Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

जन्मापासूनच्या पहिल्या काही महिन्यांमध्येच तुमच्या बाळाचे संवेदना आणि हालचाल कौशल्य विकसित होईल. रांगणे, हसणे, बोटांच्या चिमटीत वस्तू पकडणे इत्यादी अनेक विकासाचे टप्पे बाळाने पार पडले आहेत आणि त्यामुळे भविष्यातील शारीरिक आणि सामाजिक कौशल्ये विकसित होण्यासाठी ते तयार आहेत. इथे आपण तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांविषयी चर्चा करणार आहोत.

बाळाची वाढ

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळावर लक्ष ठेवणे आधीपेक्षा खूप कठीण आहे. तुमचे बाळ नवीन वातावरणात वेगवेगळ्या गोष्टी शिकत आहे, आधी पेक्षा जास्त बडबड करत आहे तसेच बाळाची वेगवेगळ्या गोष्टींविषयी उत्सुकता सुद्धा वाढली आहे. बाळ जसजसे १ वर्षाचे होऊ लागते तसे बाळाची वाढ आणि विकासाशी संलग्न बदल ओळखणे कठीण होते.

बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाची उत्सुकता वाढलेली असणार आहे. बाळाला खेळ खेळायला आवडतील. बाळाचा शारीरिक विकास आणि वाढलेला संवाद टिपून ठेवण्यासाठी तुमचा कॅमेरा तयार ठेवा. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की इतर मुलांपेक्षा तुमच्या बाळाचा विकास थोडा आधी किंवा नंतर होऊ शकतो, त्यामुळे त्याविषयी काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. प्रत्येक बाळाचा वाढीचा आणि विकासाचा वेग वेगवेगळा असतो आणि तुमच्या बाळाला जो वेग आरामदायक वाटेल त्यानुसार बाळाची वाढ होत असते. बाळाचा आत्मविश्वास मात्र तुम्ही वाढवत राहिले पाहिजे, बाळाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होतो आहे हे बाळाला कळू द्या. जर तुम्ही तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाच्या विकासाविषयी चिंतीत असाल तर तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधा.

  • ४४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ आधीपेक्षा आता बरेच शब्द बोलण्याचा प्रयत्न करू लागेल. तुमच्या बाळाच्या मेंदूचा सतत विकास होत असतो आणि बाळाचे बोलणे आणि तर्कसंगती अजून मजबूत होते आहे. तुम्ही बाळाच्या वाढलेल्या उत्सुकतेला नीट ऐकून प्रोत्साहन द्या आणि बाळ जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा बाळास प्रतिसाद द्या.

तुमचे बाळ आता १ वर्षांचे होते आहे आणि तुम्ही बाळाच्या शिस्तीविषयी तुमच्या पतीसोबत बोलले पाहिजे. पालकत्वाच्या पद्धती प्रत्येक पिढीच्या वेगळ्या असल्या कारणाने पालकत्व कसे करावे ह्याबाबत तुमचे आणि तुमच्या पतीचे मतभेद होऊ शकतात. आणि ते संपूर्णतः नैसर्गिक आहे. आपण आपल्या पतीसोबत ह्याविषयी शांतपणे चर्चा केली पाहिजे आणि बाळाला शिस्त लावण्याबाबत दोघांचे एकमत कसे होईल ते पहावे.

आधी ११ महिन्याच्या बाळाला शौचास कसे करावे (Potty training) ह्या विषयी प्रशिक्षण दिले जायचे आता संशोधनानुसार तुम्ही बाळ १८ ते २४ महिन्यांचे होईपर्यंत वाट पहिली पाहिजे.

बाळाचा विकास

  • ४५ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या वयातील बाळांना गडद रंगांची चित्रे असलेली पुस्तके बघायला आवडतात. तुम्ही तुमच्या बाळाला तशी पुस्तके दिली पाहिजेत. बाळासाठी गोष्टी वाचा आणि बाळाला त्यामध्ये गुंतवून ठेवा. वाचण्याची सवय लागल्यास ती सवय बाळ आयुष्यभरासाठी जतन करेल. आणि बाळाच्या विकासासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. तुम्ही तुमच्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीस सुद्धा सुरुवात करू शकता! तुम्हाला त्यासाठी लागणारी सगळी मदत तुमच्याकडे आहे ह्याची खात्री करा आणि बाळाला लागणारी सगळी उत्पादने जवळच ठेवा.

  • ४६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

हा काळ तुमच्या बाळासाठी महत्वाचा आहे, कारण ह्या कालावधीत तुम्ही बाळाला स्तनपानापासून दूर ठेवता. बाळाला स्तनपानाची सारखी आठवण येऊ शकते परंतु तुम्ही बाळासोबत चांगला वेळ घालवा, तुमच्या दैनंदिन कामांसाठी बाहेर पडताना बाळालासुद्धा बाळाला बाहेर घेऊन जा. बाळाशी सतत संवाद साधा आणि तुच्याशी व तुमच्या पतीसोबत बाळाचा खेळण्याचा कालावधी वाढावा.

४६ व्या आठवड्यात तुमच्या बाळाला त्रास कमी कसा होईल हे समजले पाहिजे. ह्या वयात खूप जास्त काही अपेक्षित नसले तर खेळून झाल्यावर खेळणी बाजूला ठेवणे किंवा बाळाने खाली काही पडल्यावर ते पुन्हा उचलून ठेवणे इत्यादी गोष्टी बाळाला समजल्या पाहिजेत. तुम्ही बाळाला ‘Please’ ‘thank you’ ह्या शब्दांचा वापर करण्यास शिकवा त्यामुळे विनम्र कसे रहावे हे बाळ शिकेल.

तुमचे बाळ आता घनपदार्थ खाऊ लागेल तुमच्या बाळाचे स्तनपान बंद करण्यास सुरुवात करा. तुमच्या बाळाच्या आहाराविषयी बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला तुम्ही घेणे अपेक्षित आहे. बाळाला लागणारी सगळी उतपादने ताजी आणा.

  • ४७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या कालावधीत तुमचे बाळ स्वतंत्रपणे चालण्यास शिकू लागेल. तुम्ही बाळासाठी वॉकर आणून त्यास प्रोत्साहन देऊ शकता. तुम्ही बाळापासून थोडे दूर थांबून हात फैलावून बाळाला तुमच्याकडे येण्यास सांगू शकता.

तसेच जिथे तुम्ही बाळाला चालण्यास शिकवत आहात ती जागा बाळासाठी सुरक्षित आहे ना हे सुद्धा पहा.

बाळाची तब्येत

तुमचे बाळ नवीन वातावरणाशी अजून जुळवून घेत आहे त्यामुळे, घरात येताना तुम्ही किंवा तुमच्याकडे येणाऱ्या लोकांनी पादत्राणे बाहेर काढून ठेवली पाहिजेत. जरी तुमच्या बाळाने अजूनही चालण्यास सुरुवात केलेली नसेल तरी रांगत जाऊन तुमचे बाळ घराचा कोपरा अन कोपरा शोधून येईल. तुम्ही बाळाला हानिकारक भागापासून उदा: गॅरेज, किचन, दूर ठेवण्यासाठी दुभाजक वापरा. तुमचे बाळ घन पदार्थ स्वतःचे स्वतः खाऊ लागल्यावर विषाणूंचा संसर्ग होत नाही. बाळाच्या जवळ कुणालाही धूम्रपान करू देऊ नका. ह्या महिन्यात बाळाचे कुठलेही लसीकरण नसेल, परंतु पुढच्या महिन्यात असणाऱ्या लसीकरणासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवा.

बाळाची तब्येत

बाळाच्या विकासाचे टप्पे ११ वा महिना

वाढीच्या ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचे आपण ढोबळमानाने खालीलप्रमाणे वर्गीकरण करू शकतो. ह्या काळात तुमच्या बाळाचे आकलनकौशल्य वेगाने वाढते. खाली काही टप्पे दिले आहेत

  • बाळ नावानिशी लोकांना ओळखू लागेल
  • प्रत्येकाच्या शारीरिक ठेवणीनुसार बाळ व्यक्तींमधील फरक ओळखू लागेल
  • बाळाचे हालचाल कौशल्यावर नियंत्रण वाढेल
  • बाळाची उत्सुकता वेगाने वाढेल कारण बाळ त्याच्या खेळण्यांशी आणि वातावरणाशी जुळवून घेताना नवीन मार्ग शोधून काढेल
  • बाळाला नाहीह्या शब्दाचा अर्थ समजेल
  • बाळाला जे हवे आहे ते बाळ अचूकतेने दाखवू लागेल

इथे ११ महिन्यांच्या बाळाच्या शारीरिक विकासाचे टप्पे दिले आहेत

  • बाळाला जी वस्तू हवी आहे तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी बाळ वेगवेगळ्या स्थिती वापरेल
  • बाळ स्वतःचे स्वतः उभे राहू लागेल
  • बाळ आधाराशिवाय काही पावले चालेल आणि आधार घेऊन चालू लागेल
  • बाळ जिने चढू शकेल
  • बाळाची बोटांची हालचाल विकसित होईल
  • बाळाला वर आणि खाली असे २२ दात येतील
  • बाळाचा दिनक्रम नीट होईल
  • बाळाला वेगवेगळ्या चवी आवडू लागतील

वर्तणूक

बाळाच्या मेंदूचा जसजसा विकास होऊ लागतो तसे बाळाला सर्व भावना कळू लागतील आणि त्यामुळे बाळाचे आकलनकौशल्य वाढेल. बाळ खूप लोकांमधून ओळखीच्या लोकांना शोधून काढेल. ओळखीच्या लोकांसोबत वेळ घालवायला बाळाला आवडेल. तसेच अनोळखी लोकांसोबत बाळाला थोडी चिंता वाटेल. बाळ आता आई बाबांना ओळखू लागेल आणि बरोबर आई‘ ‘बाबाम्हणू लागेल. एखाद्या खेळण्यासोबत कसे खेळावे हे समजले नाही तर बाळ राग दर्शवेल. तसेच आज्ञा न पाळण्याची पहिली लक्षणे दर्शवण्यास बाळ सुरुवात करेल.

११ महिन्यांच्या बाळाचे क्रियाकलाप

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळासाठी तुम्ही क्रियाकलाप करून बघू शकता. ह्या क्रियाकलापांमुळे तुमच्या बाळाचा विकास होईल आणि त्यामुळे तुमच्याशी बाळाचा बंध अधिक मजबूत होईल. आणि संतुलन वाढेल.

बाळाचा हात आणि डोळ्यांचा समन्वय सुधारणांसाठी तुम्ही बाळाला पाण्याने पेंटिंग करायला शिकवू शकता. बाळाला एका भांड्यात पाणी आणि खरा पेंटब्रश द्या. तुम्ही बिनविषारी रंग सुद्धा तुमच्या ११ महिन्यांचा बाळासाठी आणू शकता आणि गडद रंगानी पेंटिंग करण्यासाठी बाळाचा उत्साह वाढवू शकता.

११ महिन्यांच्या बाळाची काळजी

तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाला त्याच्या भोवतीच्या सगळ्या विश्वाची उत्सुकता असेल आणि त्यामुळे तुम्हाला सारखे बाळावर लक्ष ठेवून त्याच्या मागे पळावे लागेल. हे बाळाच्या विकासासाठी जरी चांगले असले तरी काही गोष्टी बाळाच्या आसपास असणे किंवा बाळाने त्यांच्याशी खेळणे हे बाळासाठी हानिकारक ठरू शकते. जसे की किचन किंवा टीव्ही, वॉशिंग मशीन, डीव्हीडी प्लेयर असलेली घरातील जागा इत्यादी.

तुम्ही बाळाचे स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करीत आहात का? तर त्यासाठी सुरुवात करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. बाळाची स्तनपानाची वेळ झाल्यावर बाळाला दुसरे अन्नपदार्थ द्या. तुमच्या बाळाला इतक्या लवकर गाईचे दूध देण्यास सुरुवात करू नका. कारण काही बाळांसाठी ते पचनास जड जाते. बालरोगतज्ञांशी संपर्क साधून बाळाला काय खायला द्यायचे ह्या विषयी सल्लामसलत करा.

तुमचे बाळ जी माणसे दररोज दिसतात त्यांच्याशी बंध निर्माण करण्यास सुरुवात करेल. जर ती माणसे बाळाच्या आजूबाजूस असतील तर बाळाला त्यांच्याशी वेळ घालवायला आवडेल. ज्या लोकांसोबत बाळाला आरामदायक वाटत नसेल त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास बाळाला जबरदस्ती करू नका.

जर बाळ ताठ उभे राहू लागले असे तर बाळाची उंची किती आहे ते भिंतीवर मार्क करून ठेवा. आणि ही सवय कायम ठेवा आणि दर ३ महिन्यांनी बाळाची उंची मोजा.

बाळाला भरवणे

११ महिन्यांच्या बाळाला स्वतःच्या दोन बोटांमध्ये अन्नपदार्थ घेऊन खाता आले पाहिजे तसेच हातात चमचा धरता आला पाहिजे. तुम्ही बाळाला स्वतःचे स्वतः खाण्यासाठी प्रोत्सहीत करा आणि बाळावर लक्ष ठेवा. जसजशी बाळाची चव विकसित होते तसे तुम्ही वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश बाळाच्या आहारात करू शकता जसे की फळे, भाज्या, चीझ, दही आणि चिकन आणि मासे ह्यासारखी प्रथिने इत्यादी. तुम्ही बाळाला बिस्किटे, फळे किंवा सीरिअल ह्यासारखा नाश्ता सुद्धा दिला पाहिजे. तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाचे वजन ७१२ किलो इतके असते आणि जर बाळ मुलगी असेल तर वजन ६. ते ११ किलो ह्या दरम्यान असते. जर तुम्हाला बाळाच्या आहाराविषयी काही शंका असतील तर तुम्ही बाळाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

बाळाला भरवणे

बाळाची झोप

ह्या वयाची बाळे दिवसाला १३१४ तास झोपतात. ३ वेळा आणि रात्रीची झोप ह्यामध्ये हा कालावधी विभाजित होतो. काही बाळे दिवसा झोपण्यास त्रास देतात परंतु दिवसात २ वेळा तरी बाळ झोपत आहे ना ह्याची खात्री करा. दिवसा बाळाची एकूण झोप २ ते २. ५ तास झाली पाहिजे.

पालकांसाठी काही टिप्स

  • बाळासोबत खेळ आणि क्रियाकलाप ह्यामध्ये मग्न रहा. त्यामुळे तुमच्या बाळाचे हालचाल कौशल्य सुधारेल आणि बाळ बागेमध्ये इतर मुलांसोबत छान मिसळू लागेल.
  • तुमच्या बाळाला स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन द्या. बाळाला स्वतःच्या हाताने खाऊ द्या आणि स्वतःचे स्वतः खेळू द्या. फक्त तुमचे लक्ष बाळावर असू द्या. बाळाला स्वतःचे स्वतः कपडे किंवा कप निवडू द्या.
  • बाळाची नवीन लोकांशी ओळख करून द्या. बागेत तुम्ही हे करू शकता. इतर मुलांशी, त्यांच्या आई बाबांशी आणि तुमच्या नातेवाईकांशी तुम्ही बाळाची ओळख करून देऊ शकता. तथापि, बाळाला आरामदायक वाटत नसेल तर त्यांच्याशी खेळण्यास बाळाला जबरदस्ती करू नका.
  • तुमच्या बाळासाठी वाचन करा. वाचनाची सवय जितकी लवकर लागेल तितके चांगले. चित्रे असलेली पुस्तके तुम्ही बाळासाठी वाचण्यास सुरुवात केल्यास बाळाला मजा येईल आणि बाळाला तुमच्यासोबत सुरक्षित वाटू लागेल.
  • बाळाशी बोलत रहा. बाळ काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ह्याकडे लक्ष द्या नि त्यानुसार प्रतिसाद द्या. बाळ जे काही सांगते आहे ते तुमच्यासाठी आत्यंतिक महत्वाचे आहे हे बाळाला समजू द्या.
  • बाळाला चांगली वर्तणूक शिकवा. एखादी गोष्ट बरोबर केल्यास बाळाचे कौतुक करा.

११ महिना म्हणजे बाळ लवकरच १ वर्षाचा मोठा टप्पा गाठणार आहे. ह्या महिन्यात तुमचे बाळाने विकासाचे अनेक टप्पे पार केलेले असतील. तुमच्या बाळाची प्रगतीची चर्चा तुम्ही बालरोगतज्ञांशी केली पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरांच्या भेटीच्या सगळ्या वेळा पाळत आहात ना ह्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article