Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

बाळाचा जावळ विधी: प्रक्रिया, सावधगिरी आणि टिप्स

बाळाचे जावळ काढणे म्हणजेच बाळाच्या डोक्यावरचे संपूर्ण केस काढून टाकणे. हा विधी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ही पारंपरिक पद्धत आहे आणि त्यामागे बरेच छुपे संदर्भ आणि त्याचे महत्व देखील आहे. जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न असतात आणि तो विधी खूप काळजीपूर्वक केला पाहिजे.

बाळे आणि मुलांसाठी असलेला जावळाचा विधी म्हणजे काय?

जावळ विधी किंवा जावळ संस्कारही भारतातील प्रसिद्ध पारंपरिक प्रथा आहे आणि तो करून घेणे शुभ असते असा विश्वास आहे. हिंदूंमध्ये केल्या जाणाऱ्या जावळ संस्कारह्या विधीमध्ये मुलाचे केस संपूर्णपणे काढून देवाला अर्पण केले जातात.

बाळाचे जावळ काढण्यामागे भारतीय संस्कृतीचा असलेला विश्वास

हिंदू संस्कृतीमध्ये असा ठाम विश्वास आहे की मुलाचे डोक्यावरील पहिले आलेले केस काढून टाकल्याने मुलाची शुद्धी होते आणि कोणत्याही वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तींपासून त्याला मुक्त करते.

ह्या प्रथेमागे इतरही विश्वास आहेत. आणखी माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा:

  • विशेष करून उन्हाळ्यामध्ये बाळाचे शरीर आणि डोके थंड ठेवण्यास मदत करते
  • मुलाचे शरीर आणि आत्म शुद्धी होते
  • जेव्हा बाळाला दात येण्यास सुरुवात होते तेव्हा त्यांना डोकेदुखीचा त्रास होतो. बाळाचे डोक्यावरचे केस काढून टाकल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
  • असा विश्वास आहे की जावळ केल्यावर निरोगी केस येतात तसेच केसांची वाढ सुधारते
  • हा विधी केल्याने मुलाचे आयुष्य वाढते आणि आरोग्य चांगले राहते
  • मागच्या जन्मातील काही कर्म किंवा नकारात्मकता ह्यापासून सुटका होते

जावळविधी केव्हा केला जातो?

जावळ करण्यासाठी, मुलाचे वय १३ वर्षे (ते बहुतेकवेळा जेव्हा मूल ७,९ किंवा ११) महिन्यांचे असते. काही लोक नंतरसुद्धा हा विधी करतात. ह्या कार्यक्रमासाठी, बाळाच्या पहिल्या केसांची चांगली वाढ झालेली असली पाहिजे.

जावळ विधी नंतर बाळाच्या केसांची चांगली वाढ होते हे खरे की खोटे?

बाळाच्या डोक्यावरील केस संपूर्णपणे काढून टाकल्यावर केसांची वाढ चांगली होते ह्यामागे शास्त्रीय कारण आहे. लहान मुलांमध्ये सर्वसामान्यपणे केसांची वाढ विरळ असते, कारण ते अजूनही विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात आणि लागणारी पोषणमूल्ये शोधून घेणे त्यांच्या वाढीसाठी गरजेचे असते आणि ती प्रक्रिया अजूनही होत असते.

जेव्हा पहिल्यांदा मुलाचे केस वाढतात तेव्हा ते फार मजबूत नसतात. केसांचे बीजकोष सुद्धा विखुरलेले असतात. जेव्हा हे कमकुवत केस काढून टाकले जातात तेव्हा नवीन केसांना जागा होते. ह्या नवीन केसांचे बीजकोष मजबूत असतात. नवीन केसांचा वाढीचा नमुना हा विखुरलेला किंवा गबाळा नसतो. म्हणूनमी जावळ केल्यानंतर बाळाच्या केसांची वाढ ही नक्कीच चांगली असते आणि हे नवीन आलेले केस दाट आणि मजबूत असतात.

जावळ संस्कार विधी

  • मुलाचे जावळ काढण्याचा विधी हा शुभ तारखेला केला जातो आणि ही वेळ बाळाच्या जन्मतारखेवर अवलंबून असते. त्या दिवसाला जावळ मुहूर्तअसे म्हणतात, ज्योतिषशास्त्रीय आणि पौराणिक घटक लक्षात घेऊन ही तारीख मंदिरातील पुजारी काढून देतात.
  • ठरलेल्या तारखेला आणि वेळेला पुजारी होम आणि पूजा मांडतात. आईला, बाळाला मांडीवर घेऊन त्यासमोर बसायला सांगितले जाते. काही कुटूंबे हा विधी घरीच करण्यास प्राधान्य देतात. तर इतर लोक मंदिर किंवा देवस्थानात जाऊन हा विधी करतात.
  • पुजारी पवित्र स्तोत्र म्हणत बाळाच्या केसांचा काही भाग काढतात. ह्या पवित्र स्तोत्रांना जावळ संस्कार मंत्रसुद्धा म्हणतात. हे मंत्र विशेषकरून ह्या विधीसाठी लिहिलेले असतात.
  • मुलाचे उरलेले केस न्हाव्याकडून खूप काळजीपूर्वक काढले जातात.
  • पुजाऱ्यांनी दिलेल्या पवित्र जलाने बाळाचे डोके धुतले जाते. त्यास गंगाजलअसे म्हणतात. ह्या पाण्याने बाळाला आराम पडतो असा विश्वास आहे.
  • सर्वात शेवटी, हे काढलेले केस देवाला अर्पण केले जातात किंवा पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्य मार्गाने दिले जातात.

जावळ विधी सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी काही टिप्स आणि घ्यायची खबरदारी

हा कार्यक्रम धोकादायक असतो आणि तो करताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. इथे काही महत्वाच्या गोष्टी दिल्या आहेत त्याची काळजी तुम्ही बाळाच्या जावळ विधी करण्याच्या आधी घेतली पाहिजे.

  • बाळाचे पोट भरलेले असले पाहिजे, तसेच बाळाची चांगली झोप होणे आवश्यक आहे. ह्याचे कारण म्हणजे

जावळ काढताना मुले अस्वस्थ आणि किरकिर करत असतात आणि थोडी जरी चूक झाली तर बाळाला जखम होऊ शकते.

  • बाळाचे जावळ काढणाऱ्या न्हाव्याला लहान मुलांचे केस काढण्याचा अनुभव असावा. तसेच त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असले पाहिजे कारण त्यामुळे तुमच्या बाळाला संसर्ग होऊ नये.
  • समारंभानंतर बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घालणे ही चांगली कल्पना आहे. बऱ्याच वेळा, केसाचे छोटे तुकडे अंगावर किंवा डोक्यावर अडकून राहतात. जर ते काढले गेले नाहीत, तर ते तुमच्या मुलाच्या डोळ्यात, नाकात किंवा तोंडात जाऊ शकतात आणि त्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकते. तसेच, जर हा कार्यक्रम बाहेर केला जात असेल तर अंघोळ घातल्याने डोक्यावरची धूळ किंवा घाण धुतली जाते.

  • बाळाच्या डोक्याला पहिल्यांदाच ब्लेड किंवा धातू लागल्याने बाळ ऍलर्जिक प्रतिक्रिया देऊ शकते. बाळांची त्वचा नाजूक असते, त्यामुळे बाळाला अँटिसेप्टिक किंवा घरी केलेली आयुर्वेदिक क्रीम लावावी ज्यामुळे त्वचेला झालेली हानी भरून निघेल आणि रॅशेस येणार नाहीत. बरेच लोक जावळ काढल्यानंतर बाळाच्या डोक्यावर हळद चंदन पेस्ट लावतात.

निष्कर्ष: जावळ काढण्याच्या सोहळ्याला खूप महत्त्व आणि अर्थ जोडलेले आहेत, म्हणूनच आजही अनेक कुटुंबे त्यास आपल्या परंपरेचा भाग बनवतात. अध्यात्मिक कारणांव्यतिरिक्त, या प्रथेचे मुलांसाठी फायदे आहेत. फक्त हा सांस्कृतिक सोहळा कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि संस्मरणीय प्रसंग व्हावा म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

आणखी वाचा:

बाळाला पाणी देण्यास केव्हा आणि कशी सुरुवात करावी?
बाळाला दात येतानाचा क्रम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article