Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे २८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमच्या बाळामध्ये आता खूप ऊर्जा आहे आणि ते सतत हालचाल करीत असते. या वयात, आपल्या बाळाच्या मेंदूचा विकास महत्त्वपूर्ण पद्धतीने झाला आहे. तुमच्या बाळाच्या विकासाच्या महत्वाच्या टप्प्यांचा पाठपुरावा करणे ही एक चांगली कल्पना असेल परंतु बाळाचा तसा विकास होत नसेल तर काळजी करू नका. विकासाचे टप्पे हे नियम नसून आपल्याला बाळाच्या प्रगतीची चांगली कल्पना येण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे असतात.

२८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

२८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळाच्या स्नायूंना बळकटी मिळाल्यामुळे २८ आठवड्यांच्या बाळाचे वजन त्याच्या जन्माच्या वेळेच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त असते. तुमचे बाळ आत्ताच रांगायला शिकले असेल, म्हणून बाळ तोंडात घालून गुदमरू शकेल अशा वस्तू शक्यतो दूर ठेवा. बाळाचे पालथे पडणे देखील सामान्य आहे आणि तुमचे बाळ सुद्धा कदाचित सर्वत्र फिरण्याचा पर्याय निवडेल.

बाळांमध्ये हालचालींची निवडलेली पद्धत मोठ्या प्रमाणात बदलते, म्हणून त्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले जाऊ नये. काही बाळे अजूनही रांगण्याचा प्रयत्न करीत असतील, परंतु काही बाळे कदाचित उभे राहण्यासाठी धडपडत असतील. बाळाच्या मेंदूचा विकास होत आहे. मेंदू स्नायू नियंत्रित करू लागतो. उभे राहणे आणि चालणे यावर नियंत्रण ठेवले जाते. आता तुमच्या बाळाला आधीपेक्षा जास्त भूक लागेल. भूक वाढणे सामान्य आहे, कारण बाळाला त्याच्या वेगवान हालचाली आणि मेंदूच्या विकासास सामर्थ्य देण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा आवश्यक असते. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी देखील या काळात बर्‍याच उर्जेची आवश्यकता आहे आणि बाळाच्या शरीराला विश्रांती घेण्यासाठी फारच कमी वेळ असेल. कोणत्याही प्रकारे, या कालावधीत बाळाचा सर्वप्रकारे वेगवान विकास होतो.

अठ्ठावीस आठवड्यांचा बाळाचे वाढीचे टप्पे

आतापर्यंत बाळाने काही विकासाचेटप्पे पार करण्याचे बंधन असले तरी प्रगती हळू होणे हे ठीक आहे. हे टप्पे नियम नाहीत, तर त्याऐवजी पालकांना वाढ कशी होत आहे याची कल्पना येण्यास मदत करणारी मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

  • रांगणे आता सामान्य होईल, तुमचे बाळ त्याला आवडेल तिकडे आता हालचाल करू शकेल. बाळ आता फ़र्निचरला धरून उभे राहू लागले आहे आणि तुमचे बाळ विकासाच्या मार्गावर पुढे आहे
  • बाळ आधाराने उभे राहू लागेल त्यामुळे त्याच्या पायाचे आणि घोट्याचे स्नायू मजबूत होतील आणि त्यामुळे चालण्यास मदत होईल
  • विशेषत: जर तुम्ही जवळ काही फर्निचरची व्यवस्था केली असेल तर तुमच्या बाळाने आधाराने चालणे सामान्य आहे

बाळाचा आहार

या वयात, तुम्ही तुमच्या बाळास आईच्या दुधाशिवाय इतर घन आहार दिलेला असेल. तथापि, काही बाळांचा अद्याप घन आहाराकडे कल नसेल. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की बाळाच्या आहारात नियमितपणे घन आहाराचा समावेश फक्त एक वर्षाच्या वयातच होतो. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारे बाळावर घन आहाराची सक्ती करु नये. कौटुंबिक जेवणाच्या वेळी बाळाला सोबत घेऊन त्याच्या समोर तुम्ही जे अन्नपदार्थ खाता ते ठेवून बाळाला उत्तेजन देऊ शकता. परंतु जेवण संपल्यानंतर जे काही शिल्लक आहे ते काढून टाकण्याचे लक्षात ठेवा. तुम्ही बाळाला जबरदस्तीने घन पदार्थ खायला घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे बाळाला त्याबाबत नकारात्मक दृष्टिकोन तयार होईल आणि बाळ घन पदार्थ खाण्यास नकार देईल. १२ महिन्याचे झाल्यावर बाळ कुटुंबातील सदस्य जे अन्नपदार्थ खातात ते खायला सुरूवात करण्याची शक्यता आहे. ह्या काळात बाळाच्या तोंडात दोन दात दिसू लागतील.

या वयात मुलांमध्ये आढळणारी सामान्य समस्या म्हणजे जीभ अडखळणे ज्याला इंग्रजीमध्ये टंग टायअसे म्हणतात. याचा अर्थ असा होतो की बाळाने खाल्लेले अन्नपदार्थ तोंडाच्या मधल्या भागात आणि गिळण्यासाठी मागच्या भागात ढकलू शकत नाही. चावणे ही देखील एक समस्या बनते कारण, व्यवस्थित चावण्यासाठी अन्न बाजूला नेऊ शकत नाही. घनपदार्थ दिल्यावर उद्भवणाऱ्या काही लक्षणांमध्ये घनपदार्थ घशात अडकणे, खोकणे किंवा उलट्या होणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. तुमच्या लक्षात ही बाब आल्यास, बालरोगतज्ज्ञांना भेट देणे चांगले आहे. तो जीभेच्या कार्यप्रणालीचा आढावा घेईल आणि स्तनपान करवण्याच्या दिवसात ही समस्या होती का ते तपासतील.

झोप

२८ आठवड्यांच्या बाळासाठी, झोप विघटनकारी होईल. रात्री अयोग्य वेळी बाळ उठून तुमचे लक्ष वेधण्यासाठी रडण्यास सुरुवात करेल. असे होण्याचे कारण म्हणजे बाळ झोपलेले असताना स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी स्नायू ताणले जातात.

या काळात पालकांसोबत झोपायला अधिक प्राधान्य दिले जाते. जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मुलाच्या गरजा भागवू शकतील. बाळ पालकांसोबत त्याच बिछान्यावर झोपते. सोबत झोपताना त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे पाळली पाहिजेत जेणेकरून बाळाला आणि पालकांना त्रास होणार नाही. ह्या काळात, तुमचे बाळ स्तनपान घेताना लॅच होणे आणि विलग होणे करू शकेल. म्हणून स्तनपान देताना आई झोपू शकते आणि त्यामुळे आईची झोप सुलभ होते.

२८ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

  • दात येतानाची खेळणी दिल्यामुळे बाळाला दिलासा मिळेल, कारण या काळात बाळाला दात येण्यास सुरुवात होईल. तुम्ही अधूनमधून तुमच्या बाळाला थंडगार वस्तू देऊ शकता जेणेकरून त्या वस्तू चावल्यावर दात येतानाची अस्वस्थता कमी होईल
  • एकाच बिछान्यावर आई आणि बाळ झोपणे सोपे आहे, परंतु रात्री तुमच्या बाळाला झोपण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल याची खात्री करा
  • जर बाळाला प्युरी किंवा मॅश केलेल्या पदार्थांचे सेवन करण्यासही अडचण येत असेल तर जीभ अडकण्याची (टंग टाय) ची शक्यता तपासणे आवश्यक आहे
  • बाळाला घन पदार्थ खाण्यास भाग पाडू नका, कारण यामुळे दीर्घकाळ वाईट संगती निर्माण होऊ शकते

चाचण्या आणि लसीकरण

वयाच्या चार ते सात महिन्यांच्या कालावधीत बाळाला मोठ्या प्रमाणात लस दिली जाईल. डीटीपी, पोलिओ लस, हेप बी, हिब, पीसीव्ही आणि रोटाव्हायरस लसींचा समावेश असणार्‍या अनेक लसींचा तिसरा डोस यावेळी देण्यात येईल. त्यामुळे हे सुनिश्चित होते की बाळाला डिप्थीरिया, पोलिओ, टिटॅनस, हिपॅटायटीस बी, फ्लू आणि इतर काही आजारांसारखे आजार होणार नाहीत. जर डॉक्टरांना असे वाटले की आपल्या बाळाला मेनिन्जायटीसचा संसर्ग होण्याचा धोका आहे तर आपल्या बाळासाठी मेनिन्गोकोकल लस देखील दिली जाईल.

खेळ आणि क्रियाकलाप

बाळाचे वजन पेलण्याइतपत बाळाचे पाय आणि पायांचे स्नायू पुरेसे मजबूत झाले आहेत, त्यामुळे तुमचे बाळ तुम्हाला जागेवर उड्या मारताना दिसेल किंवा कशाच्या तरी आधाराने चालताना दिसेल. जर तुमचे बाळ तुमच्या मांडीवर उड्या मारत असेल तर तुमच्या हातानी त्याच्या खांद्याला धरून आधार द्या त्यामुळे त्याचे पाय लवकर विकसित होतील.

आता बाळासाठी वस्तू पकडणे आणि फेकणे हे सामान्य आहे, जर तुम्ही बाळाला त्याची आवडती खेळणी फेकण्यास परवानगी दिली तर तो चांगल्या पद्धतीने विकसित होण्यास मदत होईल. तसेच, बाळाने फेकलेली खेळणी तुम्ही परत आणणे शक्य तितके टाळावे म्हणजेच ते घेण्यासाठी बाळाला पुढे जाऊ द्यावे. अशा प्रकारे त्याच्या पायांच्या स्नायूंना एक उत्तम व्यायाम मिळण्यास मदत होईल. जमिनीवरच्या खेळांना खूप प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे, कारण यामुळे बाळास उभे राहण्यास आणि लवकर चालण्यास मदत होते.

या वयात तुमचे बाळ ऐकण्यास देखील उत्सुक असेल. बोबडे शब्द बोलून बाळ सुद्धा संभाषणात सहभागी होईल, आणि अशारितीने दुसऱ्या वर्षात जेव्हा संभाषण विकास होतो त्यासाठी स्वर तयार होईल. संभाषणाची बोला आणि विराम द्याही प्रक्रिया त्याला समजली असेल. त्याचे पालक जेव्हा त्याच्याशी बोलतात तेव्हा तो खूप आनंद घेईल. त्याच्या मेंदूला आणखी उत्तेजन देण्यासाठी, बाळाचे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच्याशी बोलू शकता आणि नंतर थोडी वाट पाहू शकता जेणेकरून तो त्याची वेळ आल्यावर पुन्हा बोलू शकेल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

लसीकरणानंतर, तुमच्या बाळाला ताप येणे किंवा लसीच्या ठिकाणी पुरळ उठणे सामान्य आहे. तथापि, ही लक्षणे काही काळ राहिल्यास, डॉक्टरांना भेट देणे चांगले. जर तुम्हाला आतून बाळामध्ये काही वेगळे जाणवले तर लगेच त्याला डॉक्टरांकडे न्या. नेहमीच खेद करण्यापेक्षा सुरक्षित असणे चांगले आहे.

एका क्षणासारखे कदाचित हे सात महिने निघून गेले असतील परंतु विकासाच्या बाबतीत, आपले बाळ बर्‍यापैकी पुढे गेले आहे. बाळ आता बसू लागला आहे तसेच तो उभे सुद्धा राहू शकतो. त्याने घनपदार्थ घेण्यास सुरुवात केलेली आहे. या कालावधीत तुमच्या बाळासोबत भरपूर आनंद घ्या.

मागील आठवडा: तुमचे २७ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे २९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article