Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार

गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार

गरोदरपणात योनीला येणारा दुर्गंध: कारणे आणि उपचार

गरोदरपणामुळे स्त्रीच्या आयुष्यात बरेच बदल घडतात. यातील काही बदल आनंददायी आहेत तर काही तितकेसे आनंददायी नाहीत. मॉर्निंग सिकनेस, मळमळ, पाठदुखी, डोकेदुखी इत्यादी गरोदरपणातील काही सामान्य लक्षणे आहेत, ज्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. मूड बदलणे, मॉर्निंग सिकनेस किंवा पाठीच्या दुखण्यासारख्या लक्षणांवर अधिक तपशीलाने चर्चा केली जात असताना, योनिमार्गातील स्राव आणि योनिमार्गाच्या वासासारख्या इतर लक्षणांकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. काही स्त्रियांना त्याचा अनुभव येऊ शकतो. योनिमार्गाच्या वासाची कारणे कोणती आहेत आणि त्या अप्रिय वासातून मुक्त होण्यासाठी आपण काय करू शकता ते जाणून घेऊया.

गरोदरपणात योनीतून दुर्गंध येणे सामान्य आहे का?

गरोदरपणात स्त्रीच्या योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे. काही स्त्रियांना योनीतून येणाऱ्या स्रावाला दुर्गंधी जाणवते. गरोदरपणात योनीमार्गाचा वास ही तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप सामान्य गोष्ट आहे. ६५% पेक्षा जास्त गर्भवती स्त्रियांना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात योनीतून स्त्राव येण्याचा त्रास होतो. किमान १० पैकी ६ स्त्रिया त्यांच्या योनीतून वैशिष्ट्यपूर्ण गंध अनुभवतात. तर होय, ते सामान्य आहे.

गरोदरपणात योनीतून गंध कशामुळे होतो?

गरोदरपणात योनीचा गंध हा बदललेले पीएच संतुलन, घाम, संक्रमण, संप्रेरके आणि आहारातील बदलांमुळे असू शकतो. जर वैद्यकीय समस्या नसेल तर आपण प्रसूती झाल्यावर वास नाहीसा होईल. घाम आणि आहारातील बदलांमुळे गर्भवती नसलेल्या स्त्रियांच्या बाबतीत देखील योनीला दुर्गंधी असू शकते.

योनिमार्गाला वास येण्याची कारणे पुढीलप्रमाणे

. संसर्ग

गरोदरपणात योनीमार्गाला झालेल्या संसर्गामुळे त्यास तीव्र गंध येऊ शकतो. योनीतील संसर्ग हा योनीमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणार्‍या बुरशीच्या अत्यधिक गुणामुळे होतो. यामुळे सतत खाज सुटते आणि दुर्गंधीयुक्त गंध निर्माण होते. बॅक्टेरियल व्हजायनोसिस मध्ये योनीमार्गाला जिवाणूंचा संसर्ग होतो. यामुळे गरोदरपणात दूषित वास येऊ शकतो.

. आहारातील बदल

गरोदरपणात आहारातील बदल देखील योनीतून वास येण्यामागील एक कारण आहे. उदाहरणार्थ, आपण गरोदरपणात लसूण किंवा मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन केल्यास आपल्या योनिमार्गाच्या स्रावचा वास बदलू शकतो.

. पीएच पातळीमध्ये बदल

योनीची सामान्य पीएच पातळी ३. ८ ते ४. ५ च्या दरम्यान असते, जी ऍसिडिक श्रेणीत असते. हा आम्लीय पीएच फायदेशीर बॅक्टेरिया किंवा योनिमार्गाच्या ऍसिडिक फ्लोरा मुळे होतो जे योनिमार्गामध्ये राहून आम्ल तयार करतात. गरोदरपणात, योनिमार्गाच्या भागात जास्तीत जास्त रक्तपुरवठा झाल्यामुळे हा पीएच बदलू शकतो. त्यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि योनीतून दुर्गंधी येऊ शकते

. संप्रेरकांमधील बदल

एखाद्या महिलेच्या शरीरात गरोदरपणात हार्मोनल बदल होतात. गर्भवती असताना प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या दोन हार्मोन्सच्या उत्पादनात अचानक वाढ होते. दोन संप्रेरकांमधील ही वाढ नाळ तयार होण्यास मदत करते आणि बाळाला पोषण देते. जेव्हा एखादी महिला गर्भवती असते, तेव्हा तिच्या प्रोलॅक्टिनची पातळी देखील वाढते त्यामुळे नंतर आईच्या दुधाच्या निर्मितीस मदत होते. हे हार्मोनल बदल योनिमार्गात स्त्राव वाढवू शकतात आणि त्यामुळे योनीमार्गास वास येऊ शकतो.

गर्भवती असताना योनीमार्गाचा वास येऊ नये म्हणून काय करावे?

योनिमार्गातील दुर्गंधीयुक्त स्रावावर खालील प्रकारे उपचार केला जाऊ शकतो आणि प्रतिबंधित केला जाऊ शकतो

. स्वच्छ आणि कोरडे रहा

गर्भवती असताना, आपण योनी स्वच्छ आणि कोरडी राहिल याची खात्री करुन घ्यावी. अधिक वेळा अंघोळ करून कोमट पाण्याने योनी स्वच्छ करा. डॉक्टरांनी लिहून दिल्यास तुम्ही सौम्य साबण किंवा वॉश देखील वापरू शकता. तसेच, तेथील केस लहान आणि व्यवस्थित ठेवा.

. कॉस्मेटिक्स वापरणे टाळा

सुगंधित स्त्रियांसाठीचे स्प्रे, योनिमार्गासाठी वाईप्स इत्यादी सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळा. त्वचेसाठी कठोर असणाऱ्या साबणासारख्या उत्पादनांचा वापर करणे टाळा आणि योनीमध्ये राहणारे नैसर्गिक जीवाणू तुम्ही काढून टाकू शकता, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

. आतले कपडे सुती असुद्या

सिंथेटिक कपडे टाळा आणि त्याऐवजी सूती कपडे निवडा. आतले कपडे मऊ सूती घालण्यामुळे हवा खेळती राहील आणि जास्त घाम शोषला जाईल.

. आपला आहार बदलण्याचा प्रयत्न करा

गरोदरपणात आहारात बदल करणे अपरिहार्य आहे. आपल्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या समाविष्ट करा. मसालेदार पदार्थ किंवा जास्त लसूण असलेले अन्न खाण्यास टाळा. यामुळे घामाचा वास बदलू शकतो आणि योनीतील गंध कमी होतो.

. आपल्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्या

जर संसर्गामुळे योनीतून गंध उद्भवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांनी लिहून घेतलेली औषधे घ्या.

डॉक्टरांना कधी भेटावे?

गरोदरपणात योनिमार्गाच्या दुर्गंधीचे कारण म्हणजे घाम येणे किंवा आहारातील बदलांसारख्या साध्या गोष्टी असू शकतात, परंतु बाळाला हानी पोहचू शकणारे कोणतेही संक्रमण किंवा इतर परिस्थिती आपल्याला होणार नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

. सतत दुर्गंधी येणे

कधीकधी, गरोदरपणात वास बराच काळ टिकू शकते. जर तो पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या स्त्रावामुळे असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हिरवा किंवा पिवळा स्त्राव सामान्यत: यीस्ट किंवा जिवाणूंच्या संसर्गाचे लक्षण असते आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.

. अनियंत्रित खाज सुटणे

योनिमार्गामध्ये चिडचिड किंवा अनियंत्रित खाज सुटणे देखील सूक्ष्मजंतूंच्या संसर्गाचे लक्षण आहे आणि त्यामुळे त्यावर त्वरित स्त्रीरोगतज्ञाशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला जातो.

. लैंगिक आजार (एसटीडी)

लैंगिक रोगांमुळे देखील योनिमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव जास्त होतो. स्त्रीरोगतज्ज्ञ अशा प्रकारच्या परिस्थितींचा उपचार करण्यासाठी औषधे लिहून देऊ शकतात आणि तुम्ही व तुमचे बाळ निरोगी राहू शकता याची खात्री करुन घेऊ शकता.

. वेदना आणि जळजळ

संभोग किंवा लघवी दरम्यान वेदना किंवा जळजळ होणे हे संक्रमणाचे लक्षण आहे. जळजळ आणि खाज सुटणे ही संसर्गाची चेतावणी देणारी चिन्हे आहेत आणि अशा परिस्थतीत आपण तत्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.

. इतर चिन्हे

जर आपल्याला योनिमार्गात रक्त दिसून येत असेल आणि स्त्राव कॉटेज चीज सारखा दिसत असेल, त्यास दुर्गंधी येत असेल किंवा तो हिरवट किंवा पिवळसर रंगाचा असेल तर काहीतरी समस्या असल्याचे ते लक्षण आहे तेव्हा आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रतिबंधात्मक टिप्स

चांगली स्वच्छता ठेवल्यास योनीमार्गातून येणारा दुर्गंधीयुक्त स्त्राव टाळता येऊ शकतो. हा स्त्राव टाळण्यासाठी काही टिप्स इथे देत आहोत.

  1. सजलीत रहा: योनीतून दुर्गंधी येण्यापासून रोखण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सजलीत रहा. दररोज किमान २३ लिटर द्रव प्या.
  2. पुढून मागे पुसून घ्या: आपल्या योनीमध्ये मलमार्गातील जीवाणू पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी नेहमी योनीतून गुद्द्वार दिशेने पुसून टाका.
  3. डच करू नका: डचिंगमुळे योनिमार्गाच्या ऊतींना त्रास होऊ शकतो आणि जिवाणूंचा तुमच्या मूत्रमार्गात प्रवेश होऊ शकतो आणि संसर्ग पसरतो. तुम्ही तुमच्या योनीकडील भाग कोमट पाण्याने स्वच्छ करू शकता. स्प्रे किंवा सुगंधित साबण वापरणे आवश्यक नाही.

योनिमार्गाच्या भागाकडील वास कमी करण्यास किंवा तो पूर्णपणे नाहीसा करण्यास मदत करणारे बरेच उपाय आहेत. जर तुमच्या योनिमार्गाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही योग्य स्वच्छता राखली आहे याची खात्री करा. तथापि, ही समस्या कायम राहिल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे हा सर्वात चांगला पर्याय आहे.

आणखी वाचा:

गरोदरपणात खाज सुटण्यावर १० घरगुती उपचार
गरोदरपणातील विषमज्वर (टायफॉईड): कारणे,लक्षणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article