Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय

मुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय

मुलांमधील मूत्रमार्गाच्या संसर्गावर (यूटीआय) २० परिणामकारक घरगुती उपाय

मुलांना होणारा मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग सामान्य आहे. जरी प्रतिजैविकांचा एक कोर्स संसर्गाला बरे करू शकत असला तरी, आजकाल, अधिकतर पालक यूटीआयचा उपचार करण्यासाठी घरगुती उपायांचा पर्याय निवडत आहेत.

लहान मुलांमधील मूत्र मार्गातील संसर्गावर घरगुती उपचार

यूटीआयच्या उपचारांसाठी इथे नैसर्गिक उपायांची यादी दिलेली आहे

. भरपूर पाणी द्या

आपल्या मुलास शक्य तेवढे पाणी द्या. लघवी केल्याने बहुतेक वेळेस विषारी पदार्थ लवकर बाहेर काढण्यास मदत होते. तथापि, त्याला पाणी पिण्यास भाग पाडू नका. जर तुमच्या मुलाचे वय ६ महिन्यांपेक्षा कमी असेल तर पाण्याऐवजी आईचे दूध द्या.

. फळांचा ज्यूस द्या

जर आपल्या मुलाचे वय सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल तर क्रॅनबेरी, ब्लूबेरी आणि अननसचा रस सर्वोत्तम पर्याय आहेत. या फळांची शिफारस करण्याचे कारण म्हणजे ते मूत्रमार्गात हानीकारक जीवाणूंची वाढ होण्यास प्रतिबंध करतात आणि त्यांचा गुणाकार मर्यादित करतात. आपल्या बाळाला रस देण्यापूर्वी बालरोग तज्ञाचा सल्ला घ्या. तसेच, फळांचा रस पातळ करून द्या नाहीतर मूत्राची आम्लता वाढू शकते.

. प्रोबायोटिक्स द्या

प्रोबायोटिक्स द्या

खराब जिवाणूंची वाढ थांबवण्यासाठी चांगले जिवाणू महत्वाचे आणि आवश्यक असतात. प्रोबायोटिक्स शरीराच्या नैसर्गिक वनस्पती पुनर्संचयित करून जिवाणूंची वाढ रोखतात आणि अशा प्रकारे यूटीआयचा उपचार आणि प्रतिबंध करतात.

. लिंबाचा रस द्या

लिंबाचा रस लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून काम करते आणि शरीरातून हानिकारक जीवाणू आणि विषारी पदार्थ त्यामुळे बाहेर काढण्यास मदत होते. ह्यामुळे रक्तातील आणि मूत्रमार्गातील पीएच पातळी अम्लीय ते अल्कली अशी होते आणि त्यामुळे जीवाणूंची वाढ थांबते. तुमच्या बाळास रोज लिंबाचा रस दिल्याने भविष्यात मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग टाळता येऊ शकतो.

. ऍसिडिक अन्नपदार्थ आणि पेये टाळा

जर आपल्या मुलाने आईच्या दुधाशिवाय अर्धघन पदार्थ, घन पदार्थ आणि द्रवपदार्थ खाण्यास सुरू केले असतील तर आम्लयुक्त पदार्थ आणि पेये देणे टाळा. बाळाला सौम्य रस, आईचे दूध, भाज्या आणि आम्लता नसलेली फळे द्यावीत.

. आपल्या बाळाचे खाजगी क्षेत्र स्वच्छ ठेवा

नियमित अंतराने बाळाचे डायपर बदला. नवीन डायपर लावण्यापूर्वी बाळाचा खाजगी भाग वाईप्सने प्रथम पुसून टाका. हे करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात धुतले आहेत ना ह्याची खात्री करा.

. कोमट पाण्याने अंघोळ

कोमट पाण्याने अंघोळ

हायपोअलर्जेनिक साबणाने दिवसातून एकदा तुमच्या बाळाला कोमट पाण्याने अंघोळ घाला. कोमट पाणी वेदनांपासून आराम देईल आणि आपल्या बाळाचे खाजगी भाग स्वच्छ करेल, जीवाणूंची पुढील वाढ रोखेल.

. कापडी डायपर वापरा

कपड्यांचे डायपर मूत्र आणि शौच ​​शोषत नाहीत आणि त्वरित बदलले जाऊ शकतात. म्हणून, जिवाणूंची अति वाढ होऊ नये म्हणून तुम्ही कापडी डायपर वापरू शकता.

. पुढून मागे पुसून घ्या (मुलींसाठी)

तुम्हाला मुलगी असल्यास, पुढून मागे पुसण्यामुळे यूटीआय प्रतिबंधित होऊ शकतो. मूत्र आणि शौचामध्ये हानिकारक जिवाणू असतात हे जिवाणू मूत्रमार्गाच्या संपर्कात आल्यास संक्रमण होऊ शकते. म्हणूनच, जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाचा खाजगी भाग स्वच्छ करता तेव्हा समोरून पुढून बाजूस पुसून टाका (आणि त्याउलट नाही) आणि जननेंद्रियासाठी आणि गुद्द्वारसाठी वेगळ्या टॉयलेट पेपरचा वापर करा.

१०. बाळाला नेहमीच लघवी करण्यास सांगा

तुम्ही तुमच्या बाळाला वारंवार लघवी करण्यास सांगू शकता. कारण यूटीआयचा त्रास होत असताना लघवी करणे वेदनादायक असते. तथापि, सकारात्मक प्रोत्साहन चमत्कार करू शकते. बाळ जितकी जास्त लघवी करेल तितक्या तिच्या वेदना कमी होतील हे तुम्ही बाळाला सांगू शकता.

११. व्हिटॅमिन सी समृध्द अन्न समाविष्ट करा

व्हिटॅमिन सी मूत्रात वाढ करते आणि मूत्राशय निरोगी ठेवते. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर व्हिटॅमिन सी समृध्द फळे किंवा व्हिटॅमिन सी पूरक आहार देणे हे मुलांमध्ये यूटीआयचा उपचार करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

१२. आहारात लसणाचा समावेश करा

नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, लसूण अर्क हा यूटीआयशी संबंधित जिवाणूंच्या विरुद्ध प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात लसणाचा समावेश केला असल्याचे सुनिश्चित करा.

१३. नारळ तेल

नारळ तेल

आपल्या मुलाच्या जेवणात एक चमचा नारळ तेल घालणे हा यूटीआयचा उपचार करण्याचा एक चांगला मार्ग आहे कारण यामुळे लघवी होणे सोपे होते. तुमच्या बाळाने लघवी करण्यापूर्वी मूत्रमार्गामध्ये नारळ तेलाचा एक थेंब देखील लावू शकता.

१४. उबदार टॉवेल ठेवा

भांड्यात पाणी गरम करावे आणि त्याभोवती छोटा टॉवेल गुंडाळा. नंतर, तुमच्या बाळाच्या ओटीपोटाच्या खालच्या भागावर तो गरम टॉवेल ठेवा. दिवसभरात अनेक वेळा ह्याची पुनरावृत्ती करा. यामुळे बाळाला वेदना कमी होतील. टॉवेल पोटावर ठेवण्यापूर्वी त्याचे तापमान तपासून पहा.

१५. ऍपल सायडर व्हिनेगर वापरुन पहा

ऍपल सायडर व्हिनेगर (एसीव्ही) हा मुलांमध्ये यूटीआयचा उपचार करण्यासाठी एक उत्तम घरगुती उपचार आहे. हे पोटॅशियममध्ये समृद्ध आहे ज्यामुळे ईकोलाई बॅक्टेरियम मूत्रमार्गात विकसित होत नाहीत तसेच त्यांची संख्या वाढत नाही. ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये असलेल्या ऍसिटिक ऍसिड मध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात जे मूत्रमार्गात हानिकारक विषाणू नष्ट करतात. ऍपल सायडर व्हिनेगर तोंडाद्वारे घ्या. तुमच्या मुलास त्याची चव आवडत नसल्यास, थोडे मध आणि पाणी घाला आणि आठवडाभर सकाळी देत रहा.

१६. काकडी

काकडी हे केवळ फिंगर फूड नाही तर यूटीआयशी लढण्याचा सोपा मार्ग देखील आहे. त्यामध्ये क्षारीय स्वरूपाची खनिजे असतात ही खनिजे मूत्रमार्गात बॅक्टेरियांना येण्यास प्रतिबंध करतात आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा देखील हा पदार्थ आहे. म्हणूनच, वारंवार लघवी करून जिवाणू काढून टाकण्यास मदत होते. काकडीमध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत ज्याद्वारे यूटीआयमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

१७. अननस

अननसामध्ये ब्रोमिलीन नावाचे सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य असते जे प्रथिने खराब करते आणि त्यामुळे जळजळ होते. हे जेव्हा ट्रिप्सिन नावाच्या दुसर्‍या एंजाइमसह एकत्र होते तेव्हा तो यूटीआयवर उपचार करण्याचा एक प्रभावी मार्ग बनतो. अशा प्रकारे, आपल्या मुलाला फिंगर फूड म्हणून अननसाचे तुकडे देणे हा ह्या संसर्गावर उपचार करण्याचा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे.

१८. कॉड लिव्हर ऑइल

व्हिटॅमिन ए आणि डी समृद्ध असल्याने चांगल्या प्रतीचे कॉड लिव्हर ऑइल यूटीआयवर उपचार करण्याचा आणखी एक उपाय आहे. तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन डी मूत्राशयात अँटीमाइक्रोबियल पेप्टाइड्स कॅथेलिसिडिन तयार करते त्यामुळे संसर्ग होत नाही. वारंवार होणाऱ्या यूटीआय वर विशेषकरून ह्याची खूप मदत होते.

१९. नारळ पाणी प्या

काही दिवस नारळाचे पाणी पिण्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गापासून मुक्तता मिळते. त्याचे कारण असे की जिवाणूंमुळे येणारी सूज नारळपाण्यामुळे कमी होते.

२०. सैल कपडे घाला तसेच तिचे आतले कपडे कॉटनचे असु द्या

तुमच्या मुलाला सैल आणि सूती कपडे घातल्यामुळे हवा आत जाईल आणि खाजगी भाग कोरडा राहील. जीवाणू कोरड्या जागांमध्ये पैदास करू शकत नाहीत, यामुळे भविष्यात यूटीआय होण्याची शक्यता कमी होते.

तुम्ही तुमच्या मुलास डॉक्टरकडे कधी न्यावे?

जेव्हा यूटीआय वर वेळीच उपचार होत नाही आणि तो आणखी वाढतो तेव्हा खालील लक्षणे दिसू शकतात. खालील लक्षणे असल्यास ती धोक्याची सूचना आहे त्यामुळे त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्या.

  • लघवी करताना तीव्र वेदना आणि जळजळ होणे
  • कमी दर्जाचा ताप (१०१ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी)
  • लघवीचा रंग आणि गंध बदलणे
  • लघवी ढगाळ दिसते किंवा लघवीतून रक्त येणे

मुलांना मूत्रमार्गाचा संसर्ग होणे ही खूप काही चिंता करण्याची बाब नाही. तथापि, जर तो बराच काळ राहिल्यास त्याचा परिणाम आपल्या मुलाच्या मूत्रपिंडावर होऊ शकतो आणि गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तर, तुमच्या मुलाची यूटीआय ची समस्या बरी करण्यासाठी वर नमूद केलेले घरगुती उपचार करून पहा आणि ते कार्य करत नसल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

मुलांना होणाऱ्या खोकल्यावर २८ सुरक्षित घरगुती उपाय
लहान मुलांच्या तापासाठी १४ सर्वोत्तम घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article