प्रसूतीनंतर, बाळाच्या आईचे पोट पूर्ववत होत नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे बाळंतपणानंतर संप्रेरकांमध्ये होणारे बदल होय. गर्भारपणाच्या आधीसारखा पोटाचा आकार पुन्हा होण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात. परंतु, पोट लगेच आधीसारखे होणार नाही. त्यासाठी तुमच्या शरीरात होणारे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीराचे स्वरूप बदलण्यामागील शारीरिक बदलांबद्दल अधिक जाणून घेणे महत्वाचे आहे. तसेच तुमचे शरीर पुन्हा […]
गर्भधारणेदरम्यान पोट दुखणे खूप सामान्य आहे, पण ते भीतीदायक सुद्धा वाटू शकते. वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गरोदर स्त्रीच्या शरीरात खूप बदल होत असतात, त्यामुळे ह्या कालावधीत पोट दुखणे हे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान पोटदुखीची काही कारणे असतात जी हानिकारक नसतात परंतु काही वेळा त्यामागील कारणे गंभीरसुद्धा असू शकतात. काही वेळा गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंत असल्यास पोटदुखी […]
साबुदाणा हा बर्याचदा त्यामधील पिष्टमय पदार्थ आणि मर्यादित पोषक घटकांमुळे एक आरोग्यदायी पर्याय मानला जात नाही. परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये असलेले पिष्टमय पदार्थ आणि कर्बोदके हे शुद्ध आहेत, त्यामुळे ते मुलांसाठी उत्तम आहेत. साबुदाणा पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे आणि बाळाच्या शारीरिक विकासात तो मदत करतो. साबुदाणा म्हणजे काय? टॅपिओकाच्या मुळांमधून पिष्टमय पदार्थ काढले जातात आणि […]
ज्या स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असतात त्या स्त्रिया गर्भधारणा यशस्वी झाली आहे किंवा कसे हे जाणून घेण्यासाठी लघवीच्या चाचणीवर अवलंबून असतात. रक्ताच्या चाचणी मध्ये अचूक निदान होत असले तरी, लघवीची चाचणी जास्त सोयीची, परवडणारी असते तसेच तुमची गोपनीयता अबाधित राहते (कारण तुम्ही ती घरी सुद्धा करू शकता), त्यामुळेच रक्ताच्या चाचणीपेक्षा लघवीची चाचणी जास्त प्रसिद्ध आहे. […]