In this Article
पालक आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल, पहिले हास्य आणि ह्या जगातील त्याच्या पहिल्या काही क्षणांची आतुरतेने वाट पहात असतात. बाळ त्याच्या जन्मानंतर, तो एक वर्षाचा होण्यापूर्वी बरेच विकासात्मक टप्पे पार करतो. पालक म्हणून, आपल्याला बाळाच्या विकासाशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी ह्या टप्प्यांची माहिती असणे आवश्यक आहे आणि बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याच्या प्रत्येक विकासाच्या टप्प्याचा आनंद घ्या.
एक ते सहा महिने वयाच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता
एक ते सहा महिन्यांच्या वयोगटातील बाळांचा शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक विकास होतो. हा विकास वेगाने होतो आणि आपण त्यांना पालक म्हणून समजून घेणे महत्वाचे आहे जेणेकरुन तुमचे बाळ निरोगी आणि आनंदी राहील. बाळाच्या विकासावर लक्ष ठेवण्यासाठी बाळाच्या दरमहा विकासाचा मार्गदर्शक चार्ट ते देतात. त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
बाळासाठी पहिले काही महिने विचित्र तसेच रोमांचक असतात. बरीच बाळे अगदी कमी अवधीत मोटर आणि शारीरिक कौशल्ये विकसित करतात. १ ते ६ महिन्यांपर्यंतच्या मुलांच्या विकासाबद्दल अधिक माहितीसाठी खालील सारणीचा संदर्भ घ्या.
बाळाचे वय | प्राप्त कौशल्य (बहुतेक बाळ हे करू शकतात) | उदयोन्मुख कौशल्ये (बरेच मुले करू शकतात) | प्रगत कौशल्ये (काही मुले करू शकतात) |
पहिला महिना | तुमचे नवजात बाळ फॉर्म्युला आणि स्तनपानाच्या वासामध्ये फरक करू शकते.
तुमच्या मुलाच्या पसंतीचे संवादाचे माध्यम रडणे हे आहे तुमचे बाळ आपले पाय ताणून किक मारू शकते. |
जर एखादे बाळ घाबरले असेल तर ते आपले हातपाय आत खेचतील. ह्यास इंग्रजीमध्ये स्टार्टल रिफ्लक्स म्हणतात.
तुमच्या बाळाची दृष्टी अद्याप विकसित होत आहे, म्हणून बाळ जवळच्या वस्तूंकडे लक्ष देईल. तुमचे बाळ डोके वर उचलू शकते. |
तुमचे नवजात बाळ गोड गोष्टींना प्राधान्य देण्यास सुरवात करेल |
दुसरा महिना | बाळाला घेतल्यास ते जास्त काळ डोके स्थिर ठेवू शकतात.
रेकल्यासारखा आवाज काढण्याइतपत संवाद कौशल्य सुधारते बाळाची हाताची आणि पायाची बोटे वेगाने वाढतात. बाळाला आता गोलाकार आकार आणि रंग चांगले दिसू शकतात. |
हातांची मूठ करू लागते.
श्रवणक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते आणि बाळाला अधिक चांगले ऐकू येऊ लागते. |
हातात स्टफ टॉय दिल्यावर धरून ठेवते.
पहिल्यांदा स्मित हास्य देते. |
तिसरा महिना | पाठीवर/पोटावर झोपवलेले असताना बाळ पायाने लाथ मारू शकते.
मान वर करून बाळ त्याच्या दृष्टिक्षेपातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकते. बाळ आता संभाषणासारखा संवाद साधायला सुरुवात करते. |
बाळ हसायला आणि ओळखायला सुरुवात करेल. | बाळ स्वतःचे स्वतः पालथे पडण्यास सुरुवात करेल. |
चौथा महिना | बाळ खेळण्यांना अधिक घट्ट पकडू शकतो.
पालथे पडू शकते आणि आधार दिल्यास बसते. बाळाची दृष्टी सुधारते आणि तो दूरवरून चेहरे ओळखू शकतो. |
जन्मापासून आतापर्यंत तुमच्या बाळाचे वजन दुप्पट झाले असेल.
त्याची भूक वाढेल. वस्तू आणि आसपासच्या लोकांबद्दल गतिशीलता आणि कुतूहल वाढलेले असेल |
बाळाचे संवाद कौशल्य सुधारते आणि त्यामध्ये मोठ्याने हसणे आणि आवाज काढणे ह्यांचा समावेश होतो. |
पाचवा महिना | आपले बाळ त्याचा पहिला शब्द वापरण्याचा प्रयत्न करेल.
तो थोडा प्रयोगशील होईल, आणि सभोवतालच्या गोष्टींना सतत स्पर्श करेल. बाळ वेगवेगळे चेहरे ओळखेल आणि बाळ हसू लागेल |
थोडा आधार दिल्यास दीर्घ काळासाठी सरळ बसण्यास सक्षम असेल.
पोटावर झोपवल्यास मान धरेल. |
आपले बाळ रांगायला सुरूवात करेल |
सहावा महिना | आपले बाळ वेगवेगळे चेहरे ओळखेल
बाळ हसू लागेल. तो खोलीत सहज पाहू शकतो, कारण त्याची दृष्टी सुधारते |
वेगवेगळ्या पदार्थांची चव आणि पोत ओळखेल
आपल्या बाळाच्या मुखात दात दिसू लागतील तो त्याचे नाव ओळखण्यास सुरवात करेल आणि लोक त्याला हाक मारतील तेव्हा तो प्रतिसाद देईल |
आधाराने उभे राहू लागेल |
पुढच्या सहा महिन्यांमध्ये, तुमच्या बाळाची आणखी काही कौशल्ये विकसित होतील तसेच पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विकसित झालेल्या कौशल्यांमध्ये आणखी प्रगती होईल. चला तर मग सात ते बारा महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता पाहुयात.
सात ते बारा महिने वयाच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता
बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर, बाळाची वाढ इतकी वेगात होते की तुम्हाला परिस्थिती हाताळणे अवघड होते. आणि ह्याच वेळेला खाली दिलेला विकासाचा तक्ता तुमच्याकडे असणार आहे.
बाळाचे वय | प्राप्त कौशल्य (बहुतेक बाळ हे करू शकतात) | उदयोन्मुख कौशल्ये (बरेच मुले करू शकतात) | प्रगत कौशल्ये (काही मुले करू शकतात) |
सातवा महिना | संवाद कौशल्य सुधारेल आणि तुमचे लहान बाळ आवाजाचे अनुकरण करेल. बाळाचे वजन त्याच्या जन्माच्या वेळच्या वजनाच्या दुप्पट असेल.
बाळ दोन्ही बाजूने पालथे पडू लागते. |
चेहरे ओळखू लागेल आणि एखाद्याकडे बघून हसू लागेल
बाळाचे कुतूहल वाढेल आणि हातातील वस्तूचे सर्व बाजूनी निरीक्षण करेल |
स्वतःचे स्वतः आधाराने उभे राहू शकेल. |
आठवा महिना | आपले बाळ पालथे पडू शकते आणि आधाराशिवाय बसू शकते. पुढे वाकून एका हाताने वस्तू उचलू शकते.
तुमच्या बोलण्यातून त्याला पूर्वीपेक्षा जास्त शब्द समजू लागतात. |
बाळ, ‘पा’, ‘बा’, ‘मा’, इत्यादी सोप्या शब्दांसह आवाज करणे सुरू करू शकते.
आपले बाळ आता रांगण्यासाठी तयार असते |
बाळ एका हातातून दुसर्या हातात वस्तू हस्तांतरित करू शकते. |
नववा महिना | तुमचे बाळ घन पदार्थांचा आनंद घेऊ लागेल आणि त्या गोष्टींना प्राधान्य असेल.
आपण ओळख करुन दिल्यास बाळ अनेक प्रकारचे वास ओळखू शकतो. |
आपले बाळ आठवणींना जोडण्यासाठी संज्ञानात्मक क्षमता विकसित करेल.
तो त्याच्या खेळण्यांशी अधिक प्रयोगशील होऊ शकतो आणि खेळणी जमिनीवर आपटू किंवा फेकू शकतो. |
तो एका शब्दाचा वापर करून संवाद साधू लागेल आणि क्रोधापासून आनंदा पर्यंतच्या भावना व्यक्त करण्यास सक्षम असेल |
दहावा महिना | बाळाचे कुतूहल वाढते बाळ त्याच्या सभोवतालच्या गोष्टींकडे लक्ष देणे सुरू करते.
आपले बाळ काही तास न थकता सतत हालचाल करते. |
बाळ त्याच्या जवळच्या लोकांना ओळखण्यात आणि गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यात सक्षम असेल.
बाळावर लक्ष ठेवल्यास आणि परवानगी दिल्यास आपले बाळ स्वतःच सोप्या क्रिया करू शकेल.उदा: केस विंचरणे. |
बाळ चालण्याचा प्रयत्न करू शकेल. |
अकरावा महिना | तुमचे बाळ आरशात बघू लागते आणि स्वत: ला आणि तुम्हाला ओळखू लागते.
बॉक्स आणि कार्टन्ससारख्या सोप्या गोष्टींनी त्याला आनंद होईल. |
तो ‘ओ’ आणि ‘आह’ असे बोलून व्यक्त होऊ शकेल.
बाळ वारंवार त्याच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करेल. |
तो चालण्याचा प्रयत्न करेल |
बारावा महिना | आपल्या छोट्या मुलाने बारा महिन्यांच्या शेवटी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे आणि तो स्वत: ला चांगले संतुलित करू शकतो.
तो स्वतःचे स्वतः बसून रांगू शकतो. त्याला त्याच्या सभोवतालची उत्सुकता आहे आणि आता तो हालचाल करू शकतो, तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे शोधू घेऊ शकतो. |
विशिष्ट अन्नपदार्थांना प्राधान्य देतो आणि चवीतील फरक कळतो.
एक चमचा, हात किंवा सिप्पी कप/बाटली वापरुनही बाळ स्वत:चे स्वतः खाणेपिणे सुरू करू शकते |
बाळाची शारीरिक क्रिया वाढते. बाळ जास्त वेळ खेळू लागते |
शारीरिक, मानसिक आणि मानसशास्त्रीय महत्त्वाचे टप्प्यांची नोंद ठेवणे आणि तुलनेसाठी वाढीचा चार्ट वापरल्याने आपल्या बाळाचा योग्य विकास होत असल्याचे सुनिश्चित होते. वेगवान जगात आपल्या लहान बाळाला मार्गदर्शन करणे कठीण होते, परंतु पालकांनी बाळाच्या वाढीच्या पहिल्या वर्षात त्याच्याबरोबर बोलणे, खेळणे आणि नातेसंबंध विकसित करणे देखील महत्त्वाचे आहे. आणि मग, तुमच्या बाळाच्या विकासाचा प्रत्येक टप्पा तुमच्यासाठी आनंददायी असेल.
स्रोत अणि सन्दर्भ:
आणखी वाचा: तुमच्या नवजात बाळाची वाढ आणि विकास