Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण ओवा आणि ओव्याच्या पाण्याचे बाळांसाठी फायदे आणि उपयोग

ओवा आणि ओव्याच्या पाण्याचे बाळांसाठी फायदे आणि उपयोग

ओवा आणि ओव्याच्या पाण्याचे बाळांसाठी फायदे आणि उपयोग

ओवा (कॅरम सीड्स) हा एक भारतीय मसाल्याचा पदार्थ आहे. हा मसाला अनेक पाककृतींमध्ये वापरला जातो. ओवा घातल्यानंतर पदार्थांची चव वाढते. ओवा त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे . ओव्यामुळे पचनाच्या समस्या, पोटशूळ, तीव्र बद्धकोष्ठता तसेच लहान मुले आणि मोठ्या माणसांमधील सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. ओव्यांमध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. हा घटक एक शक्तिशाली जंतूनाशक आणि बुरशीनाशक म्हणून कार्य करतो आणि रोगजनकांच्या विकासास प्रतिबंध करतो.

बाळांना ओव्याच्या प्रचंड औषधी गुणधर्मांचा फायदा होऊ शकतो. तुम्ही बाळांना ओवा देताना ओव्याचे पाणी करून किंवा चूर्ण स्वरूपात देऊ शकता. परंतु, संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी लहान बाळांसाठी ओवा वापरताना तो मध्यम प्रमाणात वापरण्याचा सल्ला दिला जातो

बाळांसाठी ओव्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे

बाळाला ओवा द्यावा का हा प्रश्न नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना पडतो. ह्याचे उत्तर होय आहे, कारण ओव्याचे पाणी बाळांसाठी फायदेशीर आहे:

 1. ओव्यामुळे लहान मुलांना पोटशूळ आणि पोटातील गॅस पासून आराम मिळतो.
 2. ज्या बाळांना पचनाचे विकार आणि पोटदुखी होण्याची शक्यता असते, विशेषत: जेव्हा ते पहिल्यांदा एखादा नवीन पदार्थ खातात तेव्हा त्यांना ओव्याचे पाणी प्यायल्यानंतर बरे वाटते.
 3. ओव्यामुळे लहान बाळांना खोकला आणि सर्दीपासून देखील आराम मिळतो.
 4. लहान बाळांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्या बाळांना ओव्याचे पाणी दिल्याने ही समस्या दूर होऊ शकते आणि आतड्याची हालचालही नियमित होऊ शकते.
 5. ओव्यामुळे गॅस्ट्रिक ऍसिडची निर्मिती वाढते , भूक वाढू शकते आणि पचन सुलभ होते.
 6. दम्यावर उपचार करण्यासाठी ओव्याचा उपयोग होतो कारण त्यामुळे फुफ्फुसांना होणारा हवेचा प्रवाह सुधारतो आणि चोंदलेले नाक सुद्धा मोकळे होते.

बाळांना ओव्याची ओळख कधी करून द्यावी?

बाळ ८ महिन्यांचे झाल्यावर तुम्ही त्याला ओव्याची ओळख करून देऊ शकता. सुरुवातीला आपल्या बाळाला ओवा देताना त्याचे प्रमाण अगदी थोडे असणे आवश्यक असते. तसेच, एका वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी,अगदी साधे पाणी वापरावे आणि त्यात कोणतेही गोड पदार्थ घालणे टाळणे टाळावे. एकदा बाळाने घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली की,ओव्याची पूड त्याच्या आहारात मर्यादित प्रमाणात घातली जाऊ शकते. हळुहळू तुम्ही पुरी आणि पराठ्यांमध्ये सुद्धा ओवा घालू शकता.

बाळांसाठी ओवा कसा निवडावा?

लहान बाळांसाठी भुसा विरहीत ओवा चांगला असतो. लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी किंवा ओव्याची पावडर तयार करताना, तो स्वच्छ असल्याची खात्री करा. तसेच, रसायने नसलेल्या सेंद्रिय ओव्याचा वापर करण्याचे लक्षात ठेवा.

लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी तयार करणे

तुम्ही तुमच्या लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी कसे तयार करता ते खाली दिलेले आहे

 • एका पॅनमध्ये २५० मिली पाणी घ्या आणि उकळी येईपर्यंत गरम करा.
 • त्यात १/२ टीस्पून ओवा घाला आणि काही मिनिटे उकळू द्या.
 • उकळत्या पाण्यात घालण्यापूर्वी तुम्ही ओवा थोडासा भाजून त्याची पावडर तयार करू शकता.
 • जर तुम्हाला पाणी गोड करायचे असेल तर तुम्ही उकळत्या पाण्यात थोडासा गूळ टाकू शकता.
 • गाळणीने पाणी गाळून घ्या आणि बाळाला देण्यापूर्वी ते थंड होऊ द्या.

लहान बाळांसाठी ओव्याचे पाणी तयार करणे

बाळाला ओव्याचे पाणी किती प्रमाणात द्यावे?

एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी, अर्धा चमचा ओव्याच्या पाण्याने सुरूवात करा. हळहळू तुम्ही हे प्रमाण १२ चमचे इतके वाढवू शकता. परंतु बाळांना हे ओव्याचे पाणी आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा देणे सुरक्षित आहे.

लहान बाळांच्या सर्दी आणि खोकल्यासाठी ओवा वापरून करता येतील असे घरगुती उपाय

बाळाच्या सर्दी आणि खोकल्यासाठी काही उपयुक्त घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:

. औषधी काढा

आपण खालीलघटक वापरून काढा तयार करू शकता:

साहित्य

 • तुळशीची पाने
 • १ टीस्पून ओवा
 • लवंग
 • काळी मिरी एक चिमूटभर
 • /८ टीस्पून हळद
 • /८ टीस्पून सुंठ पावडर
 • १ कप पाणी

कृती

 1. वरील सर्व साहित्य एका कढईत ठेवा आणि थोडा वेळ उकळू द्या.
 2. पाणी गाळून घ्या आणि २ चमचे तुमच्या बाळाला द्या. सर्व्ह करण्यापूर्वी ते गरम करा.
 3. हा काढा सर्दी आणि खोकला बरा करण्यास मदत करतो आणि ८ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या बाळांना दिल्यास पचनाच्या समस्यांपासून बरे वाटण्यास मदत होते.

. अजवाइन हीट पॅड

लहान मुलांमध्ये छातीतील कफ कमी होण्यासाठी आणि चोंदलेल्या नाकाचा सामना करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय असू शकतो. हे सोपे उपचार नवजात बाळांसाठी चांगले कार्य करतात

साहित्य

 • २ चमचे ओवा
 • स्वच्छ मलमलचे कापड

कृती

 1. चांगला सुगंध येईपर्यंत ओवा चांगला भाजून घ्या.
 2. भाजलेला ओवा स्वच्छ मलमलच्या कपड्यात ठेवून छान पुरचुंडी तयार करा. .
 3. तुम्ही ही गरम पुरचुंडी तुमच्या बाळाच्या छातीवर गरम पॅड प्रमाणे ठेवू शकता.

अजवाइन हीट पॅड

. ओवा घातलेल्या तेलाने मसाज

ओवा घातलेल्या तेलाने मसाज केल्यास लहान मुलांमधील सर्दी खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो. हे तेल कसे तयार करायचे हे खाली दिलेले आहे.

 • साहित्य
 • १ टीस्पून ओवा
 • /२ कप मोहरीचे तेल

कृती

 1. मसाज तेल तयार करण्यासाठी मोहरीच्या तेलात ओवा घालून गरम करा.
 2. धूर येईपर्यंत गरम होऊ द्या.
 3. ह्या तेलाने बाळाला मसाज केल्यास सर्दी आणि कफपासून आराम मिळेल.
 4. हा उपाय नवजात बाळांसाठी आणि ६ ते ८ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी उपयोगी होतो.
 5. तुमच्या बाळाला नियमितपणे ओव्याच्या तेलाने मसाज केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणूनही ह्याचा उपयोग होतो.

. ओवा आणि गुळाचे पाणी

ओवा आणि गूळ (गुळ) पावडरचे मिश्रण कफ बाहेर काढण्यासाठी आणि खोकला कमी करण्यात मदत करू शकते. कफ आणि खोकल्यामुळे बाळाला रात्रीची झोप नीट लागत नाही.

साहित्य

 • १ टीस्पून ओव्याचे पाणी
 • १ टीस्पून गूळ

कृती

 1. एक वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी, ओवा भाजून त्याची बारीक पूड बनवता येते. त्यामध्ये नंतर गुळाची पूड समान प्रमाणात मिसळून दररोज बाळाला दिली जाऊ शकते.
 2. लहान बाळांसाठी, ओव्याच्या पाण्यात थोडा गूळ मिसळून ते पाणी देता येऊ शकते

लहान बाळे आणि मोठ्या माणसांसाठी ओव्याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. ओव्याचे अनेक उपयोग असल्याने ओवा हा मसाल्याचा एक मौल्यवान पदार्थ आहे तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांवर प्रभावीपणे उपचार करण्यासाठी ओव्याचा उपयोग होतो.

आणखी वाचा:

बाळांसाठी दालचिनी चांगली आहे का?
बाळांसाठी हळद: फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article