Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात रताळे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात रताळे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात रताळे खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सकस आहार घेतल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते. जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही सर्व पौष्टिक पदार्थ खाण्यास आधीच सुरुवात केलेली असेल. परंतु रताळ्यासारखे काही पौष्टिक खाद्यपदार्थ आहेत आणि त्यांचा तुमच्या गरोदरपणाच्या आहारात समावेश करावा किंवा नाही ह्याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल. रताळ्याची चव चांगली असते आणि ते खूप पौष्टिक असतात, पण तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकता  की नाही  ह्याविषयी  अधिक जाणून घेऊयात!

गरोदरपणात रताळे खाणे सुरक्षित आहे का?

रताळे हा अत्यावश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. गरोदर स्त्रीला गरोदरपणात पोषकतत्वांची गरज असते. रताळ्यामध्ये असलेल्या स्टार्च मधून ऊर्जा प्राप्त होऊ शकते. रताळ्यामध्ये प्रथिने आणि चरबी नसते. तसेच त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर इत्यादी विविध पोषक तत्वांचा चांगला साठा असतो. हे सर्व पोषक घटक बाळाच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असतात.

रताळ्याचे पौष्टिक मूल्य

रताळ्याचे पौष्टिक मूल्य

 

खालील तक्त्यामध्ये एक कप किंवा 200 ग्रॅम शिजवलेल्या रताळ्याचे पौष्टिक मूल्य दिले आहे.

पोषक घटक वजन
व्हिटॅमिन ए 1.9 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी 22.2 मिग्रॅ
मॅंगनीज 0.2 मिग्रॅ
तांबे 0.15 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी5 0.6 मिग्रॅ
पायरीडॉक्सिन 0.1 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी7 5.71 मायक्रोग्रॅम
आहारातील फायबर 4 ग्रॅम
नियासिन 0.7 मिग्रॅ
थायमिन 0.06 मिग्रॅ
रिबोफ्लेविन 0.04 मिग्रॅ

रताळ्याचे आरोग्यविषयक फायदे

गरोदरपणात रताळे खाण्याचे काही फायदे खाली दिले आहेत.

1. गर्भाची योग्य वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांना डॉक्टर व्हिटॅमिन ए समृद्ध असलेले अन्न खाण्याची शिफारस करतात,  कारण त्यांना दररोज किमान 800 मायक्रोग्राम व्हिटॅमिन ए आवश्यक असते. हे व्हिटॅमिन ए चे प्रमाण अर्ध्या कप भाजलेल्या रताळ्यापासून मिळू शकते. व्हिटॅमिन ए गर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण ते हृदय, फुफ्फुसे, यकृत, रक्त, मूत्रपिंड इत्यादी अवयवांच्या वाढीस मदत करते.

२. बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते

रताळे हे तंतुमय पदार्थांचा एक चांगला स्रोत आहे. गरोदरपणात तंतुमय पदार्थ हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. गर्भवती स्त्रिया अनेकदा बद्धकोष्ठतेची तक्रार करतात, आणि ही गरोदरपणातील एक सामान्य समस्या आहे. तुमच्या आहारात दररोज सुमारे ३० ग्रॅम फायबर असले पाहिजे – यापैकी एक तृतीयांश फायबर एक वाटी रताळ्यातून मिळू शकते.

3. गर्भाच्या मेंदूच्या विकासात मदत होते

पिरिडॉक्सीनला व्हिटॅमिन B6 देखील म्हणतात. गर्भाचा मेंदू आणि मज्जासंस्थेच्या निर्मितीसाठी हा घटक आवश्यक आहे. तसेच रक्त तयार करण्यासाठी सुद्धा त्याची गरज असते. गर्भवती स्त्रियांना होणारी मळमळ टाळण्यासाठी सुद्धा रताळ्याचा उपयोग होतो. एक वाटी रताळ्यामध्ये दररोज लागणाऱ्या  पायरीडॉक्सिनच्या सुमारे एक तृतीयांश इतके प्रमाण असते.

4. गर्भाच्या हाडांच्या विकासात मदत होते

गरोदरपणात, स्त्रीच्या आहारात दररोज सुमारे 90 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी चा समावेश करणे आवश्यक आहे. एक वाटी रताळ्यामधून दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन सी च्या १/३ इतके व्हिटॅमिन सी मिळू शकते. व्हिटॅमिन सी संप्रेरकांच्या कार्यास चालना देते, हाडे आणि स्नायूंचा विकास चांगला होतो, तसेच त्वचा सुद्धा छान होते. रताळे खाल्ल्यास लोहाचे शोषण देखील वेगाने होते, आणि ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. एक वाटी रताळ्यामधून तुमच्या शरीराला दररोज आवश्यक असणारे मॅंगनीज देखील अर्ध्या प्रमाणात मिळू शकते. मॅंगनीज हे एक दुर्मिळ खनिज आहे आणि ते गर्भाची हाडे आणि कूर्चेच्या  विकासासाठी देखील मदत करते.

गरोदरपणात तुम्ही कच्चे रताळे खाऊ शकता का?

नाही, तुम्ही रताळे कच्चे खाऊ नये कारण रताळ्याचा बाहेरचा थर नीट शिजवला नाही तर पोट फुगणे आणि छातीत जळजळ यासारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे मळमळ देखील होऊ शकते.

गरोदरपणात रताळे खाण्याचे धोके

गरोदरपणात तुम्ही जे काही खात आहात ते माफक प्रमाणात असावे. जर तुम्ही जास्त खाल्ले तर त्यामुळे गुंतागुंत होऊ शकते. गरोदरपणात रताळे खाल्ल्याने होणारी गुंतागुंत खाली सांगितलेली आहे.

  • रताळ्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मुतखड्याचा त्रास होतो. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात आणि मूत्रपिंड आणि पित्ताशयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  • रताळ्यामध्ये असलेली मॅनिटोल ही विशेष प्रकारची साखर पोटदुखीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे गॅस आणि अतिसार देखील होऊ शकतो.
  • रताळ्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असल्याने, मधुमेह आहे किंवा जास्त वजन असलेल्या स्त्रियांनी रताळे खाल्ल्यास त्यांना काही आरोग्यविषयक गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

रताळे हा एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. परंतु रताळे जास्त प्रमाणात खाऊ नका. संतुलित आहाराचे पालन करा. आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य आणि प्रथिनेयुक्त पदार्थ यांचा समावेश करा म्हणजे तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी रहाल.

आणखी वाचा:

गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का?
गरोदरपणात बीटरूट खाणे: आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article