जेव्हा तुम्ही पालक होता तेव्हा दररोजच्या आयुष्यात तुम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. रात्रीची झोप पूर्ण न होणे, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण वेळेवर न होणे, वेगवेगळ्या औषधांची नावे लक्षात ठेवणे इत्यादी. परंतु बाळाच्या जन्माच्या आधी स्वतःला मानसिकरीत्या तयार केले पाहिजे. तरीही एक आव्हान उरतेच आणि ते म्हणजे बाळाच्या नावाचा विचार करणे. जर बाळाचे नाव राशीनुसार ठेवायचे असल्यास ते काम आणखीनच कठीण होऊन बसते. कधी कधी राशीनुसार असे अक्षर निघते की त्यापासून सुरु होणाऱ्या नावांची संख्या कमी असते आणि त्याच्या बाबतीत जास्त माहिती सुद्धा नसते आणि असे एक अक्षर म्हणजेच ‘ज्ञ‘
ह्या लेखामध्ये मुलींसाठी ‘ज्ञ‘ अक्षराने सुरु होणारी पारंपरिक, अर्थपूर्ण, ट्रेंडी, आधुनिक, छोटी आणि क्युट अशा अनेक प्रकारची नावे दिलेली आहे. आपल्या छोट्या राजकुमारीसाठी एखादे वेगळ्या, युनिक नावासाठी ‘ज्ञ‘ अक्षर एकदम उपयुक्त आहे. इथे दिलेले कुठलेही नाव निवडा, ते नाव बाळाचे व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी आणि त्याला वेगळी ओळख देण्यासाठी उपयुक्त ठरेल.
ज्ञ अक्षरावरून मुलींची नावे
खाली दिलेल्या यादीत ‘ज्ञ‘ अक्षरावरून मुलींच्या ५० नावांचे संकलन आहे.
‘ज्ञ‘ अक्षरावरून नाव | नावाचा अर्थ | धर्म |
ज्ञानेश्री | खूप ज्ञान असलेली | हिंदू |
ज्ञानदा | देवी सरस्वती | हिंदू |
ज्ञाना | देवी सरस्वतीचे एक नाव, समजूतदार स्त्री | हिंदू |
ज्ञापिता | तृप्त, संतुष्ट | हिंदू |
ज्ञानीशा | ज्ञानाची देवी | हिंदू |
ज्ञानमा | हुशारी | हिंदू |
ज्ञानिता | ज्ञानी व्यक्ती कडून दिले गेलेले ज्ञान | हिंदू |
ज्ञानवी | बुद्धिमान | हिंदू |
ज्ञानिका | जिला ज्ञान घेण्याची इच्छा आहे अशी | हिंदू |
ज्ञानंदा | परमानंद, उत्साह देणारी | हिंदू |
ज्ञानदीपिका | ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी | हिंदू |
ज्ञानेंद्री | ज्ञानाने भरलेली | हिंदू |
ज्ञानेश्वरी | ज्ञानेश्वरांनी लिहिलेली गाथा, ज्ञान देणारी | हिंदू |
ज्ञानकार्तिका | श्री शंकराशी संबंधित | हिंदू |
ज्ञानी | बुद्धिमान | हिंदू |
ज्ञानज्योति | ज्ञानाचा प्रकाश | हिंदू |
ज्ञाता | सगळे माहित असणारी | हिंदू |
ज्ञानार्पणा | ज्ञान देणारी | हिंदू |
ज्ञानसुख | बुद्धिमान | हिंदू |
ज्ञानकर्णा | ज्ञानाचा प्रकाश | हिंदू |
ज्ञानविता | भरपूर ज्ञान असणारी | हिंदू |
ज्ञानजा | ज्ञानातून निर्माण झालेली | हिंदू |
ज्ञानरती | हुशार | हिंदू |
ज्ञानुत्तमा | प्रवीण, कुशल स्त्री | हिंदू |
ज्ञानातीता | सर्वात चांगली | हिंदू |
ज्ञेया | बोध घेण्याजोगी | हिंदू |
ज्ञातव्या | जिच्या विषयी माहिती आहे अशी | हिंदू |
ज्ञप्ता | सूचित, भेजा हुआ | हिंदू |
ज्ञानप्रदा | बरेच ज्ञान असलेली सुविद्य मुलगी | हिंदू |
ज्ञानस्वरूपा | ज्ञानमय | हिंदू |
ज्ञानोदया | ज्ञानाचे प्रकटीकरण | हिंदू |
ज्ञानार्जना | अध्ययन | हिंदू |
ज्ञानसाधना | जिच्या मदतीने ज्ञानप्राप्ती केली जाते | हिंदू |
ज्ञापा | जिच्या जवळ लोकांना बघण्याची दृष्टी असते | हिंदू |
ज्ञानवैष्णवी | ज्ञान आणि पराक्रम असलेली | हिंदू |
ज्ञानार्थी | जिज्ञासु | हिंदू |
ज्ञानाश्रयी | ज्ञान संबंधी, ज्ञान से ब्रह्म को प्राप्त करने के सिद्धांत पर बल देने वाली | हिंदू |
ज्ञानाकर | महान ज्ञानी | हिंदू |
ज्ञानमूर्तिका | प्रबुद्ध स्त्री | हिंदू |
ज्ञापयिता | सूचना देणारी | हिंदू |
ज्ञानदेवी | ज्ञान देणारी | हिंदू |
ज्ञानलीन | ज्ञान जिच्यासाठी सर्वकाही आहे अशी | शीख |
ज्ञानजीत | जिला सर्वकाही येत असते | शीख |
ज्ञानकीरत | ज्ञानाची पूजा करणारी | शीख |
ज्ञानजोत | ज्ञानाचा दीपक | शीख |
ज्ञॉंगी | मोती | ख्रिश्चन |
ज्ञासी | चमत्कारी | ख्रिश्चन |
ज्ञॉर्गी | पृथ्वीची सेवा करणारी | ख्रिश्चन |
ज्ञाला | तरुण | ख्रिश्चन |
आम्ही इथे ‘ज्ञ‘ अक्षरावरून सुरु होणारी जवळजवळ सगळी नावे दिलेली आहेत, तुमच्या आवडीचे नाव निवडण्यासाठी आता उशीर करू नका.