Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य बाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळाची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यामुळे बाळाच्या त्वचेला लवकर संसर्ग होऊन नुकसान पोहोचते. सर्वात प्रामुख्याने आढळणारी बाळाच्या त्वचेची स्थिती म्हणजे एक्झिमाहोय. बाळाला खूप लहान वयात तो होतो. तथापि, ह्या विषयवार अधिक चर्चा करण्यापेक्षा, हे जाणून घेऊया की एक्झिमा म्हणजे नक्की काय? एक्झिमा म्हणजे थोडक्यात त्वचा कोरडी होऊन त्यावर रॅशेस येतात आणि त्यामुळे त्वचेला खूप खाज सुटते. अगदी सोप्पं सांगायचे तर एक्झिमा म्हणजे त्वचेवर आलेली रॅश होय.

एक्झिमा नक्की कशामुळे होतो ह्या बाबतीत वेगवेगळी मते आहेत, एका बाजूला एक्झिमा ही ऍलर्जी आहे असे काहींचे मत आहे आणि दुसरीकडे त्यामागे जनुकीय कारण सुद्धा आहे असे काहींचे मत आहे. एक्झिमाला डरमॅटिटिस, ऍटॉपिक एक्झिमा किंवा आटोपीक डरमॅटिटिस असे म्हणतात.

खूप अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की पाच वर्षांखालील मुलांमध्ये एक्झिमा होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, जनुकीय करण्याव्यतिरिक्त एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जीमुळे जास्त होतो.

बाळाला होणारा एक्झिमा म्हणजे नक्की काय?

बाळाला एक्झिमा कशामुळे होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच बाळांना ही त्वचेची समस्या येते आणि त्यास वैद्यकीय भाषेत ऍटॉपिक डरमॅटिटिसअसे म्हणतात. ऍटॉपिक म्हणजे बाळाची एक्झिमा, अस्थमा किंवा हे फिवर होण्याची प्रवृत्ती होय आणि ड्रामॅटीटीस म्हणजे सूज येणे.

पहिल्या वर्षात बाळांना ही त्वचेची समस्या होण्याची शक्यता जास्त असते परंतु, नंतरही ती वाढण्याची शक्यता असते. या रोगाचा मूळ घटक म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्याची क्षमता कमकुवत असते. त्यामुळे त्वचेच्या संसर्ग होण्याची शक्यता असते. हा संसर्ग टाळू, चेहरा, पाय किंवा हाताच्या मागील भागावर लक्षात येण्यासारख्या चट्ट्यांच्या स्वरूपात दिसतो. एक्झामा बरा होऊ शकत नाही परंतु उपचाराद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येते.

बेबी एक्झिमाची कारणे

एक्झिमाचे नक्की कारण काय आहे ह्या बाबत संशोधक अजूनही चर्चा करीत आहे. परंतु इथे काही त्यामागची कारणे दिली आहेत.

. जनुकीय कारण

अनुवंशिकता आणि प्रतिकार प्रणाली कमकुवत असणे ही बाळाला एक्झिमा होण्यामागची काही कारणे आहेत. वातावरणातील संसर्ग आणि त्वचेतील पारगम्यता ह्यामुळे त्वचेची जळजळ होते.

. संबंधित रोग

जर कुटुंबामध्ये अस्थमा किंवा हे फिवर चा इतिहास असेल तर हा धोका जास्त असतो. त्यामुळे असे इतर काही रोग जर बाळास असतील तर त्यामुळे एक्झिमा होण्याची शक्यता वाढते.

. ऍलर्जी

हे सर्वज्ञात आहे की एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जी ह्याचे संयोजन आहे. एक्झिमाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे कोरडी त्वचा आणि रॅशेस ही आहेत. त्वचेवरील रॅश प्रामुख्याने तोंड, पाय आणि हातावर आढळते. ह्या सर्व ऍलर्जी ह्या स्तनपानातून पसरतात. ह्यामध्ये आईच्या आहाराच्या सवयी त्यास जबाबदार आहेत.

एक्झिमा मध्ये बाळाच्या त्वचेचा दाह होतो आणि त्वचा कोरडी पडून खाज सुटते. काही ऍलर्जीना बाळाची प्रतिकार प्रणाली प्रतिक्रिया देते. ह्या कालावधीत, लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

बाळांमध्ये होणाऱ्या एक्झिमाची लक्षणे

सुरुवातीची लक्षणे बाळाच्या वयावर अवलंबून असतात. सुरुवातीची लक्षणे म्हणजे त्वचेवर कोरडे पट्टे तयार होतात आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते. त्वचेचा दाह होतो. त्वचेच्या पुटकुळ्यांमधून स्त्राव येतो आणि सूज येते.

कोरडी त्वचा किंवा खूप खाजवल्यामुळे त्वचा जाड होणे ही सुद्धा एक्झिमाची कारणे असू शकतात. जर ह्या भागातून रक्तस्त्राव सुरु झाला तर ह्या रॅशेसची तीव्रता वाढते. चाचण्यांद्वारे हे लक्षात येईल की एक्झिमाचे मूळ कारण अनुवंशिकता आहे की ऍलर्जी. मुले जेव्हा पौगंडावस्थेत पोहोचतात तेव्हा एक्झिमा वाढतो. बाळामध्ये एक्झिमाची काही लक्षणे लगेच ओळखता येतात.

बाळांमध्ये होणाऱ्या एक्झिमाची लक्षणे

बाळाला एक्झिमा झाला आहे त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे

. बाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या

बाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या दिसू लागतात आणि त्या उग्र व खरबरीत असतात.

. त्वचेतून पिवळा स्त्राव येऊ लागतो

कोरड्या त्वचेखालून पिवळा स्त्राव जमा होतो आणि स्थिती उग्र झाल्यावर हा स्त्राव बाहेर येऊ लागतो.

. त्वचा लाल होऊन खाज सुटते

सतत त्वचा खाजवल्याने त्वचा लालसर होते.

. त्वचेच्या काही भागात पू होणे

रक्ताचा प्रवाह नीट न होऊ शकल्यामुळे त्वचेच्या काही भागात पू होतो आणि त्यामुळे बाळाला वेदना होतात.

. फ्लू सारखी लक्षणे

एक्झिमा मुळे तुमच्या प्रतिकार प्रणालीवर काही प्रमाणात परिणाम होतो आणि बाळाला फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात त्यामध्ये खोकला, शिंका आणि शरीराचे वाढलेले तापमान ह्यांचा समावेश होतो.

जर ह्यापैकी कुठलीही लक्षणे दिसली तर लागलीच उपचार करा. काही तीव्र प्रकरणांमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधवा.

बेबी एक्झिमावर उपचार

 • त्वचारोगतज्ञांनी नीट तपासणी केल्यास उपचार सोपे होतील. डॉक्टर नीट तपासणी करून, तुमचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतील त्यामुळे ह्या रॅशेस येण्याचे कारण कळण्यास मदत होईल. सुरुवातीला, ते सौम्य लोशन वापरण्याचा सल्ला देतील त्यामुळे एक्झिमा नियंत्रित राहील.
 • स्टिरॉइड क्रीम्स नियमित लावण्यास सांगितले जाईल. डॉक्टर पॅच टेस्ट करून पाहतील आणि त्यामुळे ऍलर्जीचे कारण कळण्यास मदत होईल. ह्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे त्वचेचा हा आजार नियंत्रित राहतो कारण तो संसर्गजन्य नाही.
 • त्वचेची खाज नियंत्रित राहावी, सूज कमी व्हावी, नवीन पुटकुळ्या तयार होऊ नयेत म्हणून तसेच संसर्ग नष्ट व्हावा म्हणून औषधे आणि थेरपी दिली जाते. ह्या प्रक्रियेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बाळाची त्वचा मॉइश्चराईझ करणे होय.

घरगुती उपचार

वर दिलेल्या उपचारांव्यतिरिक्त बेबी एक्झिमासाठी घरगुती उपचार सुद्धा केले जाऊ शकतात

 • घरात स्वच्छ, कोरडे आणि थंड वातावरण असणे गरजेचे आहे. जर गरज वाटली तर ह्युमिडीफायर घरात बसवून घ्या.
 • बाळाला अंघोळ घालताना किंवा कपडे धुताना साबणाचा वापर करणे टाळा कारण जर बाळाला त्याची ऍलर्जी असेल तर एक्झिमा होऊ शकतो. अंघोळीनंतर लगेच, त्वचेवर मॉइश्चरायझर लावले पाहिजे.
 • कमी प्रमाणात कोर्टिसोन असलेले क्रीम औषधांच्या दुकानात मिळते. घट्ट बसणारे कपडे तसेच सिंथेटिक कपडे टाळले पाहिजेत.
 • ज्या भागात एक्झिमा झाला आहे तिथे ऑलिव्ह ऑइल लावा. कोरफड त्या भागावर लावल्यास खाजणाऱ्या भागाला थंडावा मिळतो आणि त्यामुळे बाळाला आराम पडतो. बऱ्याच तेलांमध्ये ओमेगाफॅटी ऍसिड्स असतात ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि एक्झिमाच्या लक्षणांची तीव्रता कमी होते.

घरगुती उपचारकायम होणाऱ्या एक्झिमा रॅशवर उपचार

रॅशची तीव्रता किती आहे ह्यावर एक्झिमाची तीव्रता अवलंबून असते. जर रॅशेसची अगदी सुरुवातीची लक्षणे दिसली तर लोशन लावल्यास खाज कमी होते. लोशन लावल्याने रॅश झालेला भाग कोरडा पडत नाही, नाहीतर कोरडी त्वचा खाजवल्यावर घर्षणामुळे रॅश वाढते.

 • त्वचेवरील रॅश कोरडी होऊ नये म्हणून पालकांनी वारंवार त्या जागेवर लोशन लावले पाहिजे. तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी जे लोशन योग्य, ते लावणे उत्तम.
 • इतर उपचारपद्धती म्हणजे बाळाला कोमट अथवा थंड पाण्याने अंघोळ घालणे होय. कारण गरम पाण्यामुळे त्वचा लवकर कोरडी पडते. बाळाची अंघोळ झाल्यावर तुम्ही लगेच बाळाला मॉइश्चरायझर लावा म्हणजे ते लगेच शोषले जाईल. नंतर बाळाला कॉटन पासून तयार केलेले सैल आणि हलके कपडे घाला. लोकर किंवा जाड कापडाचे कपडे घालणे टाळा कारण त्यामुळे शरीराचे तापमान वाढून बाळाला अस्वस्थता येऊ शकते.
 • तुमचे टॉडलर जेव्हा अंग खाजवत असेल तेव्हा लक्ष ठेवा. खाजवून अजून ते दुखणे वाढवत नाहीत ना ते पहा.
 • जर पुरळ खूप असेल तर ते पसरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही थंड बर्फ लावू शकता.
 • तसेच, खूप तीव्र एक्झिमा असेल तर ५ ते १० पट पातळ केलेल्या ब्लिचच्या पाण्याने बाळाला अंघोळ घाला.
 • १ गॅलन पाण्यामध्ये दोन टेबलस्पून ब्लिच घाला आणि बाळाला त्या पाण्यात ठेवा. बाळ ते पाणी पीत तर नाही ना ह्याकडे लक्ष ठेवा. अंघोळीनंतर ते पाणी लगेच बाहेर फेकून द्या. ब्लिचचा वास निघून जावा म्हणून बाळाला लगेच स्वच्छ धुवा.

अटॉपिक डरमॅटीटीस आणि ऍलर्जिक अन्नपदार्थ

अन्नपदार्थांच्या प्रतिक्रियांमुळे एक्झिमा होतो ह्याबाबत वेगवेगळी मते आहेत.मते वादविवादास्पद आहेत परंतु संशोधकांनी सहा महिन्यांपर्यंत स्तनपान दिले पाहिजे ह्याचे समर्थन केले पाहिजे, कारण त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. छोट्या मुलांमध्ये अन्नपदार्थांच्या ऍलर्जीमुळे ही लक्षणे वाढतात आणि पर्यावरणीय धोक्यांमुळे मोठ्या माणसांमध्ये लक्षणे दिसून येतात.

अन्नपदार्थांची ऍलर्जी आणि अटॉपिक डरमॅटीटीस एकमेकांशी संबंधित आहेत याबद्दल देखील एकमत आहे. केलेल्या अनेक अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की मुलांद्वारे खाण्यात आलेल्या विशिष्ट अन्नामुळे सूज येते ज्यामध्ये प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूडचा समावेश असतो. अल्पवयीन मुलांमध्ये संसर्ग वाढण्यामागे जरी काळानुसार ऍलर्जी वाढण्याची प्रवृत्ती असते तरीसुद्धा खाण्याच्या काही वस्तू जबाबदार असतात. खबरदारी म्हणून ऍलर्जी मूल्यांकन चाचणी करून घेण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो.

वैद्यकीय निदान आणि पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स द्वारे अन्नपदार्थ आणि लक्षणे ह्यातील नाते लक्षात येते. अधिक अचूकतेने सांगायचे झाल्यास, एखादा अन्नपदार्थ घेतल्यावर लक्षणे दिसू लागतात आणि त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. ज्या पदार्थांमुळे ऍलर्जी होते असे पदार्थ परीक्षण आणि त्रुटी ह्या पद्धतीने ओळखले पाहिजेत.

बाळांना होणारा एक्झिमा कसा टाळावा?

बाळाची कोरडी त्वचा आणि सूज ह्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. आधी सांगितल्याप्रमाणे, जर त्याचे कारण आनुवंशिक असेल तर तुम्ही ते टाळू शकत नाही. बाळाच्या जन्मानंतर एक वर्षाने लक्षणे दिसू लागतात. तंज्ञांच्या मतानुसार जर योग्य उपचार घेतले तर एक्झिमा टाळता येऊ शकतो. तसेच बाळाला ह्या ऍलर्जी कशामुळे होतात ह्याची नोंद ठेवणे तुमच्यासाठी (आणि तुमच्या डॉक्टरांसाठी) फायद्याचे आहे.

बाळांना होणारा एक्झिमा कसा टाळावा?

एक्झिमा टाळण्यासाठी इथे काही मार्ग आहेत:

 • बाळाचा आहार हे आणखी एक कारण असू शकते ज्यामुळे एक्झिमा होतो परंतु बाळाच्या आहारात कुठलाही बदल करण्याआधी डॉक्टरांशी संपर्क साधा. घरी स्वच्छ आणि धूळविरहित वातावरण ठेवणे ही एक्झिमा होऊ नये म्हणून योग्य परिस्थिती आहे परंतु तसे करणे अवघड असू शकते. आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो.
 • सिंथेटिक कपडे घालणे टाळा कारण कॉटनचे कपडे घालण्यास प्राधान्य द्या. कारण त्यामुळे बाळाला खाज सुटून कोरडेपणा आणखी वाढू शकतो.
 • रॅश दिसल्यावर लगेच उपचार केल्यास ती नियंत्रित ठेवण्यास मदत होते. क्रिम्स आणि स्टिरॉइड्स चा बाहेरून वापर करणे हा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे सूज कमी होते. कारण त्यामध्ये अँटीइंफ्लामेटरी घटक असतात. आणि ते बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण वापरू शकता. त्वचेला काहीही नुकसान न पोहोचवता त्यामुळे एक्झिमा कमी होतो.
 • काहीवेळा, ऍलर्जीमुळे एक्झिमा होतो, म्हणून वातावरणातील ह्या ऍलर्जी ओळखून आणि त्या नक्की कुठल्या आहेत त्या तपासून घेण्याने मदत होऊ शकते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एक्झिमा विषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न खालीलप्रमाणे:

. मुलींना एक्झिमा होण्याचा धोका जास्त असतो का?

कॅरोलिन्स्का इन्स्टिटयूट इन स्टोकहोम च्या अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की पौगंडावस्थापूर्व कालावधीतील मुलींना मुलांच्या तुलनेत एक्झिमा होण्याचा जास्त धोका असतो.

. एक्झिमा होण्याचे कारण काय?

एक्झिमा होण्याचे नक्की कारण काय ह्यावर बरीच वेगवेगळी मते आहेत. बऱ्याच लोकांच्या मते हे कारण आनुवंशिक असते तर काहींच्या मते ऍलर्जी आणि वातावरणातील काही घटकांमुळे एक्झिमा होतो.

. एक्झिमा संसर्गजन्य आहे का?

नाही, स्पर्शाद्वारे किंवा इतर माध्यमातून तो पसरत नाही.

. एक्झिमचे रूपांतर संसर्गात झाले तर काय?

रॅश आणि संसर्गजन्य एक्झिमा ह्यातील फरक लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा नुकसान पोहोचलेल्या त्वचेला संसर्ग होतो तेव्हा एक्झिमा संसर्गजन्य होतो. तिथे खाजवल्यावर संसर्गाची तीव्रता वाढते. त्यामुळे रॅश आणखी तीव्र होते आणि संसर्ग वाढतो.

एक्झिमा झाल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष दिले पाहिजे. संसर्ग किती प्रमाणात झाला आहे हे बघितले पाहिजे. त्वचारोगतज्ञ संसर्गाची तीव्रता आणि काळ कमी करण्यास मदत करू शकतात. ते तुम्हाला औषधें आणि उपचार देतील त्यामुळे शरीराच्या इतर भागात संसर्ग पसरणार नाही. निरीक्षणाद्वारे असे लक्षात आले आहे की स्टॅफायलोकोकस ऑरिअस हा जिवाणू एक्झिमा होण्यास कारणीभूत असतो. हा जिवाणू जखमेच्या भोवती असतो आणि जेव्हा रुग्ण तो संसर्गजन्य भाग खाजवतो तेव्हा रॅशच्या भागात प्रवेश करतो.

अशावेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजिवाणू क्रीम्स लिहून दिली जातात. एक्झिमच्या तीव्रतेनुसार काहीवेळा पोटातून घेण्याची स्टिरॉइड्स सुद्धा लिहून दिली जातात.

. स्ट्रोइड्सचा वापर बाळासाठी हानिकारक असतो का?

औषधोपचार निर्धारित मर्यादेत असले पाहिजेत. पॅरासिटामोलने काय बरे करता येते ते प्रतिजैविकांनी बरे केले जाऊ नये आणि जिथे अँटीबायोटिक्स काम करू शकतात तेथे स्टिरॉइड्स कधीही दिले जाऊ नयेत. तथापि, तोंडी स्टिरॉइड उपचारांचा वापर आपल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार केला जावा.

योग्य प्रमाणातील स्टिरॉइड्स दिल्यास ते निरुपद्रवी असतात. कुणीही संदर्भ दिलेली किंवा स्वतःच्या मनाने बाळाला औषधे देऊ नका कारण त्यामुळे बाळाच्या कोमल त्वचेला न भरून येणारे नुकसान होऊ शकते . हे हानिकारक असू शकते कारण आवश्यक असताना स्टिरॉइड इच्छित परिणाम देत नाही.

एक्झिमाचे नेमके कारण माहित नसले तरी अशा काही सोप्या पद्धती आहेत ज्याद्वारे ही त्वचेची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. एक्झिमा शरीराच्या इतर भागात सुद्धा पसरू शकतो त्यामुळे त्यावर लवकर उपचार केल्यास बाळाची अस्वस्थता कमी होईल.

आणखी वाचा:

बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय
डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article