Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात रडणे आणि त्याचे बाळावर होणारे परिणाम

गरोदरपणात रडणे आणि त्याचे बाळावर होणारे परिणाम

गरोदरपणात रडणे आणि त्याचे बाळावर होणारे परिणाम

तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुमचे आरोग्य आणि क्रियाकलाप पातळी इत्यादींचा तुमच्या उदरातील बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम होत असतो. गरोदर स्त्रीने नेहमी आनंदी कसे राहावे आणि नैराश्याला कसे बळी पडू नये याबद्दल तुम्हाला सल्ला मिळाला असेल – आणि हा सल्ला मिळण्यामागे काही कारण असू शकते. असोसिएशन फॉर सायकॉलॉजिकल सायन्सने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की आईच्या भावनांचा परिणाम सहा महिने किंवा त्याहून अधिक वयाच्या गर्भावरही होऊ शकतो. तुमच्या गरोदरपणात तुम्हाला कसे वाटते ते तुमचे बाळ मोठे झाल्यावर त्याची वृत्ती आणि जीवनाबद्दलचे दृष्टिकोन ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

बाळावर किती प्रभाव पडतो याबद्दल कोणतेही निश्चित निष्कर्ष नाहीत, परंतु आपण गरोदर असताना खूप रडू नये. गरोदर स्त्रिया इतरांपेक्षा विशिष्ट वेळी जास्त रडतात असेही आढळून आले आहे. गरोदरपणाच्या पहिल्या आणि तिसर्‍या तिमाहीत अनेक स्त्रिया रडताना दिसतात.

व्हिडिओ

गरोदर असताना रडण्याची कारणे

गरोदर असताना रडण्याची कारणे

जर तुम्हाला अचानक खूप रडू येत असेल तर काळजी करू नका त्यामध्ये तुमची काही चूक नाही. बर्‍याच गर्भवती स्त्रिया अशाच अनुभवातून जातात आणि तुम्ही एकट्या नसता. स्त्रिया गरोदर असताना रडण्याची अधिक शक्यता असते आणि त्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये शारीरिक तसेच भावनिक कारणांचा समावेश होतो. येथे त्यापैकी काही कारणे दिलेली आहेत:

1. संप्रेरकांमधील चढउतार

शरीरात तीन हार्मोन्स – इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि मानवी कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (एचसीजी) तयार होतात. या संप्रेरकांच्या पातळीतील बदल मेंदूमध्ये विविध सिग्नल तयार करू शकतात. आणि त्याचा परिणाम गर्भवती स्त्रीच्या मूडवर होऊ शकतो. गरोदरपणातील संप्रेरके मुख्यतः गरोदरपणाच्या वाढण्यास आणि गरोदर स्त्री कोणत्याही कारणाशिवाय रडण्यास जबाबदार असतात. विशेषतः गर्भधारणेच्या शेवटच्या दोन महिन्यांत प्रोजेस्टेरॉनची पातळी जास्त असते, त्यामुळे गरोदर  स्त्री खूप असुरक्षित होते.

2. ताण

तुम्ही तुमच्या गरोदरपणाचे नियोजन कसे केले आहे  ह्याने काही फरक पडत नाही -कितीही नियोजन केले तरी ताण येतोच. तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, तुमच्या पोटातील बाळाच्या आरोग्याची काळजी, डॉक्टरांच्या भेटी आणि चाचण्या, नोकरीशी संबंधित चढ-उतार, कौटुंबिक नातेसंबंध, मोठी मुले इत्यादी सर्व घटक गरोदरपणात तणाव निर्माण करू शकतात.

3. स्ट्रेच मार्क्स

या काळात जवळजवळ प्रत्येक गर्भवती स्त्रीला कमीत कमी काही स्ट्रेच मार्क्स असतील. ते सहसा कालांतराने नाहीसे होतात, परंतु स्ट्रेच मार्क्स पहिल्यांदाच बघितल्याने गर्भवती स्त्रीला रडू येऊ शकते कारण तिचे शरीर बदलत असते.

4. अस्वस्थ असणे

शारीरिक अस्वस्थता हा प्रत्येक गर्भधारणेचा भाग असतो. तुमच्या गर्भधारणेपूर्वी तुम्ही तंदुरुस्त असलात तरी सुद्धा काही वेदना होतातच. दर काही मिनिटांनी कूस बदलल्याशिवाय तुम्ही शांतपणे झोपू शकत नाही, जास्त वजन आणि प्रचंड पोट घेऊन फिरणे हे वेळोवेळी रडू  येण्यासाठी पुरेसे आहे.

5. न बसणारे कपडे

गरोदरपणात कपड्यांची खरेदी करणे काही वेळा दुःखदायक ठरू शकते कारण तुम्हाला तुमचे नेहमीचे कपडे बसणार नाहीत, आणि मॅटर्निटी क्लोथ्स खूप मोठे होतील. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी आकर्षक काहीतरी घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला रडू येऊ शकते.

6. भावनिक चित्रपट/शो पाहणे

मनाला चटका लावणारा चित्रपट किंवा टेलिव्हिजन शो पाहिल्याने क्षणार्धातरडू येऊ शकते. तसेच, लहान मुलांची चित्रे, पालक-मुलातील नातेसंबंध, आणि अगदी संकटात सापडलेले लहान प्राणी देखील तुम्हाला कळण्याआधीच तुम्हाला रडू आणण्यास कारणीभूत ठरू शकतात.

7. तुमच्या गरोदरपणाविषयी कॉमेंट्स

तुमच्या गरोदरपणाचे शरीर आणि वजन यावर लोकांच्या टिप्पण्या त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे तुम्हाला रडू येऊ शकते. मूल होण्याने तुमचे जीवन बदलणार आहे असे लोक सतत तुम्हाला सांगतील, तुमचे आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते देखील तणावपूर्ण असू शकते.

8. गरोदरपणाचे टप्पे

तुमच्या गरोदरपणातील काही क्षण अनमोल राहतील – जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकता तेव्हा , तुम्ही तुमच्या लहान मुलाला पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड इमेजमध्ये पाहता तेव्हा, पहिल्यांदा तुमच्या बाळाला तुमच्या गर्भाशयात लाथ मारताना अनुभवता तेव्हा तुम्हाला आनंदाश्रू येऊ शकतात.

9. तुमची प्रसूतीची तारीख ओलांडणे

प्रसूतीची तारीख उलटून गेल्याने गर्भवती स्त्री निराश आणि अधीर होऊ शकते.  तुम्ही ज्या शारीरिक अस्वस्थतेचा सामना करत आहात त्यामुळे तुम्ही कंटाळला आहात आणि जर शेवट अद्याप दृष्टीस पडत नसेल तर ते थोडे जास्त असल्याचे सि तुम्हाला रडू येऊ शकते.

10. प्रसूतीकळा सुरु असणे

तुम्ही गर्भधारणेच्या किती वर्गांना उपस्थित राहिलात किंवा तुम्ही गरोदरपणाच्या मॅन्युअल किती काटेकोरपणे वाचले आहे हे महत्त्वाचे नाही, प्रसूती वेदनादायक असू शकते. तुमची योनिमार्गातून प्रसूती होत असेल किंवा सी-सेक्शन असेल, वेदना होतातच!

गरोदरपणात रडण्याचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होऊ शकतो?

दुस-या तिमाहीत रडण्याचे परिणाम – तुमच्या गरोदरपणात रडल्यामुळे तुमच्या लहान बाळावर परिणाम होईल. तुम्ही कोणत्या प्रकारची आई आहात यावर ते अवलंबून आहे. गरोदरपणात रडणे बाळासाठी किती वाईट आहे हे स्पष्ट करणार्‍या काही श्रेणी येथे आहेत:

1. जर तुम्ही तणावग्रस्त आई असाल

गरोदरपणात काही तणावाचे दिवस येऊ शकतात. अधूनमधून येणारा ताण तुमच्या बाळाला काहीही इजा करणार नाही. परंतु, जर तुम्हाला दीर्घकाळ चिंता आणि तणाव असेल तर, तुमचे शरीर कॉर्टिसॉल, एक तणाव संप्रेरक तयार करू शकते. हे संप्रेरक प्लेसेंटाद्वारे तुमच्या बाळापर्यंत जाऊ शकते. जर पोटात असताना तुमचे बाळ सतत ह्या संप्रेरकाच्या सानिध्यात येत असेल तर त्याला पोटशूळ किंवा चिंताग्रस्तता ह्याचा त्रास होण्याची शक्यता असते

2. जर तुम्ही निराश आई असाल

गरोदरपणात अनेक महिलांना नैराश्य येते. खरं तर, असा अंदाज आहे की सर्व गर्भवती महिलांपैकी सुमारे दहा टक्के स्त्रिया उदासीन आहेत. हे तुमच्या मुलासाठी चांगले नाही कारण त्याचा तिच्यावर पुढील आयुष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो. वैद्यकीयदृष्ट्या नैराश्याने ग्रस्त असलेल्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना भावनिक अडथळ्यांसोबतच प्रौढ म्हणून स्वतःला नैराश्याचा सामना करावा लागतो.

3. तुम्ही गरदोरपणामुळे नाराज असलेल्या आई आहात का?

गरोदर राहिल्यावर तुम्ही आनंदी नसाल आणि तुम्हाला होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबद्दल तुम्ही बाळाला रागवत असाल, तर बहुधा परिस्थिती आणखी बिघडेल. असे दिसून आले आहे की ज्या गरोदर स्त्रियांना त्यांच्या पोटातील बाळाबद्दल कोणतीही आसक्ती वाटत नाही त्यांना बालपणात भावनिक समस्या निर्माण होणारी मुले होण्याची शक्यता असते.

4. गरोदरपणात अधूनमधून ताण येत असल्यास

तुम्ही गरोदर असताना तुम्हाला अधूनमधून ताण किंवा नैराश्य येऊ शकते. त्या नऊ महिन्यांत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप काही होत असताना, तुम्ही आनंदी असावे अशी अपेक्षा करणे अवास्तव ठरेल. अधूनमधून येणारा ताण आणि नैराश्याचा तुमच्या बाळाच्या वाढीवर आणि विकासावर कोणताही परिणाम होणार नाही.

आपण काय करू शकता?

गरोदरपणात येणारा ताण हा अगदी नैसर्गिक आहे, परंतु ताण निर्माण करणाऱ्या घटकांना सामोरे जाऊन  पुढे जाणे महत्त्वाचे आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की मन जेव्हा सतत तणावात असते तेव्हा त्याकडे लक्ष दिले जात नाही तर त्यामुळे आपल्या शरीराच्या तणाव व्यवस्थापन प्रणालीमध्ये बदल होऊ शकतो. आणि त्यामुळे शरीराकडून प्रक्षोभक प्रतिक्रिया सुरू होऊ शकते – गरोदरपणात आरोग्य चांगले राहत नाही आणि बाळांमध्ये विकासात्मक समस्या निर्माण होतात असे म्हटले जाते. अशा प्रकारे, गर्भवती स्त्रीने आपल्या शरीराचे ऐकणे आणि आपल्या दैनंदिन जीवनात अडथळा आणणारे तणाव दूर करणे महत्वाचे आहे.

तुम्हाला कसे वाटते आहे ह्याबद्दल तुमच्या पतीशी, जवळच्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्याशी बोला. तुम्ही किती वेळा उदास मूडमध्ये आहात याचे मूल्यांकन करा. तुम्हाला उदासीनता आणि तणावाच्या प्रसंगांचा जास्त वेळा अनुभव येत असल्यास तुम्हाला मदत घ्यावी लागेल. एखाद्या योग्य डॉक्टरांचा  सल्ला घेतल्याने तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे तणावास सामोरे जाण्यास मदत होईल. गरोदर स्त्रियांना निराशा कमी होण्यासाठी औषधे लिहून दिली जाऊ शकतात आणि तुमचे डॉक्टर तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. तसेच, तुम्ही एखाद्या पात्र प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली छंद जोपासणे, ध्यानधारणा किंवा योगासने करणे यासारखे चांगले बदल जीवनशैलीमध्ये करू शकता. निरोगी आणि पौष्टिक अन्न खाणे आणि नकारात्मक विचार आणि भावनांपासून स्वतःचे लक्ष विचलित करणे ह्यामुळे देखील फायदा होतो.

खालील काही उपायांनी तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकता.

  1. नियमित अंतराने खा. जेवण टाळू नका कारण त्यामुळे  मूड बदलू शकतो. सारखी भूक लागून जास्त खाणे होते. तुमच्या जेवणाच्या किमान 2भागांमध्ये फळे, हिरव्या, पालेभाज्या आणि नट्सचा समावेश करा.
  2. नियमितपणे वेळेवर झोपायला जा: तुम्ही आणि बाळ दोघेही आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी शरीराला  विश्रांती देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरुन तुम्हाला कमी झोप झाली आहे असे वाटणार नाही.
  3. आपल्या गरजा प्रथम ठेवा. गरोदर पणाचा काळ कठीण आहे. काम आणि घर या दोन्ही ठिकाणी सतत मागणी असते, परंतु हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे  – स्वतःला मसाज करा (तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर), चित्रपट बघायला जा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या पार्लर मध्ये जा. आपल्या आवडीच्या गोष्टी केल्याने तणाव लक्षणीयरीत्या कमी होईल.
  4. थोडा व्यायाम करा. या प्रक्रियेत तुम्हाला थकून जाण्याची गरज नाही; फक्त तुमचे रक्ताभिसरण चांगले झाल्याने तुमचा मूड चांगला होईल. रोज एक वेळ ठरवून बाहेर फिरायला जा. तुम्ही काही योगाभ्यास देखील करू शकता – हे शांत वातावरण तुम्हाला गोंधळापासून दूर राहण्यास मदत करेल. दररोज 30मिनिटे व्यायाम करणे तुम्हाला तणावातून बाहेर काढण्यासाठी पुरेसे आहे – दररोज व्यायाम करा!
  5. तंत्रज्ञानापासून दूर राहा. हे कठीण असू शकते, परंतु दिवसातून किमान एक तृतीयांश वेळ तुमचा फोन दूर ठेवल्याने तुम्हाला तुमचे मनोरंजन करण्याचे इतर मार्ग शोधण्यात मदत होईल – वाचन, लेखन, चित्रकला किंवा फक्त संगीत ऐकणे ह्यामुळे सोशल मीडियावर लोकांच्या आयुष्याविषयी सतत माहिती वाचून तुम्हाला येणारा सर्व ताण विसरण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या पोटातील बाळाच्या मानसिक आरोग्यासाठी आणि प्रौढत्वापर्यंतच्या विकासासाठी तुमचे भावनिक आरोग्य महत्त्वाचे आहे. म्हणून, तुमच्या आयुष्यातील या महत्त्वपूर्ण टप्प्यावर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून बाळासाठी गोष्टी तयार करण्यात स्वतःला  व्यस्त ठेवा. तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास अरोमाथेरपी मेणबत्त्या आणि ध्यान यांसारखे काही घरगुती उपाय करून पाहिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. हे उपाय जरी साधे असले तरी, कोणत्याही औषधाची गरज नसताना दररोज ताण आणि नैराश्याचा सामना करण्यासाठी हे काही अत्यंत प्रभावी उपाय आहेत.

आणखी वाचा:

गरोदरपणातील उचकी: कारणे आणि उपाय
गरोदरपणात छातीत जळजळ होणे: लक्षणे, कारणे आणि उपचार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article