Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

फक्त महिन्यांनी तुमचे बाळ एक वर्षाचे होणार आहे, तुमचे महिन्यांचे बाळ हे आता आयुष्याच्या खूप रोमांचक टप्प्यावर आहे. व्या महिन्यात तुमचे बाळ आता घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रांगत असेल, कदाचित कशाचातरी आधार घेऊन उभे सुद्धा रहात असेल. बोबडे बोल बोलत असेल आणि तुम्हाला पहिल्यांदाच मामाकिंवा दादाअशी हाक मारत असेल. ह्या अगदी गोंडस टप्प्यावर विकासाचे काही टप्पे बाळाच्या निरोगी वाढीचे निर्देशक असतात. शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि मानसिक निर्देशक हे बाळाचा विकास दर्शवतात.

बाळाची वाढ

बाळाची वाढ

वयाच्या ह्या टप्प्यावर बाळाने काहीही केलं तरी ते खूप मजेदार आणि मनोरंजक वाटते. तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ आता नक्कल करते आणि एखाद्या कलाकारासारखे भासते. तुमच्या बाळाचे आकलन कौशल्य वाढते आणि नैसर्गिक रित्या ते प्रभावी वाटू लागते. तुमचे बाळ खेळणी बाजूला सारते, वेगळी करून ठेवते आणि जेव्हा बाळ खेळत असते आणि तुम्ही त्याच्या जवळ नसाल तर बाळाच्या ते लक्षात येते. तसेच त्यांच्या दिनक्रमाच्या व्यतिरिक्त कुठलीही क्रिया केलेली त्यांना आवडत नाही.

बाळाचा विकास

बाळाची बडबड ऐकण्यास तयार रहा. कारण आता तुमचे बाळ अर्थपूर्ण शब्द लवकरच बोलू लागेल. तुम्ही उत्सुकतेने वाट बघाल असे पहिले काही शब्द म्हणजे -‘मामादादाअसतील जे पटकन त्यांच्या तोंडातून निघतील आणि त्यांना त्याचा अर्थ सुद्धा माहिती असेल. जर तुमचे बाळ लवकर बोलायला लागले तर त्यांनी काही शब्दांचा वापर करणे आतापर्यंत सुरु सुद्धा केले असेल. तुमचे बाळ हावभाव आणि विविध आवाजांचा वापर करून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागेल.

तुमच्या बाळाला आता सावधानता आणि भीती ह्या भावना कळू लागल्या आहेत. जेव्हा बाळ नवीन वातावरणात किंवा नवीन लोकांच्यात असते तेव्हा ह्या भावना दिसून येतात. बाळाला शैक्षणिक खेळण्यांशी खेळायला आवडते किंवा पुस्तकांमधील चित्रे पाहायला आवडतात आणि वेगवेगळ्या आवाजांचे संवाद ऐकणे सुद्धा त्यांना आवडते. त्यांना कधी कधी पिकाबू सारखे खेळ किंवा लपवून ठेवलेली खेळणी शोधायला आवडतात. तसेच बाळ सगळ्या दिशांना रांगते.

काही बाळे फर्निचरचा आधार घेऊन किंवा तुमचा हात धरून उभे राहतात. काही वेळा बाळ आधार घेऊन किंवा आधाराशिवाय चालायला लागते. ह्या टप्प्यावर बाळ स्वतंत्र होते आणि अंगठा आणि तर्जनी ह्यामध्ये वस्तू धरू लागते. बाळ काही वस्तुंना तर्जनीने टोचत राहते. काही बाळे स्वतःचा स्वतः कप किंवा बाटली किंवा खाण्यासाठी चमचा हातात घेतात. बोलून आणि वेगवेगळे हावभाव करून बाळ व्यक्त होते.

  • ३६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळापासून दूर जाताना:

लक्षात ठेवा की येत्या काही आठवड्यांमध्ये, जेव्हा तुम्ही बाळापासून दूर जाल तेव्हा बाळाला चिंता वाटेल. बाळाला अनोळखी व्यक्तींची भीती वाटणे हे खूप नॉर्मल आहे. बाळाला अनोखळी व्यक्तींची किंवा आजीआजोबांची आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींची भीती वाटणे खूप नॉर्मल आहे. हा बदल सोपा करण्यासाठी तो हळूहळू होऊ देणे महत्वाचे आहे.

प्रवास आवडणे:

ह्या टप्प्यावर बाळ त्यांच्या स्वतःच्या वातावरणात आरामदायी असते आणि त्यांना त्यांची स्वतःची स्पेस आवडत असते. तुमचे घर किंवा पाळणाघर ह्यापैकी हे काहीही असू शकते. जर तुम्हाला प्रवास करावासा वाटला तर तुम्ही बाळाच्या अनपेक्षित वागण्याची तयारी ठेवा. तुमच्या बाळाला ओळखीचे चेहरे बघायला आवडतात. नवीन जागेला भेट देताना किंवा अनोळखी व्यक्ती समोर आल्यास बाळाला सुरक्षित वाटत नाही आणि बाळाला अस्वस्थता येते.

  • ३७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

३७ व्या आठवड्यात तुमच्या बाळाला गोष्टी आठवतील आणि सगळी माहिती बाळाच्या मेंदूमध्ये साठवली जाईल. खेळणी घरात कुठे ठेवली आहेत हे बाळाला आठवेल आणि एक आठवड्यापूर्वी केलेल्या गोष्टींची नक्कल बाळ करून दाखवेल. ही बाळाची मागील गोष्टी आठवण्याचे कौशल्य आहेत म्हणजेच एखाद्या अनुभवाचे तपशील बाळाला थोड्या काळासाठी लक्षात राहतील. विशिष्ट घटना जाणीवपूर्वक लक्षात राहण्याचे कौशल्य बाळ २ किंवा ३ वर्षांचे म्हणजेच जेव्हा बाळ बोलू लागेल तेव्हा विकसित होईल.

  • ३८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाने जन्मापासून जे काही शब्द ऐकले आहेत त्यांची जादू दिसण्यास आता सुरुवात होणार आहे. बाळाला ते शब्द नक्कीच समजत असतात, परंतु त्यांचा वापर करणे अजून नियंत्रित आहे. शब्दांच्या सततच्या गोंधळामुळे ते खऱ्या शब्दांसारखे, वाक्यांसारखे वाटत नाहीत. तुमचे बाळ तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी बडबड करीत असते.परंतु तुम्ही प्रश्नांकित चेहऱ्याने बाळाकडे बघू नका, त्याऐवजी बोलण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. तुमचे बाळ प्रत्यक्ष शब्दांऐवजी तुमच्या आवाजाचा टोन समजू लागेल. बाळांना तुमच्या आवाजातील चढ उतार आणि तुमच्या हावभावांवरून तुमच्या भावना समजतील. बाळ लवकर बोलावे म्हणून बाळाशी आणखी संवाद वाढवत रहा.

  • ३९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या बाळाचे व्यक्तिमत्व विकसित होत आहे. ह्या टप्प्यावर बाळाचे खळखळून हसणे, सगळ्यांना भेटल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलणे, कधी नक्कल करणे किंवा अनोळखी व्यक्ती दिसल्यास लाजणे हे खूप सामान्य आहे. दुसऱ्यांशी बंध तयार करण्याआधी तुमचे बाळ परिस्थिती अगदी धाडसीपणाने तपासून पाहिल. तुम्हाला बाळाचे मूड स्विंग, किंवा विचित्र वागणुकीचा अनुभव येईल.

बाळाची तब्येत

तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची लसीकरणाची वेळ झाली आहे. तुम्हाला बाळाच्या नियमित तपासणीची तयारी करावी लागेल जेव्हा तुमचे बाळ वर्षाचे होईल. तथापि, ह्या वयाच्या बाळांना कानाचा संसर्ग जास्त होतो. जर तुमच्या बाळाला खूप वेळा कानाचा संसर्ग होत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी त्यावर दीर्घकालीन उपाययोजनेबाबत चर्चा केली पाहिजे.

जर तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत असाल तर आता निर्जंतुक करून घेण्याची गरज नाही. तथापि त्या गरम, साबणाच्या पाण्याने धुवून घेत आहात ना ह्याची खात्री करा.

बाळाच्या विकासाचे टप्पे ९ महिने

तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचे ३ गटांमध्ये वर्गीकरण करता येऊ शकते आकलन, शारीरिक आणि सामाजिक व भावनिक. प्रत्येक प्रकारच्या विकासाची काही लक्षणे आहेत.

. संज्ञानात्मक विकास:

हे बाळाचे मानसिक पराक्रम, विश्लेषणात्मक क्षमता आणि विवेकबुद्धीशी संबंधित आहे जे खाली दर्शवले आहेत.

  • हावभाव आणि आवाजांची नक्कल करणे

आपल्या बाळाची संज्ञानात्मक क्षमता वयाच्या ९ महिन्यांत हावभाव आणि ध्वनीचे अनुकरण करण्यात मदत करेल. जेव्हा पालक बाळाला आवाज काढण्यास किंवा हावभाव करण्यास सांगतात तेव्हा बाळ त्याचा अर्थ लावू शकते.

  • अक्षरांची नक्कल करणे

मामा आणि दादा यासारखे एक किंवा दोन अक्षरे असलेले छोटे शब्द बाळ वारंवार बोलू शकतो. हे शब्द योग्य व्यक्तीला संबोधित असतीलच असे नाही. नाहीह्या शब्दाचे महत्व समजणे. तुमचे बाळ नाहीही नकारात्मक सूचना समजू शकते आणि ह्या आज्ञेचा हेतू सुद्धा बाळाला समजू शकतो. ज्या गोष्टीची प्रतिक्रिया नकारात्मक येते अशा गोष्टी करण्याचे बाळ टाळते.

  • नाहीह्या शब्दाचे महत्व समजणे

तुमच्या बाळाला नाहीम्हणजे एक नकारात्मक सूचना आहे हे समजले पाहिजे तसेच त्याचा अर्थ सुद्धा समजला पाहिजे. पालकांकडून आलेला नकारात्मक प्रतिसाद बाळास समजेल आणि बाळ ती गोष्ट करणार नाही.

  • बोट दाखवणे

तुमचे बाळ त्यांच्या आवडीच्या वस्तू, लोक किंवा कुठे जायचे ती दिशा बोटाने दाखवतात

  • गोष्टी शोधणे

तुमच्या बाळाचे आकलनकौशल्य वाढले आहे त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या स्मरणशक्तीमुळे त्यांना ह्या टप्प्यावर लपवलेल्या वस्तू सापडतील.

. शारीरिक बदल:

  • रांगणे, बसणे आणि आधाराशिवाय उभे राहणे

व्या महिन्यापर्यंत तुमचे बाळ रांगू शकेल. तुमच्या बाळाचे कमरेचे स्नायू मजबूत झाल्यामुळे बाळ अंगू शकते आणि बराच काळ बसू शकते. बाळाचे पायाचे स्नायू मजबूत असतात आणि शरीराचे वजन पेलू शकतात. काही बाळे आधाराने उभी सुद्धा राहू लागतात

  • वस्तू पकडणे आणि धरून ठेवणे

बाळाची तर्जनी आणि अंगठा एकमेकांना स्पर्श करू शकतात आणि त्यामुळे बाळ बोटांच्या चिमटीत वस्तू पकडू शकते. बाळ खाताना चमचा धरण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो

  • पॅराशूट रिफ्लेक्स (Parachute reflex)

जेव्हा डोके पुढे झुकते तेव्हा आपोआप हात पुढे ठेवले जातात. डोक्याला जखम किंवा मार बसू नये म्हणून शरीराची ही स्वतःची प्रतिक्रिया असते

  • हाताचा वाढलेला वापर

महिन्यांचे बाळ हातांचा वापर करून वस्तू फेकू शकतात किंवा दुसरीकडे पास करू शकतात

  • दृष्टी विकसित होणे

डोळ्यांचे स्नायू मजबूत झाल्यामुळे बाळाला हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेता येतो

  • झोपेचा पॅटर्न

तुमचे बाळ दिवसा कमी झोपते आणि रात्रीचे जास्त वेळ झोपू लागते

३. सामाजिक आणि भावनिक विकास:

तुमच्या बाळाचे आता सामाजिक संवाद कौशल्य, वर्तणूक आणि भावनिकता विकसित होऊ लागेल

  • काळजीघेणारे सदस्य आणि ओळखीच्या लोकांसोबत सुरक्षित वाटणे

तुमच्या बाळाला आता तुमच्यासोबत किंवा तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तींसोबत सुरक्षित वाटेल आणि तुम्ही दूर गेल्यावर बाळ रडू लागेल. बाळाला तुमचा स्पर्श आवडतो. महिन्यांच्या बाळाला त्यांच्या ओळखीच्या लोकांसोबत जसे की आजी आजोबा किंवा फॅमिली फ्रेंड्स जे सतत घरी येत जात असतात त्यांच्यासोबत राहायला आवडते.

  • अनोळखी व्यक्तींविषयी चिंता

बाळ जेव्हा अनोळखी व्यक्तींच्या सानिध्यात येते किंवा त्याला नवीन चेहरे दिसतात तेव्हा बाळ रडू लागते. अनोळखी व्यक्ती कितीही प्रेमळ असली तरी बाळ पालकांकडे झेप घेते

  • खेळण्यांचा प्राधान्यक्रम

बाळांना काही खेळणी आवडीची असतात कारण बाळांना नवीन गोष्टी आवडतात आणि त्यांच्याशी खेळायला आवडते.

प्रत्येक बाळ हे विशेष असते आणि विकासाचे सगळे विकासाचे टप्पे विकसित होनाची वेळ प्रत्येक बाळाची वेगळी असू शकते. बाळाचा विकास जर हवा तसा होत नसेल तर त्याची लक्षणे दिसून येतात आणि तुम्हाला तेव्हा वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते.

वर्तणूक

बाळाचे स्वरयंत्र विकसित होत असल्याने ह्या महिन्यात तुम्हाला बाळाचे मोठ्या आवाजात ओरडणे जाणवेल. बाळे वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही बाळे खूप मोठ्याने ओरडतात किंवा काही शांत असतात. खूप मोठा आवाज आल्यावर बाळाच्या डोळ्यांकडे नीट लक्ष द्या. बाळाचे डोळे आवाजाच्या दिशेने वळले पाहिजेत. तसेच बाळ शरीराची हालचाल कशी करते ह्यावर बारीक लक्ष ठेवा. बाळामध्ये विकासाच्या काही समस्या असतील किंवा काही शारीरिक समस्या असतील तर सर्वात प्रथम त्या पालकांच्या लक्षात येतील. त्यामुळे वेळीच वैद्यकीय मदत घेतल्यास नंतरच्या दृष्टीने ते चांगले असते

महिन्यांचे बाळाचे क्रियाकलाप

  1. बाळाची शारीरिक लवचिकता वाढलेली असल्यामुळे तुम्ही बाळाला शारीरिक हालचाल करण्यास प्रोत्साहन द्या. हातापायांची हालचाल होण्यासाठी त्यांना काही गोष्टी घेऊन त्या पास करण्यास सांगा आणि अशा खेळांना प्रोत्साहन द्या. जर बाळाला आधाराला धरून उभे राहता येत असेल तर काही वेळ उभे राहण्यासाठी प्रोत्साहन द्या.
  1. बाळाची दृष्टी आणि आकलनकौशल्य विकसित झाल्याने बाळाला गोष्टी समजू लागतील. बाळासोबत जास्त वेळ घालवा. बाळासाठी पुस्तके वाचा, गाणी म्हणा किंवा संवाद वाढवण्यासाठी फक्त बाळाशी बोलत रहा, त्यामुळे बाळाशी संवाद वाढेल आणि मानसिक चपळता सुद्धा वाढेल.
  1. ह्या टप्प्यावर बाळास दात येण्यास सुरुवात होते आणि जेली असलेले टीदर्स तुम्ही बाळाला देऊ शकता. बाळाच्या हिरड्यांना आराम मिळावा म्हणून तुम्ही काहीही गोड बाळास देऊ शकता.
  1. बाळाला बोटांच्या चिमटीत वस्तू उचलता येऊ लागल्याने तुम्ही बाळाला स्वतःच्या हातात चमचा पकडून खाण्यास प्रोत्साहित करू शकता. त्याने थोडा पसारा होऊ शकतो परंतु बाळ स्वावलंबी होण्यासाठी हा चांगला मार्ग आहे आणि त्यामुळे वस्तू कशा धराव्यात हे सुद्धा बाळाला समजू शकेल.

महिन्यांच्या बाळाची काळजी

सध्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हाला तुमच्या महिन्यांच्या बाळाची काळजी घेता येऊ शकते

  • बाळाला शब्दांचा अर्थ समजण्यासाठी बाळाशी संवाद साधत रहा
  • बाळाच्या बडबड लक्षपूर्वक ऐका आणि त्यांना संवादात गुंतवून ठेवा
  • खेळण्याची वेळ ठरवून ठेवा आणि पिकाबू, प्राण्यांचे आवाज काढणे किंवा गोष्टी पास करणे इत्यादी खेळ बाळासोबत खेळ त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटेल आणि प्रेम सुद्धा वाढेल
  • वाचनामुळे बाळाला एक नवे जग समजू शकते. बाळाच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी तसेच त्यांची नवीन गोष्टींची क्षमता वाढण्यासाठी बाळासाठी वाचन करीत रहा.
  • चालण्यासाठी आणि पळण्यासाठी बाळाचे स्नायू मजबूत होण्यासाठी बाळाला शारीरिक क्रियाकलापांमध्ये सामील करून घ्या.
  • तुमचे घर बाळासाठी सुरक्षित आहे ह्याची खात्री करून घ्या कारण बाळ काहीही घेऊन तोंडात टाकू शकते.

बाळाला भरवणे

तुमच्या बाळाला काय आवडते ते त्याचे त्याला खाऊ द्या. त्यामुळे घाण किंवा पसारा होऊ शकतो परंतु त्यांना तोंडात घास कसा घालावा हे समजेल. बाळाच्या जेवणाच्या वेळी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी बाळाला स्वतःचे स्वतः खाण्यास शिकविले पाहिजे त्यामुळे बाळ स्वावलंबी होईल. बाळाला फिंगर फूड स्वतःचे स्वतः घेऊ द्या, जसे की वेगवेगळ्या रंगांच्या चिरलेल्या भाज्या किंवा फळे. बाळाला स्वतःचे पातळ केलेले अन्न स्वतः खाण्यासाठी चमच्यांचा वापर करण्यास प्रोत्साहित करा.

बाळाची झोप

व्या महिन्यात बाळाचे झोपण्याचे तास कमी होतील आणि ह्या बदलामुळे बाळ चिडचिडे होईल आणि थकून जाईल. बाळाचे डोळे चुरचुरणे सारख्या लक्षणांकडे लक्ष द्या. तुमच्या बाळाला खूप जास्त थकू देऊ नका आणि रात्री खूप जास्त जागरण करू नका. जर झोप कमी झाली तर ती रात्री भरून काढता येईल. प्रत्येकाच्या फायद्यानुसार दिनक्रम ठरवा.

पालकांसाठी टिप्स

  • बाळाच्या वर्तणुकीत होणाऱ्या लक्षणीय बदलांसोबत पालकांनी त्यांच्या महिन्यांच्या बाळाला क्रियाकल्पांमध्ये व्यस्त ठेवले पाहिजे.
  • महिन्यांच्या बाळाचा विकासावर नीट लक्ष दिले पाहिजे. तुमच्या बाळाला उभे राहून वाकण्यासाठी मदत करा. तुम्ही घाबरून जाऊन बाळाला सुद्धा घाबरवू नका.
  • तुमच्या बाळाच्या वजनाविषयी तुम्ही तुमच्या बालरोगतज्ञांचे मत घ्या आणि बाळाची शारीरिक वाढ कशी होते आहे हे जाणून घ्या.

महिन्यांचा रोमांचक टप्पा पार करून तुमचे बाळ आता मोहक वयात पदार्पण करेल. आता बाळ बोलण्यास, चालण्यास आणि पाळण्यास शिकेल. बाळाच्या व्यक्तिमत्वाचा पाया भक्कम करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article