Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अकाली जन्मलेली बाळे गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ

जेव्हा गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरून बाळाचा जन्म होतो त्यावेळी बाळाची योग्य वाढ आणि विकास होण्यास मदत होते. परंतु स्त्रीला गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी पूर्ण करणे नेहमीच शक्य नसते कारण गरोदरपणात काही गुंतागुंत होऊन अकाली प्रसूती होऊ शकते. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेल्या बाळांना अकाली जन्मलेली बाळे असे म्हटले जाते. ह्या लेखात, आम्ही तुम्हाला गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांची माहिती देऊ. बाळ गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात का जन्माला येऊ शकते, त्याला कोणत्या संभाव्य गुंतागुंतांचा सामना करावा लागू शकतो आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

३२ व्या आठवड्यात बाळाचा जन्म कशामुळे होतो?

खालील कारणांमुळे गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात बाळाचा जन्म होतो

  • जुळी किंवा तिळी बाळे
  • नाळेच्या समस्या
  • जेव्हा नाळेतून बाळाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही
  • गर्भवती महिलेला संसर्ग झालेला असणे
  • गरोदरपणात बेकायदेशीर औषधे घेणे, अल्कोहोलयुक्त पेये पिणे किंवा धूम्रपान करणे
  • गर्भाशयाचे मुखाच्या समस्येमुळे बाळ सुरक्षितपणे गर्भाशयात न राहणे

३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाचा विकास

गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांचे वजन साधारणपणे १.५ किलोग्रॅम असते आणि त्यांची लांबी साधारणपणे २० इंच असते. आतापर्यंत त्यांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसली तरीही बहुतेक बाळे स्वतःहून श्वास घेऊ शकतात. परंतु शरीरातील ऑक्सिजनची पातळी निरोगी ठेवण्यासाठी त्यांना पूरक ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्येच राहावे लागत आहे. गरोदरपणाच्या ३४ आठवड्यांपर्यंत गिळण्याची आणि चोखण्याची प्रतिक्षिप्त क्रिया बाळांमध्ये विकसित होत नसल्यामुळे, ते स्वतः दूध ओढू शकत नाहीत किंवा चोखू शकत नाहीत. म्हणून, त्यांना दूध आणि द्रवपदार्थ शिरेद्वारे, म्हणजे, आयव्ही द्वारे दिले जातात.

काही अकाली जन्मलेल्या बाळांना खूप केस असतात, तर काहींना विरळ केस असू शकतात. पुरुष बाळांमध्ये, अंडकोष सहसा अंडाशयात खाली उतरतात परंतु काही बाळांमध्ये असे काही काळाने होऊ शकते. ३२ व्या आठवड्यांत जन्मलेल्या बाळाला त्याच्या सभोवतालची परिस्थितीची जाणीव असली पाहिजे, कारण त्याच्या सर्व संवेदना चांगल्या प्रकारे कार्य करू लागलेल्या असतात आणि बाळाला संवेदनांच्या आकलनाशी संबंधित समस्या क्वचित असू शकते.

या वेळेपर्यंत बाळाच्या शरीरातील चरबी मोठ्या प्रमाणात वाढते आणि बाळ गुबगुबीत दिसू शकते. परंतु जर बाळाचे वजन वाढत नसेल, तर त्याच्या शरीराचे तापमान उबदार ठेवण्यासाठी त्याला इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाऊ शकते.

गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला आरोग्यविषयक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो

३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळासाठी, लगेच योग्य खबरदारी आणि काळजी न घेतल्यास गुंतागुंत होऊ शकते. गरोदरपणाच्या ३२ आठवड्यात जन्मलेल्या बाळाला खालील आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

. जन्मतः बाळाचे वजन कमी असण्याची शक्यता आहे

अकाली जन्मलेल्या बाळाचे जन्मतः वजन कमी असण्याची शक्यता असते. बाळाचे वजन हवे तेवढे नसल्याने बाळाचे वजन वाढण्यासाठी बाळाला पाजणे हा सर्वात महत्वाचा प्राधान्यक्रम असतो. जर त्याचे वजन वाढत नसेल तर त्याला हायपोथर्मियाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे, पुढील काही आठवडे वजन सामान्य होईपर्यंत त्या बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाईल.

. तो चोखू शकत नाही

गरोदरपणाच्या ३४ आठवड्यांच्या आसपास बाळामध्ये शोषण्याची प्रतिक्षिप्त क्रिया विकसित होत असल्याने, ३२ व्या आठवड्यात जन्माला आलेले बाळ यशस्वीरित्या दूध पिऊ शकत नाही. काही वेळा,अकाली जन्मलेल्या बाळांना आईचे दूध पचणे कठीण जाते, ज्यामुळे आरोग्याच्या पुढील समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, बाळाला इंट्राव्हेनस पद्धतीने, म्हणजेच आय.व्ही. द्वारे पोषण दिले जाईल.

. त्याला मेंदूच्या विकासाच्या समस्या असू शकतात

३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला शिकण्याच्या आणि वर्तणुकीशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते कारण त्याचा मेंदू आतापर्यंत पूर्णपणे विकसित झालेला नसतो. गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात, बाळाचा मेंदू फक्त ६६% विकसित होतो, म्हणूनच डॉक्टर त्याला एनआयसीयू मध्ये ठेवू शकतात.

. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असू शकते

गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात आईमुळे बाळाच्या प्रतिकारशक्तीला मोठी वाढ मिळते. परंतु अकाली जन्म झाल्यामुळे, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत नाही, त्यामुळे त्याला संसर्ग लगेच होऊ शकतो. मुलाला आधार देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नळ्या आणि इंजेक्शन्समुळे देखील त्याला संसर्ग होऊ शकतो

गरोदरपणाच्या ३२व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाला आरोग्यविषयक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो

३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

योग्य प्रसूतीपूर्व काळजी घेतल्यास, अकाली जन्माचे धोके कमी केले जाऊ शकतात आणि अकाली प्रसूती थांबवता येऊ शकते किंवा विलंब होऊ शकतो. परंतु जर बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यांत झाला असेल तर त्याला चांगला आहार देणे आवश्यक आहे. बाळाला नॅसोगॅस्ट्रिक ट्यूबद्वारे आईचे दूध दिले जाऊ शकते. बाळाला एनआयसीयूमध्ये राहावे लागण्याची शक्यता असते आणि ते बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते.

डॉक्टर कांगारू केअरचा सल्ला देतात, कारण त्यामुळे बाळाच्या वाढीस मदत होते. ‘कांगारू केअरम्हणजे बाळाच्या त्वचेला तुमच्या त्वचेचा स्पर्श होणे, कारण त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती आणि वजन वाढण्यास मदत होते. जर तुमच्या बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात झाला असेल, तर तुम्ही तुमच्या बाळाला नैसर्गिकरित्या उबदार आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य तितक्या काळ तुमच्या उघड्या स्तनांवर धरून ठेवू शकता.

बाळाला एनआयसीयु मधून डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला घरी घेऊन जाण्याची काळजी घ्यावी. तुमच्या घरातील आणि आजूबाजूचे वातावरण सुरक्षित आणि निर्जंतुकीकरण ठेवा. तुमच्या अकाली जन्मलेल्या बाळाचा विकास होण्यास वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही विशेष कार्यक्रम शोधू शकता ज्याद्वारे तुमच्या मुलाला योग्य पद्धतीने गोष्टी शिकण्यास आणि शक्य तितक्या लवकर विकास होण्यास मदत होऊ शकते.

३२ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांचा जगण्याचा दर किती आहे?

७ व्या महिन्यात जन्मलेल्या बाळाच्या जगण्याची शक्यता खूप जास्त आहे. वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे तुमच्या बाळाची निरोगी वाढ होऊ शकते. परंतु हे बाळाच्या आरोग्याच्या स्थितीवर देखील अवलंबून असते. ७व्या महिन्यात जन्मलेले बाळ जगू शकते की नाही हे फक्त एकटे डॉक्टरच सांगू शकतात.

गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ एनआयसीयू मध्ये किती काळ राहील?

जर तुमच्या बाळाचा जन्म वेळेआधी झाला असेल किंवा त्याचा जन्म ३२ व्या आठवड्यात झाला असेल, तर तुमच्या बाळाला किती काळ रुग्णालयात राहावे लागेल ह्याबद्दल तुम्हाला काळजी वाटेल. तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जायचे असेल तर तुम्हाला स्वतःला त्याची काळजी घ्यावी लागेल. मात्र तो बरा होईपर्यंत त्याला एनआयसीयूमध्ये राहावे लागेल. मुदतपूर्व बाळे काहीवेळा पूर्ण वाढ झालेल्या नवजात बाळासारखी दिसतात परंतु ती पूर्णपणे विकसित झालेली नसतात आणि बाहेरच्या जगात राहू शकतील ह्याची खात्री नसते.

एखाद्या बाळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून संसर्गाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. बाळ स्तनांमधून दूध ओढण्यास सक्षम असले पाहिजे जेणेकरून नळ्या काढून टाकता येतील आणि बाळ नैसर्गिकरित्या स्तनपान घेऊ शकेल. एकदा तुमच्या बाळाचा पूर्ण विकास झाला आणि त्याचे विकासाचे सर्व टप्पे, जसे की दूध पिणे, स्वतः श्वास घेणे, कोणत्याही बाह्य आधाराशिवाय उबदार राहणे, पूर्ण झाल्यावर डॉक्टर बाळाला डिस्चार्ज देतील.

गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यांत बाळाला जन्म देणे हे नवीन आईसाठी खूपच त्रासदायक असू शकते. बाळाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करून, घरच्या सुरक्षित वातावरणात बाळाचा विकास होण्यासाठी तुम्ही बाळाला घरी घेऊन येऊ शकता आणि प्रेमाने त्याचा सांभाळ करू शकता.

संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article