सिझेरिअन प्रसूतीनंतरची पहिली मासिक पाळी – काय अपेक्षित आहे?

सी सेक्शन प्रसूतीनंतर मासिक पाळीमध्ये होणारे बदल

सिझेरिअन प्रसूतीमध्ये बाळाचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे होतो. नॉर्मल प्रसूती ऐवजी, गर्भाशयावर आणि पोटावर छे द पाडून बाळाचा जन्म होतो. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आणि योग्य ती काळजी घेतल्यामुळे सी सेक्शन प्रसूती सुरक्षित आहे परंतु आईच्या प्रकृतीस सिझेरिअन प्रसूतीमुळे धोका सुद्धा असतो.

सी सेक्शन मुळे पाळी उशिरा येते का?

जेव्हा स्त्रियांची सिझेरिअन पद्धतीने प्रसूती होते तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की शस्त्रक्रियेमुळे पाळी सुरु होण्यास उशीर होईल का? परंतु सीसेक्शन मुळे पाळी सुरु होण्यास उशीर होत नाही. तुमच्या शरीरातील संप्रेरकांची पातळी, आरोग्याची स्थिती आणि स्तनपान ह्या घटकांनुसार पाळी पुन्हा सुरु होते. परंतु मासिक पाळीवर नक्कीच सिझेरिअन प्रसूतीचा परिणाम होतो. सीसेक्शन नंतर सुरु होणारी मासिक पाळी ही वेगळी असते.

सीसेक्शन नंतर पाळी पुन्हा केव्हा सुरु होते?

सीसेक्शननंतर पाळी येण्यासाठी किती वेळ वाट पाहावी हे संप्रेरकांच्या पातळीवर अवलंबून असते. प्रसूतीनंतर, एचसीजी, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी असते. स्तनपान हा आणखी एक घटक आहे.

. जर तुम्ही स्तनपान करत असाल तर

जर तुम्ही स्तनपान करत असाल तर

स्तनपानाचा संप्रेरकांच्या पातळीवर परिणाम होतो, आणि त्यामुळे सी सेक्शननंतर तुमच्या पाळीवर परिणाम होतो. प्रोलॅक्टिन वाढते आणि त्यामुळे ओव्यूलेशनला अडथळा येतो. म्हणून, स्तनपान करणाऱ्या मातांना पाळी पुन्हा सुरु होण्यासाठी किमान ६ महिने वाट पाहावी लागेल. जर स्तनपान अनियमित असेल, तर पाळी सुद्धा अनियमित येते.

. जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर

जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर

जर तुम्ही बाळाला स्तनपान करीत नसाल तर प्रोलॅक्टीनची पातळी कमी होते आणि पाळी लवकर सुरु होते. काहीवेळा सी सेक्शननंतर पाळी सहा आठवडयांनी लगेच सुरु होते. जर तुम्हाला ३ महिन्यांनी पाळी सुरु झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रसूतीनंतरच्या पहिल्या पाळीमुळे स्तनपानावर परिणाम होतो का?

जर तुम्हाला सी सेक्शननंतर पहिल्यांदा पाळी आली तर, स्तनपानाच्या पुरवठ्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा बाळाची स्तनपानाविषयी प्रतिक्रिया बदललेली असते. ह्या काळातील संप्रेरकांमधील बदलांमुळे

  • स्तनपानाच्या पुरवठ्यात घट होते
  • स्तनपानाच्या रचनेत किंवा चवीत बदल होतो
  • स्तनपानाच्या वारंवारितेत बदल होतो

ह्या बदलांचा तुमच्या स्तनपानाच्या क्षमतेवर मोठा परिणाम होत नाही

सी सेक्शननंतर तुमच्या मासिक पाळीवर कुठल्या घटकांचा परिणाम होतो ?

काही घटक खालीलप्रमाणे

  • ताण
  • विश्रांतीचा आभाव
  • वजन
  • जर काही गुंतागुंत असेल तर

सी सेक्शननंतरची पहिली पाळी कशी असते?

सी सेक्शननंतरची पहिली पाळी नॉर्मल प्रसूतीनंतरच्या पाळीपेक्षा खाली दिल्याप्रमाणे वेगळी असते:

. वेदनादायी असू शकते

संप्रेरकांमधील बदलांमुळे काही स्त्रियांना खूप तीव्र पेटके येतात आणि सी सेक्शननंतरची पाळी वेदनादायी असते.

. खूप रक्तस्त्राव

काही मातांना सी सेक्शननंतर गर्भाशयाला छेद घेतल्यामुळे खूप जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. काही दिवसांनी रक्तस्त्राव नॉर्मल होतो. परंतु रक्तस्त्राव जास्त होत राहिला तर स्त्रीरोगतज्ञांची भेट घ्या.

. पाळीदरम्यान कमी रक्तस्त्राव आणि कमी वेदना होऊ शकतात

काही वेळा, नेहमीपेक्षा कमी रक्तस्त्राव होतो आणि वेदना होत नाहीत. ज्या स्त्रियांना एन्डोमेट्रिओसिसचा त्रास होतो, त्यांची ही समस्या बाळ झाल्यानंतर कमी होते. प्रोजेस्टेरॉनची वाढलेली पातळी हे हलका रक्तस्त्राव होण्याचे कारण आहे. ही जास्त पातळी एस्ट्रोजेनची पातळी संतुलित राखण्यास मदत करते आणि गर्भाशयाच्या भित्तिकांच्या वाढीस सुद्धा मदत करते

. खूप दिवस सुरु राहते

सी सेक्शननंतरची पहिली पाळी एक आठवडाभर सुरु राहते, परंतु काही वेळा रक्तस्त्राव १२ दिवसांपेक्षा जास्त काळ सुरु राहतो.

. गडद लाल रंग

जर तुम्ही बघितलत तर हा रक्तस्त्राव गडद लाल रंगाचा असतो. परंतु घाबरून जाऊ नका! हे रक्त सी सेक्शननंतर तयार झालेले असते.

. त्यामध्ये रक्ताच्या गाठी असू शकतात

तुमच्या पहिल्या पाळीदरम्यान गडद रंगाच्या रक्ताच्या गाठी पडू शकतात. शरीरातून स्त्रवणारे रक्ताची गोठण्याची क्रिया थांबवणारे द्रव्य, ह्या कालावधीत परिणामकरीत्या काम करीत नाही आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता वाढते.

सी सेक्शननंतर अनियमित पाळी

सामान्यपणे, ज्या स्त्रियांचे सी सेक्शन होते त्या बऱ्याच स्त्रियांना हि समस्या येते. परंतु पाळी पूर्ववत होण्यास खूप वेळ लागत नाही. म्हणजेच २८ दिवसांचे चक्र पुन्हा सुरु होते. परंतु त्याच वेळेला, काही स्त्रियांमध्ये अनियमित पाळी सुद्धा असू शकते. ताण, थायरॉईड, वजनात घट किंवा वजनातील वाढीमुळे असे होऊ शकते. काही स्त्रियांमध्ये वयाच्या पस्तीशीत रजोनिवृत्तीची लक्षणे आढळतात आणि त्यामुळे पाळी अनियमित येते.

संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेमुळे मासिक पाळीवर परिणाम होतो का?

बऱ्याच स्त्रिया सी सेक्शन नंतर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय निवडतात. ह्या शस्त्रक्रियेमध्ये गर्भधारणा राहू नये म्हणून बीजवाहिन्या कापल्या जातात किंवा ब्लॉक केल्या जातात. सीसेक्शन नंतर केलेल्या संतती नियमनाच्या शस्त्रक्रियेचा पाळीवर परिणाम होत नाही. काही वेळेला ज्या स्त्रियांचे सी सेक्शन आणि संतती नियमनाची शस्त्रक्रिया होते त्यांना खूप जास्त रक्तस्रावाचा त्रास होतो.

वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी?

सी सेक्शन नंतर पहिल्यांदा पाळी आल्यावर जर तुम्हाला खालील लक्षणे दिसली तर वैद्यकीय मदत घ्या

. खूप जास्त रक्तस्त्राव

जर तुम्हाला दिवसातून खूप वेळा पॅड बदलावे लागले तर तुम्ही स्त्रीरोगतज्ञांची तात्काळ भेट घेतली पाहिजे.

. ताप

ताप

जर तुम्हाला पहिल्या पाळी च्या वेळेला किंवा नंतर ताप आला तर तुम्ही स्त्रीरोगतज्ञांची भेट घेतली पाहिजे

. खूप दिवस रक्तस्त्राव होणे

सात दिवस रक्तस्त्राव होणे हे नॉर्मल आहे, परंतु त्यानंतर रक्तस्त्राव होत राहणे हे नॉर्मल नाही

. खूप वेदना होणे

जर तुम्हाला खूप जास्त वेदना झाल्या किंवा पोटात पेटके येत असतील तर वैद्यकीय मदत घेणे चांगले

. थकवा

जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत राहिला किंवा ऍनिमियाची लक्षणे दिसली तर तुम्ही जितक्या लवकर डॉक्टरांची भेट घ्याल तितके चांगले

. पाळी न येणे

स्तनपान करणाऱ्या स्त्रीमध्ये, सी सेक्शन नंतर पाळी येण्यासाठी सहा महिने लागू शकतात. जर सहा महिन्यांनंतर सुद्धा पाळी आली नाही तर तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी संपर्क साधा.

सी सेक्शननंतर तुमच्या शरीरात आणि मासिक पाळी चक्रामध्ये बदल होतात. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपाय म्हणजे ताणविरहित राहणे आणि मातृत्वाचा आनंद घेणे होय. जेव्हा गरज पडेल तेव्हा तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय
प्रसूतीनंतर खावेत असे २० भारतीय अन्नपदार्थ