Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात मांडी घालून बसणे (भारतीय पद्धत) सुरक्षित आहे का?

गरोदरपणात मांडी घालून बसणे (भारतीय पद्धत) सुरक्षित आहे का?

गरोदरपणात मांडी घालून बसणे (भारतीय पद्धत) सुरक्षित आहे का?

गरोदरपणात त्रास टाळण्यासाठी, बसताना शरीराचा योग्य पवित्रा राखणे महत्वाचे आहे. मांडी घालून बसल्याने रक्तदाब वाढतो आणि रक्त प्रवाहात अडथळा येऊ शकतो त्यामुळे व्हेरीकोस व्हेन्सचा सुद्धा त्रास होऊ शकतो. काही गर्भवती महिलांना मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. बरेच लोक जेवताना खाली मांडी घालून बसतात. बसतानाची शारीरिक स्थिती चांगली असल्यास स्नायूंचे कार्य सुधारते तसेच मानसिक आरोग्य, एकाग्रता आणि रक्त प्रवाह सुधारतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची प्रसूतीच्या वेळेला मदत होते. गर्भवती स्त्रियांनी बैठी जीवनशैली टाळली पाहिजे त्यासाठी त्यांनी स्ट्रेचिंग केले पाहिजे, तसेच थोडे चालले पाहिजे आणि ताठ बसले पाहिजे. जोपर्यंत काही त्रास होत नाही आणि गर्भवती स्त्रीला आरामदायक वाटते तोपर्यंत गर्भवती स्त्रीने मांडी घालून बसायला हरकत नाही.

गरोदरपणात मांडी घालून बसणे सुरक्षित आहे काय?

सर्व गर्भवती स्त्रिया निरोगी गर्भारपणाचे उद्दिष्ट ठेवून ज्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे त्याकडे लक्ष देतात. मांडी घालून बसल्याने श्रोणी उघडण्यास मदत होते आणि बाळ खाली सरकण्यास मदत होते आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीला प्रसूतीसाठी मदत होते. हा फायदा लक्षात घेऊन गर्भवती स्त्रिया घरात कामे करताना, धार्मिक कार्यक्रमात किंवा योगा व ध्यानधारणा करताना मांडी घालून बसण्यास प्राधान्य देतात.

गर्भवती असताना मांडी घालून बसणे कुणी पूर्णपणे टाळले पाहिजे?

मांडी घालून बसण्याचे अनेक फायदे असूनही फिजिओथेरपिस्ट काही गर्भवती महिलांसाठी याची शिफारस करत नाहीत. खालील प्रकारच्या स्त्रियांनी गर्भवती असताना पूर्णपणे भारतीय शैलीत बसणे टाळले पाहिजेः

  • पेल्विक गर्डल पेन (पीजीपी) ग्रस्त गर्भवती महिलांनी मांडी घालून बसणे टाळले पाहिजे.
  • सिम्फिसिस पबिस डिसफंक्शन (एसपीडी) हे आणखी एक कारण आहे, ज्यामुळे श्रोणिकडील भाग असमान स्थितीत राहतो. त्यामुळे पायांवर वजनाचे असमान वितरण होते आणि त्यामुळे ताण शरीरावर ताण येऊन अस्वस्थता येते.
  • कधीकधी, खूप वेळ मांडी घालून बसल्यास पाय आणि घोट्यांवर दाब येतो, रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे सूज येते किंवा व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास उद्भवतो.
  • काही स्त्रिया केवळ मांडी घालून बसल्यामुळे नाही तर कोणत्याही स्थितीत बराच काळ बसून राहिल्यास पाठीवर ताण येतो.

अस्वस्थता कमी करण्यासाठी गरोदरपणात बॉडी मेकॅनिक्सयोग्य असले पाहिजेत हे ह्या लेखाद्वारे निःसंशय सिद्ध झाले आहे. ‘बॉडी मेकॅनिक्ससाध्य करण्यासाठी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे शरीराची स्थिती नीट ठेवणे. मांडी घालून बसणे आरामदायक आहे आणि त्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो. मांडी घालून बसल्याने स्नायूंमध्ये लवचिकता देखील वाढते. म्हणूनच, मांडी घालून बसल्यास बाळ गर्भाशयाच्या मुखाकडे सरकण्यास मदत होते आणि त्यामुळे प्रसूती सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होते.

आणखी वाचा:

गरोदरपणातील मानेचे दुखणे: कारणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध
गरोदरपणातील बधिरता: कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article