मराठी
English
हिन्दी
বাংলা
Firstcry Parenting
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास ३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे

३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे

३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाची खूप वेगाने वाढ होत आहे आणि जरी तुमच्या बाळामुळे तुमची धावपळ होत असली तरी पुढच्या येणाऱ्या काही महिन्यांच्या प्रत्येक क्षणाच्या तुम्ही प्रेमात पडाल. तुमच्या लहानग्याच्या वाढीच्या टप्प्यांवर लक्ष ठेवल्यास बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे ह्याची खात्री पटेल आणि बाळाच्या विकासात  उशीर होत असेल तर त्याचे अचूक निदान करून त्यास तुम्हाला प्रतिबंधित करता येऊ शकेल.

३ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता 

इथे ३ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता दिला आहे त्याद्वारे आत्तापर्यंत कुठले टप्पे पार केले आहेत आणि कुठल्या टप्प्यांची वाट पाहायची आहे ह्याची झलक आपल्याला दिली आहे.

बाळाने पार पडलेले विकासाचे टप्पे ह्या पुढील विकासाचे टप्पे 
४५ अंशाच्या कोनात मान वळवते ९० अंशाच्या कोनात मान वळवते 
अनोळखी व्यक्तींजवळ शांत राहते अनोळखी व्यक्तींसोबत अस्वस्थ होते 
दृष्टीक्षेपात असलेल्या वस्तूंचा मागोवा घेते दृष्टिक्षेपाच्या बाहेरील वस्तूंचा मागोवा घेते 
उभे धरल्यावर पाय खाली दाबते उभे धरल्यास पायावर भार देते 
काही क्रियांचे अनुकरण करते खूप क्रियांचे अनुकरण करते 
जवळच्या वस्तू उचलते दूरच्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करते
जवळच्या वस्तू हलवते वस्तू कोपऱ्यात फेकते आणि काही जागांवर फेकून मारते 

काही प्रमुख  विकासाचे टप्पे जे तुमच्या बाळाने आतापर्यंत पार पाडले पाहिजेत

प्रमुख विकासाचे टप्पे हे ५ प्रकारचे असतात आकलन विषयक, शारीरिक, सामाजिक, भावनिक, दृष्टीविषयक व श्रवणशक्ती तसेच संवादकौशल्य विकास. इथे ३ महिने वयाच्या बाळाचे विकासाचे टप्पे दिले आहेत.

आकलन विषयक  विकासाचे टप्पे 

आकलन विषयक  विकासाचे टप्पे 

 • क्रियांचे अनुकरण करते तुम्ही स्वयंपाक, स्वच्छता किंवा काहीतरी छान मजेदार करत असाल तर तुमचे बाळ तुमची नक्कल करते आणि तुमच्या काही क्रियांचे अनुकरण करते 
 • गालातल्या गालात हसणे तुम्ही बाळाशी काही बोललात तर ते गालातल्या गालात हसते, बडबड करते. अशा प्रकारे बाळ तुम्हाला प्रतिसाद देते.
 • मान वळवते तुम्ही किंवा इतर कुणी आवाज केला तर तुमचे बाळ कुठून आवाज आला आहे हे जाणून घेण्यासाठी त्या दिशेने मान वळवते.
 • अंतरावरून चेहरे वाचते तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना आता बाळाच्या जवळ जाण्याची गरज नाही, बाळ काही अंतरावरून लोकांना ओळखू लागेल 

शारीरिक विकासाचे टप्पे 

 • मान वळवून पाहणे बाळाच्या दृष्टिक्षेपापासून तुम्ही एखादी वस्तू बाजूला केलीत तर बाळ मान वाळवून त्या वस्तूचा मागोवा घेईल.
 • ४५ अंशाच्या कोनात मान वळवते पोटावर झोपवल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ ४५ अंशाच्या कोनात मान उचलेल किंवा वळवेलह्या प्रक्रियेमध्ये बाळाचे मानेचे स्नायू मजबूत होतील.
 • आधाराने शरीराचे वजन पेलते जेव्हा तुम्ही बाळाला वर उचलून धरता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बाळ पायांवर त्याचे वजन उचलून धरते. जरी बाळ एकटे स्वतःचे स्वतः उभे राहू शकत नसेल तरी तुमच्या आधाराने ते उभे राहील.
 • कमी झोप तुमचे बाळ जेव्हा ३ महिन्यांचे होईल तेव्हा बाळाची झोप कमी होईल. तुमच्या लक्षात येईल की बाळ आता १६ तास झोपण्याऐवजी १५ तास झोपू लागेल विशेष करून रात्रीच्या वेळी.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

 • भावंडांशी संवाद साधणे तुमच्या बाळाला आता भावंडे समजू लागतील आणि बाळ त्यांच्यासोबत वेगवेगळे आवाज काढून संवाद साधू लागेल.
 • अनोळखी लोकांसमोर शांत बसेल तुमच्या बाळाला अनोळखी व्यक्तीसोबत अनुकूल वाटणार नाही. काही बाळे अनोळखी व्यक्तींसोबत चिंतीत होतात.
 • बाळाचे पहिले हसू ३ऱ्या ते ४थ्या महिन्यांच्या दरम्यान तुम्ही तुमच्या बाळाचे हसू पहिल्यांदा  पहाल.
 • बाळ तुमच्याकडे बघून हसू लागेल बाळाचे आई बाबा किंवा बाळाची काळजी घेणाऱ्या लोकांसोबत बाळ अभिवादन केल्याप्रमाणे हसेल. ज्यांना बाळ ओळखते फक्त त्यांच्यासोबतच ते हसते, अनोळखी व्यक्तींसोबत बाळ हसत नाही.

दृष्टी आणि ऐकू येण्याविषयक विकासाचे टप्पे 

 • तीव्र परस्परविरोधक तुमच्या बाळाला गडद रंगांची खेळणी बघताना आनंद होईल  तसेच बाळाला काळा आणि पांढरा अशा तीव्र परस्परविरोधक रंगांची सुद्धा सवय होईल.
 • चेहऱ्याचे निरीक्षण करणेतुमच्या बाळाला नवीन चेहऱ्यांची सवय होईल आणि लोकांच्या डोळ्यात काही वेळ पहात राहील. जर तुम्ही बाळाच्या पाळण्यात आरसा दिला तर बाळ स्वतःच्या चेहऱ्यावरील भाव बघत बसेल 
 • तुमच्या आवाजाला प्रतिसाद देईल: तुमचे बाळ तुमचा आवाज ओळखेल आणि त्याच्याभोवतालच्या आवाजाला बडबड करून प्रतिसाद देईल.
 • डोळ्यांनी वस्तूंचा मागोवा घ्या: तुमचे बाळ त्याच्या दृष्टिक्षेपाच्या बाहेरील वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी मान वळवून बघू लागेल. बाळ तुमच्या हालचालींचा मागोवा घेईल आणि तुम्ही कुठे जात आहात हे सुद्धा दुरून बघेल.

संपर्क कौशल्य विकासाचे टप्पे 

 • सामाजिक हास्य: जर बाळाला एखादी अनोळखी व्यक्ती माहिती असेल किंवा एखाद्या मित्राला बाळ नेहमी भेटत असेल तर त्यांना भेटल्यावर बाळ आनंदाने त्यांच्याकडे बघून हसते. परंतु हे तेव्हाच घडते जेव्हा बाळाला नवीन चेहऱ्यांची सवय होते.
 • हावभाव ह्या वयात बाळ फक्त रडून संवाद साधत नाही तर ते संवाद आणि प्रतिसादासाठी तुमची नक्कल करते.
 • कमी रडते पुन्हा बाळाच्या रडण्याकडे येउयात. तुमचे बाळ आता दिवसभरात एक तासापेक्षा जास्त काळ रडणार नाही.
 • खूप जास्त आवाज: तुमचं बाळ आता बडबड करू लागेल आणि ‘ ‘आहअसे वेगवेगळे आवाज संवाद साधण्यासाठी काढेल. तसेच बाळ तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघेल आणि त्यानुसार वेगवेगळे आवाज काढेल.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

 • प्रतिसाद देत नसेल तर जर तुमचा चेहरा बघून किंवा इतर लोक बाळाशी बोलत असून सुद्धा बाळ प्रतिसाद देत नसेल तर बाळाच्या विकासामध्ये गंभीर उशीर झाला आहे.
 • बडबड करत नसेल तर जर तुमचे बाळ कुठलेही आवाज काढत नसेल किंवा बडबड करत नसेल तर सावध राहण्याची गरज आहे 
 • बाळ डोके टेकवत असेल तर जर तुमचे बाळ स्वतःचे स्वतः मान धरत नसेल तर काहीतरी समस्या आहे असे समजावे.
 • वस्तू पकडू किंवा धरून ठेवू शकत नसेल तर जर बाळाला खेळणी खेळण्यात रस वाटत नसेल कारण बाळाला खेळणी धरता येत नसतील किंवा बाळ खेळणी तोंडात घालत नसेल तर ते लक्षण सांगण्याची गरज आहे.

तुमच्या ३ महिन्यांच्या बाळाने विकासाचे टप्पे गाठावेत म्हणून मदतीसाठी काही टिप्स 

विकासाचे टप्पे लवकर गाठता यावेत म्हणून काही मार्ग 


 • पोटावर झोपवण्याचे खेळ बाळाला पोटावर झोपवून खेळायचे खेळ बाळासोबत खेळा त्यामुळे मानेच्या स्नायूंच्या हालचालीस प्रोत्साहन मिळेल. खूप वेळ पोटावर झोपवणे म्हणजे रांगण्याच्या क्रियेकडे जलद संक्रमण होय.
 • तुमच्या बाळाशी बोला जरी बाळाला पहिल्यांदा काही समजत नसेल तरी तुमच्या बाळाबरोबर बोलत रहा. तुमचा दिवस कसा गेला किंवा रात्री जेवायला काय काय केले आहे इत्यादी. बाळाची ऐकण्याची क्षमता आणि शब्दसंग्रह ह्यामुळे सुधारित होईल.
 • शब्दांनुसार हावभाव करा तुम्ही जर शब्दांनुसार हावभाव केलेत तर तुमचे बाळ त्याचा संबंध लवकर जोडेल. नियमीत बोलत राहिल्याने बाळ अवचेतन स्तरावर तोंडी माहितीवर प्रक्रिया करण्यास शिकेल.
 • खेळण्यांबरोबर खेळणे खेळण्यातील आगगाडी हे तुमच्या बाळाला हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेण्यास शिकवण्याचे उत्तम उदाहरण आहे. खेळण्यातील कार ला दोरा लावून इकडे तिकडे फिरवा आणि बाळाला रंगून ती कार पडण्यास प्रोत्साहन द्या.

विकासाचे टप्पे गाठण्यासाठी कुठलाही जादुई फॉर्मुला नाही. फक्त नियमित सराव करत राहा. तुमच्या बाळासोबत सौम्य राहा आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर बाळ विकासाचे टप्पे गाठेल.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article