Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात भारतीय पद्धतीचे शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

घरात एक नवीन पाहुणा येणार आहे ह्या बातमीने प्रत्येकजण आनंदी होतो, परंतु सावधगिरी बाळगणे आणि काळजीपूर्वक वागणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी गरोदर महिलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवले जाते, घर चाइल्डप्रूफ केले जाते आणि व्यायाम अनिवार्य केले जातात. तथापि, एक साधे काम ज्याचा लोक फारसा विचार करीत नाहीत ते म्हणजे गरोदर स्त्रीचे पोट साफ होणे. आजकाल आपल्यापैकी बहुतेक लोकांकडे पाश्चिमात्य शैलीतील शौचालये आहेत. आणि जरी आपल्या घरात भारतीय शैलीतील शौचालय असेल तर गर्भवती महिलेस ते वापरण्यास परवानगी नसते. परंतु गरोदरपणात भारतीय शौचालय वापरणे खरोखर हानिकारक आहे काय? तुम्ही गरोदर असताना तुम्हाला ह्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

गर्भवती असताना भारतीय शौचालय वापरणे सुरक्षित आहे का?

एखादी स्त्री गर्भवती असताना भारतीय किंवा स्क्वाट टॉयलेट वापरणे केवळ सुरक्षित नाही तर आई आणि बाळासाठी देखील ते चांगले आहे. गर्भवती असताना भारतीय शौचालयाचा वापर करण्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तथापि, जर तुम्हाला अकाली प्रसूतीचा धोका असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला भारतीय शौचालय न वापरण्यास सांगितले असेल गरोदरपणात भारतीय शौचालय वापरू नका.

गरोदरपणात भारतीयशैलीतील शौचालय वापरण्याचे फायदे

गरोदरपणात भारतीय शौचालयाचा वापर केल्याने गर्भवती स्त्रीला फायदा होतो. त्यामुळे खालील फायदे होतात

 • स्क्वॉटिंगमुळे पेल्विक प्रॉलेप्सची शक्यता कमी होते.
 • भारतीय शौचालयाचा वापर केल्याने शरीरातील मल बाहेर टाकण्यासाठी पोटावर आवश्यक दबाव निर्माण होण्यास मदत होते.
 • होणाऱ्या आईच्या शरीराचा आणि शौचालयाच्या पृष्ठभागा दरम्यान असुरक्षित संपर्क टाळला जातो.
 • स्त्रीच्या मांडी कडील तसेच ओटीपोटाचे क्षेत्र मजबूत करते आणि बाळाच्या प्रसूतीसाठी तिला तयार करते.
 • प्रसूतीच्या वेळी ही स्थिती आदर्श मानली जाते कारण त्यामुळे जन्म कालवा उघडतो आणि बाळास नैसर्गिकरित्या खाली उतरण्यास मदत होते.

गरोदरपणात भारतीय-शैलीतील शौचालय वापरण्याचे फायदे

भारतीय पद्धतीचे शौचालय वापरताना घ्यावयाची काळजी

भारतीय महिलांनी भारतीय शौचालये वापरणे ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आईच्या गरजेनुसार आहे याची काळजी घ्यावी. भारतीयशैलीतील शौचालय वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेतः

 • घसरू नये व अपघात होऊ नयेत यासाठी टॉयलेटचे क्षेत्र कोरडे व स्वच्छ असल्याची खात्री करा.
 • गर्भवती महिलेला बसताना संतुलन साधण्यासाठी, बाथरूमच्या प्रत्येक बाजूला हँडल्स बसवा जेणेकरून तिची त्यावर चांगली पकड असेल आणि ती मागे पडणार नाही (एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की पाश्चिमात्य शौचालयाची सवय असल्यामुळे तीनपैकी एक महिला भारतीय शौचालयात नीट बसू शकत नाही).
 • नंतरच्या स्वच्छतेसाठी लागणारे टॉयलेट पेपर आणि पाणी जवळ असल्याची खात्री करा. होणाऱ्या आईला ते घेण्यासाठी जास्त ताण पडणार नाही ह्याची खात्री करा.
 • तुमच्या शरीराच्या गरजेनुसार तुम्ही कोणत्या प्रकारचे शौचालय वापरावे याबद्दल प्रसूतीतज्ञाशी सल्लामसलत करा. तसेच, जर तुम्हाला भारतीय शौचालय वापरण्याची सवय नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे गरोदरपणातील पुढील गुंतागुंत टळेल.
 • बाथरूम मध्ये चांगला प्रकाश आणि हवा असल्याचे सुनिश्चित करा. त्यामुळे गर्भवती स्त्रीला गुदमरल्यासारखे होणार नाही आणि तिला आरामदायक वाटेल.
 • शौचास करताना खूप दाब देऊ नका त्यामुळे तुमच्या पोटावर आणि पेल्विक क्षेत्रावर जास्त दबाव येऊ शकतो.
 • शौचासाठी बसताना आपली पाठ सरळ ठेवा (हे सुरुवातीच्या काळात थोडेसे कठीण असेल परंतु कालांतराने सोपे होईल). ह्यामुळे संतुलन टिकवून ठेवण्यास आणि कोणत्याही प्रकारची घसरण किंवा वेदना टाळण्यास मदत होईल.
 • बाथरूम मध्ये घसरून पडणे टाळण्यासाठी घट्ट पकड असलेल्या चपला घाला.
 • पाश्चिमात्य शौचालयात तुम्ही भारतीय शौचालयात बसता तसे दोन पायांवर बसू नका. त्यामुळे उंचावरून पडण्याची शक्यता वाढते.
 • गर्भवती स्त्रीने मदतीसाठी हाक मारल्यानंतर लगेच तिच्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर स्त्री अस्वस्थ असेल, तिला चक्कर येत असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना ती अनुभवत असेल तर हे आवश्यक आहे.

गर्भवती महिलेच्या आरोग्यासाठी भारतीय शौचालय चांगले आहे. ह्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होतेच, परंतु ह्यामुळे तिचे मन आणि शरीर सुद्धा तयार होते. तथापि, भारतीय शौचालय गर्भवती स्त्रीसाठी फायदेशीर असले तर सुरक्षित राहण्यासाठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

आणखी वाचा:

गरोदरपणातील पिवळा स्त्राव
गरोदरपणातील पोटदुखी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article