Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home प्रीस्कूलर (३-५ वर्षे) मातृदिनाच्या दिवशी आईला भेट देण्यासाठी ३५ एकमेव आणि कल्पक भेटवस्तूंचे पर्याय

मातृदिनाच्या दिवशी आईला भेट देण्यासाठी ३५ एकमेव आणि कल्पक भेटवस्तूंचे पर्याय

मातृदिनाच्या दिवशी आईला भेट देण्यासाठी ३५ एकमेव आणि कल्पक भेटवस्तूंचे पर्याय

आईला आपल्या मुलांसाठी काय गिफ्ट आणावं हे माहिती असते, परंतु आईला सुद्धा मातृदिनाच्या दिवशी भेटवस्तू दिल्यास तिला स्पेशल वाटेल. तुमच्या आईला आवडतील अश्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही तिच्यासाठी आणू शकता किंवा तुम्ही स्वतः तिच्यासाठी काहीतरी बनवू शकता. तुम्ही आईला काहीही दिलंत किंवा तिच्यासाठी छोटीशी गोष्ट केलीत तरीही तिला ते आवडणारच आहे त्यामध्ये काहीच शंका नाही. पण ह्या मदर्स डे साठी आईला काय गिफ्ट द्यायचे हे तुमचे अजूनही ठरलेले नसेल तर जरूर विचार करा.

मदर्स डे २० सर्वोत्तम गिफ्ट्स

इथे मदर्सडे गिफ्ट साठी काही छान छान पर्याय दिलेले आहेत जे तुम्ही तुमच्या आईला देऊन नक्कीच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकाल. तुम्ही स्वतः काही गोष्टी तिच्या साठी तयार करू शकता किंवा बाहेरून विकत आणलेल्या आणि तुम्ही तयार केलेल्या गोष्टी तिला एकत्र देऊ शकता ज्यामुळे तुमच्यासाठी ती किती स्पेशल आहे हे कळेल

. ‘सर्वोत्तम आईअसा संदेश असलेल्या भेटवस्तू

तुमची आई सर्वोत्तम आहे ह्या तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही तिला वर्ड्स बेस्ट मॉम असे लिहिलेला, कप, उशी किंवा किचन मॅग्नेट देऊ शकता. तुमच्या आईच्या गरजेप्रमाणे तुम्ही ह्याव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींचा विचार करू शकता. तुमच्या आईला दररोज लागणाऱ्या गोष्टींचा तुम्ही ह्यासाठी विचार करू शकता जेणेकरून तुम्ही दिलेले हे विशेष गिफ्ट तिच्या कायम लक्षात राहील.

. तुमचा आणि आईचा फोटो

तुमच्या आईचा किंवा तुमचा किंवा तुमच्या दोघींच्या फोटोची फ्रेम आईला गिफ्ट म्हणून द्या. विशेष संदेश लिहून तुम्ही तुमच्या अख्ख्या कुटुंबाचा फोटो देखील आईला गिफ्ट करू शकता. हे एक साधं गिफ्ट आहे पण अनेक वर्षे ते तिच्या लक्षात राहील.

. नेकलेस

आईला दररोज घालता येईल अशी माळ/नेकलेस तुम्ही तिला देऊ शकता. तुम्ही त्यासोबत बांगड्या आणि कानातले सुद्धा देऊ शकता. तुमच्या आईला जे घालायला आवडते त्याचा सेट तिला दिल्यास ते खूप आवडेल.

. डायरी

आईला तिच्या दिनचर्येचे किंवा आहाराचे नियोजन करण्यासाठी तुम्ही तिला डायरी किंवा प्लॅनर देऊ शकता. हे असे गिफ्ट आहे की तुमची आई ते दररोज वापरू शकेल आणि त्यामुळे तिला दररोजच्या गोष्टी त्यामध्ये लिहून त्या दिवसाचे नियोजन करता येईल. किंवा नुसत्या तुमच्यासोबतच्या आठवणी लिहून काढण्यासाठी सुद्धा तिला त्याचा उपयोग करता येईल. ह्या चांगल्या सवयीमुळे ती अनेक वर्षांनी पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकेल.

. छोटी पर्स

आईच्या मोठ्या पर्स मध्ये ठेवण्यासाठी एक छोटे क्लच तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता. ज्यामध्ये ती सुटे पैसे, लिपस्टिक वगैरे ठेऊ शकते. अशाप्रकारे तिच्या वस्तू नीट राहतील आणि घाईच्यावेळी तिला तिच्या बॅगमधून काढता येतील

. पुस्तक

तिला एखादं पुस्तक वाचावेसे वाटते आहे का? किंवा खरेदी करायचे आहे का? ह्याविषयी तुमच्याशी ती काही बोलली असेल तर तुमच्या वाचनप्रिय आईला एखादं पुस्तक दिल्यास खूप आनंद होऊ शकतो तसेच त्यामुळे पुस्तक वाचण्याच्या निमित्ताने आरामात वाचत बसता येईल. तुमच्या आईला खूप काळापासून वाचण्याची ईच्छा असेल किंवा तिला वाचताना मजा येईल असे पुस्तक निवडा.

. रोप

तुमच्या आईला बागकामाची आवड असेल तर तिला तिच्या बागेत नेहेमीच हवेसे वाटणारे एखादे रोपटे तुम्ही तिला भेट देऊ शकता. तसेच बागकामाची लागणारी साधने किंवा टूल बॅग सुद्धा दिल्यास तिच्यासाठी ते परफेक्ट गिफ्ट असेल.

. आईस्क्रीम पार्टी

बऱ्याच आयांना आईस्क्रीम आवडते. तुम्ही आईसाठी आईस्क्रीम पॅक आणू शकता आणि ती आईस्क्रीमचा आनंद तुमच्यासोबत आणि कुटुंबासोबत घेऊ शकते. मदर्स डे ला सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन तो साजरा करा. तुम्ही तिला आईस्क्रीम पार्टीसाठी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकता.

. हँगिंग गार्डन किट

बागकामाची आवड असणाऱ्या आईसाठी हे आणखी एक गिफ्ट आहे, ज्यामुळे तिला मिनी किंवा इनडोअर हँगिंग गार्डनचा आनंद घेता येईल. ह्या किट मध्ये शोभेचे रॉक्स आणि छोटे फॅन्सी इनडोअर हँगिंग्स असू शकतात.

१०. फ्लॉवर पॉट्स आणि सुगंधी मेणबत्त्या

तुमच्या आईला तुम्ही नेहमी घर सजवताना बघता का? किंवा तिला वेगवेगळ्या सुगंधी मेणबत्त्या आणि फुलदाण्या गोळा करण्याचा छंद आहे का? मग तिच्यासाठी ही निवड योग्य आहे आणि तुमच्या आईला ही भेट नक्कीच आवडेल.

११. वाचताना डोक्याला आधारासाठी उशी

पलंगावर लोळून पुस्तक वाचण्याइतकं सुख नाही. ही उशी वाचकांसाठी स्पेशल बनवली गेली आहे आणि त्या उशीमुळे आरामदायक स्थितीत वाचता येऊ शकते.

१२. कोस्टर्स

आवडत्या टेबल टॉप वर पाहुण्यांकडून डाग पडू नयेत म्हणून तुम्ही तिला टेबल कोस्टर्स देऊ शकता. त्यावर आवडते संदेश किंवा तिला आवडणारी चित्रे तुम्ही लावू शकता.

१३. फॅमिली ट्री

मुलांकडून आईला फॅमिली ट्री, म्हणजेच त्यावर कुटुंबातील सदस्यांची नावे आणि फोटो लावून दिल्यास तिला नक्कीच आनंदाश्रू दाटून येतील. तुम्ही त्यावर काही संदेश सुद्धा लिहू शकता.

१४. बोन्साय झाड

एखादं बोन्साय आईला दिल्यास तिला नक्कीच ते घरात किंवा गच्चीतल्या बागेत ठेवायला आवडेल. त्यांची देखभाल कमी करावी लागते आणि छोट्याश्या कुंडीत ही बोन्साय खूप गोड़ दिसतात. तुमच्या आईला ती भेट द्या ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नक्कीच हासू येईल.

१५. पाककृतींचे पुस्तक

तुमच्या आईला नवीन नवीन पदार्थ करून पहायला आवडतात का? मग तिला पाककृतींचे पुस्तक भेट द्या. तिला नक्कीच वेगळे पदार्थ करून बघायला आवडतील.

१६. भिंतीवरील बाग

अंगणाच्या भिंतीवर निसर्ग सौंदर्य सगळ्या आयांना आवडते. ती बाहेर बसून त्यांच्याकडे पहात मस्त कॉफीचा आस्वाद घेऊ शकते.

१७. फुले

आईला फुलांची आवड असेल तर सोनचाफा, मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाच्या फुलांचा गुच्छ दिल्यास तिला नक्की आवडेल. आणि तुमचं नातं त्या फुलांसारखंच बहरेल आणि सुगंधित होईल.

१८. साडी

वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगांच्या आणि भरपूर विविधता असलेल्या साड्या हल्ली बाजारात पाहायला मिळतात. तुमच्या आईच्या आवडीनुसार आणि तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी साडी तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता.

१९. स्वयंपाक घरात लागणाऱ्या गोष्टी

आईला तिचे स्वयंपाकघर सर्वात प्रिय असते म्हणून तुम्ही तिच्यासाठी चहा सेट, स्वयंपाक घरात लागणारा नॅपकिन्स संच, भांडी, पॅन्स ह्या पैकी तिला लागणाऱ्या काही गोष्टी भेट म्हणून देऊ शकता.

२० स्मार्टफोन

आई जर स्वतंत्र राहत असेल तर सतत संपर्कात राहण्यासाठी तिला स्मार्ट फोन दिल्यास उपयुक्त ठरेल, कारण कोणत्याही वेळी ती तिच्या कुटुंबातील व्यक्तींशी किंवा मैत्रिणींशी संपर्कात राहू शकते.

मातृदिनाच्या भेटवस्तूंच्या ह्या कल्पना फक्त अशा सूचना आहेत ज्या वापरून तुम्ही स्वतःची आवृत्ती तयार करण्यासाठी वापरू शकता. एक खास आणि तिला अनुकूल अशी भेट आणा जी तिला निःसंशय आवडेल. तिला वापरण्यासारख्या छोट्या गोष्टी दिल्याने अनुभवात आणखी भर पडेल आणि आयुष्यभर तिच्या आठवणींमध्ये ते राहील

तुमच्या सासूबाईंना मदर्स डे ची भेट देण्यासाठी १५ पर्याय

तुमच्या सासूबाईंच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारी आणि तुम्हाला त्यांची काळजी असल्याचे दर्शवणारी भेट मिळवणे अवघड आहे. परंतु त्यांच्यासाठी काही भेटवस्तू आम्ही सुचवल्या आहेत आणि त्या भेट्वस्तूच तुमच्या ह्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवतील! तुमच्या सासूबाईंनी तुमच्या आजीवन जोडीदाराची देखभाल केली आणि आज ते जे काही आहेत ते फक्त तुमच्या सासूबाईंमुळे. त्या जर सुगरण असतील किंवा त्यांना स्पा मध्ये जाऊन स्वतःचे लाड पुरवून घ्यायला आवडत असतील तर इथे आम्ही त्यांचासाठीच्या भेटवस्तूंची यादी देत आहोत ज्यामुळे नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटेल!

. स्पा गिफ्ट बास्केट

आजकाल सगळ्याच स्त्रियांना वेगवेगळ्या ताणातून जावे लागते. आपल्या सासूबाईंना अशी एक भेट द्या ज्यामुळे त्यांचा हा मातृदिन आरामात जाईल त्यासाठी त्या तुमच्या खूप आभारी असतील! त्या दिवशी त्यांना संपूर्ण आराम मिळावा म्हणून तुम्ही त्यांना स्पा गिफ्ट बास्केट विलासी वस्तू आणि अंघोळीचे साहित्य (बाथ गुड्स) भेट देऊ शकता. जर त्यांना मालिश करून घेणे किंवा मॅनिक्युअर, पेडिक्युअर आवडत असेल तर तुम्ही त्यांना जवळच्या स्पाचे भेट प्रमाणपत्र देखील देऊ शकता. खूप मऊ बाथ रोब किंवा स्लीपर्स देण्यास विसरू नका!

. कटिंग बोर्ड

संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक घर हे सुंदर आठवणी आणि सोई निर्माण करण्यासाठी एक जागा असते. हे लक्षात ठेवून, तुमच्या सासूबाईंना त्यांना हवा तसा कटिंग बोर्ड दिल्यास ती भेट खरोखर एक समाधानकारक भेट असेल. ह्या अतिशय विचार करून आणि रोज वापरता येण्याजोग्या भेटीमुळे त्यांना आनंद होईल.

. बेडशीट्स

आपण सर्वजण शांत आणि समाधानकारक झोपेसाठी पात्र आहोत, यामुळेच भेट देण्यासाठी आरामदायक बेडशीट्स हा एक परिपूर्ण पर्याय बनतो. रंग, डिझाइन आणि कापडाच्या बाबतीत बाबतीत तुमच्या सासूबाईंच्या आवडीनिवडी लक्षात घ्या. आणि जेव्हा काळजीपूर्वक निवड केली जाते तेव्हा ही भेट सुंदर होते!

. बांगड्या

तुमच्या सासूबाईंसाठी एखादी छोटीशी भेट शोधत असाल तर त्यांच्यासाठी बांगड्या किंवा एखादे ब्रेसलेट देण्याचा पर्याय निवडल्यास त्यामध्ये चूक होऊ शकत नाही! त्यांना आवडेल असे खास डिझाइन शोधा. कोरीव काम केलेले किंवा त्यांचे बर्थस्टोन असलेले ब्रेसलेट तुम्ही त्यांच्यासाठी तयार करून घेऊ शकता.

. वैयक्तिकृत मग

जर तुमच्या सासूबाईंना चहाकिंवा कॉफी आवडत असेल तर त्यांना चहा किंवा कॉफीसाठी मग दररोज लागेल म्हणून मदर्स डे साठी त्यांना ही भेट देणे ही चांगली कल्पना आहे, होय ना ? त्यांचे नाव असलेला किंवा त्यांना प्रेरणादायक एखादे वाक्य असलेला मग तुम्ही देऊ शकता.

. दिवे

दिवे म्हणजे भेट देण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. व्यवहारिकरीत्या आणि काळजीपूर्वक निवडल्यास हे दिवे कोणत्याही खोलीचे स्वरूप बदलू किंवा सुधारू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या सासूबाईंना दिवा द्याल तेव्हा लगेच त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरेल. हे लालित्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

. भरतकाम केलेली पर्स

आमच्या आवडत्या भेटवस्तू कल्पनांपैकी एक सुंदर नक्षीदार पर्स आहे. तुमच्या सासूबाईंना पार्टी, ब्रंच आणि कौटुंबिक मेळाव्यासाठी हि पर्स नेण्यास आवडेल ह्या पर्स मध्ये त्यांना फोन आणि काही रोख रक्कम ठेवता येईल.

. ज्वेलरी बॉक्स

सासूबाईंचे सगळे आवडते दागिने ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या सासूबाईंना स्टाईलिश ज्वेलरी बॉक्स देऊ शकता. सुंदरसा दागिन्यांचा बॉक्स निवडा ज्यामुळे त्यांच्या बेड साईड टेबलला शोभा येईल.

. इसेन्शिअल ऑइल डिफ्युजर

जेव्हा स्पाला जाणे सुखदायक असते, तेव्हा ही भेट त्यांना दिल्यास घरच्या घरी स्पा चा आनंद त्या केव्हाही घेऊ शकतात. त्यांचे आवडते इसेन्शिअल ऑइल निवडा आणि पहा ही भेट त्यांच्या चेहऱ्यावर किती हसू आणि ताजेपणा आणते!

१०. डिझायनर स्कार्फ

सासूबाईंवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सहसा त्या स्वतःहून विकत घेऊ न शकणारी एखादी वस्तू भेट देऊन त्यांचे कौतुक करण्याची ही एक चांगली संधी आहे. स्कार्फ एक उत्तम ऍक्सेसरी आहे ज्याचा योग्य तो नमुना, रंग आणि पोत निवडल्यास कोणत्याही पोशाखास तो उजळ बनवू शकतो आणि त्यांनी आपल्यासाठी जे काही केले त्याबद्दल तुमच्या सासूबाईंचे आभार मानण्यासाठी ही एक परिपूर्ण भेट आहे.

११. डिनर सेट

प्रत्येक आईला तिच्या स्वतःच्या डिनर सेटचा अभिमान असतो आणि तो सहसा केवळ खास प्रसंगी, कौटुंबिक मेळाव्यासाठी किंवा पार्टीसाठी वापरला जातो. तर तुम्ही सासूबाईंना जर आकर्षक आणि सुंदर डिनर सेट गिफ्ट दिल्यास सासूबाई सगळ्या पाहुण्यांना तो अभिमानाने दाखवतील.

१२. परफ्यूम

या मातृदिनानिमित्त सासूबाईंना काय भेट द्यावी याबद्दल आपण अद्याप विचार करीत असाल तर नवीन परफ्यूम ही आदर्श भेटवस्तू आहे. कदाचित तुमच्या सासूबाईना त्यांचे सध्याचे परफ्युम आवडत असेल किंवा त्या बदल शोधत असतील तर निवडण्यासाठी अनेक सुगंध पर्याय आहेत!

१३. योग चटई

तुमच्या सासूकडे आधीच योग चटई आहे, त्यांच्याकडे चांगल्या प्रतीची योग मॅट आहे का? की परवडणारी आणि जवळच्या दुकानातून एखादी साधीशी मॅट त्या सध्या वापरत आहेत का? आरामदायक अनुभवासाठी उच्च घनता उशीचा प्रभाव प्रदान करणारी आपली उत्कृष्ट योग चटई त्यांच्यासाठी आणा आणि योगाच्या नेक्स्ट लेव्हलला जाण्यासाठी त्यांना त्याची मदत होईल.

१४. कुकी कटर

जर तुमच्या सासूबाईंना बेकिंगची आवड असेल तर त्यांच्यासाठी ही एक चांगली भेट आहे. आकाराच्या विस्तृत श्रेणीमधून योग्य निवड करा.

१५. एखादी छानशी वही

तुमच्या सासूबाईंना लिखाणाची आवड आहे का? एखादा जवळच असलेला कागदाचा तुकडा घेऊन त्या त्यावर लिहिताना तुम्ही पाहिले आहे का? मग तुम्ही त्यांची किती काळजी घेत आहात हे त्यांना दर्शविण्यासाठी एक वही ही एक परिपूर्ण भेट असेल. व्यावहारिक परंतु अत्यंत विचारशील भेट त्यांना नेहमीच लक्षात राहील.

मातृदिनाच्या भेटवस्तूंच्या ह्या कल्पना फक्त अशा सूचना आहेत ज्या तुम्ही स्वतःची आवृत्ती तयार करण्यासाठी वापरू शकता. एक खास आणि तिला अनुकूल अशी भेट आणा जी तुमच्या आईला किंवा सासूबाईंना निःसंशय आवडेल. त्यांना वापरण्यासारख्या छोट्या गोष्टी दिल्याने तुमच्या अनुभवात आणखी भर पडेल आणि आयुष्यभर त्यांना आठवणींमध्ये ते राहील.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article