Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळासाठी अननस – तुमच्या बाळाला तुम्ही अननस देऊ शकता का?

बाळासाठी अननस – तुमच्या बाळाला तुम्ही अननस देऊ शकता का?

बाळासाठी अननस – तुमच्या बाळाला तुम्ही अननस देऊ शकता का?

अननस हे एक पौष्टिक, रसाळ आणि रुचकर फळ आहे.  तुम्ही बाळाला अननस, इतर फळे आणि भाज्यांसोबत सुद्धा देऊ शकता. आणि, हो तुम्ही तुमच्या बाळासाठी अननसाच्या चविष्ट रेसिपी देखील तयार करू शकता! बाळासाठी अनुकूल अश्या पाककृती करण्यासाठी आधी तयारी आवश्यक आहे. तुमचे लहान बाळ जसजसे मोठे होत असते आणि त्याचा विकास होत असतो तसे तुम्ही त्याला इतर फळे आणि भाज्या देत असाल. परंतु त्यासोबतच तुमच्या बाळाला अननसाच्या सर्व प्रकारच्या चवी आणि पोतांशी सुद्धा तुम्ही ओळख करून दिली पाहिजे.

लहान बाळांसाठी अननस सुरक्षित आहे का?

बाळाच्या सतत वाढत जाणाऱ्या आहारात समाविष्ट करण्यासाठी अननस हा एक चांगला पर्याय आहे. त्याच वेळी, पालकांनी लहान मुलांना लिंबूवर्गीय आणि आम्लयुक्त फळे देण्याबाबत काळजी घ्यावी. बाळासाठीचे पदार्थ अगदी लक्षपूर्वक तयार करणे आवश्यक आहे. बाळाला एका वेळी फक्त एकच नवीन अन्नपदार्थ दिला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला बाळाची अन्नाविषयीची ऍलर्जीक प्रतिक्रिया तपासून पाहता येईल. तसेच, सायट्रिक ऍसिडचा बाळाला कधीकधी त्रास होऊ शकतो.

बाळ अननस कधी खाऊ शकते?

अननस हे अत्यंत आरोग्यदायी फळ असले तरी ते फक्त सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांनाच द्यावे. ह्या काळात बाळाची पचनसंस्था विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा सामना करण्यास शिकत असते. लहान बाळांना लिंबूवर्गीय किंवा आम्लयुक्त पदार्थ देत असताना पालकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जर बाळाची संवेदनशीलता जास्त असेल तर असे पदार्थ बाळ एक वर्षाचे झाल्यावर द्यावेत.

अननसाचे पौष्टिक मूल्य

फळे आणि भाज्या बाळाच्या आहारात खूप महत्वाची भूमिका बजावतात. अननस हे व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळते. त्यात व्हिटॅमिन बी 1 असते आणि ते स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या विकासात योगदान देते. अननसामध्ये फॉलिक ऍसिड, मँगनीज आणि फायबर देखील असतात आणि त्यामुळे अननस हे एक सुपर हेल्दी फूड बनते. अननसामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत आणि पचनासाठी त्याची मदत होऊ शकते.

लहान बाळांनी अननस खाल्ल्यास त्यामुळे निर्माण होणारे धोके

अननस पौष्टिक असले तरी सुद्धा बाळाला ते देताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कारण तुमच्या लहान बाळाच्या पचनसंस्थेसाठी अननस पचवणे कठीण होऊ शकते. अननसाचे पदार्थ बाळासाठी आम्लयुक्त असतात आणि त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. अननसातील ऍसिडमुळे बाळाच्या तोंडाभोवती पुरळ उठू शकतात, कारण बाळाची त्वचा नाजूक असते. अननस असलेले पदार्थ खाल्ल्याने बाळाला डायपर रॅश सुद्धा होऊ शकतात. म्हणून बाळाला अननस देत असल्यास थोड्या प्रमाणात द्या. अननस देताना इतर पदार्थांसोबत मॅश करून द्या.  बाळाने वयाचे सहा महिने पूर्ण केल्यानंतरच बाळाला अननस देण्यास सुरुवात करा. अननसाची पाचर किंवा तुकडे बाळाला देणे हे चांगले नाही, कारण हे तुकडे खूप तंतुमय असतात आणि त्यामुळे गुदमरण्याचा धोका असतो.

बेबी फूडसाठी अननस कसे निवडावे?

बाळासाठी अननस खरेदी करताना, ताज्या आणि गोड अननसाची निवड करा. हे अननस लहान किंवा मोठे असू शकते – ह्यामुळे आकारात फरक पडत नाही. सर्व अननसांचे पोत आणि पौष्टिक मूल्य सारखेच असते. परंतु, आपण खरेदी केलेले अननस जड असावे. तसेच, न पिकलेले अननस मुलांना कधीही देऊ नये, कारण त्यामुळे अतिसार, घशात जळजळ किंवा उलट्या होऊ शकतात.

बाळासाठी कोणते अननस चांगले आहे – ताजे की कॅन केलेले?

ताजे आणि रसाळ अननस हे बाळासाठी सर्वोत्तम आणि सर्वात पौष्टिक पर्याय आहेत. जेव्हा ताजे अननस उपलब्ध नसतील तेव्हाच कॅन केलेल्या अननसाचा पर्याय स्वीकारावा. कॅन केलेले फळ अननसाच्या रसात भिजवावे, सिरपमध्ये नाही. कॅन केलेले फळ कमी आम्लयुक्त असते आणि लहान मुले ते खाण्याचा आनंद घेऊ शकतात.

कॅन केलेला अननस

तुम्ही बाळासाठी सेंद्रिय अननस विकत घ्यावे का?

कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे सर्वाधिक दूषित झालेल्या फळांच्या यादीत अननस दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत, अननसाचे साल काढून टाकावे लागते. अननसाचे जाड साल प्रभावी संरक्षण प्रदान करते, कीटकनाशके शोषली जात नाहीत. त्यामुळे, बाळासाठी सेंद्रिय अननस खरेदी करणे आवश्यक नाही.

अननस वापरून बेबी फूड कसे तयार करावे?

गोड वासाचे, पिकलेले आणि ताजे अननस हे बाळाला अनुकूल असलेल्या पाककृतींसाठी वापरण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

 1. ताजे अननस हे केळी, पेअर्स, रताळे, कॉटेज चीज, मलई किंवा नारळाच्या दुधाने मॅश करून त्याची प्युरी केली पाहिजे.
 2. जर अननस कडक किंवा मॅश करण्यासाठी कठीण असेल तर ते थोडेसे वाफवून किंवा पाण्यात किंवा रसात उकळवून ते मऊ होईपर्यंत शिजवावे.
 3. अर्ध-पिकलेले अननस रसदार आणि मऊ करण्यासाठी, ते खोलीच्या तपमानावर दोन दिवस ठेवावे.
 4. कापलेले अननस जर बाळासाठी असेल तर, फ्रीजमधील हवाबंद डब्यात,पाण्यात किंवा रसात साठवून ठेवावे. एक ते दोन दिवसात ते वापरण्याची शिफारस केली जाते.

अननस बेबी फूड रेसिपी

बाळासाठी अननसाचा रस नेहमीच सर्वोत्तम असतो. काही चवदार आणि तयार करायला सोप्या पाककृतींसाठी खाली वाचा:

1. अननस योगर्ट

बाळासाठी हा एक स्वादिष्ट पदार्थ आहे. त्याला अननसाची चव असते.

अननस योगर्ट

 

लागणारे साहित्य:

 • 1 अननस चकती
 •  सफरचंद रस
 • 1 कप दही

तयारी कशी करावी?

 1. अननसाच्या रिंगला सफरचंदाच्या रसात 5मिनिटे पूर्णपणे भिजवा.
 2. ते तपकिरी होईपर्यंत ग्रील करा, नंतर ते पलटवा आणि पुन्हा असेच करा.
 3. ग्रिलमधून काढून टाकल्यानंतर ते फक्त उबदार होईपर्यंत थंड होऊ द्या.
 4. दह्यामध्ये घालण्यापूर्वी त्याची प्युरी करा.

2. अननस प्युरी

बाळासाठी अननस प्युरी सर्वोत्तम आहे. ही एक चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी आहे, बाळांना आनंद घेण्यासाठी आणि पचायला सोपी अशी ही रेसिपी आहे.

अननस प्युरी

लागणारे साहित्य: 

 • 1 कप चिरलेला अननस
 • 1 केळी

तयारी कशी करावी?

 • ब्लेंडरमध्ये घटक एकत्र करा आणि योग्य सुसंगतता येईपर्यंत प्युरी करा.
 • जास्तीची प्युरी बर्फाच्या ट्रेमध्ये फ्रीजरमध्ये ठेवता येते. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डीफ्रॉस्ट करा.
 • वेगळ्याचवीसाठी, केळीच्या जागी पेअर वापरा.

3. अननस आणि टरबूज पॉप्सिकल

दात येणा-या बाळाला शांत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यास देखील ह्याची मदत होते. परंतु, ही थंड आणि लिंबूवर्गीय रेसिपी तुमच्या बाळाला देण्यासाठी सावधगिरी बाळगा. हे फक्त अगदी कमी प्रमाणात सर्व्ह करा. घसा खवखवणे, ऍलर्जी, ओहोटी किंवा इतर आजाराच्या लक्षणांसाठी आपल्या लहान बाळावर लक्ष ठेवा.

अननस आणि टरबूज पॉप्सिकल

लागणारे साहित्य:

 • 3कप चिरलेला टरबूज
 • ½ कप अननस, चिरलेला
 • 2चमचे सफरचंद रस
 • ½ कप नारळ पाणी

तयारी कशी करावी?

 1. ब्लेंडरमध्ये सर्व साहित्य एकत्र करा आणि गुळगुळीत प्युरी करा.
 2. पॉपसिकल मोल्ड मध्ये घाला, आणि रात्रभर गोठवा.

4. उष्णकटिबंधीय स्मूदी

ही सोपी आणि स्वादिष्ट स्मूदी लहान मुलांसाठी एक मेजवानी आहे.

उष्णकटिबंधीय स्मूदी

लागणारे साहित्य:

 • ½ कप चिरलेला अननस
 • 1केळं
 • 1/3कप नैसर्गिक दही
 • 1/8टीस्पून जिरे पावडर
 • 1/8टीस्पून दालचिनी पावडर

तयारी कशी करावी?

 • सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घाला आणि गुळगुळीत प्युरी बनवा.
 • लगेच सर्व्ह करा.
 • वेगळ्याचवीसाठी, अल्ट्रा-ट्रॉपिकल स्मूदीसाठी दालचिनी आणि जिरे घालण्याऐवजी तीन चमचे नारळाचे दूध घाला.

अननस हे एक चविष्ट फळ आहे. मोठी माणसे आणि लहान मुलांसाठी त्याचे सारखेच आरोग्यविषयक फायदे आहेत. लहान मुलांना हे उष्णकटिबंधीय फळ देण्याचे ठरवताना, आपल्या मुलाच्या संवेदनशीलतेची जाणीव ठेवा. एकदा तुमच्या लहान मुलाने ह्या फळाचा आनंद घ्यायला सुरुवात केली की, त्याचा पुरेपूर फायदा घ्या! अननस घालून तयार केलेले पदार्थ बाळाला दिल्यास ते तुमच्या बाळाचे सर्वात आवडते फळ बनू शकते.

आणखी वाचा:

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी
तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ देणे सुरक्षित आहे का?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article