एक कप आले घालून केलेला गरम चहा प्यायल्यावर आपल्याला एकदम तरतरीत वाटते. परंतु गरोदरपणात कुठले पेय प्यावे असा तुम्हाला प्रश्न पडेल. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांश स्त्रिया जाणीवपूर्वक कॉफीपासून दूर राहतात. परंतु मॉर्निंग सिकनेस पासून सुटका करून, मूड फ्रेश करणाऱ्या चहाच्या बाबतीत सर्व नियम बाजूला ठेवले जातात. विशेषतः हर्बल चहापासून अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. […]
जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचाली जाणवणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमचे गरोदरपण एक वास्तव आहे असे वाटणार नाही. तुम्ही गरोदर आहात हे समजण्यासाठीची प्रमुख लक्षणे म्हणजे मळमळ आणि मॉर्निंग सिकनेस ही आहेत. परंतु, एकदा तुमचे बाळ तुम्हाला जाणवतील अशा हालचाली करण्यासाठी पुरेसे मोठे झाले की, तुम्हाला तुमचे गर्भारपण पूर्वीपेक्षा अधिक वास्तविक वाटू लागते! प्रत्येक आईसाठी हा […]
तुम्ही गरोदर असताना, तुम्हाला तुमच्या बाळाविषयी सगळे जाणून घ्यायचे असते. तुमच्या पोटातील बाळाचा, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक आठवड्याला कसा विकास होतो आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असते. जर तुम्ही १७ आठवड्यांच्या गरोदर असाल तर तुमच्या बाळाची किती प्रगती झाली आहे हे जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल. गरोदरपणाच्या १७ व्या आठवड्यातील तुमचे बाळ तुमच्या तळहाताच्या आकाराचे […]
बाळाला मालिश करणे हा बाळाला शांत करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. बाळाच्या आरोग्यासाठी मालिशचे खूप फायदे आहेत. मालिश केल्याने बाळाचे रक्ताभिसरण वाढते, वजन वाढण्यास मदत होते, पचनयंत्रणा सुधारते, तसेच दात येण्याची प्रक्रिया सुद्धा सुलभ होते. तुमच्या छोट्याशा बाळाला मालिश करण्याने तुमचं बाळाविषयीचे प्रेम, काळजी व्यक्त होते तसेच तुमच्या आणि बाळामध्ये एक बंध तयार होतो. बाळाची […]