In this Article
सगळ्यांच्या घरी, कुठल्याही वेळेला, कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही ऋतूमध्ये, जेवणात काकडीचा समावेश असतो. सामान्यपणे काकडीची कोशीबींर किंवा सॅलड केले जाते. काकडी स्नॅक म्हणून सुद्धा खाल्ली जाऊ शकते किंवा अन्नपदार्थात तिचा समावेश केला जाऊ शकतो. तुमचे मूल जेव्हा घनपदार्थ घेण्यास सुरुवात करते तेव्हा तुम्ही त्याला काकडी देऊन बघू शकता कारण बाळाला देण्यासाठी काकडी सर्वात सुरक्षित आहे. परंतु बाळाला काकडी योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला दिली पाहिजे. तसेच काकडी देताना काळजी घेतली पाहिजे.
लहान मुले काकडी खाऊ शकतात का?
सर्वसाधारणपणे, जसे इतर घन पदार्थ आणि भाज्या व फळे आपल्या बाळासाठी चांगले असतात तसेच बाळाला काकडी देणे सुद्धा चांगले असते. आपल्या बाळाला काकडी आणि त्यापासून मिळणाऱ्या पोषणातून बरेच फायदे मिळतात. पण त्याची ओळख योग्य वेळी झाली पाहिजे. आपण आपल्या बाळाच्या आहारात काकडी कधी समाविष्ट करू शकता ते शोधा.
तुम्ही तुमच्या मुलाला काकडी कधी देऊ शकता?
लहान मुले सहा महिन्यांची झाल्यावर त्यांना घन पदार्थ देण्यास सुरुवात केली पाहिजे. तथापि, बहुतेक डॉक्टर घनपदार्थ सुरू करण्याबरोबरच, बाळ किमान एक वर्षांचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवण्याची शिफारस करतात. बाळ सहा ते आठ महिन्यांचे झाल्यानंतर आणि डॉक्टरांकडून बाळाची तपासणी करून घेतल्यानंतर तुम्ही बाळाला काकडी देऊ शकता. बाळाला काकडी देताना त्यातील बिया तुम्ही काढून टाकल्याची खात्री करा.
काकडीचे पौष्टिक मूल्य
काकडीमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात ज्यामुळे ती पूर्णपणे निरोगी भाजी बनते. सोललेल्या काकडीच्या १०० ग्रॅम सर्व्हिंगमध्ये, खालीलप्रमाणे पोषणमूल्ये असतात.
पोषक घटक | प्रमाण |
फ्लोराईड | १.३ एमसीजी |
पाणी | ९५ टक्के |
जस्त | ०.२३ मिग्रॅ |
सोडियम | १०.२ मिग्रॅ |
पोटॅशियम | ५० मिग्रॅ |
फॉस्फरस | २५ मिग्रॅ |
मॅंगनीज | ०.०८० मिग्रॅ |
मॅग्नेशियम | १५ मिग्रॅ |
लोह | ०.६० मिग्रॅ |
कॅल्शियम | १० मिग्रॅ |
व्हिटॅमिन के | १६.५ एमसीजी |
व्हिटॅमिन सी | ७ मिग्रॅ |
फोलेट | ७.१ एमसीजी |
व्हिटॅमिन बी ६ | – |
व्हिटॅमिन बी ५ | ०.२६ मिग्रॅ |
नियासिन | ०.२ मिग्रॅ |
रिबोफ्लेविन | ०.०३५ मिलीग्राम |
थायमिन | ०.०३ मिलीग्राम |
प्रथिने | ०.४ ग्रॅम |
चरबी | ०.१ ग्रॅम |
तंतुमय पदार्थ | ०.५२ ग्रॅम |
शर्करा | १.६५ ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | २.५ ग्रॅम |
ऊर्जा | १३ किलो कॅलरी |
लहान मुलांसाठी काकडीचे आरोग्य विषयक फायदे
काकडी खाल्याने तुमच्या बाळाला भरपूर पोषण आणि फायदे मिळू शकतात. काकडीमधील पोषणमूल्ये तुमच्या लहान मुलाला त्याच्या संपूर्ण वाढीमध्ये निरोगी ठेवण्यास मदत करतात.
१. त्वचेच्या समस्या दूर होतात
बाळाची त्वचा खूप संवेदनशील असते. किटक चावण्यापासून ते थोडेसे भाजणे ह्या सारख्या बाह्य हल्ल्याना त्वचा खूप लगेच प्रतिक्रिया देते. असे काही झाल्यास त्वचेच्या त्या विशिष्ट भागास सूज येते. त्वचेला शांतपणा देण्याचा गुणधर्म सर्व स्त्रियांना ज्ञात आहे. काकडीचा तुकडा कापून ह्या सूज आलेल्या भागावर ठेवल्यास वेदनेपासून आराम मिळतो आणि काही प्रमाणात सूज कमी होते.
२. वेदनेपासून आराम प्रदान करते
बाळाची वाढ अद्याप पूर्ण झालेली नसल्याने वेदनाशामक औषधे देणे शक्य नसते. काकडीमध्ये देखील वेदनाशामक गुणधर्म आढळून आलेले आहेत. ते प्रामुख्याने त्यामध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्सच्या उपस्थितीमुळे असतात. काकडीमध्ये असलेले वेदनाशामक गुणधर्म विशिष्ट परिस्थितीमध्ये वेदना कमी करण्यास मदत करतात.
३. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो
काकडी पोटाच्या समस्यांपासूनही आराम देते. ऍसिडिटी असो, अल्सर असो किंवा जठराची कोणतीही समस्या असो, त्यावर काकडीचे सेवन करणे हा एक नैसर्गिक उपाय आहे. काकडी वाफवून त्याचा लगदा करून त्यातील रस पिळून काढून बाळाला देणे हा एक उत्तम मार्ग आहे.
४. सजलीत होण्यासाठी काकडी चांगली असते
कधीकधी, लहान मुले पाणी पिण्यास नकार देतात किंवा कमी पाणी असलेल्या गोष्टी खातात. उन्हाळ्यात जेव्हा खूप भूक लागते तेव्हा असे जास्त होते. अशा परिस्थितीत काकडीचे सेवन करणे चांगले कारण काकडीमध्ये जवळपास ९५ टक्के पाणी असते. तुमच्या लहान मुलाने एखादी काकडी चावून खाल्ल्यास त्याची तहान भागेल आणि शरीरातील आवश्यक क्षार आणि खनिजे पुन्हा भरून निघतील. निर्जलीकरण झाल्यास हे क्षार आणि खनिजे ह्यांचा ऱ्हास होईल.
५. काकडीमध्ये अनेक जीवनसत्वे असतात
काकडीमध्ये असलेली जीवनसत्वे मोजताना तुम्ही दमून जाल. काकडीमध्ये जवळजवळ सर्वकाही आहे, मुलाच्या वाढीस म्हणजे अगदी शारीरिक, न्यूरोलॉजिकल, डोळ्यांचा विकास, रक्त परिसंचरण, लोह संश्लेषण, हाडांचे आरोग्य इत्यादीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी काकडीमध्ये आढळतात.
आपल्या बाळाला काकडी देताना घ्यावयाच्या खबरदारी
बाळासाठी काकडीचे कुठले पदार्थ तयार करता येतील ह्याचा विचार करण्याआधी तुम्ही बाळाला काकडी देताना कुठली खबरदारी घेतली पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे.
- काकडी आणि इतर भाज्यांची प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता. लहान मुलांना त्याची चव आवडू शकते.
- जेव्हा तुम्ही पहिल्यांदा काकडी देता तेव्हा बाळाला ऍलर्जी आहे का ते तपासा. कोणतीही अप्रिय प्रतिक्रिया लक्षात येण्यासाठी काही दिवसांचे अंतर ठेवा. सर्व काही सुरक्षित असल्यास बाळाला काकडी देण्यास हरकत नसते.
- कच्ची काकडी देणे टाळा कारण त्यात जिवाणू असू शकतात. काकडी नेहमी वाफवून आणि उकडून घ्या जेणेकरून प्युरी सहजतेने तयार होईल आणि आत असलेले जिवाणू नष्ट होतील.
- काकडी खाण्यासाठी तयार करण्यापूर्वी त्याचे साल काढून टाका. बाळाचे पोट ते लगेच पचवू शकत नाही.
- निरोगी आणि कोणतेही दोष नसलेली काकडी खरेदी करा. ती कडू नाही याची खात्री करण्यासाठी ती थोडी खाऊन पहा.
बाळांसाठी काकडीच्या पदार्थांच्या पाककृती
इथे काकडी घालून केलेल्या पदार्थांच्या काही सोप्या पाककृती दिलेल्या आहेत.
१. काकडी प्युरी
इथे काकडीच्या प्युरीची पाककृती दिलेली आहे
लागणारे साहित्य
- काकडी – १/२
- तुळशीची पाने–२–३
- आंबट मलई – १ कप
- चीज सॉल्ट किंवा आयोडीन नसलेले मीठ–१/२ टीस्पून
कृती
- काकडी सोलून कापून घ्या आणि बिया काढून टाका. सुसंगतता चांगली होईपर्यंत इतर सर्व घटकांसह मॅश करा. मीठ घाला आणि सर्व्ह करा!
२. दही पुदिना काकडी
चवीसाठी फळे घालून केलेली एक छानशी पाककृती
लागणारे साहित्य
- काकडी – १/२
- पुदिन्याची पाने– २–३
- दही – १ कप
- पेअर – १/२
कृती
- काकडी सोलून कापून बिया काढून टाका. चिरून घ्या, किसून घ्या
- पेपरचे साल काढून फोडी करा. अर्धे पेअर घेऊन किसून घ्या
- एका भांड्यात पुदिन्याची पाने आणि दही घाला आणि चांगले मिक्स करा
- आवश्यक असल्यास ब्लेंडर मध्ये प्युरी करून घ्या
काकडी खूप चविष्ट आहे आणि लहान मुलांना तुम्ही ती देऊ शकता. परंतु जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात काकडी समाविष्ट करण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी बालरोगतज्ञांशी संपर्क साधा. डॉक्टरांनी बाळाला काकडी देण्यास परवानगी दिल्यास ऍलर्जिक प्रतिक्रियांकडे लक्ष ठेवा. बाळासाठी काकडीचे पौष्टिक पदार्थ तयार करा जेणेकरून बाळाला त्यांचा आनंद घेता येईल.
आणखी वाचा:
बाळांसाठी लिंबू सुरक्षित आहे का?
बाळांसाठी केळ्याची पूड: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती