Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ स्तनपान जागतिक स्तनपान सप्ताह – इतिहास आणि महत्व

जागतिक स्तनपान सप्ताह – इतिहास आणि महत्व

जागतिक स्तनपान सप्ताह – इतिहास आणि महत्व

वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (डब्ल्यू ए बी ए ) च्या वतीने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताहाच्या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जगभरातील नवीन मातांमध्ये स्तनपानाविषयी जागृती निर्माण करणे, त्याचे समर्थन करणे आणि प्रोत्साहन देणे हा ह्यामागील हेतू आहे.

जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?

जगभरात सर्वत्र स्तनपान करणाया मातांचे संरक्षण, समर्थन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह आयोजित करून तो साजरा केला जातो. १९९२ मध्ये पहिल्यांदा जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला आणि त्या काळापासून, जगभरातील संस्थांद्वारे त्यास मान्यता मिळाली. जागतिक स्तनपान सप्ताहाला (डब्ल्यू बी डब्ल्यू) जन्म देणाऱ्या जगभरातील समुदायांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि स्तनपानाविषयी अधिक माहिती पसरवण्यासाठी डब्ल्यूएबीए ने संपूर्ण आठवडा समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता. वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताहासाठी एक नवीन थीम आणि घोषवाक्य तयार करते. ‘स्तनपान संरक्षण: एक सामायिक जबाबदारी‘, ही जागतिक स्तनपान सप्ताह २०२१ ची थीम आहे.

जागतिक स्तनपान सप्ताह का साजरा केला जातो?

जागतिक स्तनपान सप्ताहाचा इतिहास

जेव्हा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) यांनी स्तनपानाचे संरक्षण, प्रोत्साहन आणि समर्थन करण्यासाठी इनोसेन्टी डिक्लरेशन म्हणून ओळखले जाणारे एक निवेदन तयार केले तेव्हा स्तनपानाचे महत्त्व जागतिक स्तरावर ओळखले गेले. इनोसेन्टी डिक्लरेशन एक औपचारिक दस्तऐवज आहे आणि ते उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार केले गेले होते, त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश केला गेलेला होता:

 • राष्ट्रीय स्तनपान समिती तयार करणे आणि देशभरात राष्ट्रीय स्तनपान समन्वयक नियुक्त करणे
 • प्रसूतीनंतर योग्य काळजी आणि स्त्रियांना त्यांच्या मुलांना पोसण्यासाठी आणि स्वतः निरोगी राहण्यासाठी पुरेसे पोषण मिळावे यासाठी उपाययोजना करणे
 • महिलांच्या स्तनपान हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे
 • ब्रेस्ट मिल्क सब्स्टिट्यूट्सच्या आंतरराष्ट्रीय विपणन संहितेचे सर्व लेख आणि डब्लूएचओ च्या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा तयार करणे
 • स्त्रियांना त्यांच्या बाळाला ४६ महिन्यांपर्यंत फक्त स्तनपान करवण्यास सक्षम करणे

वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन (डब्ल्यू ए बी ए) ची स्थापना १९९१ मध्ये इनोसेन्टी डिक्लेरेशनमध्ये नमूद केलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. जागतिक स्तरावर स्तनपानाबद्दल जागरूकता आणि महत्त्व पसरवण्यासाठी डब्ल्यूएबीए जबाबदार आहे. डब्ल्यूएबीए च्या काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • मातांना स्तनपान चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे
 • बाळासाठी अनुकूल हॉस्पिटल उपक्रम
 • वडिलांना माता, आरोग्य सेवा कामगार आणि समुदायाला पाठिंबा देण्यासाठी मार्गदर्शन आणि शिक्षण
 • स्तनपान करणा या मातांचे संरक्षण आणि समर्थन करण्यासाठी कायदे आणि धोरणे तयार करणे

जागतिक स्तनपान सप्ताह कसा साजरा करावा?

जागतिक स्तनपान सप्ताह (डब्ल्यूबीडब्ल्यू), हा जगभरातील स्तनपान करणा या समुदायाला एकत्र करणे, स्तनपानास सार्वजनिक समर्थन वाढवणे आणि इनोसेन्टी घोषणेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साजरा केला जातो. उत्सवाच्या पहिल्या वर्षी, सुमारे ७० देश जागतिक स्तनपान सप्ताहामध्ये सामील होते. परंतु आज ही संख्या १७० देशांमध्ये वाढली आहे. जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्याचे अनेक मार्ग आहे. तुम्ही खालीलपैकी एक किंवा अधिक गोष्टी करू शकता.

. आपल्या लहान मुलाला स्तनपान करा

जागतिक स्तनपान आठवडा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, अर्थातच, आपल्या लहान बाळाला स्तनपान देणे आणि त्याचे पोषण करणे! आपल्या सर्वांना माहीत आहे की आई आपल्या बाळाला पाजण्यासाठी सदैव तयार असते, त्यासाठी विशिष्ट तारखांची आणि उत्सवाची गरज नसते. जर तुम्ही सध्या बाळाला स्तनपान देत असाल तर ह्या आठवड्यात सुद्धा तुम्ही ते उत्साहाने केले पाहिजे!

आपल्या लहान मुलाला स्तनपान करा

. विविध एजन्सीद्वारे प्रायोगिक कार्यक्रम, व्याख्याने किंवा वॉक

जागतिक स्तनपान सप्ताहादरम्यान जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था वॉक, सेमिनार इत्यादी प्रायोजित करतात. त्यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी लोगो असलेले टी शर्ट, बांगड्या इत्यादी प्रदान करतात.

विविध एजन्सीद्वारे प्रायोगिक कार्यक्रम, व्याख्याने किंवा वॉक

. स्तनपानाच्या सुट्टीसाठी जा

आपल्या दिनचर्येतून थोडा वेळ काढून कुटुंबासह सुट्टीवर जा. दररोजच्या कामांमध्ये आणि चिंतांमध्ये न अडकता ह्या कालावधीत तुमच्या बाळाला स्तनपान दिल्याचा आनंद घ्या, थोडा वेळ काढा आणि आराम करा, योगा, ध्यान किंवा आपल्या मनाला, शरीराला आणि आत्म्याला नवचैतन्य देणारी कोणतीही क्रिया करा. सुट्टीची योजना आखत असताना, तुमच्या कामांमध्ये ‘शॉप ऑफ द परफेक्ट ब्रा’ समाविष्ट करा, कारण योग्य ब्रा तुमच्या स्तनांचे आरोग्य राखण्यास नक्कीच मदत करू शकते. विशेषत: या महत्त्वाच्या काळात हे अगदी गरजेचे आहे. काही वेळा काही अडचणींमुळे तुम्ही प्रवास करू शकत नसल्यास तुम्ही घरीच छोट्या सुट्टीचे नियोजन करू शकता. शेवटी, आपल्या लहान बाळासोबत आणि आपल्या पतीसोबत आराम करण्यासाठी आणि दर्जेदार वेळ घालवण्यासाठी घर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे!

स्तनपानाच्या सुट्टीसाठी जा

. तुमची ब्रेल्फीपोस्ट करा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने सुरू केलेल्या ट्रेंडमुळे मातांना त्यांच्या स्तनपानाची सेल्फी किंवा ब्रेल्फीसोशल मीडियावर शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाते. सार्वजनिकरित्या स्तनपानासंबंधी कलंक मोडून काढणे आणि मुलाच्या शारीरिक,मानसिक विकासासाठी स्तनपानाचे महत्त्व पसरवणे ह्याविषयी ही एक चळवळ होती. म्हणून जेव्हा जागतिक स्तनपान सप्ताह चालू होतो, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमची ब्रेल्फी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करू शकता.

तुमची 'ब्रेल्फी' पोस्ट करा

. आपले स्तनपान अनुभव शेअर करा

स्तनपान करणे ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. तुमच्या बाळाबरोबरचा तुमचा अनुभव तुम्ही इतर स्तनपान करणाऱ्या माता किंवा गर्भवती स्त्रियांसोबत शेअर केला पाहिजे. आईच्या दुधाचे महत्व आणि त्याविषयी जागरूकता पसरवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले परंतु अनेक प्रयत्नांना न जुमानता, केवळ ५०% बाळांना सहा महिन्यांच्या वयापलीकडे स्तनपान केले जाते आणि त्यापैकी फक्त अर्धेच लोक एक वर्षांपर्यंत स्तनपान करीत असतात. अनेक अविकसित देशांमध्ये, मातांना त्यांच्या बाळांना स्तनपान देण्याबाबत मदत दिली जात नाही, त्यांना अनेक समस्या भेडसावत असतील ज्याबद्दल त्यांना माहिती नाही. तुम्ही तुमच्या अनुभवांबद्दल जितके अधिक बोलता, तितके तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात त्यांना मदत करू शकता.

आपले स्तनपान अनुभव शेअर करा

. स्तनपान करणाऱ्या मातांचे आभार माना

स्तनपान करणाऱ्या मातांना धन्यवाद देण्याची संधी म्हणून ह्याकडे पहा. कौतुकाचा एक छोटासा शब्द आणि एक स्मितहास्य अनेक लोकांच्या जीवनात मोठा फरक निर्माण करू शकतो. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर तुम्ही तुमच्या बाळाला देत असलेल्या अद्भुत भेटीबद्दल स्वतःचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या!

जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम

वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक नवीन थीम आणि घोषणा तयार करते. ते विशेषतः स्तनपानाच्या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केलेले असतात. थीमला अंतिम रूप दिल्यानंतर, विपणन साहित्य जसे की ब्रोशर, पोस्टर्स, बॅनर, जाहिराती आणि वेबसाइट जागतिक स्तनपान सप्ताहाच्या त्या वर्षाच्या विषयाचा प्रसार करण्यासाठी डिझाइन करते.

ह्या थीम, घोषणा आणि साहित्य, सरकारी संस्था, स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करणारी मंडळे, रुग्णालये, आरोग्यसेवा संस्था, फार्मास्युटिकल्स आणि इतर संस्था, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तनपानाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी वापरू शकतात. २०२१ मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहाची थीम स्तनपान सुरक्षित करणे: एक सामायिक जबाबदारीअशी आहे. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या मागील काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:

 • आरोग्यासाठी स्तनपानाला समर्थन द्या
 • स्तनपान हा तुमचा हक्क आहे
 • माहिती युगात स्तनपान
 • स्तनपान जीवनासाठी शिक्षण
 • स्तनपान निसर्गाचा मार्ग
 • स्तनपान एक महत्वाची आपत्कालीन प्रतिक्रिया
 • स्तनपान निरोगी माता आणि निरोगी बाळ
 • मदरफ्रेंडली वर्कप्लेस इनिशिएटिव्ह (एमएफडब्ल्यूआय)
 • हा सर्वांचा अधिकार आहे: स्तनपान
 • स्तनपान महिलांचे सक्षमीकरण
 • स्तनपान आणि काम. लेट अस मेक इट वर्क
 • माझ्याशी बोल! स्तनपान ३ डी अनुभव
 • स्तनपान, जीवनासाठी एक विजयी ध्येय!

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानावर चर्चा करणे, आणि त्याबद्दल जागरूकता पसरवणे हा विषय अजूनही भारतात अनेक ठिकाणी निषिद्ध मानला जातो. तथापि, सुशिक्षित व्यक्ती म्हणून, आपण पुढे आले पाहिजे आणि या विषयाभोवतीचा सामाजिक कलंक दूर करण्यासाठी कार्य केले पाहिजे. एक प्रबुद्ध आणि जबाबदार नागरिक म्हणून, स्थानिक उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये तुमचा सहभाग झाल्यास लक्षणीय फरक करेल.

आणखी वाचा:

स्तनपान आणि कावीळ – कारणे, उपचार आणि प्रतिबंध
स्तनपानाविषयीच्या भारतातील ५ विचारशील योजना

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article