Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण जुळी आणि एकाधिक मुले जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १४ वा आठवडा

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १४ वा आठवडा

In this Article

जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह १४ आठवड्यांच्या गरोदर असता तेव्हा तुम्ही गरोदरपणाचा हा काळ अगदी चांगल्या प्रकारे हाताळू शकता हे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच स्त्रियांची चिंता, काळजी आधीपेक्षा आता खूप कमी झालेली असते आणि त्यांना त्यांच्या शरीराविषयी अधिक आत्मविश्वास जाणवू लागतो. गरोदरपणाचा सर्वात चांगला काळ आता सुरु झाला आहे ज्यास इंग्रजी मध्ये हनिमून फेजअसे म्हणतात. ह्या टप्प्यात तुम्हाला आयुष्यातील अद्भुत कालावधी अनुभवता येईल. तुमच्या गरोदरपणाला धोका निर्माण करणारे टप्पे किंवा परिस्थिती आता कमी झाली आहे परंतु तुम्ही जागरूक राहणे आवश्यक आहे. तुम्ही १४ व्या आठवड्यात प्रवेश करताना तुम्हाला माहिती असली पाहिजे अशी महत्वाची माहिती ह्या लेखात दिलेली आहे. चला तर मग बाळाच्या वाढीपासून सुरुवात करूयात!

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात बाळांची वाढ

गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात तुमचे बाळ गर्भाशयात किती वेगाने वाढत आहे हे तुम्हाला समजेल. बरीचशी बाळे आधीच्या आठवड्यांपेक्षा आकाराने दुप्पट होतील आणि त्यांच्या वजनात वाढ होऊ लागेल. येत्या काळात त्यांची शारीरिक शक्ती सुद्धा वाढेल. हाडांची संरचना आणि बाळाच्या स्नायूंची व्यवस्था आता अशा टप्प्यावर आहे जेव्हा बाळाला हालचालींवर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे ह्या हालचाली अगदी सहज आणि प्रवाही असतात त्या अचानक किंवा झटके देऊन होत नाहीत. खालच्या दिशेने असलेले डोके आता किंचित घट्ट वाटू शकते कारण तुमचे बाळ आता गर्भाशयात फिरू लागते.

बर्‍याच वेळा पहिल्यांदाच पालक झालेल्या मंडळींना आपले बाळाचे संपूर्ण शरीर केसानी झाकलेले पाहून आश्चर्यचकित व्हायला होते कारण ते माणसांसारखे दिसण्याऐवजी वानरांसारखे दिसते आहे असे त्यांना वाटते. गर्भजलामध्ये असताना उबदार वाटावे म्हणून त्यांच्या शरीरावर ही केसांची वाढ गरजेची असते. जर तुमचे बाळ अकाली जन्मले नाही तर बाळाच्या जन्माच्या आधीच त्याच्या शरीरावरील हे सगळे केस गळून जातील आणि फक्त त्याच्या डोक्यावर दाट केशसंभार शिल्लक राहील. आईचे गर्भाशय हे बाळासाठी एखाद्या घरासारखेच असते आणि गर्भजल पिशवी मध्ये बाळाची सर्वोतोपरी काळजी घेतली जाते. बाळाद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या मूत्राचा सुद्धा ह्यामध्ये समावेश होतो. बाळाचे मूत्रपिंड आता विकसित झालेले असतात आणि त्यांचे कार्य सुरु होते. शरीराची रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरु होते आणि योग्य मार्गाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात बाळाचा आकार

ह्या कालावधीत बाळांची वाढ वेगाने होत असते. बहुतेक बाळांची लांबी साधारणतः ८ ते ९ सेमी इतकी असते आणि त्यांचे वजन २० २५ ग्रॅम इतके असते. तिळे किंवा त्याहून जास्त बाळांसह गर्भधारणा झालेली रस्त्यास बाळांचे वजन सरासरीपेक्षा कमी असते आणि ते ठीक आहे. त्यांचे आकार सुद्धा झाकलेल्या मुठीपेक्षा लहान असतील.

आता आपण गरदोरपणाच्या १४ व्या आठवड्यात तुमच्या शरीरात काय बदल होतील ते पाहुयात:

सामान्य शारीरिक बदल

तुमचे गरोदरपणाचे टप्पे आनंदात गेल्यास तुमची बाळे सुद्धा आनंदी राहतात आणि तुमचे शरीर बदलांना कसा प्रतिसाद देते हे सुद्धा समजते.

  • गर्भाशयाचा विस्तार होत असतांना तो आता प्यूबिक बोन्सच्या वरच्या बाजूला सुद्धा होऊ लागतो. ह्या टप्य्यावर पोटाचा आकार पिशवी सारखा होतो. मागच्या दोन आठवड्याच्या तुलनेत पोटाचा आकार आणखी गोल होतो.
  • पोटाचा आकार आणि वजन वाढीमुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. बसताना आणि उठताना तुम्हाला हा त्रास जास्त जाणवेल आणि बाळाच्या वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला हा त्रास पाठीच्या खालच्या भागात जाणवू शकतो. पाठीवर कुठल्याही प्रकारचा ताण पडणार नाही अशा पावित्र्याचे पालन केल्याने तसेच सपाट शूज वापरल्याने तुमचा हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. पाठदुखीची तीव्रता तुम्हाला नेहमी होणाऱ्या पाठदुखीसारखीच असते. जर वेदना खूपच तीव्र असतील तर ही स्थिती आरोग्याची समस्या दर्शवते.
  • तुमच्या पोटाचा वाढता आकार हा गर्भाशयाच्या विस्ताराशी संबंधित आहे तर तुमच्या स्तनांवरची सूज ही वाढलेल्या रक्तप्रवाहाचा परिणाम आहे. तथापि, तुमच्या पायाच्या घोट्यांजवळ सुद्धा तुम्हाला सूज जाणवू लागेल. बर्‍याच स्त्रिया याबद्दल तक्रारी करतात, ही समस्या सामान्यत: स्नायूंमध्ये पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे होते. गरोदरपणात असे होणे सामान्य आहे परंतु आहारात भरपूर मिठाचा वापर केल्याने किंवा खूप काळ उभे राहिल्यास ही सूज आणखी वाढू शकते.

सामान्य शारीरिक बदल

दुहेरी किंवा एकाधिक बाळासह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात, भयानक लक्षणांमुळे गरोदरपणाचा प्रारंभिक टप्पा एका भीतीदायक स्वप्नासारखा होता. गरोदरपणाच्या ह्या टप्प्यात काही नवीन लक्षणे तुम्ही स्पष्टपणे अनुभवू शकता.

  • पोटाचा वाढणारा आकार हे तुमच्या गरोदरपणाचे स्पष्ट चिन्ह असू शकते, परंतु ह्या आठवड्यात तुमच्या वाढलेल्या भुकेमुळे बाळ किती वेगाने वाढत आहे ह्याची जाणीव तुम्हाला होईल. त्यांच्या पौष्टिक गरजा लवकरच वाढू लागतात आणि तुमच्या शरीरातील उर्जा आणि कॅलरीची मागणी सुद्धा त्यासोबत वाढेल. तुमच्या बाळांच्या संख्येनुसार जवळजवळ ७०० कॅलरी किंवा त्यापेक्षा जास्त घेण्याची शिफारस केली जाते.
  • पाठीचा त्रास बहुतेक स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणात होतो, परंतु जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असाल तर तुम्हाला अस्थी बंधाशी संबंधित वेदना होण्याची शक्यताही जास्त आहे. गर्भाशयाचा विस्तार झाल्यामुळे अंतर्गत स्नायूंवर थोडा ताण पडतो आणि तीव्र वेदना होऊ शकतात.
  • शरीरातील संप्रेरके ह्या बदलांचे समर्थन करतात आणि तुमच्या लहान बाळांसाठी चांगले वातावरण तयार करण्यास मदत करतात. ह्यामुळे तुमचे केस चमकदार आणि दात होणे ह्यासारखे परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर होताना दिसतात.
  • दुसर्‍या तिमाहीत प्रवेश केल्यावर गर्भवती स्त्रियांना दुसरे आयुष्य मिळाल्यासारखे असते. तुम्हाला नवीन उर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटू शकते परंतु ही ऊर्जा तुमच्याकडे होतीच फक्त गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ती कमी झाली होती. ह्या ऊर्जेचा जितका चांगल्या पद्धतीने वापर करता येईल तितका करा.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण १४ वा आठवडा पोटाचा आकार

तुमचे गर्भाशय आता ओटीपोटाच्या आजूबाजूच्या जागेत स्वत: साठी जागा बनवू लागले आहे, त्यामुळे पोटाचा गोलाकारपणा आणि त्याची वाढ आणखीन स्पष्ट होऊ शकेल. तुमचा बाळाशी असलेला बंध आणखी घट्ट होण्यास त्यामुळे मदत होईल. तसेच तुम्हाला सैल कपडे घातल्यावर बरे वाटू लागेल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण १४ वा आठवडा अल्ट्रासाऊंड

ह्या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड केल्यास तुम्हाला तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांना सहजतेने पाहता येईल. जर त्यांचे चेहरे पुरेसे मोठे असतील तर त्यांच्या चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये तुम्हाला ओळखता येतील. बर्‍याचदा, तुमचे बाळ तुमच्याकडे बघून हसत असल्याचे तुमच्या लक्षात येईल आणि जणू काही ते तुम्हाला ओळखते असे तुम्हाला वाटेल. तुम्हाला हा अनुभव अत्यंत आनंददायी वाटू शकेल परंतु त्यामागचे सत्य हे आहे की बाळाचा मेंदू त्याच्या चेहऱ्यावरील वेगवेगळ्या भागांना संदेश पाठवून ते योग्यप्रकारे कार्य करीत आहेत ना ह्याची तपासणी करीत असतो. त्यामुळे तुमचे बाळ हास्य, काळजी आणि त्यांना शक्य तितकी प्रत्येक अभिव्यक्ती करीत असते.

जुळ्या किंवा एकाधिक बाळासह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील आहार

काय खावे हे माहित करून घेण्याआधी, काय दूर ठेवले पाहिजे हे देखील माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला गर्भधारणा झाली आहे हे समजल्यापासूनच अल्कोहोलचे सेवन थांबविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, तुमच्यामध्ये ऍलर्जिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकेल अशा कोणत्याही अन्न उत्पादनांपासून दूर रहा.

अंडी, चॉकलेट आणि अगदी दुध यासारख्या निरोगी खाद्यपदार्थांची सुद्धा तल्लफ येऊ शकते. ह्यामध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलची अफाट मात्रा असते आणि ते जास्त खाल्ल्यास हानिकारक ठरू शकते. भाजलेले मांस खाणे टाळावे.

प्रथिने खाणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असावी. इतर शाकाहारी पर्यायांप्रमाणे पुरेसे उकडलेले किंवा शिजवलेले मांस खाणे चांगले. ओमेगा -3, जीवनसत्त्वे, फॉस्फरस आणि इतर असंख्य घटक ज्या आहारात आढळतात, ते ऊतकांच्या विकासासाठी वाढीसाठी तसेच तुमच्या बाळांना मदत करण्यासाठी सेवन केले पाहिजे.

जुळ्या किंवा एकाधिक बाळासह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यातील आहार

गरोदरपणात काळजी घेण्याविषयक टिप्स

तुमची ऊर्जा आता पूर्ववत झाली आहे आणि तुम्ही आनंदाच्या सर्वोच्च स्तरावर आहात. ह्या काळात तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी काही टिप्स खाली देत आहोत ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आरामदायी होऊ शकेल.

हे करा

  • तुम्ही तुमच्या आहारात पुरेसे तंतुमय खाद्यपदार्थ तसेच मांस आणि नट्स ह्याचा समावेश केल्याचे सुनिश्चित करा. त्यामुळे पचनक्रियेस उत्तेजन मिळते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.
  • हलक्या व्यायामाचे वेळापत्रक आपल्या दैनंदिन कामकाजाचा एक भाग असावे. हलके चालणे किंवा पोहण्याचे सत्र सुरू करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

काय टाळावे?

  • आपल्या आधीच्या कपड्यांमध्ये आपण चांगले दिसतो ह्या भावनेने आपले जुने कपडे घालण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे पोट आणि शरीर आरामदायक आहे ह्याची खात्री करून घ्या आणि सैल कपडे निवडा.
  • रस्त्यावर किंवा उघड्यावरच्या खाद्यपदार्थापासून दूर रहा. जरी ते तुमच्यासमोर उकळलेले आणि शिजवलेले असले तरीही त्यामध्ये तुम्हाला माहित नसलेले बॅक्टेरिया आणि इतर संक्रमण असू शकते.

दुहेरी किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या १४ व्या आठवड्यात आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमच्या पोटाचा आकार झपाट्याने वाढत असताना, तुम्ही स्ट्रेचमार्क्स साठी व त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काही क्रीम खरेदी करू शकता. तुम्ही या पुढील आठवड्यांमध्ये घालू शकता असे काही सैलसर आणि आरामदायक कपडे विकत घ्या. तसेच बाळांच्या नावांची पुस्तके खरेदी करा आणि आपल्या बाळासाठी काही निवडक नावांची यादी तयार करून ठेवा.

१४ आठवड्यांच्या जुळ्या बाळांसह गर्भवती असताना आयुष्य छान वाटू शकते आणि येत्या काही आठवड्यांमध्ये ते अधिक चांगले होईल. परंतु तुमची आणि बाळांची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असणार आहे. आपल्या पुढील मार्गावर येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला सामोरे जाण्याचा उत्तम उपाय म्हणजे आधीच तयारी करणे हा होय.

मागील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १३ वा आठवडा
पुढील आठवडा: जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – १५ वा आठवडा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article