Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाची काळजी तुमच्या बाळाचे दात कसे स्वच्छ करावेत: दात घासण्यास कधी सुरुवात करावी आणि ते कसे घासावेत?

तुमच्या बाळाचे दात कसे स्वच्छ करावेत: दात घासण्यास कधी सुरुवात करावी आणि ते कसे घासावेत?

तुमच्या बाळाचे दात कसे स्वच्छ करावेत: दात घासण्यास कधी सुरुवात करावी आणि ते कसे घासावेत?

मोत्यासारख्या शुभ्र दातांमुळे तुमच्या बाळाचे हास्य आणखीनच मोहक होईल. भविष्यात दातांच्या कोणत्याही गंभीर समस्या टाळण्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच त्याच्या दातांची काळजी घेणे हे तुमचे काम आहे. लहानपणापासूनच दातांच्या स्वच्छतेचे नियमित रुटीन असल्यास तुमच्या मुलाला दातांच्या स्वच्छतेची सवय लागते. त्यामुळे दातांची कीड टाळता येते. तसेच दातांचे पोषण आणि वाणीच्या विकासातील कोणतीही समस्या टाळता येऊ शकते. तुम्ही तुमच्या बाळाचे दात कसे आणि केव्हा घासावेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

व्हिडिओ: तुमच्या बाळाचे दात कसे घासावेत?

तुमच्या बाळाचे दात घासणे कधी सुरू करावे?

तुमच्या बाळाला पहिला दात आल्यावर लगेच बाळाचे दात घासणे सुरु करणे आवश्यक आहे. बाळाला पहिला दात त्याच्या वयाच्या तीन ते नऊ महिन्यांच्या दरम्यान केव्हाही येऊ शकतो. बाळाला पहिला दात येण्याचे वय प्रत्येक बाळासाठी वेगवेगळे असू शकते. काही बाळांना ते एक वर्षांचे झाल्यावर सुद्धा पहिला दात येत नाही.

तुमच्या बाळाचे दात घासण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे?

तुमच्या बाळाचे दात घासण्यासाठी तुम्हाला टूथब्रश आणि फ्लोरिडेटेड टूथपेस्टच लागेल. बाळ खूप लहान असल्यास, तुम्ही बाळाचे दात स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ ओलसर कापड, तुमचे बोट किंवा गॉझ पॅड वापरू शकता. तुमच्या लहान बाळाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून बाळाचे दात हळुवारपणे घासण्याचे लक्षात ठेवा. तुम्ही जर बाळाचा टूथब्रश वापरत असाल, तर ब्रशचे ब्रिस्टल्स मऊ असतील तसेच, डोके लहान आणि हॅण्डल रुंद असतील ह्याची खात्री करा. लहान मुलांसाठी फक्त तांदळाच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरा.

तुमच्या बाळाचे दात कसे घासावेत?

तुमच्या बाळाचे दात घासताना ते हळूवारपणे घासणे महत्वाचे आहे. बाळाचे दात घासण्याचा हा सर्वोत्तम मार्ग खालीलप्रमाणे: –

  1. भरपूर प्रकाश असेल अशा ठिकाणी बसा. तुमच्या बाळाचे डोके तुमच्या मांडीवर ठेवा.
  2. तुमच्या बाळाच्या टूथब्रशवर किंवा गॉझ पॅडवर थोडी टूथपेस्ट लावा. तांदळाच्या दाण्याएवढी टूथपेस्ट बाळासाठी भरपूर असते.
  3. हळूवारपणे तुमच्या बाळाचा प्रत्येक दात हळूहळू घासा. बाळाच्या प्रत्येक दाताचा पुढचा आणि मागचा भाग हलक्या वर्तुळाकार हालचालींमध्ये घासणे आवश्यक आहे. तसेच ब्रशची हालचाल पुढे आणि मागे करून हलकेच छोटे स्ट्रोक द्यावेत. दिवसातून असे दोनदा करावे.
  4. टूथब्रशने बाळाची जीभ सुद्धा स्वच्छ करा. असे केल्याने जिवाणू जमा होणार नाहीत आणि श्वासाची दुर्गंधी टाळेल.
  5. टूथब्रश पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडा होऊ द्या. तुम्हाला तुमच्या बाळाचे तोंड स्वच्छ धुवावे लागणार नाही कारण टूथपेस्टचे प्रमाण खूपच कमी आहे.

तुमच्या बाळाला दात घासणे आवडत नसल्यास काय करावे?

लहान मुलांच्या हिरड्या संवेदनशील असतात आणि दात येताना बाळाला दुखापत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे, दात घासताना बाळ विरोध करण्याची शक्यता आहे. जर तुमचे बाळ दात घासण्यास विरोध करत असेल किंवा दात घासून घेण्यास उत्सुक नसेल तर तुम्ही खालील टिप्स वापरून बघू शकता.

तुमच्या बाळाला दात घासणे आवडत नसल्यास काय करावे?

  • हळुवारपणा: तुमच्या बाळाच्या हिरड्या संवेदनशील असतात. जर बाळाला टूथब्रश आवडत नसेल, तर तुम्ही मऊ वॉशक्लोथ किंवा गॉझ पॅड वापरून पाहू शकता
  • बाळाचे लक्ष विचलित करा: लहान बाळे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे बाळासाठी गाणे म्हणून किंवा गोष्ट सांगून त्याचे लक्ष विचलित केल्याने दात घासताना त्याची मदत होऊ शकते
  • तुमच्या बाळासोबत तुम्ही ब्रश करा: तुम्ही ब्रशिंगमधून एक गेम बनवू शकता. तुम्ही तुमचे दात कसे घासता ते तुमच्या बाळाला दाखवा आणि नंतर त्याला ते करून पाहण्यास सांगा
  • त्यांच्या उत्सुकतेला वाव द्या: लहान मुलांना नवीन गोष्टींसोबत खेळायला आवडते. टूथब्रशचा आनंद घेण्यासाठी तुमच्या बाळाला पुरेसा वेळ द्या. तो स्वतःहून टूथब्रश तोंडात घालण्याची शक्यता आहे

दिवसातून किती वेळा तुम्ही तुमच्या बाळाचे दात घासले पाहिजेत?

रुटीन नीट होण्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाचे दात दररोज दोनदा घासू शकता. सकाळी एकदा आणि आणि तो झोपण्यापूर्वी एकदा असे दोनदा तुम्ही बाळाचे दात घासू शकता

तुम्ही बाळाच्या हिरड्या घासू शकता का?

बाळाला स्तनपान दिल्यानंतर तुम्ही बाळाच्या हिरड्या स्वच्छ केल्यास जिवाणूंची वाढ रोखण्यास मदत होते. तुम्ही त्यासाठी टूथब्रश न वापरणे चांगले. त्याऐवजी, तुम्ही मऊ आणि स्वच्छ ओलसर कापड वापरू शकता. सिलिकॉन किंवा रबर फिंगर ब्रशेस देखील मिळतात. हे ब्रश तुमच्या बाळाच्या संवेदनशील हिरड्यांसाठी अगदी मऊ असतात. हिरड्या स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला टूथपेस्टची गरज नाही. तुम्ही बाळाला दात येण्याआधीच त्याच्या हिरड्या स्वच्छ करण्यास सुरुवात करू शकता.

जर तुमच्या बाळाचे दात घासताना रक्त येऊ लागले तर?

तुमच्या बाळाचे दात घासताना तुम्हाला रक्तस्त्राव होत असल्याचे दिसल्यास ते संसर्गाचे लक्षण असू शकते. हिरड्या मऊ झालेल्या असल्यास किंवा जळजळ होत असल्यास त्या चिन्हांकडे लक्ष द्या. नियमित दात घासून दातांची काळजी घेतल्यास ही लक्षणे कमी होण्याची शक्यता असते. तथापि, तसे न झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तुम्ही त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.

प्रत्येक आहारानंतर बाळाचे दात घासणे आवश्यक आहे का?

नाही. प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या बाळाला दात घासण्याची गरज नाही. नाश्त्यानंतर आणि झोपण्यापूर्वी दिवसातून दोनदा ब्रश करणे पुरेसे आहे. परंतु, जिवाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही बाळाला दूध पाजल्यानंतर त्याच्या हिरड्या पुसून घेऊ शकता.

तुम्ही नारळाच्या तेलाने लहान मुलांचे दात घासू शकता का?

तुमच्या बाळाचे दात घासण्यासाठी तुमच्या बाळाच्या दातांच्या डॉक्टरांनी सांगितलेली कुठलीही फ्लोराइडेड टूथपेस्ट किंवा कोणतीही टूथपेस्ट वापरणे चांगले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, खोबरेल तेल दातांसाठी चांगले असल्याचे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही.

लहान मुलांच्या दाताला कीड लागून दंत क्षय होण्याची शक्यता असते. बाळाचे दात योग्य प्रकारे कसे स्वच्छ करावे हे जाणून घेतल्यास भविष्यात बाळाच्या दातांच्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. बाळ सहा किंवा सात वर्षांचा होईपर्यंत दात घासत असताना त्याला मदत करत राहणे आवश्यक आहे. ह्याचे कारण म्हणजे दुधाच्या दातांना कीड लागू शकते किंवा हिरड्यांना संसर्ग होऊ शकतो आणि त्याचा परिणाम दातांवर कायमस्वरूपी होऊ शकतो. सुरुवातीपासूनच तुमच्या बाळाचे दात घासल्यास ह्या समस्या टाळल्या जाऊ शकतात.

आणखी वाचा:

बाळाला दात येतानाचा क्रम
बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article