Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी

बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी

बाळांसाठी शेळीचे दूध: फायदे आणि रेसिपी

नव्यानेच पालक झाल्यावर बाळाची काळजी घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेणे हा त्यातील मुख्य भाग आहे. बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेतल्याने तुम्हाला त्याच्या आहाराचे उत्तम आणि अधिक चाणाक्षपणे नियोजन करण्यास मदत होईल. त्यातील एक मोठा भाग म्हणजे बाळाच्या पोषणविषयक गरजा समजून घेणे. कोणत्याही बाळाच्या आहारासाठी एक चवदार पदार्थ म्हणजे दूध. सोया दूध, बदामाचे दूध, म्हशीचे दूध आणि पारंपारिक सर्वांचे आवडते गायीचे दूध यासारखे दुधाचे असंख्य प्रकार आहेत, तरीसुद्धा अनेक डॉक्टरांनी तुमच्या बाळासाठी शेळीच्या दुधाची शिफारस करण्यास सुरुवात केली आहे.

शेळीचे दूध तुमच्या बाळासाठी सुरक्षित आहे का?

दुधात लॅक्टोज नावाची साखर असते. ती पचायला अत्यंत अवघड असते. पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या गाईच्या दुधात कॅल्शियम भरपूर असले तरी त्यात भरपूर लॅक्टोज सुद्धा असते, त्यामुळे बाळाला पचायला ते जड जाते. नवजात बाळासाठी शेळीचे दूध पूर्णपणे लॅक्टोजमुक्त नसले तरी, लॅक्टोजचे प्रमाण खूप कमी असते.

तर, सोया दूध, तांदळाचे दूध किंवा बदामाचे दूध यासारख्या दुधाच्या पर्यायांपेक्षा शेळीचे दूध निरोगी किंवा आरोग्यदायी का आहे? त्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त आहे आणि ते बाळांसाठी खूप पौष्टिक आहे. दूध हा बाळाच्या आहाराचा अत्यावश्यक भाग आहे, कारण बाळाच्या शारीरिक विकासासाठी दुधामधील पोषक तत्वे आवश्यक आहेत. सोया दुधासारखे बहुतेक गैरदुग्धजन्य पदार्थ प्रौढांच्या आरोग्यासाठी चांगले असतात, परंतु विकसनशील नवजात बाळांसाठी , शेळीच्या दुधासारखे दुग्धजन्य पदार्थ आवश्यक आहेत. आणि ते तुमच्या बाळासाठी गाईचे दूध किंवा कृत्रिम दुधापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते.

तुम्ही तुमच्या बाळाला शेळीचे दूध कधी देणे सुरू करू शकता?

शेळीचे दूध हे काही स्तनपानासाठी पर्याय नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुमच्या बाळाला अजूनही स्तनपानाची गरज आहे. फॉर्म्युला ऐवजी शेळीचे दूध वापरण्याची सुद्धा शिफारस केलेली नाही. शेळीचे दूध फक्त १८ महिन्यांनंतर बाळांना द्यावे. ह्याचे कारण म्हणजे त्यात सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे किडनीवर भार पडू शकतो. अशा प्रकारे, लहान वयात शेळीचे दूध दिल्यास मुलाच्या पोषण संतुलनात समस्या निर्माण होऊ शकतात.

लहान बाळांसाठी शेळीच्या दुधाचे फायदे

तुमच्या मुलाला शेळीचे दूध दिल्याने अनेक फायदे होऊ शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

. ऍलर्जीचा कमी धोका

गाईच्या दुधात काही पदार्थ आणि प्रथिने असतात ज्यामुळे ते अत्यंत ऍलर्जीक असू शकतात, उदा: लॅकटोज. ज्यांना लॅकटोजची ऍलर्जी आहे त्यांना लॅकटोज असहिष्णुता आहे असे म्हणतात. ही समस्या असल्यास बाळाला त्यामुळे अस्वस्थता येऊ शकते. शेळीच्या दुधात लॅकटोज खूपच कमी असते. त्यामुळे बाळाला काही गंभीर ऍलर्जी होण्याचा धोका कमी असतो. शेळीच्या दुधामुळे गाई आणि म्हशीच्या दुधाइतकी ऍलर्जी होत नाही, परंतु ज्या मुलांना गाईच्या दुधाची ऍलर्जी असते त्यांना शेळीच्या दुधाची ऍलर्जी देखील असू शकते, कारण प्रथिनांचे प्रमाण समान असते.

. चांगली चरबी

गाईच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध पचायला सोपे असते आणि त्यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट सारख्या चांगल्या चरबीचे प्रमाण जास्त असते. म्हणजेच तुमच्या बाळाला शेळीचे दूध पचनास सोपे असते आणि चांगली चरबी शरीराद्वारे शोषली जाते. तुमच्या मुलाच्या योग्य वाढीसाठी चांगली चरबी आवश्यक आहे.

. आतड्यांसाठी चांगले

लॅक्टोजचे विघटन करणे कठीण आहे आणि ते पचनास सोपे असते. लॅकटोजची आणखी एक समस्या म्हणजे त्यामुळे आतड्यांना हानी पोहोचवू शकते. शेळीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे तुमच्या बाळाच्या आतड्याचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.

. प्रीबायोटिक्स

बहुतेक दुधाच्या प्रकारांमध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स म्हणून ओळखले जाणारे निरोगी जीवाणू असतात. डेअरीच्या इतर दुधाच्या तुलनेत शेळीच्या दुधात प्रीबायोटिक्स जास्त असतात. ह्यामुळे तुमच्या बाळाला निरोगी राहण्यास मदत होते तसेच निरोगी आतडे आणि पचनास मदत करणारे जिवाणू चांगल्या प्रमाणात राखण्यास मदत करते.

. कमी कोलेस्ट्रॉल

शेळीच्या दुधात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते आणि सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. शेळीचे दूध हे मोठी माणसे आणि बाळे दोघांसाठी खूप आरोग्यदायी मानले जाते. कारण कोलेस्टेरॉलचे असंतुलन नंतरच्या आयुष्यात उच्च रक्तदाबाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

बाळासाठी शेळीच्या दुधाची पाककृती

शेळीचे दूध गाईच्या दुधाप्रमाणेच वापरले जाऊ शकते. बाळ आजारी पडू नये म्हणून शेळीचे दूध उकळून घेतले पाहिजे किंवा पाश्चराईझ केलेले शेळीचे दूध विकत घेतले पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीतून शेळीचे दूध पाजू शकता आणि जर बाळ पुरेसे मोठे असेल तर तुम्ही हे दूध ड्रिंकिंग चॉकलेटमध्ये मिसळू शकता किंवा तृणधान्यांमध्ये वापरू शकता.

बाळासाठी शेळीच्या दुधाची पाककृती

तुम्ही तुमच्या बाळाला शेळीच्या दुधावर आधारित फॉर्म्युला किंवा शेळीच्या दुधाचे दही द्यावे का?

परिस्थितीनुसार, जर तुम्ही तुमच्या बाळाला दह्यात उपलब्ध असलेल्या निरोगी बॅक्टेरियामुळे शेळीच्या दुधाचे दही देण्याचा विचार करत असाल. परंतु त्यापूर्वी, तुम्ही पोषणतज्ञ किंवा डॉक्टरांशी बोलले पाहिजे. दुधात काही पोषक घटक असतात आणि दह्यात नसतात, त्यामुळे तुमच्या मुलाला खायला घालताना हे पोषक घटक बदलणे आवश्यक आहे.

शेळीचे दूध गाईच्या दुधावर आधारित डेअरी उत्पादनांसाठी योग्य पर्याय का असू शकत नाही का?

शेळीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा लॅक्टोज चे प्रमाण कमी असले तरीसुद्धा शेळीच्या दुधात अजूनही ठराविक प्रमाणात लैक्टोज असते आणि त्यामुळे तुमच्या बाळाला लॅक्टोज असहिष्णुता विकसित होऊ शकते. आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे शेळीच्या दुधात फॉलिक ऍसिड नसते. फॉलिक ऍसिड तुमच्या बाळाच्या पोषणाचा एक महत्वाचा भाग आहे. गायीच्या दुधात फॉलिक ऍसिड असते. म्हणूनच तुम्ही प्रथम डॉक्टरांशी तपशीलवार बोला आणि गायीच्या दुधाऐवजी शेळीचे दूध वापरण्याचे धोके समजून घ्या.

तुमच्या अर्भकासाठी शेळीचे दूध निवडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या मुलाला शेळीचे दूध देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसे की:

  • शेळीच्या दुधात फॉलिक ऍसिड्सचे प्रमाण कमी असते. बाळाच्या पोषणासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. फॉलिक ऍसिड असलेले दूध खरेदी करा.
  • व्हिटॅमिन बी१२ हा तुमच्या बाळाच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. गाईच्या दुधात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ असते, म्हणून जर तुमचे बाळ शेळीचे दूध घेत असेल, तर तुम्ही त्याला काही प्रकारची पूरक जीवनसत्वे देणे आवश्यक आहे.
  • शेळीच्या दुधाने किंवा इतर कोणत्याही दुधाने तुमचे बाळ डिहायड्रेट होण्याचा धोका आहे, त्यामुळे तुमचे बाळ नियमितपणे हायड्रेटेड असल्याची खात्री करा.

तुमच्या बाळाच्या आहारात बदल करण्यापूर्वी किंवा शेळीच्या दुधाचा समावेश करण्याआधी तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यावा. नेहमी तुमच्या डॉक्टरांचे ऐका. आहारातील बदल करण्याचे फायदे आणि जोखीम समजून घ्या. तुमच्या बाळाच्या आहारात कधीही कठोर बदल करू नका. बदल करायचे असतील तर ते हळूहळू करा. ह्या बदलांमुळे जर बाळाने वाईट प्रतिक्रिया दिली तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

आणखी वाचा:

बाळांसाठी रव्याचे पदार्थ: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती
बाळाच्या आहारात पनीरचा समावेश करणे – फायदे आणि पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article