Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ देणे सुरक्षित आहे का?

तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ देणे सुरक्षित आहे का?

तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ देणे सुरक्षित आहे का?

बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की ते घन पदार्थ खाण्यास तयार होते. पालक म्हणून तुम्हाला तुमच्या बाळाला अगदी रोज नाही, तरी प्रत्येक आठवड्याला नवीन पदार्थ भरवावेसे वाटतील. मऊ कुस्करलेला वरण भात आणि भाज्यांची प्युरी ही तुमची पहिली पसंती असेल. तुम्ही बाळाच्या आहारात काही फळांचा समावेश करण्याचा विचार करू शकाल. फळे पौष्टिक असतात आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकतात. परंतु, विशेषतः १ वर्षाखालील मुलांसाठी सगळी फळे सुरक्षित नसतात. तुम्ही तुमच्या लहान बाळाला ड्रॅगन फळ देऊ शकता का हे जाणून घेण्यासाठी हा लेख मदत करेल. ड्रॅगन फ्रूट त्याचे पौष्टिक मूल्य आणि चांगल्या चवीमुळे प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फळ बाळांसाठी सुरक्षित आहे का ते जाणून घेऊया.

तुम्ही तुमच्या बाळाला ड्रॅगन फळ द्यावे का?

ड्रॅगन फळ हे जीवनसत्त्वे ए, बी १, बी २, बी ३, आणि सी, लोह आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. ह्या फळामध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात.त्यामुळे पचन सुधारते. बाळाला ड्रॅगन फळ देण्यासाठी एक वर्षापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला जात असला तरी, काही माता त्यांच्या बाळांना ६ महिन्यांपासून ड्रॅगन फळाची ओळख करून देतात. बाळाला ह्या फळाची ऍलर्जी नसल्यास बाळ हे फळ पचवू शकते.

लहान बाळांसाठी ड्रॅगन फळाचे आरोग्यविषयक फायदे

ड्रॅगन फळ खाल्ल्याने तुमच्या बाळाला कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.

. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते

ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. फ्री रॅडिकल्समुळे पेशींच्या भित्तिकांचे नुकसात होते त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी हे अँटिऑक्सिडंट्स मदत करतात. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या लहान बाळाची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करू शकतात आणि त्यामुळे त्याला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.

. हृदयाचे रक्षण करू शकते

ड्रॅगन फ्रूटमध्ये पोषक तत्वे असतात. ही पोषक तत्वे लहान मुलांच्या आणि प्रौढांच्या हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. आहारात ड्रॅगन फळाचा समावेश करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

. हाडे मजबूत करण्यास मदत करू शकते

कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असलेले ड्रॅगन फळ हाडांच्या विकासासाठी मदत करू शकतात. फॉस्फरस फिनोलिक आणि फ्लेव्होनॉइड ह्या घटकांमुळे हाडांची घनता सुधारते तसेच हाडे मजबूत होतात. बालपणातील मुडदूस आणि नंतर संधिवात यांसारख्या आजारांपासून दूर राहण्यास हे घटक मदत करू शकतात. ड्रॅगन फ्रूट मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. हाडे, स्नायू आणि त्वचेच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते गरजेचे असते आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. ड्रॅगन फ्रुट मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते आणि स्कर्वी सारख्या आजारांना प्रतिबंधित करू शकते.

. पचन सुधारण्यास मदत होऊ शकते

आतड्याच्या निरोगी हालचालीसाठी आणि पचनसंस्थेची देखभाल करण्यासाठी तंतुमय पदार्थ आवश्यक आहेत. ड्रॅगन फ्रुट मुळे साखरेचे प्रमाण स्थिर राहते आणि बाळाचे पोट भरलेले राहून वजनात वाढ होते. फळांमध्ये जास्त प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

पचन सुधारण्यास मदत होऊ शकते

. डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकते

निरोगी डोळे आणि चांगल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन ए आवश्यक आहे. ड्रॅगन फ्रूट व्हिटॅमिन ए चा समृद्ध स्रोत आहे. रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.

. अशक्तपणा टाळण्यासाठी मदत करू शकते

ड्रॅगन फ्रूट लाल रक्तपेशींची संख्या वाढवण्यास मदत करते कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आहे. त्यामुळे ऍनिमिया होत नाही. लहान मुलांमध्ये ऍनिमिया आढळल्यास त्यांचा विकास नीट होत नाही. केसांच्या निरोगी वाढीस चालना देण्यासाठी भरपूर लोह सामग्री देखील आवश्यक आहे.

. मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत होते

ड्रॅगन फ्रूटमधील फॉस्फरस, सोडियम आणि कॅल्शियमचे प्रमाण मज्जासंस्थेचे कार्य योग्यरीत्या आणि सुरळीतपणे चालण्यासाठी मदत करते. म्हणजेच बाळामध्ये चांगली मोटर आणि संवेदी कौशल्ये विकसित होतात.

. त्वचा निरोगी राहते

त्वचा तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. ड्रॅगन फ्रूट, हे व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या बाळाच्या त्वचेचा पोत चांगला राहण्यासाठी आणि कोमलता राखण्यासाठी ते मदत करू शकते.

बाळाला ड्रॅगन फ्रूट खायला देण्यापूर्वी घ्यावयाची खबरदारी

इतर कोणत्याही अन्नाप्रमाणेच, बाळाला ड्रॅगन फळ देण्याआधी तुम्हाला पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे तुमच्या मुलाला ड्रॅगन फ्रूटची ऍलर्जी आहे की नाही हे तपासावे लागेल. तुमच्या बाळाला ड्रॅगन फ्रूट खायला घालताना, सर्वात आधी, फळाचा एक छोटासा भाग खायला द्या. तोंडावर किंवा ओठांवर पुरळ किंवा सूज यासारख्या ऍलर्जीक प्रतिक्रियांकडे लक्ष द्या. काहीवेळा काही खाद्यपदार्थांमुळे पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो. अतिसार आणि सूज यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात.

फळ चांगले धुतले जाणे आवश्यक आहे कारण त्यात परागकणांचे अंश असू शकतात ह्या पराग कणांमुळे ऍलर्जी होऊ शकते. ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण चांगले असल्याने ते थोडे ऍसिडिक असते. त्यामुळे बाळाच्या पोटात जळजळ होऊ शकते आणि म्हणूनच हे फळ फक्त इतर पदार्थांसह सुरू केले पाहिजे. शंका असल्यास, आपल्या बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

तुमच्या बाळाच्या आहारात ड्रॅगन फळाचा समावेश कसा कराल?

एकदा तुमच्या बाळाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली की, बाळाला ड्रॅगन फ्रूट देणे खूपच सोपे आह. तुम्ही हे फळ मध्यभागी कापून आतील खाण्यायोग्य गर वेगळा काढून घ्या आणि बिया काढून टाका. बाळासाठी लाल ड्रॅगन फळ देणे चांगले आहे कारण ते पांढऱ्या फळांपेक्षा अधिक स्वादिष्ट असते. जर तुमच्या बाळाला त्याची चव आवडत असेल, तर तो गडबड न करता ते खाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आधी लाल ड्रॅगन फळापासून सुरुवात करा. ड्रॅगन फ्रूट ची प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता किंवा ब्लूबेरी, सफरचंद, क्रॅनबेरी आणि पीच सारख्या इतर फळांसह देखील ते दिले जाऊ शकते.ड्रॅगन फ्रुट दह्यासोबत देणे चांगले असते आणि काही चिकन डिशेश मध्ये सुद्धा ते वापरले जाते.

लहान मुलांसाठी ड्रॅगन फ्रूट प्युरी कशी तयार करावी?

ड्रॅगन फ्रूट प्युरी बद्धकोष्ठतेपासून आराम देऊ शकते आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करू शकते. बाळाला त्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक त्याद्वारे मिळू शकतात. आपल्या बाळाला ड्रॅगन फळ कसे द्यावे हे इथे दिलेले आहे.

लहान मुलांसाठी ड्रॅगन फ्रूट प्युरी कशी तयार करावी?

लागणारे साहित्य:

ड्रॅगन फ्रूट प्युरी बनवण्यासाठी तुम्हाला खालील साहित्य आवश्यक आहे

  • १ कप चिरलेले ड्रॅगन फळ
  • २ टेबलस्पून साखर
  • पाणी

कृती:

चिरलेले ड्रॅगन फळ ब्लेंडरच्या भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये साखर आणि पाणी घालून गुळगुळीत होईपर्यंत एकत्र करा. बिया तशाच राहिल्यास तुम्ही चाळणीने बिया गाळून घेऊ शकता. लगेचसर्व्ह करा.

ड्रॅगन फळाची चव चांगली असते आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण तुमच्या बाळाच्या आहारात त्याचा समावेश करण्यापूर्वी बाळाला त्याची ऍलर्जी नसल्याची तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. तुमच्या लहान बाळाच्या आहारात ड्रॅगन फळ किंवा इतर कोणतेही नवीन अन्न समाविष्ट करण्यापूर्वी बालरोगतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा:

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी
बाळांसाठी द्राक्षे: आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपी

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article