In this Article
जांभूळ हे लोकप्रिय भारतीय फळ आहे. जांभळाला इंग्रजीमध्ये ‘जावा प्लम’ किंवा ‘ब्लॅक प्लम’ असेही म्हटले जाते. आरोग्यासाठी जांभळाचे असंख्य फायदे आहेत. तुम्हाला गरोदरपणात जांभूळ खाण्याची इच्छा आहे का? गरोदरपणात जांभूळ खाणे सुरक्षित आहे की नाही असा विचार तुम्ही करत असाल. लहान मुलांसाठी जांभूळ हे एक चांगले फळ आहे. जांभळामध्ये कॅलरी कमी असतात. गरोदरपणात जांभूळ खाण्यास परवानगी आहे हे ऐकून तुम्हाला बरे वाटेल.
जांभळाचे असंख्य फायदे तसेच गरोदरपणात जांभूळ खाणे कधी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
गरोदर असताना जांभूळ खाणे सुरक्षित आहे का?
होय. तुम्ही गरोदर असताना जांभूळ खाणे सुरक्षित आहे. जांभळामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात आणि बाळाच्या विकासासाठी आरोग्यासाठी आवश्यक असणारी पौष्टिक मूल्ये जांभळामध्ये भरपूर प्रमाणात असतात.
गरोदरपणात जांभूळ खाण्याचे आरोग्यविषयक फायदे
तुम्ही गरोदर असताना जांभूळ खाण्याचे आरोग्यविषयक फायदे खाली दिलेले आहेत
1. पौष्टिक घटक
जांभळामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी पौष्टिक घटक असतात. ही जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडे मजबूत करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात.
2. पचन सुधारते
जांभळाचे नियमित सेवन केल्याने जुलाब आणि अल्सर बरे होण्यास मदत होते. जांभूळ खाल्ल्यास इरिटेबल बोवेल सिंड्रोमचा सामना करण्यास देखील मदत होते. हे आजार नैसर्गिकरित्या सुधारतील आणि तुम्हाला लवकरच निरोगी पोटाचे फायदे जाणवतील.
3. उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो
जांभळामध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त असल्याने, तुमच्या गरोदरपणात तुम्हाला उर्जा मिळेल. ह्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास देखील मदत होते. जांभळामध्ये किती पोटॅशियम आहे असा विचार तुम्ही करत असाल तर १०० ग्रॅम जांभळे खाल्ल्यावर तुम्हाला ५० मिलिग्रॅम पोटॅशियम मिळते.
4. प्रतिकारशक्ती सुधारते
जांभळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. जांभळामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जांभळे खाल्ल्याने तुमचे शरीर संक्रमण आणि रोगांपासून सुरक्षित राहते. लालरक्तपेशींची संख्या देखील वाढते, त्यामुळे ऍनिमिया सारखे आजार दूर राहतात.
5. बाळाची दृष्टी विकसित होते
जांभळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते. हे व्हिटॅमिन ए बाळाच्या दृष्टीच्या विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक असलेला एक पोषक घटक आहे.
6. तोंडाचे आरोग्य राखते
जांभूळ त्याच्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे तसेच दातांच्या विविध समस्यांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहे. गरोदरपणात जांभूळ खाल्ल्याने तोंडाचे आरोग्य चांगले राहते.
7. हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य चांगले राहते
जांभूळ खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे रक्तदाब पातळी नियंत्रित राहते, तसेच भविष्यात हृदयविकाराचा धोका कमी होतो. जांभूळ खाल्ल्यास सूज कमी होते. अशा प्रकारे, हृदयाच्या वाहिन्यांचे संरक्षण होते.
8. मुदतपूर्व प्रसूती प्रतिबंधित करते
जांभळामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण उच्च असते. अकाली प्रसूती टाळण्यासाठी जांभूळ खाणे आवश्यक आहे, त्यामुळे गर्भाची संपूर्ण वाढ आणि विकास सुनिश्चित होतो.
गरोदरपणात तुम्ही दररोज किती जांभळे खाऊ शकता?
दररोज जांभळे खाल्ल्याने तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्याचे आरोग्यविषयक फायदे मिळण्यास मदत होईल. दिवसातून दोनदा जांभळे खा. त्यापेक्षा जास्त जांभळे खाऊ नका. दररोज मध्यम प्रमाणात जांभळे खा. २ वाट्यांपेक्षा जास्त जांभळे खाऊ नका. तुमच्या आहारात जांभळाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या आहारतज्ञांचा सल्ला घ्या.
गरोदरपणात जांभळे खाताना काय काळजी घ्यावी?
गरोदरपणात जांभळे खाणे सुरक्षित असले तरी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- हे फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका.
- जर तुम्हाला मधुमेह असेल तर जास्त प्रमाणात जांभळे खाऊ नका, कारण त्याचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो आणि रक्त गोठण्यास ते कारणीभूत ठरते.
गर्भवती स्त्रियांनी जांभूळ खाणे कधी टाळावे?
जांभळाचे झाड हलवून जांभळे खाली पाडली जातात आणि जमिनीवरून उचलली जातात. जर जांभळे खूप खराब झालेली असतील किंवा ताजी नसतील अथवा व्यवस्थित पॅक केलेली नसतील तर अशी जांभळे खाऊ नका.
जांभळाची निवड कशी करावी?
आपल्या आजूबाजूच्या झाडांवर आपल्याला अनेकदा जांभळे आलेली आढळतात. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना अशी जांभळे उचलून घरी आणणे आवडू शकते. गरोदरपणात तुमचे नुकसान करणारी कोणतीही गोष्ट तुम्ही टाळणे आवश्यक आहे. गरोदरपणात खाण्यासाठी जांभळाची निवड कशी करावी ह्याविषयीच्या काही मार्गदर्शक सूचना खाली दिलेल्या आहेत:
- खराब झालेले, किंवा ‘विचित्र दिसणारे’ जांभूळ खाणे टाळा.
- जर फळ पिकलेले नसेल किंवा ते कडक पोत असेल तर ते विकत घेऊ नका.
- सामान्य तापमानाला जांभळाचे शेल्फ लाईफ कमी असते. त्यांना जाळीच्या पिशव्यामध्ये पॅक करून रेफ्रिजरेट करा. फ्रिज मध्ये ठेवल्यावर जांभळाचे शेल्फ लाइफ दोन आठवड्यांपर्यंत वाढते.
गरोदरपणात जांभळाचे सेवन कसे करावे?
इतर फळांप्रमाणेच जांभूळ सुद्धा कच्चे खाता येते. जांभळे खाण्यापूर्वी तुम्ही ती नीट धुवून घ्या. या पौष्टिक फळाचा आहारात समावेश करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे जांभळाची स्मूदी तयार करणे. जांभळाची स्मूदी तयार करण्याची सोपी रेसिपी खाली दिलेली आहे. ह्या रेसिपी द्वारे काही मिनिटातच जांभळाची स्मूदी तयार होते.
साहित्य:
- जांभूळ – ३/४ वाट्या(बिया काढलेले)
- दही – २वाट्या
- मध – चवीनुसार
- काही बर्फाचे तुकडे
कृती:
- ब्लेंडरमध्ये जांभळे, दही आणि मध घालून चांगले मिक्स करून घ्या. एका ग्लासमध्ये काही बर्फाचे तुकडे घाला आणि स्वादिष्ट जांभळाची स्मूदी त्यावर घाला.
- पौष्टिक घटक जास्त प्रमाणात असणे, शून्य कॅलरीज, आणि अँटिऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण हे जांभळाचे काही चांगले गुणधर्म आहेत. गरोदरपणात बाळासाठी पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे आहे. जर तुमचा आहार शिस्तबद्ध असेल तर गरोदरपणात तुमच्या आहारात जांभळाचा समावेश करण्याचा तुम्ही विचार करू शकता.
आणखी वाचा: