Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ स्तनपान स्तनपान करताना मधाचे सेवन करणे

स्तनपान करताना मधाचे सेवन करणे

स्तनपान करताना मधाचे सेवन करणे

स्तनपान करणा-या आईला तिच्या आहाराविषयी चिंता वाटते. स्तनपान करताना ती अनेक सामान्य सवयी बदलते. तिच्या बाळाला उत्तम पोषण मिळण्यासाठी ती कॅफीन, अल्कोहोल, लिंबूवर्गीय फळे इ. पदार्थ टाळते. पण, जे अन्न सामान्यतः पौष्टिक मानले जाते त्याचे काय? त्याचे सेवन करणे सुरक्षित आहे? असाच एक अन्नपदार्थ म्हणजे मध होय. मधातील उच्च पोषक मूल्यांमुळे त्याला ‘वितळलेले सोने’ असेही म्हणतात. तर, स्तनपान करत असताना मध खाणे सुरक्षित आहे का? होय, परंतु मध खाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

व्हिडिओ: स्तनपान करताना मध खाणे सुरक्षित आहे का?

स्तनपान करणाऱ्या माता मध खाऊ शकतात का?

होय. स्तनपान करत असताना मध खाणे सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे.  बाळाला स्तनपान करत असताना मध खाण्याबद्दल अनिश्चितता वाटण्याचे कारण म्हणजे बोटुलिझम बीजाणू होय. हा बीजाणू मधामध्ये असू शकतो. जेव्हा थेट मधाचे सेवन केले जाते तेव्हाच हा जिवाणू लहान मुलांसाठी हानिकारक आहे.  परंतु, हे बीजाणू स्तनपानाद्वारे बाळामध्ये संक्रमित होत नाहीत. याचे कारण असे आहे की हे बीजाणू सहजपणे तोडले जातात आणि मोठ्या माणसांच्या शरीरातून काढून टाकले जातात, अशा प्रकारे कोणत्याही विषारी पदार्थांना रक्तप्रवाहात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केले जाते. तसेच, बीजाणू दुधात जाण्यासाठी खूप मोठे असतात. अशाप्रकारे, स्तनपान करणाऱ्या माता जोपर्यंत थेट बाळाला मध देत नाही तोपर्यंत मध खाऊ शकतात.

स्तनपान करताना मध घेताना घ्यावयाची खबरदारी

  • आपले हात नियमितपणे स्वच्छ करा. मध खाल्ल्यानंतर हाताच्या स्वच्छतेची खूप काळजी घ्या जेणेकरून बाळाचे हात आणि ओठ अन्नाच्या संपर्कात येणार नाहीत.
  • मध तुमच्या त्वचेवर किंवा स्तनांवर कुठेही लावू नका, कारण तुमचे बाळ त्याच्या संपर्कात येऊ शकते.
  • कधीही, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला मध देऊ नका – अगदी धार्मिक कारणांसाठीही नाही.
  • कच्च्या मधाऐवजी फिल्टर केलेल्या मधाचा वापर करा.
  • मध कमी प्रमाणात घ्या. जर तुमचे कुटुंब गोड पदार्थ म्हणून मध नियमितपणे वापरत असेल, तर तुम्ही काही पदार्थांमध्ये गुळाचा पर्याय निवडू शकता.
  • मधाचे सेवन कोमट द्रवपदार्थात घालून करा. द्रवपदार्थ गरम असू नये कारण गरम द्रव मधातील पोषक आणि निरोगी एन्झाईम्सच्या कार्यात अडथळा आणू शकतात.

मधु खाती आई

स्तनपान करत असताना मध खाण्याचे फायदे

  • हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे आणि साखरेपेक्षा आरोग्यदायी आहे.
  • सर्दी आणि घसा खवखवण्यावर हा एक उत्तम उपाय आहे.
  • मध इतर खाद्यपदार्थांसोबत चांगले काम करते.रात्री मध घालून दूध घेतल्यास झोप चांगली लागण्यास मदत होते.
  • मधामध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोजची उच्च पातळी असते, त्यामुळे शारीरिक क्षमता वाढते आणि ऊर्जा मिळते.
  • मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

मध खाणे कधी टाळावे?

मध हे एक आरोग्यदायी अन्न आहे आणि ते तुमच्या आरोग्यासाठी मदत करते. स्तनपानादरम्यान मधाचे सेवन टाळले पाहिजे असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु, विशिष्ट परिस्थितीत मध खाणे टाळले पाहिजे.

  • तुमचे बाळ जवळ असताना मध खाऊ नका. हे फक्त अपघात टाळण्यासाठी आहे.
  • ‘मॅड हनी’, हा मधाचा प्रकार रोडोडेंड्रॉनच्या फुलांच्या प्रजातींपासून तयार होतो, त्यात ग्रेयानोटॉक्सिन असतात त्यामुळे ह्या मधाचे नियमित सेवन न करणे चांगले. खरेदी करण्यापूर्वी पॅकवरील घटकांची यादी काळजीपूर्वक वाचा.
  • तुमचे डॉक्टर जोपर्यंत एखाद्या सुप्रसिद्ध ब्रॅण्डचा मध तुमच्यासाठी लिहून देत नाहीत तोपर्यंत साधा स्थानिक मध वापरा. तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या आहारातील गरजांसाठी लिहून दिला आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. स्तनपानादरम्यान मध आणि दालचिनी खाणे सुरक्षित आहे का?

अंगावरील दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी  मध, दूध आणि दालचिनी पावडर यांचे मिश्रण उत्तम आहे. त्यामुळे, मध आणि दालचिनी खाणे हे केवळ आरोग्यदायीच नाही तर दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे.

2. बाळाला स्तनपान देत असल्यास आले आणि मधाचा चहा घेणे योग्य आहे का?

होय, आले आणि मधाचा चहा सर्दी आणि घसा खवखवण्यापासून आराम देतो आणि विशेषत: स्तनपान करताना.अॅलोपॅथी औषधांपेक्षा तो एक चांगला नैसर्गिक उपाय आहे.

3. मी मनुका मध खाऊ शकते का?

मनुका मध हा न्यूझीलंडमध्ये आढळणाऱ्या मनुका वनस्पतीपासून मिळतो. हा एक चांगला अन्न पदार्थ  आहे कारण त्यात अनेक उपचारात्मक गुणधर्म आहेत. मनुका मध हा मधाचा सर्वोत्तम प्रकार देखील मानला जातो. ह्या मधाचे सेवन नव्याने आई झालेल्या स्त्रिया करू शकतात. परंतु, काहीही खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

4. बोटुलिनम बीजाणू माझ्या बाळावर कसा परिणाम करू शकतात?

जेव्हा 1 वर्षापेक्षा कमी वयाचे बाळ ह्या बीजाणूंच्या थेट संपर्कात येते किंवा हे बीजाणू गिळते तेव्हा त्यांचे पचन होत नाही त्यामुळे त्यांची मोठ्या आतड्यात वसाहत होते आणि बोट्युलिनम विष तयार होते. सुरुवातीच्या टप्प्यात, ह्यामुळे स्नायूंना हानी पोहोचते आणि अशक्तपणा येतो. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल व्हावे लागते. स्नायू आणि नसांना कायमचे नुकसान होऊ शकते. परंतु असे  नेहमीच होत नाही.

5. मधावर प्रक्रिया करताना बोट्युलिनमचे बीजाणू काढले जाऊ शकतात का?

नाही. बोटुलिनम बीजाणू मधामध्ये फार क्वचितच असतात. हे उघड्या डोळ्यांना दिसत नाही किंवा प्रक्रिया करून काढले जाऊ शकत नाही.

6. मी माझ्या बाळाचे बोटुलिनमपासून संरक्षण कसे करू शकतो?

बाळाला बोटुलिझम फक्त अन्नामुळे होत नाही तर दूषित मातीमुळे देखील होऊ शकते. आपल्या बाळाचे संरक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंध करणे आणि बाळाचे संरक्षण करते. एक वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बाळाला (थेट किंवा कॅन केलेला) मध देणे टाळा. धूळ आणि मातीच्या संपर्कात येण्यापासून बाळाचे रक्षण करा.

मध हे पॉवर-पॅक अन्न आहे. स्तनपान करणा-या आईला मधापासून अनेक पोषक तत्वे मिळतात. परंतु, तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांमध्ये केव्हाही बदल करू शकता. जर मध खाण्याच्या कल्पनेने तुमच्यावर ताण येत असेल तर ते टाळणे चांगले. स्तनपान केल्याने बाळाचे कधीही नुकसान होणार नाही.  खरं तर, बाळाला बोटुलिझमची लागण झाली असेल तर  बाळाला वारंवार स्तनपान करण्यास सांगितले जाते. स्तनपान करणार्‍या मातांनी बाळाचे संरक्षण आणि पालनपोषण करण्यास सक्षम होण्यासाठी सावध राहणे आवश्यक आहे.

आणखी वाचा: 

 स्तनपान वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार – अंगावरील दूध वाढवण्यासाठी वनौषधी

शाकाहारी, मांसाहारी आणि वेगन आहार घेणाऱ्या स्त्रियांसाठी स्तनपान आहार विषयक टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article