Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी प्रसूती रजा आणि मातृत्व लाभ कायदा २०१७

प्रसूती रजा आणि मातृत्व लाभ कायदा २०१७

प्रसूती रजा आणि मातृत्व लाभ कायदा २०१७

In this Article

देशाच्या प्रसूती रजा कायद्यांमध्ये अलीकडे बरेच बदल झालेले आहेत. बाळाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी प्रसूती रजेच्या कायद्यांविषयी ह्या लेखात बरीच माहिती दिलेली आहे. गरोदरपणाच्या कालावधीत तुम्ही कुठल्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता याबद्दल तपशीलवार चर्चा इथे आपण करणार आहोत तसेच ह्या विषयावरील इतर सामान्य प्रश्न सुद्धा आपण बघणार आहोत.

प्रसूती रजा म्हणजे काय?

बाळंतपणाच्या सुरुवातीच्या काळात नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी गर्भवती स्त्रियांना प्रसूती रजा दिली जाते. ह्यामध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यांचा देखील समावेश होतो त्यास जन्मपूर्व रजा म्हणतात. गर्भारपण आणि प्रसूतीच्या काळात विश्रांतीसाठी आणि बाळाची काळजी घेण्यासाठी, कर्मचारी काम करत असलेल्या आस्थापनेकडून ही रजा पूर्ण भरपाईसाठी पात्र आहे.

प्रसूती रजा कायद्याचे पालन करण्यासाठी सर्व भारतीय कंपन्यांमधील प्रसूती रजा धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे (सुधारित २०१७)

प्रसूती रजेचा कालावधी काय आहे?

२०१७ मध्ये मातृत्व लाभ कायद्यात केलेल्या दुरुस्तीनुसार, आधीच्या १२ आठवड्यांच्या कालावधीच्या तुलनेत, प्रसूती रजेचा कालावधी आता २६ आठवडे आहे. जन्मपूर्व रजेसाठी कालावधी १२ आठवडे आहे.

दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांसाठी रजेचा कालावधी कमी आहे अशा केसेस मध्ये प्रसूती रजा १२ आठवड्यांसाठी आहे आणि जन्मपूर्व रजा ६ आठवडे आहे.

मातृत्व लाभ कायद्यासाठी पात्र होण्यासाठी, एखाद्या महिलेने गेल्या १२ महिन्यांत किमान ८० दिवस आस्थापनेवर नोकरी केली असावी.

गर्भपाताच्या दुर्दैवी परिस्थितीत, कर्मचाऱ्याला घटनेच्या तारखेपासून ६ आठवड्यांची रजा दिली जाते.

तुम्ही प्रसूती रजा कधी सुरू करू शकता?

गर्भवती स्त्री कर्मचारी प्रसूतीच्या तारखेच्या ८ आठवडे आधीपासून तिची प्रसूती रजा सुरू करू शकते.

प्रसूती रजेसाठी अर्ज कसा करावा?

प्रसूती रजेसाठी अर्ज कसा करावा?

कौटुंबिक रजा आणि प्रसूती रजेसाठी बहुतेक कंपन्यांकडे स्वतःची प्रक्रिया असते. प्रसूती रजा सामान्यतः प्रसूतीच्या तारखेच्या काही आठवडे आधी लागू केली जाते. प्रसूती रजा कायदा ८ आठवड्यांच्या रजेची परवानगी देतो.

सशुल्क आणि निःशुल्क अश्या दोन्ही प्रकारच्या प्रसूती रजा मंजूर आहेत का?

प्रसूती रजेचा विस्तार आई किंवा/आणि बाळाला ज्या परिस्थितींना तोंड द्यावे लागत असेल त्यावर अवलंबून असतो. कायद्यानुसार २६ आठवड्यांचा कालावधी हा पगारी रजेचा कालावधी आहे. २६ आठवड्यांच्या कालावधीनंतर, कोणतीही रजा (जर नियोक्त्याने मंजूर केली असेल तर) सहसा बिनपगारी मानली जाते.

प्रसूती रजेवर असताना तुम्हाला कर भरण्याची गरज आहे का?

प्रसूती रजेदरम्यान कर्मचार्‍याला मिळणारे वेतन आयकरासाठी विचारात घेतले जाईल. हा कर त्या अंतर्गत येणाऱ्या कर कंसावर अवलंबून असतो.

तुम्ही २६ आठवड्यांनंतर तुमची गर्भधारणा रजा वाढवू शकता का?

आरोग्याच्या कारणास्तव रजेची मुदत वाढवणे आवश्यक असल्यास, कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकाकडून प्रमाणपत्र किंवा समतुल्य दस्तऐवजासह या आवश्यकतेचा पुरावा देऊ शकतो. आस्थापना, कारणे शोधून त्यानुसार मुदतवाढ देऊ शकते. तथापि, प्रसूती रजा कायदा विहित केलेल्या २६ आठवड्यांसाठी पूर्ण वेतन अनिवार्य करतो.

तुमची गर्भारपणाची रजा संपल्यावर काय?

तुमची गर्भारपणाची रजा संपल्यावर काय?

प्रसूती रजा कायद्यातील ताज्या सुधारणांमुळे कर्मचारी घरून काम करू शकेल अशी तरतूद त्यामध्ये असू शकते, परंतु हे कामाच्या स्वरूपावर अवलंबून असते.

तुम्ही गर्भवती आहात म्हणून तुमचा बॉस तुम्हाला कामावरून काढू शकतो का?

ह्या प्रश्नाचे उत्तर उत्तर नाहीअसे आहे. गरोदर असणे हे एखाद्याला कामावरून काढून टाकण्याचे कारण असू शकत नाही.

कायदे आणि कामाच्या ठिकाणी काम करणार्‍या महिलांबद्दलच्या सर्वसाधारण वृत्तींमध्ये बरीच प्रगती झाली आहे. गरोदरपणात नोकरी करणार्‍या महिलांनी त्यांचे अधिकार समजून घेणे नेहमीच विवेकपूर्ण असते. मॅटर्निटी बेनिफिट कायद्यानुसार, नियोक्त्याने गर्भधारणेमुळे कामगाराचा करार किंवा नोकरी संपुष्टात आणणे बेकायदेशीर आहे.

तुम्ही गरोदरपणासाठी रजेवर असताना तुम्हाला कोणते फायदे मिळतील?

प्रसूती रजेवर असताना, कर्मचार्‍यांना वेतन मिळण्याचा अधिकार आहे. रजा ​​सुरू होण्यापूर्वी लगेचच तीन महिन्यांच्या कालावधीत तिच्या सरासरी दैनंदिन कमाईवर प्रसूतीची भरपाई मोजली जाते.

तुम्हाला मूल दत्तक घेण्यासाठी किंवा अनाथ मुलांचे पालनपोषण करण्यासाठी प्रसूती रजा मिळेल का?

नवजात (३ महिन्यांपेक्षा कमी वयाची मुले) दत्तक घेणाऱ्या मातांसाठी प्रसूती रजा उपलब्ध आहे आणि दत्तक घेतल्याच्या तारखेपासून हा कालावधी १२ आठवड्यांचा असतो. मोठी मुले दत्तक घेण्याची तरतूद नाही.

तुम्हाला मातृत्व विम्याची गरज असल्यास तुम्हाला तो कसा मिळेल?

तुम्हाला मातृत्व विम्याची गरज असल्यास तुम्हाला तो कसा मिळेल?

जर तुम्ही खाजगी आरोग्य सेवा प्रदात्याची निवड करत असाल तर बाळंतपण म्हणजे एक महाग गोष्ट आहे.विम्याद्वारे प्रसूतीच्या खर्चामध्ये, सर्वसाधारणपणे, संबंधित रुग्णालयाचा खर्च, प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतरचे खर्च आणि पहिल्या ३० दिवसांसाठी नवजात बाळाचा खर्च इत्यादींचा समावेश असतो. तुम्ही मातृत्व विम्याचा दावा करण्यापूर्वी बहुतेक पॉलिसी २ ते ४ वर्षांचा प्रतीक्षा कालावधी घेतात आणि काही पॉलिसींचा प्रतीक्षा कालावधी ६ वर्षांपर्यंत असतो. गर्भधारणा ही सामान्यतः नियंत्रित आणि नियोजित घटना असते या वस्तुस्थितीमुळे विम्याचा हफ्ता जास्त असतो. प्रसूती योजना ऑफर करणार्‍या बहुतेक विमा प्रदात्यांशी ऑनलाइन किंवा वैयक्तिक भेटी यांसारख्या माध्यमांद्वारे संपर्क साधला जाऊ शकतो.

प्रसूती रजा संपल्यानंतर तुम्ही कामावर परत न गेल्यास काय?

प्रसूती रजेनंतर तुम्ही तुमच्या नियोक्त्याला सादर केलेल्या समर्थनाशिवाय कामावर परत न गेल्यास, तुम्हाला नुकसानभरपाईचा अधिकार राहणार नाही, कारण कायदा केवळ २६ आठवड्यांच्या कालावधीसाठी आहे.

गरोदर स्त्रीला इतर कोणते फायदे आहेत?

प्रसूतीच्या तारखेपर्यंतच्या १० आठवड्यांत, कोणत्याही गर्भवती कर्मचाऱ्याला आई आणि बाळाच्या कल्याणावर परिणाम होऊ शकेल अशी कठीण कामे करण्यास भाग पाडले जाऊ नये, असेही मातृत्व लाभ कायदा सांगतो.

जर संबंधित कर्मचारी ५० पेक्षा जास्त कर्मचार्‍यांसह आस्थापनेमध्ये काम करत असेल, तर तिला तिच्या नोकरीवर परतल्यावर क्रॅच सुविधा मिळण्याचा अधिकार आहे.

मातृत्व लाभ कायदा २०१७ काय आहे?

कर्मचार्‍यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही कायदेशीर चौकटीत मातृत्व रजेसाठी कायदे आवश्यक आहेत. प्रसूती रजेच्या अधिकारांमध्ये वेतन, नियोक्त्याकडून अनुकंपा आणि गर्भवती कर्मचाऱ्यासाठी काही विशेषाधिकार यांचा समावेश होतो. भारतात, मातृत्व लाभ कायदा १९६१ हा महिला कर्मचाऱ्याला तिच्या बाळाची काळजी घेण्यासाठी वेळ आणि संसाधने देण्याचा अधिकार देतो. मातृत्व लाभ कायदा २०१७ अंतर्गत, नवीन सुधारणांमुळे, प्रसूती रजा १२ वरून २६ आठवडे केलेली आहे. प्रसूतीच्या तारखेपर्यंत ८ आणि बाळंतपणानंतर १८ आठवड्यांपर्यंत ही रजा वाढवण्यात आलेली आहे.

या सुधारणांमुळे कायद्याची व्याप्तीही वाढली आहे. दत्तक आणि सरोगेट मातांसाठी प्रसूती रजा देखील कायद्याच्या कक्षेत आली आहे. ५० किंवा त्याहून अधिक लोक असलेल्या संस्थेत काम करणाऱ्या मातांसाठी क्रॅच सुविधांचा प्रवेश देखील मातृत्व लाभ कायदा २०१७ नुसार अनिवार्य झालेला आहे.

ह्या कायद्याच्या आदेशामध्ये महिला कर्मचाऱ्यांचे मातृत्व हक्क आणि कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या फायद्यांबाबतच्या शिक्षणाचा समावेश आहे.

प्रसूती रजा महत्त्वाची का आहे?

आई होणे हा एक मोठा निर्णय आहे ह्यामध्ये मोठ्या जबाबदाऱ्या येतात. जरी बाळाची काळजी घेण्याचा हा प्रवास आनंददायक असला तरी, काहीवेळा बाळाच्या आरोग्यामुळे पालकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे, प्रसूती रजेचे अनेक फायदे असतात आणि आई आणि मूल दोघांनाही फायदा होतो.

. बाळासाठी आरोग्य फायदे

बाळाच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी पहिले वर्ष अत्यावश्यक असल्याने, मातृत्वाच्या रजेमुळे मातांना कुठलाही आर्थिक भर न पडता त्यांच्या मुलांची काळजी घेता येते. अशा प्रकारे, लहान मुले अधिक स्ट्रॉंग आणि आनंदी असतात.

. आईचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

ज्या महिलांना प्रसूती रजा दिली जाते त्यांना प्रसूतीनंतरच्या नैराश्याची शक्यता कमी असते, कारण त्या नेहमी त्यांच्या बाळासोबत असतात, अपराधीपणा, चिंता किंवा दुःख यासारख्या भावना, प्रसूती प्रतिबंधित करते.

. महिलांची नोकरी टिकून राहते

प्रसूती रजा महिलांना त्यांच्या रजेचा कालावधी संपल्यानंतर नियोक्त्याकडे परत येण्याची परवानगी देते. यामुळे कंपनीच्या प्रगतीत मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना नियोक्ते कायम ठेवू शकतात.

स्पर्धात्मक आर्थिक परिस्थितीमध्ये महिलांना अनेकदा अन्यायकारक कामाच्या पद्धतींचा फटका बसला आहे. आईला तिचे हक्क माहित असणे अत्यावश्यक आहे कारण ती तिच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत बाळाचे संगोपन करण्याचा समतोल राखत असते. कायदेशीरदृष्ट्या, प्रसूती रजेच्या कालावधीचा विचार केल्यास, जगाच्या बहुतेक भागांच्या तुलनेत भारताचा क्रमांक चांगला आहे. तथापि, प्रत्यक्षात, विशेषत: खाजगी आणि असंघटित क्षेत्रातील, परिस्थिती तितकीशी चांगली नाही. त्यामुळे, तुमचे (किंवा तुमच्या प्रियजनांचे) प्रसूती रजेचे अधिकार जाणून घेणे हे योग्य दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

आणखी वाचा: प्रसूतीची तारीख कशी काढावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article