Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे २६ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

वेळ किती भर्रकन पुढे सरकतो, नाही का? तुमचे बाळ ६ महिन्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही बाळामध्ये विकासाची विविध चिन्हे आता पहात असाल. तुमचे बाळ आजूबाजूच्या वातावरणातील गोष्टींचे झपाट्याने आकलन करू लागेल. तुमचे बाळ आता २६ आठवड्यांचे झाले आहे आणि पालक म्हणून ह्या आणि ह्यापुढील आठवड्यात तुम्हाला त्याचे वाढीचे महत्वाचे टप्पे आणि विकास ह्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मग वाट कसली बघताय? २६ आठवड्यांच्या तुमच्या बाळाच्या विकासाविषयी जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचा विकास

 • वाढलेली मोटर कौशल्य: तुमच्या बाळाने २६ व्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि बाळाचे लहान स्नायू आता लवचिक होण्यास सुरुवात झाली आहे. बाळाचे शरीर त्यांना सरळ चालण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे प्रशिक्षण देईल.
 • आवाजाकडे लक्ष देणे: आवाज ग्रहण करणारा मेंदूचा भाग ह्या काळामध्ये सक्रिय होईल. कारण बाळाचा विकास वेगाने होत आहे आणि तुम्ही तुमच्या मुलाच्या श्रवणशक्तीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा करू शकता.
 • दात येणे: यावेळी, बाळांना दुधाचे दात येण्यास सुरुवात होईल, जेणेकरून ते घन आहार घेण्यास प्रारंभ करू शकतात.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

 • तुमचे बाळ थोडे चपळ होईल
 • तुमच्यापैकी काही जण आता नोकरी करत असतील आणि बाळाची काळजी घेण्यासाठी मदतनीस ठेवली असेल. मदतनीस बाईंना बाळ चांगले प्रतिक्रिया देते हे पाहून तुम्हाला वाईट वाटेल. परंतु बाळाला त्याचे पालक आणि मदतनीस ह्यांच्यातील फरक समजू लागेल. म्हणजेच बाळाला दिवसाच्या शेवटी तुमच्याच कुशीत यावेसे वाटेल
 • या काळातील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, तुमचे बाळ स्वतंत्र होऊ लागते आणि दिवाणखाना असो किंवा मनोरंजन पार्क असो, बाळाला नवीन गोष्टींना शोध घ्यायला आवडेल तसेच फिरायला आवडेल
 • बाळाची श्रवणक्रिया जसजशी चांगली होत जाईल तसतसे ते ऐकत असलेल्या काही आवाजांचे अनुकरण करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास सुरवात करतील. जरी त्यांची बोलण्याची क्षमता मर्यादित असली तरीही तुम्ही बाळाच्या बोबड्या बोलांची अपेक्षा करू शकता. बाळे सहसा व्यंजन पुन्हा पुन्हा उच्चारतात आणि तेव्हा तुम्ही तुमच्या लहान बाळाचे पहिले शब्द मामाकिंवा दादाबोलण्याची अपेक्षा करू शकता. कृपया लक्षात घ्या की बाळाचा शब्दसंग्रह अस्तित्त्वात नसला तरीही बाळ काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे तुम्ही सहजपणे सांगू शकता
 • त्यांची श्रवणशक्ती वेगवान वेगाने विकसित होते आणि बाळांकडून तुम्ही कोणत्याही असामान्य आवाजांवर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्याची अपेक्षा करू शकता
 • आपले बाळ काही सेकंद किंवा काही मिनिटे आधाराशिवाय बसणे देखील सुरु करू शकते

आहार देणे

२६ व्या आठवड्यात आपल्या बाळासाठी घन पदार्थ (सुरुवातीला अर्ध घन पदार्थ ठीक आहेत ) सुरु करणे ठीक आहे. हा संक्रमणाचा काळ आहे त्यामुळे स्तनपानापासून नवीन अन्नपदार्थांसाठी पचनप्रणाली अजूनही समायोजित होत आहे. अशा प्रकारे, जर तुम्हाला बाळाच्या शौचामध्ये न पचलेल्या अन्नाचे तुकडे आढळले तर काळजीचे काही कारण नाही. या काळात तुमच्या बाळाला बद्धकोष्ठता सुद्धा होऊ शकते. बाळाच्या पचनसंस्थेत झालेल्या बदलामुळे असे होऊ शकते. आहारात पपई, सुके प्लम फळ, गाजर आणि पालक सारख्या फायबरसमृध्द पदार्थांची ओळख करुन आपण या परिस्थितीवर उपाय करू शकता.

तुम्ही तुमच्या बाळाला पाण्याची ओळख देखील करून देऊ शकता. बाळाला पाणी देण्यापूर्वी पाणी उकळले आहे ह्याची खात्री करा कारण बाळाची रोगप्रतिकारशक्ती अजूनही विकसित होत आहे. तुम्ही बाळाला सिप्पी कप वापरण्यास शिकवू शकता जेणेकरून कमीत कमी पाणी सांडेल. जर तुमचे बाळ अजूनही घनपदार्थ घेत नसेल तर निराश होऊ नका तो आज ना उद्या नक्की घन आहार घेण्यास सुरुवात करेल. बाळाला जबरदस्तीने भरवू नका कारण बाळ जिभेच्या साहाय्याने अन्न पुन्हा बाहेर काढू शकेल.

बाळाची झोप

काही २६ आठवड्यांची बाळे दीर्घ कालावधीसाठी झोपी जातात, तर असे बरेच लोक आहेत जे कदाचित इतके भाग्यवान नसतील. दात येणे आणि रात्रीचे दूध पिण्यास उठणे यासारख्या अनेक घटकांमुळे विचलित केलेली झोप असू शकते. कृपया लक्षात घ्या की रात्रीच्या वेळी आपल्या बाळाला कमीतकमी एकदा स्तनपान देणे अगदी शक्य आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की या वेळी किमान ७८% मुले रात्री उठतात.

तुमच्या २६ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

तुम्ही तुमच्या छोट्या बाळाची कशी काळजी घेऊ शकता ते इथे दिलेले आहे

 • या वयातील तुमच्या बाळाला आजूबाजूच्या वातावरणाचा शोध घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही योग्य काळजी घेतली नाहीत तर बाळाला इजा पोहचू शकते. त्यामुळे बाळाला हानी पोहचू नये म्हणून धारदार कडा झाकून घर आणि आजूबाजूचा परिसर बेबीप्रूफ करा.
 • याकाळात बाळाला दात येण्यास सुरुवात होईल आणि आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी बाळ तोंडात घालू लागेल. त्यामुळे बाळाच्या घशात अडकेल अशी कोणतीही वस्तू किंवा खेळणे नाही अशी खात्री करुन घ्या. आपल्या बाळाची खेळणी नियमितपणे स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.
 • जर बाळ त्याचा डावा हात वारंवार वापरत असेल तर बाळाला उजवा हात वापरण्यास प्रोत्साहित करणे टाळा. कारण तसे केल्याने त्यांचे कौशल्य रोखले जाईल. तसेच, ते २३ वर्षांचे होईपर्यंत बाळ डावखुरे आहे की सामान्य हे समजत नाही
 • तुम्ही बाळाला बाथ टब मध्ये अंघोळ घालत असाल तर दक्ष राहा कारण अगदी ४५ सेंमी पाणी सुद्धा प्राणघातक अपघात होण्यासाठी पुरेसे आहे
 • या वयात मूल विभक्त चिंतेने (separation anxiety) ग्रस्त होऊ शकतो, हा टप्पा कायम रहात नाही कालांतराने तो कमी होतो. त्यामुळे बाळाला आपली सवय होईल ही भीती न बाळगता त्यांच्याकडे लक्ष द्या.

चाचण्या आणि लसीकरण

ह्या काळात दिल्या जाणाऱ्या लसींमध्ये खालील लसी समाविष्ट आहेत

 • डीटीएपी आणि हिब
 • आता आणि वय वर्षे १८ महिने दरम्यान अंतिम हेपेटायटीस बी डोस
 • इन्फ्लूएंझा लस
 • क्षय रोग एक साथीचा रोग आहे जो शिशुंसाठी घातक ठरू शकतो. जर तुमच्या जवळच्या कुटूंबातील कुणाला क्षयरोग झाला असेल तर तुमच्या मुलाची तपासणी करुन घ्या
 • दंत तपासणीसाठी आपण दंतचिकित्सकाकडे जाऊ शकता कारण आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये दंतपोकळी निर्माण होण्याची शक्यता असते
 • सुरक्षित राहण्यासाठी आपण नेहमीच लीड स्क्रीनिंग चाचणीसाठी जाऊ शकता. साधारणपणे बाळाने कोणत्याही विषारी पदार्थांचे सेवन केले आहे की नाही हे पाहण्यासाठी हे केले जाते

खेळ आणि क्रियाकलाप

येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत जे तुम्ही तुमच्या लहान मुलास गुंतवून ठेवण्यासाठी करून बघू शकता

 • कथा सांगणे: चांगली कथा कोणाला आवडत नाही! बाळाला तोंडी सांगितलेली माहिती पटकन समजते. हि संधी साधून तुम्ही बाळाला रात्री गोष्टी सांगण्यास सुरुवात करू शकता. गोष्टीच्या विशिष्ट टप्प्यावर बाळाचे लक्ष वेधण्यासाठी तुम्ही आवाजाची पट्टी वर खाली करू शकता.
 • वाद्य वस्तू वापरा: तुम्ही संगीत खेळण्यांचा साठा करू शकता आणि तुमच्या बाळास गुंतवून ठेवण्यासाठी एका वेळी एक वापरू शकता. तुमच्या बाळाची श्रवणशक्ती समजून घेण्यासाठी आणि आवाज कोठून येत आहे हे समजण्यास मदत करण्यासाठी वेगवेगळ्या बाजूनी खेळणी हलवून पहा.
 • मजेदार गाणे म्हणा: आपल्या बाळाचे कपडे बदलताना किंवा ते स्वच्छ करताना बाळांसाठी मजेदार गाणे म्हणा आणि बाळ कशी प्रतिक्रिया देतात ते पहा. हे क्रियाकलाप आपल्या बाळाशी असलेले आपले बंध आणखी मजबूत करेल, ऐकण्याची भावना सुधारेल आणि नवीन शब्द शिकण्यास मदत करेल. तुम्ही बाळाला सोबत गाण्यासाठी प्रोत्साहित देखील करू शकता. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणि गाण्यासाठी तुमचे लहान बाळ बोबडे बोल म्हणेल.
 • चेंडूचा मागोवा: एखादा चेंडू किंवा खेळणे शोधा ज्यामध्ये बाळाला विशेष रस असेल आणि त्यास खोलीच्या दुसऱ्या बाजूला ठेवा. बाळाला खोलीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला लावा. ह्यामुळे त्याच्या पायांच्या स्नायूंचा विकास होण्यास आणि चालण्याच्या प्रक्रियेस गती मिळण्यास मदत होईल.
 • ब्लॉक्ससह खेळणे: तुलनेने लहान वस्तूंबरोबर बाळाला खेळू दिल्यास त्याचे कौशल्य सुधारण्यास मदत होऊ शकते.परंतु घशात अडकतील इतक्या सुद्धा ह्या वस्तू लहान असू नयेत.
 • सामाजीकरणः आपल्या बाळाला बाहेर घेऊन जा आणि इतर मुलांशी खेळू द्या. आपल्या मुलास इतर मुलांचे निरीक्षण करू द्या आणि त्यांच्याशी संवाद साधू द्या म्हणून तुमच्या बाळाच्या वयाची मुले असलेल्या शेजारील स्त्रिया किंवा मित्रमैत्रिणींना आमंत्रित करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

पुढील बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या:

 • दात येण्याची कुठलीही चिन्हे नसताना बाळाला खूप जास्त ताप येत असेल तर लवकरात लवकर बाळाला बालरोगतज्ञांकडे न्या
 • जर बाळ आवाजास कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नसेल तर ते काळजीचे कारण आहे. बाळाला वाचाभाषा तज्ञांकडे न्या. ते ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने श्रवण चाचणी घेऊ शकतात
 • जर आपले बाळ कुपोषित दिसत असेल तर बाळाला डॉक्टरकडे नेण्याची आवश्यकता असू शकते

प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वत: च्या गतीने विकास होतो. म्हणून, जर तुमच्या बाळाचा वरीलप्रमाणे विकास होत नसेल तर काळजी करू नका. तो नक्की तिथे पोहोचेल! तोपर्यंत तुमच्या बाळासोबतचा प्रत्येक क्षण साजरा करा आणि बाळासोबतचा हा वेळ मौल्यवान बनवा!

मागील आठवडा: तुमचे २५ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article