Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाच्या झोपेविषयी बाळांसाठी झोपेची दिनचर्या

बाळांसाठी झोपेची दिनचर्या

बाळांसाठी झोपेची दिनचर्या

पालकत्व हा एक नवीन अनुभव असतो. येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमच्या बाळाचा नवीन विकास होत असतो. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळाच्या सर्वांगीण वाढीबद्दल आणखी प्रश्न निर्माण होतात.

व्हिडिओ: तुमच्या बाळासाठी एक चांगला झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करणे

जर तुमचे बाळ तीन महिन्यांचे असेल तर तुम्ही त्याच्या झोपेच्या वेळा ठरवू शकता त्यामुळे त्याला ठराविक वेळेला झोपेची सवय लागेल. झोपेची दिनचर्या ठरलेली असली की बाळाची चांगली झोप आणि विकास होतो. झोपेचे रुटीन असले की पालकांचा बाळांशी बंध निर्माण होण्यास मदत होते. तुमच्या बाळाची शांत झोपेची दिनचर्या कशी ठरवावी ह्या विषयी मार्गदर्शन ह्या लेखामध्ये केलेले आहे.

तुमच्या बाळाची झोपेची दिनचर्या कधी सुरु करावी?

झोपेची दिनचर्या सुरु करण्याची घाई नसावी. नवजात बाळ दिवसातील बराच वेळ झोपलेलेच असते आणि झोपण्यासाठी, नित्यक्रमाची आवश्यकता नसते. जेव्हा तुमचे बाळ तीन महिन्यांचे होते, तेव्हा ते झोपेच्या दिनचर्येसाठी तयार असते. एक साधी आणि सातत्यपूर्ण दिनचर्या सुरू करून, तुम्ही तुमच्या बाळाला निरोगी झोपेची सवय लावण्यास मदत करू शकाल. संध्याकाळी ६.३० ते रात्री ८.३० दरम्यान तुम्ही बाळाला झोपेची सवय लावू शकता. छोट्या दिनक्रमाने सुरुवात करा आणि नंतर वेळ वाढवा.

झोपेची वेळ ठरवण्याचे बाळासाठी फायदे

आपल्या दैनंदिन जीवनात गोष्टी नियोजनाप्रमाणे केल्यास आपण सर्वजण आरामात आणि आनंदी असतो. तुमच्या बाळासाठीही हेच खरे आहे! झोपण्याच्या वेळेची एक निश्चित दिनचर्या असली कि बाळाचा योग्य वेळेला योग्य मूड असतो. त्यामुळे बाळाला शांत वाटते आणि चांगली झोप लागते. प्रवास करताना झोपेची दिनचर्या निश्चित असली की बाळाला नवीन परिस्थतीशी जुळवून घेण्यास मदत होते. पालकांसाठी देखील ते फायदेशीर असते. त्यामुळे पालकांना लहान बाळासोबत वेळ घालवण्यास मदत होते.

झोपण्याच्या वेळेचा नित्यक्रम तयार करणे

जर तुम्ही तुमच्या बाळासाठी झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करणार असाल, तर त्यासाठी संध्याकाळी लवकर सुरुवात करणे आवश्यक आहे. लहान बाळांना अंघोळ घालून त्यांचे डायपर बदला त्यामुळे बाळ स्वच्छ होईल. एकदा हे सर्व झाल्यावर तुम्ही बाळाला रॉकिंग चेअर मध्ये घेऊन गाणे म्हणू शकता किंवा त्याला गोष्ट सांगू शकता. आता तुमचे बाळ झोपी जाण्यासाठी तयार आहे. बाळाच्या झोपेचा नित्यक्रम ज्या खोलीमध्ये बाळ झोपते तिथेच सुरु करा. अन्य दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी नाही. तुमच्या तुमच्या बाळासाठी झोपेची जागा किंवा खोली ठरवणे गरजेचे आहे.

झोपण्याच्या वेळेचा नित्यक्रम तयार करणे

झोपेच्या योग्य दिनचर्येसाठी उपाय

तुमच्या बाळासाठी चांगल्या आणि निरोगी दिनचर्येसाठी खालील टिप्स उपयुक्त ठरू शकतात.

  • लवकर आवरणे: नियोजित झोपेच्या सुमारे ३० मिनिटे आधी, तुम्ही तुमची नेहमीची घरगुती कामे आटोपून थोड्या हलक्या कामांकडे वळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या बाळाला आता झोपेची वेळ झालेली आहे असा सिग्नल मिळेल.
  • झोपण्याच्या नित्यक्रमासाठी एक वेळ सेट करा: बाळाच्या झोपेची वेळ निश्चित करून बाळ बिछान्यावर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाळाचे वय आणि स्वभाव ह्यांची मदत होईल. उदा: नवजात बाळांना बिछान्यावर घेण्यासाठी फक्त ५ मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे. परंतु छोट्या मुलांना त्यासाठी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे झोपेची दिनचर्या ठरवण्यासाठी लहान मुलांना नवजात बाळांपेक्षा जास्त वेळ लागतो.
  • नियमित वेळ पाळा: तुम्ही तुमच्या बाळाला प्रत्येक दिवशी एकाच ठराविक वेळेला झोपवल्यास त्याची दिनचर्या ठरवण्यासाठी खूप मदत होऊ शकते. दिनचर्या ठरवल्यामुळे तुमच्या बाळाला आता आणि पुढेसुद्धा वेळेवर झोपण्याची सवय लागेल.
  • झोपायच्या आधी आंघोळ घाला: झोपेच्या आधी बाळाला गरम पाण्याने अंघोळ घालणे हा बाळांना शांत करण्याचा उत्तम मार्ग आहे. बाळाला झोपवण्याच्या आधी बाळ शांत, स्वच्छ असल्याची खात्री करा.

परंतु जर अंघोळ घातल्यानंतर तुमचे बाळ अधिक उत्साही झाले किंवा ते खेळू लागले तर बाळाला झोपवण्यापूर्वी अंघोळ घालणे टाळा. काही वेळेला असे झालेले दिसून येते.

  • झोपण्याच्या नित्यक्रमासाठी तयार होणे: बाळाला झोपवण्यापूर्वी काही गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये बाळाचा चेहरा धुवून स्वच्छ पुसणे, बाळाला रात्रीचे कपडे घालणे ह्यांचा समावेश होते. तुमच्या बाळासाठी ह्या गोष्टी करण्यास लवकरात लवकर सुरुवात करा जेणेकरून ह्या चांगल्या सवयी त्यांच्या झोपेच्या दिनक्रमाचा एक भाग बनतील.
  • तुमच्या बाळाला योग्य कपडे घाला: झोपताना बाळाला खूप कपडे घातल्यास बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. बाळांना रात्री घाम येऊ शकतो. तुमच्या लहान बाळाला आरामदायक नाईटवेअर घाला.
  • झोपताना बाळाला गोष्टी सांगा: झोपेच्या वेळेला तुमच्या बाळाला कथा वाचून दाखवाव्यात. ही वेळ त्याच्यासाठी उत्तम वेळ आहे. ह्यामुळे तुमच्या बाळाला दीर्घकाळ वाचनाची सवय लागण्यास सुद्धा मदत होईल.
  • बाळाला आवडीच्या वस्तू द्या: बाळांना त्यांच्या बाजूला काहीतरी घेऊन झोपायला आवडते. हे त्यांचे आवडते खेळणे, एक उशी किंवा दुसरे काहीतरी असू शकते. तुमच्या बाळाला झोपेच्या वेळी आरामदायी आणि शांत वाटण्यासाठी अश्या वस्तूंचा उपयोग होऊ शकतो.
  • शेवट सुसंगत ठेवा: झोपण्याच्या नित्यक्रमाला एक निश्चित शेवट असू द्या. उदाहरणार्थ, एखादी कथा वाचा, गाणे गा किंवा रात्रीचा दिवा लावा आणि नंतर खोलीच्या बाहेर जा. जर तुम्ही दररोज रात्री दिनचर्येचा एक निश्चित शेवट पाळला तर तुमचे मूल तुमच्या शेवटच्या कृतीनंतर झोपायला तयार होईल. तुमच्या शेवटच्या कृतीनंतर, आता शांत होण्याची आणि झोपण्याची वेळ आलेली आहे हे तुमच्या मुलाला समजेल.

बाळाच्या झोपेच्या दिनचर्येमध्ये काही कमतरता आहे का?

इतर कोणत्याही दिनचर्याप्रमाणे, तुमच्या बाळाची झोपेची दिनचर्या देखील लवचिक असणे आवश्यक आहे. जसजसे तुमचे बाळ मोठे होईल,तसे त्याची मनःस्थिती बदलेल आणि बाळ नेहमीच्या झोपण्याच्या वेळेला विरोध करेल. झोपायच्या आधी बाळाला काही वेळेला कपडे बदलायचे नसतील आणि जर मूल मोठे असेल तर दात घासण्यास नकार देऊ शकते. हे अपरिहार्य आहे आणि सर्व पालकांनी ते स्वीकारले पाहिजे. तुमच्या वाढत्या मुलाच्या गरजेनुसार झोपण्याच्या नित्यक्रमात आवश्यक बदल करण्यासाठी तुम्ही तयार असले पाहिजे. तुमचे मूल काय म्हणते ते ऐका आणि आवश्यक असल्यास नित्यक्रमात एखादा बदल करण्यास तयार रहा. हा बदल छोटा आणि सोपा असू शकतो. उदा: झोपेच्या वेळी करण्यासारखा क्रियाकलाप आपण कमी करू शकता. परिस्थितीनुसार तुमचा निर्णय घ्या. कठोर दिनचर्या पाळण्यासाठी तुमच्या मुलाला अस्वस्थ करू नका.

झोपेची दिनचर्या ठरलेली असेल तर आई आणि बाळ दोघांनाही ताण येत नाही. झोपेची दिनचर्या असल्यास पुढे सुद्धा बाळाला वेळेवर झोपण्याची चांगली सवय लागते. तुमच्या बाळासाठी योग्य अशी झोपेची दिनचर्या ठरवा.

आणखी वाचा:

बाळाला रात्री कसे झोपवावे?
तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते? (नवजात बाळ पासून १२ महिन्यांच्या बाळापर्यंत)

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article