In this Article
नवरात्रीचे हे नऊ शुभ दिवस, श्री दुर्गा मातेच्या नऊ अवतारांचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि उपासनेसाठी असतात. या नऊ दिवसांच्या उत्सवात, दुर्गा देवीच्या सर्व नऊ रूपांची पूजा केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचा वाईट आत्म्यांवर झालेला विजय साजरा केला जातो. नवरात्र वर्षातून चार वेळा येते, पण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र सर्वात जास्त प्रमाणात साजरे केले जाते. हे नऊ दिवस उत्साहाने, आनंदाने आणि सत्कर्म करून साजरे केले जातात. रामनवमीपर्यंत या नऊ दिवसांत लोक आपली घरे स्वच्छ करतात, नवीन कपडे घालतात, उपवास करतात आणि देवीचे भजन आणि कीर्तन करतात.
हा नवरात्रोत्सव साजरा करत असताना चांगले कपडे घालणे तसेच इतर गोष्टींव्यतिरिक्त, लोक त्यांच्या प्रियजनांना आणि सहकाऱ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगले संदेश आणि शुभेच्छा शेअर करतात.
नवरात्रीच्या शुभेच्छा आणि संदेश
तुमच्या गोड शुभेच्छा किंवा संदेश कुणालातरी आनंदी करू शकतात . यंदाच्या नवरात्रीत, आपल्या प्रियजनांना आणि सहकाऱ्यांना इंग्रजी, हिंदी, हिंग्लिश आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये संदेश आणि शुभेच्छा पाठवून हे नवरात्र साजरे करूया.
- देवी दुर्गा तुम्हाला जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला अपार शक्ती देवो. नवरात्रीच्या खूप शुभेच्छा!
- या नवरात्रीत तुम्हाला खूप आनंद आणि यश मिळो अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
- नवरात्रीचे नऊ दिवस तुमचे घर आणि हृदय सकारात्मकतेने, चांगल्या विचारांनी आणि आनंदाने भरून जावो. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- नवरात्रीचे हे नऊ दिवस आपल्या सर्वांना जीवनात आनंदी राहण्यासाठी आणि आयुष्यात जे काही मिळालेले आहे त्याबद्दल आभार मानण्याची प्रेरणा देतात. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- या नवरात्रीत भक्ती, सुसंवाद आणि आनंदाच्या रंगीबेरंगी रंगांनी तुमचे हृदय भरून जावे. हे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला आनंदी आणि मंगलमय जावो हीच शुभेच्छा!
- श्री देवी दुर्गेचे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भरपूर आशीर्वाद लाभोत. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- माँ दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
- माँ दुर्गा का सदा राहे आशीर्वाद,
धन, समृद्धी, सुख और कमियाबी का दे आपको आशीर्वाद,
नवरात्री की नौ रातें रोशन कर देंगे आपका जीवन,
नवरात्री की शुभ कामनाये !
- या नवरात्रीमध्ये तुम्हाला जीवनातील अडचणी आणि समस्यांना तोंड देण्यासाठी पुरेसे सामर्थ्य मिळावे आणि तुम्हाला यश मिळावे ह्या सदिच्छेसह, शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
- या नऊ शुभरात्री च्या कालावधीत उग्रता आणि सौम्यतेचा आनंद घ्या. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान तुमचे जीवन अतुलनीय ऊर्जा आणि आनंदाने भरून जावो. तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा!
- तुम्हाला श्री देवी दुर्गेकडून सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य, श्री लक्ष्मीकडून समृद्धी आणि श्री सरस्वती कडून बुद्धी लाभो हीच शुभेच्छा. नवरात्रीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
- श्री वैष्णोदेवीचे ९ अवतार तुम्हाला ज्ञान, आनंद, सुसंवाद, भक्ती, मानवता, आरोग्य, शांती, नाव आणि कीर्ती या ९ गुणांचे आशीर्वाद देवोत. नवरात्रीसाठी शुभेच्छा!
- नवरात्रीचा शुभ सण तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- ही नवरात्री तुमच्या जीवनाला एक प्रगल्भ उद्देश, वाटचाल करण्याची नवी दिशा देवो आणि जीवनात नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळो. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
- ह्या नवरात्रीमध्ये तुमचे घर आणि हृद्य सकारात्मक ऊर्जेने उजळून जावो. तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभोत. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
- या नवरात्रीत, अग्नी देवता तुम्हाला प्रकाशित करो. जय माता दी!
- नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला खूप आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा .
- हे नवरात्र तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आनंद आणि भरभराट घेऊन येवो. जय माता दी!
- इस नवरात्री आपकी मनोकामनायेन हो पुरी. आप पाये सुख समृद्धी आणि शांती. माँ दुर्गा के आशीर्वाद हमेशा रहे आपके और आपके परिवार पे. जय माता दी!
- नवरात्रीच्या शुभ नऊ दिवसांच्या उत्सवानिमित्त माझ्या शुभेच्छा पाठवत आहे. जय माता दी!
- माता वैष्णो, सरस्वती आणि लक्ष्मी तुम्हाला तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व शक्ती तुम्हाला देवो! . नवरात्रीच्या शुभेच्छा!
- नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही पूर्ण भक्तिभावाने आणि अंत:करणाच्या शुद्धतेने साजरे करा. जय माता दी!
- नवरात्रीचा पवित्र काळ जवळ आला आहे, सर्व वातावरण प्रेम आणि आनंदाने भरलेले आहे,हे नवरात्र तुमच्यासाठी उत्तम यश घेऊन येईल अशी आशा आहे! नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
- तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच तुम्हाला मोठी शक्ती देण्यासाठी माता दुर्गा सदैव तत्पर राहो.
- नवरात्रीचा हा कालावधी आनंदाचा आणि समृद्धीचा जावो. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- माँ शेरवाली तुम्हाला चांगले भाग्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी आयुष्य देवो. नवरात्रीच्या शुभेच्छा.
- यंदाच्या नवरात्रीमध्ये, देवी सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. जय सरस्वती माता!
- या नवरात्रीला तुमच्यावर देवीची कृपा राहूदे. जय भैरवी!
- प्यार का तराना ऊपर हो, खुशीयो का नजराना बेशुमार हो, ना रहे कोई गम का एहसास, ऐसा नवरात्र उत्सव हा साल हो!
- नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा… तुमच्या जीवनात शाश्वत आनंद आणि समृद्धी घेऊन येणारे नऊ दिवस उत्सव, उत्साह, उपवास, नृत्य, मेजवानी आणि दांडिया यांनी भरलेले जावोत यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
- आनंद आणि वैभव घेऊन येणाऱ्या ह्या नवरात्रीच्या विशेष प्रसंगी, मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देतो. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
- तुमचे जीवन समृद्धी, यश, धन आणि ऐश्वर्याने भरावे! जय माँ वैष्णो! नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
- सर्व नऊ देवी तुम्हाला शाश्वत आनंद आणि यश देवो. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
- घरात माता दुर्गेच्या आगमनाने नवीन सुरुवात करा. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
- आई अंबेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तेव्हा आयुष्यात घाबरण्यासारखे काही नाही. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- नवरात्रीच्या काळातील सकारात्मक स्पंदने तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकतील आणि तुमचा हा काळ अगदी उत्साहात पार पडेल. जय माता दी!
- माझ्या जिवलग मित्राला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री देवीच्या कृपेने तुम्हाला जीवनात उत्तम आरोग्य, शांती आणि आनंद लाभो! नवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!
- नवरात्रीच्या सर्व नऊ रात्री तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
- तुमच्या सर्व प्रयत्नांना फळ मिळू दे अशी माझी तुमच्यासाठी अंबे चरणी प्रार्थना. ह्या नवरात्रीला तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्वोत्कृष्ट गोष्टींचा वर्षाव तुमच्यावर होवो ही प्रार्थना!
तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी कोट्स!
नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हे कोट्स शेअर करून नवरात्रीचे नऊ दिवस अधिक खास बनवा. हिंदी आणि मराठी भाषेतील हे सुंदर कोट्स त्यांना नक्कीच आनंदित करतील.
- गणेश का निवास हो, लक्ष्मी का हाथ हो, सरस्वती का साथ हो और माँ अंबे के आशीर्वाद से आपके जीवन मै प्रकाश ही प्रकाश हो!
- नवरात्रीच्या दिवशी, माँ वैष्णो आपल्या सर्वांना शक्ती, सकारात्मकता, बुद्धी आणि भक्तीने प्रेरित करे!
- जय अंबे! जय भवानी! जय दुर्गा!
एकत्र या आणि मजा करा,
दांडिया रास सुरु झाला आहे,
दुर्गा माता आपल्याला आशीर्वाद देत आहे,
तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा! - माता भारती झोळी खाली!
माता अंबे वैष्णो वाली!
माता संकट हरणा वाली!
माता विपडा मिटने वाली!
माता के सब भक्तो को नवरात्री की हार्दिक सुभ कामनायें! - नवरात्रीचे तेजस्वी रंग आपल्या जीवनात चैतन्य आणि सकारात्मकता आणू दे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या मंगलमय आणि आनंददायी शुभेच्छा!
- माँ दुर्गा आपको , बुद्धी, सुख, ऐश्वर्या और सुख प्रदान करे! जय माता दि
- नवरात्री के शुभ अवसर पर भूल दो सारे गम और खुशीयों से भर लो अपना मन. आशीर्वाद माता का जीवन में भर लो नये रंग! शुभ नवरात्री!
- माँ की आराधना का पर्व है आया, साथ में खुशी है लाया, बिगडे काम बन जायेंगे, यश और समृद्धी से घर आंगन मेहेक जायेंगे, नवरात्री शुभेच्छा.
- तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व शक्ती तुम्हाला देण्यासाठी माँ दुर्गा सदैव तत्पर राहो. तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
- लक्ष्मी का हाथ हो, सरस्वती का साथ हो, गणेश का निवास हो;
और माँ दुर्गा के आशीर्वाद से आपके जीवन मै प्रकाश ही प्रकाश हो. - हा चौफेर पसरलेला सोनेरी प्रकाश, हवेतील सुगंध, ही मंद वाऱ्याची झुळूक, थंड हवा आणि मनसोक्त संगीत. अरे! ही तर नवरात्रीची सुरुवात! नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
- नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला शुभेच्छा पाठवत आहे! तुम्हाला नवरात्रीचा हा काळ आनंदी आणि भरभराटीचा जावो हीच सदिच्छा!
- आओ हम सब हो जाए तैयर, गरबे की आने वाली है रात, तन, मन और जीवन में भर जायेगी नयी उमंग,आओ साथ मिल्कर मनायेन नवरात्री!
- नवदुर्गाचे दैवी सौंदर्य आणि तिच्या शक्तींचा चांगला विचार करून आणि चांगले कार्य करून हा उत्सव साजरा करा. जय माता दी! शुभ दुर्गापूजा!
- नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या सर्व समस्या कमी होवोत आणि तुमच्या सर्व संधी उजळून निघू दे.
- देवी दुर्गा म्हणजे शक्तीचा अवतार आहे. ह्या शक्तीने जगाच्या दुष्कृत्यांवर मात केली आहे. या नवरात्रीत प्रत्येकाने आपल्या जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी देवीचे आशीर्वाद आणि सामर्थ्य वापरावे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीसाठी छान व्हाट्सअप स्टेटस
आजकाल लोक व्हाटसऍप वर स्टेटस ठेवतात. त्यानिमित्ताने लोकांना नवरात्रीच्या नऊ उत्सव रात्रींची आठवण करून दिली जाते. खाली काही नवरात्रीचे आशीर्वाद दिलेले आहेत जे तुम्ही नवरात्रासाठी स्टेटस म्हणून वापरू शकता
- नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माँ दुर्गेच्या नऊ अवतारांचे आशीर्वाद घेताना आपण गरबा करून उत्सवाचा आनंद घेऊ या!
- नऊ देवींच्या पूजेच्या नऊ दिवसांच्या उत्सवात स्वतःला झोकून द्या. नवरात्रीच्या शुभेच्छा!
- तुमच्या नातेसंबंधाची स्थिती बदलण्यासाठी नाही तर देवीवरील तुमचे प्रेम समर्पित करण्यासाठी गरबा खेळा,
- यंदाच्या नवरात्रीमध्ये, देवी अंबे तुमचे सर्व दुःख दूर करो आणि तुम्हाला आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभो. जय माता दी!
- पग पग में फूल खिले,
ख़ुशी आप सबको इतनी मिले,
कभी न हो दुखों का सामना,
यही है नवरात्री की शुभकामना।
जय माता दी । - मां लक्ष्मीने तुम्हाला सद्गुण आणि दैवी गुणांची आंतरिक संपत्ती दान करावी अशी शुभेच्छा.
- तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- मां दुर्गा, मां अंबे, मां जगदंबे,
मां वैष्णो, मां भवानी, मां शीतला, मां चंडी,
माता रानी मेरी और आपकी मनोकामना पूरी करें!
शुभ नवरात्रि - तुमच्यासाठी नऊ नवरात्रीचे प्रसाद पाठवत आहे:
शांती
शक्ती
संयम
सन्मान
सरलता
सफलता
समृद्धी
संस्कार
स्वास्थ - नवरात्री की शुभकामनाये! माँ अंबे आपको आणि आपके परिवार को धन, धन्य, बाल, बुद्धी, सुख, ऐश्वर्या, समृद्धी और संपन्ता प्रदान करे! ओम नमो दुर्गेय !
आम्हाला आशा आहे की तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी तुम्हाला वरील लेखामध्ये सर्वात योग्य कोट्स सापडतील. माँ दुर्गा तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो!
आणखी वाचा:
मुलांसाठी नवरात्र आणि दसरा ह्या सणांची माहिती
नवरात्रीच्या उपवासासाठी तुम्ही करून बघू शकता अश्या चवदार पदार्थांच्या रेसिपी