Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण नवजात बाळ ते ४ महिन्यांपर्यंतच्या बाळाचा आहार आणि टिप्स

नवजात बाळ ते ४ महिन्यांपर्यंतच्या बाळाचा आहार आणि टिप्स

नवजात बाळ ते ४ महिन्यांपर्यंतच्या बाळाचा आहार आणि टिप्स

बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यांपर्यंत बाळाला केवळ आईचे दूध द्यावे असे बहुतेक बालरोगतज्ञ सुचवतात, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तशी शिफारस केलेली आहे. परंतु काही बाळांना फॉम्युला देण्याची गरज भासू शकते. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात, बाळाचे वजन तिप्पट वाढेल. अशा प्रकारे, त्यांना जन्मापासूनच बाळांना सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळणे अत्यावश्यक असते.

ह्या टप्प्यावर मुलांसाठी महत्वाची पोषक तत्वे

तुमच्या बाळाची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी खालील पोषक घटकांची गरज आहे.

 1. फोलेट – बाळाच्या शरीरातील पेशी विभाजित होण्यास मदतकरते.
 2. कॅल्शियम – तुमच्या बाळाचे दात आणि हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.
 3. लोह – रक्तपेशी वाढतात. तसेच मेंदूचा विकास होण्यास मदत होते. जर तुमचे बाळ केवळ स्तनपान करत असेल तर तुमचे डॉक्टर लोह पूरक आहार सुचवू शकतात.
 4. चरबी – संक्रमणापासून संरक्षण मिळते. त्वचा आणि केस निरोगी राहतात. मेंदूच्या विकासासाठी देखील उपयुक्त आहे आणि ऊर्जा प्रदान करते.
 5. झिंक – पेशींची  दुरुस्ती आणि वाढीसप्रोत्साहन मिळते.
 6. कर्बोदके आणि प्रथिने – तुमच्या बाळाला आवश्यक ऊर्जा मिळते. बाळाची वाढ चांगली होण्यासाठी हे घटक आवश्यक आहेत.
 7. जीवनसत्त्वे – मेंदू, रोगप्रतिकार प्रणाली, मज्जासंस्था इत्यादींचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अ, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, डी, ई आणि के ह्यासारखी विविध जीवनसत्वे आवश्यक असतात.

ह्या टप्प्यावर मुलांसाठी महत्वाची पोषक तत्वे

शक्य तितके आईच्या दुधासारखेच फॉर्मुल्यातील घटक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. वरील पोषक तत्वांव्यतिरिक्त, काही सूत्रांमध्ये आवश्यक फॅटी ऍसिड देखील असू शकतात उदा: डीएचए (डोकोसाहेक्झानॉईक ऍसिड) आणि एआरए (हा जैविक पेशींच्या आवरणाचा एक घटक आहे, आणि तरलता आणि लवचिकतेसाठी मदत करतो), न्यूक्लियोटाइड्स, प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स इत्यादी.

आपल्या बाळाला स्तनपान देणे: जन्मापासून ४ महिन्यांपर्यंत

सुरुवातीपासूनच तुमच्या बाळाच्या निरोगी आहाराच्या सवयींना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. बाळाला स्तनपान देण्याच्या योजनांचे साधारणपणे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते – बाळाच्या गरजांप्रमाणे तयार केले जाणारे वेळापत्रक, पालकांनी केलेले वेळापत्रक आणि दोन्हींचे एकत्रितपणे तयार झालेले वेळापत्रक. नावाप्रमाणेच, बाळाच्या गरजांप्रमाणे तयार झालेले वेळापत्रक हे असंरचित असते त्यामध्ये विशिष्ट वेळा पाळल्या जात नाहीत. पालकांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दिनचर्येमध्ये खाणे, खेळणे आणि झोपण्याच्या विशिष्ट वेळा असतात. दोन्हींचे मिळून तयार झालेले वेळापत्रक हे लवचिक असते. हे वेळापत्रक पालकांनी निश्चित केलेले असले तरी, बाळाच्या इच्छा काही प्रमाणात सामावून घेतल्या जाऊ शकतात. बाळाच्या गरजा आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर आधारित तुमच्या कुटुंबासाठी यापैकी कोणते वेळापत्रक चांगले आहे हे तुम्हाला ठरवावे लागेल.

आपण किती प्रमाणात आणि किती वेळा स्तनपान करावे?

आपण किती प्रमाणात आणि किती वेळा स्तनपान करावे

जसजसे तुमचे बाळ मोठे होईल तसतसे फीडिंगची संख्या कमी होईल. तुमचे बाळ आता जास्तीत जास्त झोपू लागेल. बाळ दिवसातून सरासरी सहा ते आठ वेळा स्तनपान घेईल. जर तुमचे बाळ सजग, आनंदी, सक्रिय असेल, त्याचे वजन नीट वाढत असेल, त्याचा चांगला विकास होत असेल, दररोज पुरेसे डायपर किंवा लंगोट ओले होत असतील, त्याला शौचास नीट होत असेल, तर तुम्ही तुमच्या बाळाला नीट स्तनपान करीत आहात असे समजावे. परंतु जर तुमचे बाळ स्तनपान केल्यावर आनंदी दिसत नसेल, आणि त्याला आणखी स्तनपान घ्यायचे असेल किंवा तो विक्षिप्त वाटत असेल आणि खूप रडत असेल, तर बाळाचे बाळाला स्तनपान अपुरे पडत असेल.

तुम्ही  बाळाला फॉर्म्युला किती प्रमाणात आणि किती वेळा द्यावा?

फॉर्म्युलापेक्षा आईचे दूध पचायला सोपे असते. म्हणून, फॉर्म्युला घेणाऱ्या बाळांना स्तनपान घेणाऱ्या  बाळांपेक्षा कमी वेळा फिडींग देण्याची शक्यता असते. जसजसे बाळ मोठे होते, तसे फीड्सची संख्या आणखी कमी होते. आपल्या बाळाला जास्त प्रमाणात पाजत नाही ना ह्याची काळजी घेणे जास्त महत्वाचे असते, कारण बाळांसाठी स्तनपानापेक्षा बाटलीचे दूध पिणे जास्त सोपे असते.

नवजात बाळ ते ४ महिन्यांच्या बाळासाठी आहारविषयक टिप्स

बाळांच्या पौष्टिक गरजा भिन्न असू शकतात, कारण कोणतीही दोन मुले सारखी नसतात.

तुमचे बाळ भुकेले असल्याची चिन्हे

 • तुमचे बाळ तोंड उघडून त्याचे डोके स्तन किंवा बाटलीकडे वळवते.
 • बाळ त्याची बोटे आणि मुठी चोखू लागते.
 • बाळ अत्यंत गडबड गोंधळ करून मुठी आवळून रडू लागते.

बाळ समाधानी असल्याची चिन्हे

 • बाळाला आता स्तनपानात अथवा बाटलीमधील दुधामध्ये रस नसतो.
 • दूध दिल्यानंतर बाळ लगेच झोपी जाते किंवा खेळू लागते.
 • बाळाचे हात रिलॅक्स असतात आणि बाळ ते खूप हळूहळू चोखते.

इतर लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी

 • लहान बाळाची वाढ झपाट्याने होत असते आणि काही बाळांची वाढ दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला आणि पुन्हा तीन ते सहा आठवड्यांच्या दरम्यान असू शकते.
 • लहान बाळांनी थुंकणे सामान्य आहे, कारण अन्ननलिका आणि पोट यांना जोडणाऱ्या स्नायूंची झडप अपरिपक्व असते. त्यामुळे पोटातील सामग्री पुन्हा वर येते.
 • प्रत्येक फीड नंतर बाळाला शौचास होऊ शकते किंवा दिवसातून एकदा ते तीन दिवसांतून एकदा अशी शौचास होण्याची वारंवारिता असू शकते. (केवळ स्तनपान करणा-या बाळांमध्ये शौचास होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते). हे प्रमाण प्रत्येक बाळानुसार बदलू शकते. जोपर्यंत तुमच्या बाळाचे वेळापत्रक ठीक पळाले जात असेल तोपर्यंत सर्वकाही ठीक असले पाहिजे.
 • बाळ ५ ते ६ महिन्यांचे होईपर्यंत, सर्व अन्नपदार्थ द्रवस्वरूपात असतील. बाळांना कमीत कमी सहा महिन्यांचे होईपर्यंत घन पदार्थ देणे टाळा.
 • स्तनपान करताना, काही वेळानंतर स्तन बदल करा. अशा प्रकारे, बाळाला सतत दुधाचा पुरवठा होईल. तुमच्या बाळाला एक स्तन रिकामे होण्यासाठी पाच ते १५ मिनिटे लागू शकतात. स्तन खूप लवकर बदलल्याने तुमचे बाळ समृद्ध हिंद दुधापासून वंचित राहू शकते. हिंद मिल्क अत्यंत पौष्टिक असते आणि त्यामुळे पोट भरते.
 • प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्तन बदलता तेव्हा बाळाचा ढेकर काढा. खूप थुंकणाऱ्या बाळाचा ढेकर काढणे आवश्यक असते.

सहा महिन्यांपर्यंतच्या बाळांसाठी आईचे दूध किंवा फॉर्मुला हे आदर्श अन्न आहे. जर, काही कारणास्तव, तुम्हाला बाळाला घन पदार्थ लवकर सुरु करण्याची गरज भासल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून 4 महिन्यांच्या बाळाच्या आहाराचे वेळापत्रक तयार करू शकता. लहान बाळांचे पोट लहान असल्याने, त्यांची वाढ चांगली होण्यासाठी आणि विकासाचे टप्पे पूर्ण करण्यासाठी त्यांना वारंवार आहार देणे गरजेचे आहे. बाळे त्यांच्या आयुष्यातील पहिले चार महिने एकतर आईच्या दुधावर किंवा फॉर्म्युलावर जगतात. फॉर्म्युल्यामध्ये पौष्टिक घटक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. स्तनपान देणाऱ्या मातांनी निरोगी आहार घेणे आवश्यक आहे, कारण त्यामधूनच बाळाला पौष्टिक घटक मिळतात.  फॉर्म्युला निवडताना,  नामांकित ब्रँड निवडा.

अस्वीकरण: ही माहिती केवळ एक मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.

आणखी वाचा:

बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article