Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात उन्हात बसणे सुरक्षित आहे का?

आपली आनंदाची कल्पना म्हणजे लक्ख ऊन पडलेला सकारात्मक दिवस ही असू शकते. परंतु जेव्हा तुम्ही गर्भवती होता तेव्हा परिस्थिती बदलू शकते. लोक आपल्याला काय करावे व काय करू नये याबद्दल सतत सल्ला देत असतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीबद्दल जागरूक राहू लागता. गर्भारपण आणि सूर्यप्रकाशाचा संबंध ह्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

गरोदरपणात सूर्यप्रकाश फायदेशीर ठरतो का?

हे सर्वज्ञात आहे की जर तुम्हाला व्हिटॅमिन डी चा पुरेसा डोस आवश्यक असेल तर उन्हाशी संपर्क चांगला असतो. म्हणूनच, गर्भवती स्त्रियांसाठी उन्हाचा संपर्क आवश्यक आहे कारण ते गर्भाच्या हाडांच्या निर्मितीस मदत करते. शिवाय, तुमच्यासाठी आणि बाळासाठी एक मजबूत प्रतिकारशक्ती देखील तयार होते.

वरील वस्तुस्थितीच्या विपरीत, गर्भवती राहिल्याने तुमच्या संप्रेरक पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमची त्वचा नेहमीपेक्षा अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे गर्भवती असताना जास्त काळ सूर्यप्रकाशात राहणे टाळले पाहिजे.

गरोदरपणात उन्हात जास्त काळ राहिल्याने निर्माण होणारी जोखीम

गरोदरपणात सूर्यप्रकाशाविषयी संवेदनशीलता वाढते आणि ती तुमच्यासाठी आणि बाळासाठी धोकादायक असू शकते. तर, गर्भधारणेदरम्यान सूर्यामुळे होण्याचे संभाव्य धोके काय आहेत हे जाणून घ्या.

  • त्वचेचा कर्करोग

गर्भवती महिलांसाठी ही एक मोठी चिंता आहे. एका अभ्यासानुसार असे सूचित केले गेले आहे की ज्या गर्भवती स्त्रिया दीर्घकाळ अति नील किरणांच्या सानिध्यात असतात त्यांना त्वचेच्या कर्करोगाचा धोका असतो. दीर्घकाळ उन्हात राहिल्याने सनबर्न झाल्यामुळे तो होतो. आधीच चर्चा केल्याप्रमाणे, गर्भवती स्त्रिया त्वचेच्या संवेदनशीलतेमुळे ग्रस्त असतात त्यामुळे त्यांना सनबर्न होण्याची शक्यता जास्त असते.

  • मेलास्मा

ह्या स्थितीला प्रेग्नन्सी मास्क म्हणून ओळखले जाते, हि अशी एक अवस्था आहे ज्यामुळे त्वचेचा रंग फिकट होऊ शकतो. गर्भवती असताना, हार्मोनल बदलांमुळे मेलेनिनचे अत्यधिक उत्पादन होऊ शकते. अशी स्थिती संवेदनशीलतेत आणखी भर घालू शकते, उन्हाच्या संपर्कात असताना तुमच्या त्वचेचा रंग फिकट होऊ शकतो.

  • निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

तुम्ही उन्हाचा आनंद घेत असताना पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेणे विसरू शकता. यामुळे पुढे जाऊन डिहायड्रेशन होऊ शकते. जरी तुम्ही गर्भवती असलात तरीही ही एक सामान्य बाब आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम गर्भावस्थेत लगेच दिसून येऊ शकतात. गर्भवती महिलांमध्ये डिहायड्रेशनमुळे त्यांच्या हृदयाची गती वाढू शकते आणि गर्भासाठी ऑक्सिजनचे प्रमाण देखील त्यामुळे कमी होते.

  • फॉलिक ऍसिडचे विघटीकरण

काही अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की गर्भवती महिलांमध्ये सूर्यप्रकाशामुळे जास्त प्रमाणात फोलेटच्या पातळीत घट होऊ शकते. जर असे झाले तर त्यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा मुलांमध्ये मज्जातंतूनलिका व्यंग निर्माण होऊ शकतात. विशेषत: गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत फॉलिक ऍसिड आवश्यक असते आणि म्हणूनच या महत्त्वपूर्ण काळामध्ये उन्हाशी संपर्क कमी करण्याची शिफारस केली जाते

गरोदरपणात सनस्क्रीन वापरणे सुरक्षित आहे का?

सनस्क्रीनन्स हे सनबर्न्स आणि त्वचेच्या इतर नुकसानींसाठी योग्य उपाय म्हणून कार्य करतात. पण गर्भवती स्त्रिया याचा वापर करू शकतात का? तर उत्तर आहे, होय, गर्भवती महिला सनस्क्रीन वापरु शकतात. परंतु कोणता सनस्क्रीन वापरायचा हा पुढील प्रश्न आहे.

सनस्क्रीनचे दोन प्रकारात वर्गीकरण केले आहे, म्हणजे फिजिकल ब्लॉकर्स आणि केमिकल ब्लॉकर्स. फिजिकल ब्लॉकर्स वापरण्यास सुरक्षित आहेत कारण ते टायटॅनियम डायऑक्साइड आणि झिंक ऑक्साईड यांचे मिश्रण आहेत जे एकत्रितपणे हानिकारक अतिनील किरणांना प्रतिबिंबित करण्यास मदत करतात.

दुसरीकडे, रासायनिक ब्लॉकर्सची गर्भवती महिलांसाठी अजिबात शिफारस केली जात नाही . कारण या ब्लॉकर्समध्ये अतिनील किरणे प्रतिबिंबित करणाऱ्या घटकांऐवजी ते शोषून घेणारे घटक असतात. आणि अशा घटकांपैकी एक ऑक्सीबेन्झोन आहे जो सामान्यत: रासायनिक ब्लॉकरमध्ये आढळतो. ऑक्सीबेन्झोन त्वचेच्या आत शिरतो आणि त्यामध्ये विशेषत: नवजात मुलींमध्ये ऍलर्जी, संप्रेरकांची अस्वस्थता आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलींचे वजन कमी करण्याची संभाव्य क्षमता असते.

गर्भवती असताना उन्हात बसताना घ्यावयाच्या खबरदारी

वेळ घालवण्यासाठी तुम्हाला सनबाथिंग आवडू शकते. परंतु गर्भवती असताना स्वतःच्या तसेचबाळाच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काही खबरदारी घेणे आवश्यक आहे

. आरामदायक कपडे आणि ऍक्सेसरीज घाला

सैल आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे अधिक फायदेशीर ठरू शकते. पांढरे, पिवळे, स्काय ब्लूसारखे रंग त्याच्या प्रतिबिंबित करण्याच्या गुणधर्मामुळे छान असतील. छत्री बाळगणे, सनग्लासेस घालणे आणि टोपी घालणे हे वरदान ठरू शकते.

. स्वत: ला हायड्रेटेड ठेवा

स्वत: ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी हा एक उत्तम द्रव असूनही, रस आणि एनर्जी ड्रिंकला देखील प्राधान्य देऊ शकता. तुम्ही उन्हात कुठेही प्रवास करत असाल तरी नेहमी स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जा. आवश्यक द्रवपदार्थाचे सेवन कधीही चुकवू नका

. सूर्य प्रकाशात कमी वेळ रहा

आपल्याकडे सनस्क्रीन नसल्यास वीस मिनिटांपेक्षा जास्त काळ सूर्यप्रकाशात रहाणे टाळा.

. पूरक औषधे घ्या

जर आपण संपूर्णपणे सूर्यप्रकाशात न जाण्याची योजना आखली असेल तर व्हिटॅमिन डी पूरक औषधांसाठी डॉक्टरांसाठी सल्ला घ्या.

. केव्हा बाहेर जावे हे जाणून घ्या

अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की सूर्यप्रकाशासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे दुपारची वेळ आहे. पहाटे किंवा संध्याकाळची वेळ नाही. याचे कारण असे आहे की ह्या कालावधीत तुम्हाला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी मिळते आणि मेलॅनोमा होण्याचा धोका कमी होतो.

. ढगाळ दिवसांमध्ये सनस्क्रीन लावा

हो हे बरोबर आहे! सूर्याद्वारे उत्सर्जित हानिकारक अतिनील किरणे अद्याप तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचत आहेत. केवळ ढग, धूळ किंवा धुक्यामुळे ते इतस्ततः पसरलेले आहेत.

सूर्याच्या प्रकाशामुळे गरोदरपणावर कसा परिणाम होतो हे जाणून घेत असताना, सूर्याच्या सानिध्यात कमीत कमी वेळ घालवला पाहिजे हे आपल्याला समजले असेलच. तसेच, जर तुमची त्वचा अतिसंवेदनशील असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.

आणखी वाचा: गरोदरपणातील निर्जलीकरण (डिहायड्रेशन)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article