Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी सर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत

सर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत

सर्व्हायकल कॅप – एक जन्म नियंत्रण पद्धत

जेव्हा गर्भनिरोधक पर्याय निवडण्याची वेळ येते तेव्हा बरीचशी जोडपी मोठ्या प्रमाणात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या निवडतात. कंडोमचा अपयशाचा दर जास्त असतो तर, गर्भनिरोधक गोळ्या ह्या हॉर्मोन्सने बनलेल्या असल्याने त्या स्त्रीच्या शरीरातील हार्मोनल बॅलेन्समध्ये व्यत्यय आणतात. इतर नैसर्गिक आणि संप्रेरकमुक्त पर्याय जसे की इम्प्लांट्स आणि इंट्रायूटरिन डिव्हाइस (आययूडी) महिलेच्या गर्भाशयाच्या आत दीर्घकाळ राहतात, त्यामुळे आवश्यक असल्यास ते काढणे कठीण होते. गर्भनिरोधक पद्धतींचा एक अतिशय सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय म्हणजे सर्व्हायकल कॅप (गर्भाशयाच्या मुखाची टोपी) होय. इतर पारंपारिक गर्भनिरोधक पद्धतींपेक्षा असंख्य फायद्यांमुळे सर्व्हायकल कॅपच्या (जी फेमकैप म्हणून विकली जाते), गर्भनिरोधक म्हणून लोकप्रियतेत वाढ होत आहे

सर्व्हायकल कॅप म्हणजे काय?

सर्व्हायकल कॅप एक लहान कपाच्या आकाराचे पुन्हा वापरता येण्यासारखे आणि तात्पुरते गर्भनिरोधक साधन आहे. हे साधन स्त्रियांमधील अनियोजित गर्भधारणेस प्रतिबंधित करते. आययूडी सारख्या इंट्रायूटरिन अडथळ्यांविरूद्ध, सर्व्हायकल कॅप कोणत्याही ठिकाणी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा घालता आणि काढता येऊ शकते. मेडिकल ग्रेड सिलिकॉनपासून बनवलेली सर्व्हायकल कॅप लहान टोपीसारख्या आकाराची असते. त्यामध्ये लूपच्या आत घुमटाच्या आकाराची एक छोटी रचना असते. लैंगिक संभोगापूर्वी, स्त्री तिच्या योनीमध्ये अशा प्रकारे घालते की हा घुमट गर्भाशय ग्रीवाच्या आवरणास झाकू. टाकते. ह्यामुळे शुक्राणूंचा गर्भाशयात प्रवेश करण्याचा मार्ग प्रभावीपणे रोखला जातो. कॅप च्या लूपला विस्तृत बाजू आणि अरुंद बाजू. असतात, योनीमध्ये घालताना त्या गुंडाळल्या जातात आणि गर्भाशयाच्या मुखापर्यंत पोहोचल्यावर कॅप परत उघडली जाते.

सर्व्हायकल कॅप नेहमी शुक्राणूनाशकासह वापरली जाते. शुक्राणूनाशक असे पदार्थ असतात ज्यात शुक्राणू नष्ट करू शकणारी रसायने असतात. ग्रीवा कॅप घालण्याआधी, कॅपच्या खाली असलेल्या खोल खाचेमध्ये शुक्राणूनाशक निर्धारित मात्रेत लावले जाते. अशाप्रकारे भौतिक आणि रासायनिक दोन्ही अडथळे निर्माण करून येणाऱ्या शुक्राणूंच्या विरूद्ध दुहेरी संरक्षण मिळते.

सर्व्हायकल कॅप वापरणे सुरक्षित आहे का?

लॅटेक्स विरहित आणि संप्रेरकमुक्त असल्यामुळे गर्भाशय ग्रीवाच्या कॅप्स शरीरासाठी सुरक्षित असतात. सर्व्हायकल कॅप उत्पादनामध्ये वापरले जाणारे सिलिकॉन मटेरियल वैद्यकीय ग्रेडचे असते ज्यामुळे ते कोणत्याही सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी प्रतिकूल पृष्ठभाग बनते. परंतु एखाद्या स्त्रीला जर टॉक्सिक शॉक सिंड्रोम असेल किंवा योनी अथवा गर्भाशय ग्रीवाच्या भागामध्ये कापले गेले असेल किंवा जखम झालेली असेल तर अशा स्त्रियांसाठी हे साधन असुरक्षित असू शकते. सर्व्हायकल कॅप मध्ये वापरले जाणारे शुक्राणूनाशक बहुतेक स्त्रियांसाठी सुरक्षित असते काहींना त्यापासून अलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकतात.

सर्व्हायकल कॅपचा प्रभावीपणा

कॅपची गर्भधारणेस प्रतिबंध करण्यासाठीची परिणामकारकता ८२९१% नोंदवलेली आहे. ज्या स्त्रियांची आधी नैसर्गिक प्रसूती झालेली आहे त्यांच्या तुलनेत यापूर्वी योनीतून प्रसूती झालेली नाही अशा स्त्रियांमध्ये कॅप अधिक प्रभावी आहे. जरी गर्भ निरोधक गोळ्यांचा यशाचा दर कॅपपेक्षा थोडा जास्त असला तरी जन्म नियंत्रणाची ही पद्धत अनेकांनी पसंत केली आहे कारण ती नैसर्गिक आहे आणि त्याचे दुष्परिणाम फार कमी आहेत.

कॅपचा प्रभावीपणा स्वतःसाठी कसा वाढवावा?

सामान्यत: सर्व्हायकल कॅपचा वापर शुक्राणूनाशकासह करण्याची शिफारस केली जाते. शुक्राणूनाशक येणार्‍या शुक्राणुंना प्रभावीपणे निष्क्रिय करते आणि नष्ट करते. जेव्हा फक्त कॅप वापरली जाते तेव्हा सर्व्हायकल कॅप केवळ एक अडथळा निर्माण करते, परंतु शुक्राणूनाशकासह वापरल्यास गर्भधारणेची शक्यता आणखी कमी होते, ज्यामुळे ह्या गर्भनिरोधक पद्धतीची कार्यक्षमता वाढते. कॅपबरोबरच कंडोमसारख्या इतर पद्धतींचा उपयोग केल्यास यश दर वाढवण्यासाठी मदत होऊ शकते

कॅप वापरण्याचे फायदे

गर्भनिरोधकांच्या इतर पद्धतींपेक्षा सर्व्हायकल कॅप वापरण्याचे बरेच फायदे आहेत.

 • हार्मोन मुक्त असतात आणि त्याचा वापर केल्याने शरीराच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम होत नाही
 • हे साधन कोणाच्याही लैंगिक आनंदात व्यत्यय आणत नाही, कारण ते वापरले आहे हे कळत सुद्धा नाही
 • नियमित वापरासाठी कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाची किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता नाही
 • सर्व्हायकल कॅप वैद्यकीय ग्रेड सिलिकॉन मटेरियलपासून बनविल्यामुळे, त्यात कोणत्याही टॉक्सिक शॉकचा धोका उद्भवत नाही आणि सुरक्षितपणे बारा तासांपर्यंत परिधान केले जाऊ शकते
 • शुक्राणूनाशकाचा वापर केल्यास लैंगिक संक्रमणापासून देखील संरक्षण देते
 • कोणताही वारंवार देखभाल खर्च होत नाही
 • प्रत्येक वेळी काढण्याचा आणि टाकण्याचा त्रास न घेता एकपेक्षा जास्त लैंगिक संबंधांच्या वेळेला वापरली जाऊ शकते
 • संभोगास अडथळा आणत नाही, कारण वेळेच्या आधी ती घातली जाऊ शकते
 • आकारात अगदी लहान असल्याने कोणत्याही ठिकाणी सहजपणे नेली जाऊ शकते
 • बाळांना स्तनपान देणाऱ्या स्त्रिया सुरक्षितपणे वापरू शकतात

हे कसे वापरावे?

सर्व्हायकल कॅप वापरण्यास तुलनेने सोपी आहे. पहिल्या वेळेला हे थोडे कठीण जाऊ शकते, परंतु वापरत राहिल्यास बहुतेक स्त्रियांना त्यांच्या योनीत ह्या साधनांची उपस्थिती देखील जाणवत नाही. कॅप वापरण्यासाठी येथे खाली तपशीलवार मार्गदर्शिका दिली आहे.

पूर्व तयारीः

कॅप शरीरात घालण्यापूर्वी आपण काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वापरण्यापूर्वी आपले हात आणि सर्व्हायकल कॅप धुवा आणि स्वच्छ करा. तुम्ही प्रथमच हे वापरत असल्यास, प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी कॅप घालण्याचा आणि काढून टाकण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे कॅप कशी वापरायची ह्याची तुम्हाला कल्पना येईल. . एकदा तुम्हाला कॅप घालण्याचा आणि काढण्याचा आत्मविश्वास आला की, ते गर्भाशय ग्रीवामध्ये कमीतकमी सहा तास ठेवून पहा आणि कोणती अस्वस्थता किंवा चिडचिड जाणवते का ते पहा. बहुतेक स्त्रियांना दोन वेळा वापरल्यानंतर कॅपची उपस्थिती जाणवत नाही. एकदा याचा वापर करण्याबद्दल आत्मविश्वास आला की गर्भनिरोधकासाठी त्याचा वापर करा. सर्व्हायकल कॅप घालून पहिल्या वेळेला संभोग करताना दुसरे गर्भनिरोधकाचे साधन जवळ ठेवा. म्हणजे कॅप विषयी काही समस्या आल्यास त्यास सामोरे जाता येईल.

घालताना:

कॅपच्या प्रत्येक वापरादरम्यान निर्जंतुक केलेल्या पाण्याने ती चांगली धुवून स्वच्छ करा. कॅपची स्वच्छता केल्यानंतर, कॅप गळत तर नाही ना किंवा खराब नाही ना हे तपासून पहा. कॅप चांगल्या स्थितीत आहे हे सुनिश्चित केल्यावर कपच्या आकाराच्या संरचनेत एक चमचे शुक्राणूनाशक घाला. घुमट आणि दुसऱ्या बाजूच्या कडा दरम्यानच्या भागात आणखी काही शुक्राणूनाशक वापरा. आता ते योनीमध्ये घालण्यासाठी तयार आहे. सहसा, संभोगाच्या किमान पंधरा मिनिटांपूर्वी कॅप घालावी लागते. कॅप घालण्यासाठी थोडासा सराव आवश्यक आहे आणि पहिल्या काही प्रयत्नांच्या दरम्यान आपण आपल्या डॉक्टरांची मदत घेऊ शकता. कॅप घालण्यासाठी आपले पाय रुंद उघडा आणि अर्धवट स्थितीत (Squat) बसा. स्वच्छ हातांनी, कॅपच्या कडा दोन्ही बाजूस दाबून त्यांना एकमेकांच्या जवळ आणा. सिलेंडरच्या आकाराची गुंडाळी करून योनीमध्ये घाला, आणि गर्भाशयाच्या मुखापर्यंत पुढे सरकवा. जेव्हा तुम्ही गर्भाशय ग्रीवा जवळ पोहोचता, तेव्हा कॅप उघडण्यासाठी आणि गर्भाशय मुखावर आच्छादित होण्यासाठी हात सोडा. जमिनीवर झोपून गुडघे वर करून किंवा खुर्चीवर एक पाय ठेऊन तुम्ही कॅप घालू शकता. कॅप घालण्याच्या तंत्रावर उपलब्ध असलेले विविध ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्ही बघू शकता

योनीमध्ये बोट घालून कॅपने गर्भाशय ग्रीवा व्यवस्थित झाकले आहे का ते तपासून पहा. जर व्यवस्थित बसले नाही असे आपल्याला वाटत असल्यास आपण ते काढून टाकू शकता आणि पुन्हा घालू शकता.

काढणे:

संभोगानंतर, आपल्याला कॅप कमीत कमी सहा तास ठेवावी लागेल. कॅप जागेवरून हलली आहे की नाही हे आपण संभोगानंतर ताबडतोब तपासू शकता. लैंगिक संबंध दरम्यान किंवा नंतर कॅप ची जागा बदलली आहे असे लक्षात आल्यास, गर्भधारणा टाळण्यासाठी ताबडतोब गर्भनिरोधक गोळ्या घ्या.

कॅप काढण्यासाठी, घालण्यासाठी जसे केले तसे पाय फाकवून अर्धवट स्थितीत बसा आणि काढण्यासाठी पट्टा खेचून टोपी काढा. कॅप काढून टाकण्यासाठी नेहमी स्वच्छ बोटांचा वापर करा आणि सक्शन प्रेशर कमी कारणासाठी टोपीला हळुवारपणे पुढे ढकला. काढून टाकल्यानंतर, कॅप साबण आणि पाण्याने स्वच्छ करा आणि थंड, कोरड्या आणि निर्जंतुकीकरण केलेल्या जागेवर ठेवण्यापूर्वी त पूर्णपणे वाळवा. कॅप बाजूला ठेवण्यापूर्वी कॅपला छिद्रे तर नाहीत ना हे तपासून पहा.

कॅप कुठे मिळते ?

सर्व्हायकल कॅप्स सामान्यत: मेडिकल स्टोअरमध्ये आणि निवडक आरोग्य सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असतात. अमेरिकेत, हे केवळ औषध विक्रेत्यांकडून वैध प्रिस्क्रिप्शनद्वारे खरेदी केले जाऊ शकते. तसेच निर्मात्याच्या वेबसाइटवरून किंवा अन्य ऑनलाइन शॉपिंग साइटवरून ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते. योनी कालव्याचा वेगवेगळा आकार असणाऱ्या स्त्रियांसाठी हे तीन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असते. योनि कालवा मोजण्याचे मूल्यांकन प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकाद्वारे केले जाऊ शकते. योग्य आकार निवडणे महत्वाचे असते कारण ते सर्व्हायकल कॅप्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. फेमकॅप 22 मिमी, 26 मिमी आणि 30 मिमीच्या डायफ्राम आकारात उपलब्ध आहे. 22 मिमी कॅप लहान स्त्रियांसाठी किंवा ज्या स्त्रिया कधीच गर्भवती झालेल्या नाहीत किंवा यापूर्वी योनीतून प्रसुति झाली नाही अशा स्त्रियांसाठी. असते. 26 मिमीचा कप गर्भवती स्त्रिया किंवा थोड्या काळासाठी गर्भवती असलेल्या आणि योनीतून प्रसूती न झालेल्या स्त्रियांसाठी योग्य आहे आणि 30 मिमी कॅप आधी योनीतून प्रसूती झालेल्या स्त्रियांसाठी योग्य आहे. महिला त्यांच्या आकारानुसार कॅप निवडू शकतात आणि वर नमूद केलेल्या कोणत्याही स्त्रोताकडून ती विकत घेऊ शकतात

कॅपची किंमत किती आहे?

सर्व्हेकल कॅप्स हा बाजारातील सर्वात प्रभावी गर्भनिरोधक पर्यायांपैकी एक आहे. पुन्हा वापरण्यायोग्यतेमुळे कॅप एक अतिशय किफायतशीर पर्याय आहे. अमेरिकेत व इतर काही देशांमध्ये फेमकॅप म्हणून तयार केलेल्या आणि विकल्या जाणाऱ्या सर्व्हायकल कॅप्स भारतात अंदाजे १७,००० रुपयांना मिळतात. ह्या साधनासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि अत्यंत कमी देखभाल खर्च असतो तसेच ते पुन्हा वापरता येते.

तोटे

सर्व्हायकल कॅपच्या वापराशी संबंधित काही तोटे आहेत. ते खालीलप्रमाणे.

 • संभोगाच्या प्रक्रियेदरम्यान सर्व्हायकल कॅप बाहेर पडण्याची शक्यता असते. हे खूप गैरसोयीचे आणि असुरक्षित असू शकते
 • मासिक पाळीच्या वेळी वापरले जाऊ शकत नाही
 • यासाठी शुक्राणूनाशकाचा वापर आवश्यक आहे, ज्यामुळे काही स्त्रियांमध्ये एलर्जीची प्रतिक्रिया किंवा अस्वस्थता निर्माण होते
 • काही स्त्रियांना हे साधन किंचित अस्वस्थ आणि विचलित करणारे वाटते
 • योनिमार्गात चुकीच्या पद्धतीने घातले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे गैरसोय होऊ शकते
 • कॅप घालताना योनिमध्ये बोट घालणे आणि काढणे काही स्त्रियांना अस्वस्थ वाटते
 • इतर जन्म नियंत्रण उपायांच्या तुलनेत अनावश्यक गर्भधारणा यशस्वीरित्या टाळण्याचे प्रमाण अद्याप खूप जास्त नाही. यशस्वीरित्या योनीतून प्रसूती झालेल्या महिलांमध्ये विशेषतः कमी दर आहे

सर्व्हायकल कॅप आणि डायफ्राम मधील फरक

डायफ्राम आणि गर्भाशय ग्रीवाच्या टोपीसाठी कृती सारखीच असते परंतु काही मूलभूत गोष्टींमध्ये ते भिन्न आहेत. जरी हे दोघेही गर्भाशय ग्रीवावर अडथळा निर्माण करून कार्य करीत असले तरी , सर्व्हायकल कॅप आणि डायफ्रॅम ज्या डिझाइनमध्ये बनविलेले आहेत ते थोडेसे भिन्न आहेत. डायाफ्राम डिशच्या आकारात डिझाइन केलेले आहे, तर सर्व्हायकल कॅप खलाशाच्या टोपीसारखी दिसते. डायफ्रामची कप सारख्या आकाराच्या संरचनेची धातूची अंगठी योनीच्या भिंतींवर थोडा दबाव आणते, जे सर्व्हायकल कॅप मध्ये आढळत नाही.अगदी सहज काढून टाकण्यासाठी, सर्व्हायकल कॅप मध्ये काढण्यासाठी एक पट्टा असतो, तर डायफ्रॅममध्ये अशी तरतूद नसते.

डायफ्राम जवळजवळ दहा वेगवेगळ्या आकारात येतात आणि योग्य आकार ओळखण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. सर्व्हायकल टोपीचा आकार गर्भधारणा झाल्यास किंवा योनीतून प्रसूती झाली आहे किंवा कसे यावर आधारित असतो आणि सहजपणे निर्णय घेता येतो. डायफ्रामचा यशाचा दर सर्व्हायकल कॅपपेक्षा थोडा जास्त असतो

सर्व्हायकल कॅप वापरताना जोखीम

सर्व्हायकल कॅपच्या वापराशी संबंधित काही जोखीम घटक आहेत, त्यामुळे वापरण्यापूर्वी जोडप्यांची त्याबाबत जागरूक असले पाहिजे.

 • हे बर्‍याच लैंगिक आजारांपासून संरक्षण देत नाही. जर एखाद्याला एसटीडीचा त्रास झाला असेल तर सर्व्हायकल कॅप वापरल्याने संसर्गापासून कोणतेही संरक्षण देत नाही
 • शुक्राणूनाशकाच्या वापरामुळे काही स्त्रियांमध्ये अस्वस्थता आणि एलर्जीची प्रतिक्रिया उद्भवू शकते. लैंगिक रोगाचा प्रसार होण्याचा धोका देखील वाढू शकतो कारण योनीतील सूक्ष्मजीवांचे संतुलन बदलते
 • संभोगादरम्यान सर्व्हायकल कॅप निसटण्याची शक्यता असते त्यामुळे त्या जोडप्याला अनपेक्षित गर्भधारणा होण्याचा धोका असतो
 • योनीच्या आत २४ तासांपेक्षा जास्त काळ सर्व्हाकल कॅप राहिल्यास त्या स्त्रीला टॉक्सिक शॉक चा धोका संभवतो

सर्व्हायकल कॅप वापरणे कोणी टाळले पाहिजे?

काही समस्या असलेल्या स्त्रियांसाठी गर्भनिरोधक म्हणून सर्व्हायकल कॅप हा सर्वोत्तम पर्याय नसू शकतो. त्यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत.

 • मूत्रमार्गात किंवा योनिमार्गाचा संसर्ग असलेल्या महिलांनी सर्व्हायकल कॅप वापरणे टाळावे कारण यामुळे संसर्गाशी संबंधित धोका वाढतो
 • मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांनी सर्व्हायकल कॅप वापरू नये
 • योनीतील स्नायू कमकुवत असलेल्या स्त्रियांनी सर्व्हायकल कॅपचा वापर करणे टाळले पाहिजे
 • योनी किंवा गर्भाशय मुखाजवळ जखम झालेल्या महिलांनी कॅपची निवड करू नये
 • सर्व्हायकल कॅप सिलिकॉन मटेरियलपासून बनविली जात असल्याने, ज्या स्त्रियांना टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा इतिहास आहे त्यांनी कॅपचा वापर टाळावा
 • ज्या स्त्रिया योनीमार्गे आपले बोट घालण्यास आरामदायक नसतात त्या कॅप वापरणे टाळू शकतात
 • ज्या स्त्रिया प्रजनन अवयवांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत
 • ज्या स्त्रिया प्रजनन अवयवांमध्ये कॅन्सरचे निदान झाले आहे
 • संभोगाच्या सहा आठवड्यांपूर्वी गर्भपात झालेल्या किंवा गर्भधारणा गमावलेल्या स्त्रिया

सामान्य प्रश्न

. नवीन कॅप कधी खरेदी करावी?

सर्व्हायकल कॅप्स पुन्हा वापरण्यायोग्य जन्म नियंत्रणसाधन आहे. गर्भाशय मुखाजवळ घालताना तुम्ही ते एकापेक्षा अधिक वेळा वापरू शकता. स्वच्छ करून पुन्हा वापरले जाऊ शकते. हे साधन वापरण्याच्या वारंवारतेनुसार , एक किंवा दोन वर्ष वापरल्यानंतर ते बदलले जाऊ शकते. कॅपची अखंडता तपासण्यासाठी, किंवा कॅपचे नुकसान तपासून बघण्यासाठी बारकाईने परीक्षण करा. त्यात पाणी टाकून कोणत्याही गळतीची तपासणी करू शकता. वापरण्यासाठी प्रमाणित होण्यासाठी आपण एका वर्षा नंतर डॉक्टरांकडे देखील ते घेऊन जाऊ शकता. कॅपच्या आकाराचे देखील वर्षातून एकदा परीक्षण केले पाहिजे म्हणजे कोणत्याही गळतीला जागा राहणार नाही. हे प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकाच्या मदतीने देखील केले जाऊ शकते

. बाळंतपणानंतर मी सर्व्हायकल कॅप वापरण्यास केव्हा प्रारंभ करू शकते?

नवीन मातांनी वापरण्यासाठी गर्भाशयाच्या कॅप्सची शिफारस करत नाही. प्रसुतिनंतर आठ ते दहा आठवड्यांनंतर सर्व्हायकल कॅप वापरली जाऊ शकते.

. स्तनपान देताना सर्व्हायकल कॅप वापरणे सुरक्षित आहे काय?

गर्भाशयाच्या कॅप्समध्ये कोणतेही हार्मोन्स नसतात. म्हणूनच, हे शरीरातील हार्मोन्सच्या समतोलमध्ये व्यत्यय आणत नाही. हे केवळ शारीरिक अडचण निर्माण करते म्हणून, सर्व्हायकल कॅप वापरताना आपल्या बाळाला स्तनपान देणे पूर्णपणे सुरक्षित असते. सर्व्हायकल कॅपसमवेत वापरल्या जाणार्‍या शुक्राणूनाशकाचा स्तनपानावर परिणाम होतो.

. मासिक पाळी दरम्यान कॅप वापरणे सुरक्षित आहे?

मासिक पाळी दरम्यान कॅप्स वापरण्याची शिफारस केलेली नाही. गर्भाशयाचे मुख सर्व्हायकल कॅप मुळे बंद होते आणि त्यामुळे रक्ताच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो . यामुळे शरीरावर नको ते परिणाम होऊ शकतात. खरं तर, कोणत्याही योनिमार्गाच्या रक्त स्त्राव दरम्यान सर्व्हायकल कॅपचा वापर करणे चांगले नाही

. कॅप एसटीडीच्या प्रसारास प्रतिबंध करते?

जर दोघांपैकी एकाला लैंगिक आजार असेल तर सर्व्हायकल कॅपचा वापर करण्याची शिफारस केली जात नाही. एसटीडीला कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजीवांच्या संक्रमणापासून सर्व्हायकल कॅप मुळे संरक्षण मिळत नाही. अशा परिस्थितीत कंडोमचा वापर केल्यास कॅप पेक्षा अधिक चांगले संरक्षण मिळू शकते. तसेच, कॅप सोबत वापरल्या जाणार्‍या शुक्राणूनाशकामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते

.लैंगिक संबंधादरम्यान दरम्यान कॅप खराब झाली तर काय करावे?

सेक्स दरम्यान कॅप जागेवरून पाळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे जोडप्याला अनपेक्षित गर्भधारणेस सामोरे जावे लागू शकते. जर विर्यपतनानंतर कॅप जागेवरून सरकली तर तुम्हाला आपत्कालीन गर्भ निरोधक गोळ्या म्हणजेच ईसीपी घ्याव्या लागू शकतात. ह्या गोळ्यांमुळे गर्भधारणा रोखली जाण्याची खात्री होते. तुम्हाला गोळ्याच्या प्रभावीतेबद्दल शंका असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

बाजारात उपलब्ध सुरक्षित आणि प्रभावी गर्भनिरोधकांपैकी, सर्व्हायकल कॅप निःसंशयपणे जन्म नियंत्रणासाठी एक उत्तम साधन आहे. पारंपारिक कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांव्यतिरिक्त जास्तीत जास्त महिला सर्व्हायकल कॅपचा वापर करण्याचा पर्याय शोधत आहेत, कारण हा पर्याय निरुपद्रवी आहेत आणि त्याच्या वापरामुळे संप्रेरकांच्या संतुलनावर परिणाम होत नाही

आणखी वाचा : संतती नियमनासाठी शुक्रजंतूनाशक

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article