गर्भधारणा: १५वा आठवडा

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुम्ही पहिली तिमाही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे, आणि तुम्ही दुसऱ्या तिमाहीत प्रवेश केला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणींचा मॉर्निंग सिकनेसचा त्रास कमी झाला आहे तसेच विशिष्ट वास आणि अन्नपदार्थांचा तिटकारा सुद्धा आता बऱ्यापैकी आटोक्यात आहे.

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला खूप उत्साही वाटेल तसेच तुमची कामेच्छा जागृत होईल आणि त्यामुळे तुमच्या बाळाला कुठलीही हानी पोहोचणार नाही.

गर्भारपणाच्या १५व्या आठवड्यातील तुमचे बाळ

तुमचे  बाळ आता मोसंबी किंवा सफरचंदाएवढ आहे. १५व्या आठवड्यात बाळाच्या भुवया, केस, त्वचा ह्यांचा  विकास होण्यास सुरुवात होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळाचा हाडांचा सांगाडा नीट तयार होण्यास सुरुवात होईल, जो आतापर्यंत कूर्चेच्या स्वरूपात होता. बाळ आता संपूर्ण विकसित  मनुष्यासारखे दिसू लागेल. डोक्याच्या दोन्ही बाजूला कान  आणि चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी डोळे विकसित होतील. तुमच्या बाळाच्या पोटातील हालचाल तुम्हाला जाणवण्याची शक्यता आहे तसेच तुमचे बाळ गिळणे, चोखणे आणि श्वास घेणे ह्या क्रिया सुद्धा करत आहे.

बाळाचा आकार केवढा असतो?

बाळाचा आकार केवढा असतो?

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात तुमचे बाळ जेमतेम सफरचंदाएवढे मोठे आहे, तुमच्या बाळाचा आकार  ३-४ इंच इतका आहे आणि  वजन ५०-६० ग्रॅम्स इतके असेल. तथापि बाळाचे सगळे अवयव दिवसागणिक योग्यरीतीने विकसित होत आहेत त्यामुळे  तुम्ही निश्चिन्त राहू शकता.

थोडक्यात १५व्या आठवड्यापासून तुमच्या बाळाचा वेगाने विकास होत असून ह्या नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर अखंड कार्यरत आहे.

शरीरात होणारे बदल

१५ व्या आठवड्यात तुमच्या बाळाच्या शरीरामध्ये बदल होत आहेत आणि तुमच्याही शरीरात गर्भारपणादरम्यान योग्य बदल होणे हे अतिशय सामान्य आहे. तुमच्या शरीरात आतापर्यंत झालेल्या बदलांव्यतिरिक्त तुमच्या शरीरात खाली नमूद केलेले बदल होऊ शकतात.

 • तुमचे पोट आता दिसू लागले आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे ते आता गोलाकार वाढणार आहे.
 • एका नवीन जीवाला सामावून घेण्यासाठी तुमचे शरीर अहोरात्र कार्यरत असल्याने तुम्हाला वेळोवेळी अस्वस्थता जाणवेल.
 • तुमच्या वजनामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
 • तुम्ही गर्भारपणात नवीन कपड्यांची खरेदी केलेली नसेल तर तुमचे सध्याचे कपडे तुम्हाला घट्ट होतील.

१५व्या आठवड्यात आढळणारी गर्भारपणाची लक्षणे

गर्भधारणेपासून आत्तापर्यंत तुम्ही नवीन लक्षणांचा अनुभव घेत आहात, आणि गर्भारपणाचा १५ वा आठवडा सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यातील काही लक्षणे खाली दिली आहे.

 • शारीरिक संबंध: १५व्या आठवड्याचे हे विशेष लक्षण आहे. मागचे काही महिने तुम्हाला आजारी असल्यासारखे वाटत होते, तुमच्या मनःस्थितीत चढउतार होत होते, आणि त्यामुळे शारीरिक संबंध टाळले जात होते तथापि १५ व्या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला खूप उत्साही वाटेल आणि आनंद घ्यावासा वाटेल.
 • वासांविषयी संवेदना: तुमच्या नाकाची पोकळी खूप संवेदनशील होईल. रक्तप्रवाह वाढल्याने कधी कधी नाकातून रक्त सुद्धा येऊ शकते.
 • श्वास गुदमरणे: तुमचे शरीर बाळाला सामावून घेण्यासाठी कार्यरत असते त्यामुळे तुम्हाला श्वास गुदमरल्यासारखे वाटेल.
 • अपचन/ जळजळ: हे अजून एक लक्षण आहे ज्याचा तुम्हाला अनुभव येईल. संप्रेरकांच्या चढउतारामुळे तुमच्या पचनसंस्थेचे स्नायू शिथिल होतील.
 • हिरड्यांमधून रक्त येणे: गर्भारपणाच्या ह्या टप्प्यावर तुम्हाला लक्षात येईल की हिरड्यांना  सूज येऊन त्या खूप संवेदनशील झाल्या आहेत. गरोदरपणातील संप्रेरकांमुळे gingivitis (हिरड्यांना सूज येणे) होतो. छोटासा ट्युमर पण कधी कधी दिसू शकतो पण त्यामुळे वेदना होत नाहीत आणि तो हानिकारक नसतो, आणि तो बाळाच्या जन्मानंतर नाहीसा होतो.

गर्भधारणेच्या १५व्या आठवड्यात पोटाचा आकार

तुमच्यापैकी बऱ्याच जणींचे पोट आता दिसू लागेल आणि विशेषतः ज्यांची ही दुसरी वेळ आहे त्यांच्या बाबतीत ही शक्यता जास्त आहे. पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या स्त्रियांमध्ये पोट न दिसण्याची शक्यता असू शकते.

गर्भारपणाचा १५ वा आठवडा हा दुसऱ्या तिमाहीत आणि एकूणच गर्भारपणात संक्रमणाचा काळ आहे. १५ व्या आठवड्यात, तुमच्या बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय ताणले जाते.

गर्भधारणेच्या १५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

गर्भधारणेच्या १५व्या आठवड्यातील सोनोग्राफी

ह्या आठवड्यातील सोनोग्राफीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचे बाळ हात पाय ताणत आहे. आता तुमच्या बाळाचे सांधे नीट विकसित झाले आहेत, त्यामुळे तुमचे बाळ तुमच्या पोटात खूप चुळबुळ करेल. बाळाच्या ह्या क्रियांमुळे तुम्हाला पोटात गुदगुल्या झाल्यासारखे जाणवेल आणि पोटात बुडबुडे असल्याची संवेदना होईल तसेच बाळाला उचक्या सुद्धा लागतील.

आहार कसा असावा?

गर्भारपणाच्या १५ व्या आठवड्यात ज्या ज्या गोष्टींची गोष्टींची काळजी असते त्यातील महत्वाचा विषय म्हणजे आहार कसा असावा. तुमच्या पोटात तुमचे बाळ वाढत आहे आणि बाळाला योग्य रीतीने पोषण मिळावे म्हणून तुम्हाला योग्य आहार कोणता घ्यावा म्हणून ताण येऊ शकतो. खाली एक यादी दिली आहे त्यामध्ये काय खावे हे सुचवलेले आहे.

 • फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करा.
 • ब्रेड च्या माध्यमातून पिष्टाचा समावेश तुमच्या आहारात करा. तसेच लोहयुक्त सीरिअल्स चा सुद्धा आहारात समावेश करा.
 • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तुमच्या आहारात असुद्या कारण तुम्हाला बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शिअम ची गरज भासणार आहे.
 • प्रथिनांचा समावेश करून तुमची आहाराविषयीची चिंता नष्ट करा, विशेष करून चरबीयुक्त मासे, अंडी, मांस इत्यादी.
 • ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् साठी चांगली शिजवलेली अंडी खा.

काय काळजी घ्याल आणि त्यासाठी काही टिप्स

आता आपण स्वत: ला तसेच आपल्या बाळाला सुरक्षित ठेवत आहात आणि निरोगी बाळाला जन्म देण्यासाठी योग्य जीवनशैली निवडणे काही अवघड नाही.

हे करा

 • सजलीत (hyadrated) रहा.
 • खूप विश्रांती घ्या आणि नियमित काही तास झोपा.
 • योग्य वेळेला योग्य प्रमाणात आहार घ्या.
 • डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे नियमित घ्या.
 • थोडा आणि नियमित व्यायाम करा.

हे करू नका

 • दूषित आणि घाण असलेल्या ठिकाणांपासून दूर रहा.
 • खूप जास्त प्रमाणात व्यायाम करू नका.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नका.
 • नकारात्मक विचार करू नका.
 • स्वतःला किंवा आपल्या बाळाला उपाशी ठेऊ नका.

कुठल्या गोष्टींची खरेदी कराल?

जेव्हा बाळाची चाहूल लागते तेव्हा तुमची खरेदीची यादी खूप मोठी असते. परंतु आपल्याला खरोखरीच कुठल्या गोष्टीची गरज असते ते पाहूया,

 • आरामदायी बूट, शक्यतो सपाट असावेत, उंच टाचेच्या नकोत.
 • गरोदर असताना अंग दुखते त्यामुळे चांगली झोप लागावी म्हणून बॉडी पिलो.
 • तुमची भूक भावगण्यासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यपूर्ण स्नॅक्स.
 • गर्भारपणाविषयी आणि पालकत्वाची पुस्तके.
 • कॉटनचे कपडे.
 • तुमची त्वचा कोरडी पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लोशन्स आणि मॉइश्चरायझर्स.

गर्भारपणात सकारात्मक रहा, त्याविषयी सगळी माहिती जवळ ठेवा. त्यामुळे तुम्ही आई होण्याच्या ह्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल.

मागील आठवडा: गर्भधारणा: १४वा आठवडा

पुढील आठवडा: गर्भधारणा: १६वा आठवडा