बाळाला दात येतानाचा क्रम

बाळाचे दात येताना काय अपेक्षित आहे

काही बाळांना जन्मतःच पहिला दात आलेला असतो. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळाच्या जन्माआधीच त्याच्या दंतकालिका विकसित झालेल्या असतात.

तुमच्या बाळाला पहिला दात केव्हा येईल?

जरी काही बाळांना जन्मतःच दात आलेले असतात तरी हे जन्मतःच दात येणे काही सामान्य नाही. जेव्हा बाळे तीन महिन्यांची होतात किंवा त्यानंतर थोड्या दिवसांनी बाळांचा पहिला दात विकसित होण्यास सुरुवात होते.

पहिला दात कुठला येतो?

सामान्यपणे बाळ तीन महिन्यांचे झाल्यावर बाळाला पहिला दात येतो. तथापि, काही बाळांसाठी दुधाचे दात येण्यास वेळ लागू शकतो. खालचे मधले दोन दात बाळाला सर्वप्रथम येतात. तर काही बाळांमध्ये वरचे मधले दोन दात दिसू लागतात.

बाळाला किती दात असतात?

तीन वर्षांचे होईपर्यंत बाळाला दुधाचे २० दात येतात. बाळ ५ वर्षांचे झाल्यावर हे दात पडून कायमचे दात येऊ लागतात.

बाळाच्या दातांचा तक्ता आणि त्यांच्या येण्याचा क्रम

इथे बाळाच्या दातांचा तक्ता]दिला आहे आणि प्रत्येक प्रकारच्या दातांची माहिती दिली आहे. लक्षात ठेवा हा पॅटर्न सामान्यपणे आढळणारा आहे, आणि ह्यास अपवाद असू शकतात. दिलेल्या अनुक्रमानुसार तुमच्या बाळाला दात आले नाहीत तरी हरकत नाही. तथापि, जर तुम्हाला ते काळजीचे कारण आहे असे वाटले तर तज्ञ दंतवैद्यांना भेटा.

खालचे मधलेपटाशीचे दात (Lower Central Incisors)

खालच्या जबड्याचे मधले दोन दात हे सर्वात आधी येतात, आणि त्यामुळे बाळाला अस्वस्थता येऊ शकते, तसेच बाळाची लाळ गळू लागते आणि बाळ चावण्याचा प्रयत्न करू लागते.

केव्हा दिसू लागतात:

खालचे मधले दोन दात बाळाच्या वयाच्या ६व्या ते ८व्या महिन्यांच्या कालावधीत दिसू लागायला हवेत. दात येताना बाळाला दुखू लागते आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते तेव्हा तुम्हाला दात येताना दिसू शकतात.

कार्य:

खालच्या मधल्या दोन दातांचे महत्वाचे कार्य म्हणजे ते कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात. तुमचे मूल १२ वर्षांचे झाल्यावर हे दात पूर्णपणे विकसित होतात.

दात पडण्याची प्रक्रिया:

तुमचे मूल सहा वर्षांचे झाल्यावर त्याचे खालचे मधले दोन दात पडण्यास सुरुवात होते

वरचे मधले पटाशीचे दात (Upper Central Incisors)

केव्हा दिसू लागतात:

बाळ जेव्हा ८१२ महिन्यांचे होते तेव्हा वरचे मधले दात दिसू लागतात

कार्य:

वरच्या मधल्या दातांसाठी महत्वाचे कार्य म्हणजे ते कायमच्या दातांसाठी जागा तयार करण्याचे कार्य करतात तसेच बाळाला अन्न चावण्यासाठी मदत करतात.

दात पडण्याची क्रिया

सहा वर्षांचे झाल्यावर मुलांचे हे दात पडू लागतात

वरचे बाजूकडील पटाशीचे दात

केव्हा दिसू लागतात:

नऊ ते तेरा महिन्यांच्या कालावधीत वरचे कडेचे पटाशीचे दात दिसू लागतात.

कार्य:

वरचे कडेचे पटाशीचे दातांमुळे बाळाला चावता येते तसेच बाळाला त्या दातांची बोलण्यासाठी मदत होते.

दात पडण्याची क्रिया:

ज्या अनुक्रमाने तुमच्या बाळाचे दुधाचे दात पडू लागतात त्यानुसार वरचे कडेचे पटाशीचे दात तुमचे मुल साधारण सहा वर्षांचे झाल्यावर पडू लागतात.

खालचे बाजूकडील पटाशीचे दात

केव्हा दिसू लागतात:

तुमचे बाळ जेव्हा दहा ते सोळा महिन्यांचे होते तेव्हा तुमच्या बाळाचे खालचे कडेचे पटाशीचे दात विकसित होऊ लागतात. तुमच्या बाळाचा एकाच प्रकारच्या दातांपैकी एक दात आधी विकसित होतो आणि नंतर दुसरा तशाच प्रकारचा दात विकसित होतो.

कार्य:

खालचे बाजूकडील पटाशीचे दात हे कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात . हे दात जेव्हा तुमचे मूल साधारण १२ वर्षांचे होते तेव्हा दिसू लागतात. ह्याव्यतिरिक्त हे दुधाचे दात तुमच्या बाळाला चावण्यास आणि बोलण्यास मदत करतात.

दात पडण्याची क्रिया:

तुमच्या बाळाचे खालचे बाजूकडील पटाशीचे दुधाचे दात जेव्हा बाळ ६ वर्षांचे होते तेव्हा पडण्यास सुरुवात होते.

खालचे बाजूकडील पटाशीचे दात

वरच्या पहिल्या दाढा

केव्हा दिसू लागतात:

बाळ तेरा ते एकोणीस महिन्यांचे झाल्यावर वरच्या पहिल्या दाढा दिसू लागतात.

कार्य:

वरच्या पहिल्या दाढांचे कार्य म्हणजे त्या बाळाला चावण्यास मदत करतात. बोलण्यासाठी सुद्धा त्यांची मदत होते तसेच कायमच्या दातांसाठी जागा तयार करण्याचे कार्य त्या करतात.

दात पडण्याची क्रिया

तुमच्या बाळाच्या पहिल्या दाढा वयाच्या दहा ते बारा वर्षांपर्यंत पडण्यास सुरुवात होते आणि जेव्हा तुमच्या मुलाला तेरावे वर्ष सुरु होते तेव्हा त्यास कायमचे दात आलेले असतात.

खालच्या पहिल्या दाढा

केव्हा दिसू लागतात:

खालच्या पहिल्या दाढा जेव्हा तुमचे बाळ चौदा ते अठरा महिन्यांचे होते तेव्हा दिसू लागतात.

कार्य:

खालच्या पहिल्या दुधाच्या दाढा बाळाला चावण्यासाठी आणि त्याचे अन्नपदार्थ बारीक करण्यास मदत करतात तसेच ते कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात

दात पडण्याची प्रक्रिया

तुमचे मूल दहा ते बारा वर्षांचे झाल्यावर त्याच्या खालच्या पहिल्या दाढा पडण्यास सुरुवात होते

वरचे सुळे

केव्हा दिसू लागतात:

तुमचे बाळ जेव्हा सोळा ते अठरा महिन्यांचे होईल तेव्हा वरचे सुळे येण्यास सुरुवात होईल, म्हणजेच दात येण्याच्या अनुक्रमात सुळे जवळजवळ सर्वात शेवटी येतात.

कार्य:

सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे ते कायमच्या सुळ्यांसाठी जागा तयार करतात.

दात पडण्याची प्रक्रिया:

जेव्हा तुमचे मूल १२ वर्षांचे होते तेव्हा त्याचे वरचे सुळे पडण्यास सुरुवात होते आणि त्याजागी कायमचे दात येतात.

खालचे सुळे

केव्हा दिसू लागतात:

तुमचे बाळ जेव्हा सतरा ते तेवीस महिन्यांचे होते तेव्हा खालचे सुळे विकसित होण्यास सुरुवात होते.

कार्य:

खालच्या सुळ्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे ते बाळाला चावण्यास मदत करतात तसेच कायमच्या दातांसाठी जागा तयार करण्याचे कार्य करतात.

दात पडण्याची क्रिया

तुमच्या मुलाचे खालचे सुळे तो जेव्हा दहा ते बारा वर्षांचा होईल तेव्हा केव्हाही पडण्यास सुरुवात होते.

खालच्या दाढांचा दुसरा संच

केव्हा दिसू लागतात:

तुमच्या बाळाच्या वयाचा तेवीसावा ते एकतिसावा महिना ह्या कालावधीत खालच्या दाढांचा दुसरा संच विकसित होण्यास सुरुवात होते.

कार्य:

खालच्या दाढांच्या दुसऱ्या संचाचे कार्य म्हणजे ते बाळाला चावण्यास आणि बोलण्यास मदत करतात तसेच कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात.

दात पडण्याची क्रिया

तुमच्या बाळाचे हे दात त्याच्या वयाच्या दहा वर्षे ते बारा वर्षे ह्या कालावधीत पडण्यास सुरुवात होते आणि त्यांनतर लगेच कायमचे दात विकसित होतात.

वरच्या दुसऱ्या दाढांचा संच

केव्हा दिसू लागतात:

तुमचे बाळ जेव्हा पंचवीस महिन्यांचे होते तेव्हा वरच्या दाढांचा दुसरा संच दिसण्यास सुरुवात होते.

कार्य:

वरच्या दाढांचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे ते कायमच्या दातांसाठी जागा तयार करतात तसेच त्याव्यतिरिक ते बाळाला चावण्यास मदत करतात.

दात पडण्याची प्रक्रिया:

तुमच्या बाळाच्या वरच्या दाढांचा दुसरा संच तुमचे मूल बारा वर्षांचे झाल्यावर पडण्यास सुरुवात होते.

तुमच्या बाळाच्या दातांची केव्हा काळजी करावी?

जर बाळाच्या दात येण्याचा अनुक्रम बदलला तर काळजी करण्याचे काही कारण नाही. उशीर होण्यास अनेक कारणे असू शकतात, परंतु तुमच्या बाळाला दुधाचे सर्व दात, योग्य ठिकाणी योग्य वेळेला आले पाहिजेत.

निष्कर्ष

दुधाच्या दातांकडे अनेकवेळा दुर्लक्ष केले जाते कारण ते पडणारच आहेत हे माहिती असते. परंतु दुधाच्या दाताच्या आरोग्यावर कायमच्या दातांचे आरोग्य अवलंबून असते. तुम्ही तुमच्या बाळाच्या हिरड्या स्वच्छ कापडाने वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. आणि जेव्हा बाळाचा पहिला दात दिसू लागतो तेव्हा ब्रश वापरण्यास सुरुवात करावी. निरोगी दात चांगले दिसतात तसेच बाळाचे आतडे स्वच्छ ठेवण्यास सुद्धा त्यांची मदत होते.

आणखी वाचा: बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय