Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ दर महिन्याला होणारा बाळाचा विकास तुमचे २९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे २९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

२९ आठवड्यांच्या वयापर्यंत, तुमच्या बाळास तिच्या सभोवतालची माहिती झालेली आहे आणि मूलभूत बाह्य उत्तेजनांना जसे की आवाजाला बाळ प्रतिसाद देऊ लागलेले आहे. इतकेच नाही तर, काही वेळेला बाळ त्याच्या मागण्यांसाठी हट्ट करते. हे सर्व सामान्य आहे का? या लेखाच्या माध्यमातून, तुम्ही २९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा करू शकता याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू.

२९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

२९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २९ आठवड्यांच्या बाळाची वाढ अतिशय वेगाने होत आहे. हि वाढ वेगवेगळ्या स्तरांवर असू शकते. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे दुधाचे दात, हे दुधाचे दात आता सगळ्यांना दिसू लागतात. तुमच्या छोट्या बाळाचे जवळजवळ तीन लहान दात बाहेर येऊ शकतात. तुम्हाला लक्षात येईल की बर्‍याचदा हे दात थोडे वाकलेले असतात आणि सरळ नसतात. काळाच्या ओघात ते सरळ होतील त्यामुळे हे चिंतेचे कारण नाही. नियमित सराव केल्यास, तुमच्या बाळाचे हात आणि डोळ्याचे समन्वय सुद्धा लक्षणीयरित्या सुधारित होण्याची शक्यता आहे. तसेच, बाळ आता रांगू लागले आहे आणि बाळाचे पायाचे स्नायू आधीपेक्षा बळकट झालेले आहेत.

परंतु या काळात आपण केवळ शारीरिक विकासच लक्षात घेत नाही. तिला होआणि नाहीअशा साध्या शब्दांचा अर्थ समजणे शक्य आहे. तिने तोंडी प्रतिसाद दिल्यास आश्चर्यचकित होऊ नका. तथापि, हा प्रतिसाद काही वेळेला अगदी अचूक किंवा शुद्ध असू शकत नाही. दुसरे म्हणजे, तुम्ही तिच्याकडून परिस्थितीनुसार आनंद आणि दुःख यासारखी मनःस्थिती विकसित करण्याची अपेक्षा करू शकता. शेवटी, तिच्या सभोवतालच्या वातावरणाविषयी तिची जागरूकता वाढलेली असेल आणि तिला दिवस व रात्र यांच्यात फरक लक्षात येऊ लागेल.

२९ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

तुमच्या बाळाने पूर्ण केलेले वाढीचे टप्पे खालीलप्रमाणे

  • बाळाचे स्नायू मजबूत झाल्यामुळे, तुमचे बाळ सरळ बसू शकते तसेच सरळ उभे सुद्धा राहू शकते. पण बाळ उभे राहताना ते आधार घेऊन उभे राहील. काही असामान्य वाढ असलेल्या बाळांनी कोणत्याही मदतीशिवाय उभे राहण्याची कला आत्मसात केली असेल, परंतु यावेळी बाळ चालणे किंवा फर्निचरचा आधार घेऊन चालणे अशक्य आहे.
  • तुमच्या बाळाचा शब्दसंग्रह मूलभूत आहे आणि काही निरीक्षकांना तो अस्तित्वात नसल्यासारखेही वाटू शकते. तथापि, बाळाचे बोबडे बोल ही स्वतःच एक भाषा आहे हे आपल्या लक्षात आले तर ते चुकीचे ठरणार नाही. याचा अर्थ असा आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्याशी संवाद साधण्याच्या मार्गावर तुमचे बाळ आहे.
  • २९ आठवड्यांचे बाळ चिडखोर आहे परंतु हा विकासाचा टप्पा नाही. तथापि, हे सूचित करते की ती स्वत: आणि आईमधील अंतरांची संकल्पना शिकत आहे. याबद्दल पालक दोन प्रकारे विचार करू शकतात. बाळाला रडू दिल्याने बाळ स्वावलंबी होईल असा काही पालक विचार करतात तर काही पालकांच्या मते बाळाला लगेच प्रतिसाद दिल्यास बाळाला भावनिकदृष्ट्या आधार मिळेल आणि त्याचा बाळाला दीर्घकाळासाठी फायदा होईल.

बाळाचा आहार

आतापर्यंत, तुमच्या बाळाची पुरेशी वाढ झालेली आहे. तुम्ही आधीच तिला प्युरीचा स्थिर आहार देत आहात जो खायला आणि पचवायला सोपा आहे. तथापि, आता बाळाला फिंगर फूड देण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये वाफवलेल्या भाज्यांसारखा पोषक आणि वापरण्यास सुलभ पर्यायाचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या बाळासमोर दोन पदार्थ ठेवू शकता आणि तिला कुठले योग्य आहे ते तिला ठरवू द्या. तसेच आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या वयातल्या मुलांमध्ये अजूनही खूप गॅग रिफ्लेक्स असतो. ही क्रिया कधीकधी गुदमरल्यामुळे गोंधळात टाकू शकते, कृपया आपल्या बाळाला खायला घालत असताना हे लक्षात घ्या

बाळाची झोप

२९ आठवड्यांच्या बाळाची झोप कधीकधी बऱ्याच काळासाठी अखंडित होऊ शकते. तथापि, खाली दिलेल्या कारणांमुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

  • दात देणे: बाळाला जेव्हा दुधाचे दात येऊ लागतात तेव्हा तिला वेदना होऊ शकतात. याचा परिणाम तिच्या झोपेच्या चक्रावर नक्कीच होईल आणि तिला रात्री जागे राहण्यास प्रवृत्त करेल
  • रात्रीचे स्तनपान: बर्‍याच बाळांना यापुढे रात्रीचे स्तनपान आवश्यक नसले तरीही असे बरेच लोक आहेत जे ह्याचा आग्रह धरतात. हे सामान्य आहे आणि तुम्ही हळू हळू बाळाचे स्तनपान सोडवले पाहिजे.
  • शारिरीक विकास: जसजसे तुमचे बाळ वेगाने वाढते, तसे मेंदूचा विकास देखील होतो. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जेव्हा एखादे मूल रांगायला शिकते तेव्हा झोपेच्या चक्रावर त्याचा गंभीर परिणाम होतो

२९ आठवड्यांच्या बाळाच्या काळजीविषयक टिप्स

  • आपल्या लहान बाळासाठी बेबी वॉकर वापरणे टाळा. जरी ते मदत करीत असल्यासारखे दिसत असले तरी ही मदत एक भ्रम आहे. खरं तर, हे प्रतिकूल आहे कारण ते तुमच्या बाळाला तिच्या स्नायूंचा पूर्णपणे वापर करण्यास प्रतिबंधित करते, त्यामुळे योग्य विकास होत नाही आणि त्याऐवजी, चालण्यास उशीर होतो. बाळाची वॉकरशी संबंधित असलेली आणखी एक समस्या म्हणजे अपघात होण्याची संभाव्यता. या अवस्थेत बाळांना फारच कुतूहल असते आणि त्यामध्ये जोडलेली चाके अपघाताचे कारण बनू शकतात. उदाहरणार्थ, बाळ वॉकर ने पायऱ्यांपाशी जाऊन पोहोचते आणि दुर्दैवी अपघातास कारणीभूत ठरू शकते
  • २९ आठवड्यांचे बाळ हातात येऊ शकणार्‍या कोणत्याही गोष्टीने आकर्षित होईल. महागड्या चायना, पोर्सिलेन डिशेस आणि क्रिस्टल ग्लासेस ह्यांची विशेष आवड बाळाला निर्माण होते आणि बाळ ते फोडू शकते किंवा त्यास नुकसान पोहोचवू शकते
  • तुम्ही तुमच्या बाळाच्या आवाक्यात मौल्यवान किंवा विषारी वस्तू असलेल्या सर्व निम्नस्तरीय कपाटे आणि ड्रॉअर्सला लॉक केले असल्याचे सुनिश्चित करा. बाळाचा हात तिथे पोहोचणार नाही असे म्हणून बाळाच्या हाताच्या कौशल्याला कमी लेखू नका
  • दात येताना, तुमच्या बाळाला सौम्य ताप येण्याची एखादी घटना उद्भवू शकते. बाळाला आराम पाडण्यासाठी तुम्ही तिला काही थंड पदार्थ खाऊ घालू शकता, पण तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
  • सर्व इलेक्ट्रिकल आऊटलेट्स कव्हर करा जेणेकरून आपल्या बाळाला कोणताही धक्का बसणार नाही. हे काही स्कॉच टेप वापरुन केले जाऊ शकते
  • अशी असंख्य उदाहरणे असतील जिथे आपले मूल वाढत असताना आपल्याला नाहीम्हणण्यास भाग पाडले जाऊ शकते. ही समस्या नसली तरी, सतत नाही म्हणण्यामुळे बाळाला ह्या शब्दाचा राग येऊ शकतो किंवा तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकते. नाही म्हणण्याऐवजी तुम्ही तिचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकता. इच्छित असलेल्या गोष्टी करण्यापासून रोखत असताना तिची उत्सुकता वाढते

चाचण्या आणि लसीकरण

ह्या काळात खालील लसी दिल्या जातात

  • डीटीएपी
  • हिपॅटायटीस बी
  • हिब
  • रोटाव्हायरस

जर घरातील एक किंवा अधिक सदस्यांना सक्रीय क्षयरोग असेल तर आपण क्षयरोगाची चाचणी करुन घेऊ शकता.

खेळ आणि क्रियाकलाप

. पोहणे

बाळांना पोहायला आवडते हे तुम्हाला माहिती आहे का? बाळे ६व्या आठवड्यापासून पोहणे सुरू करू शकतात आणि ते त्यामध्ये पारंगत असतात! पोहण्यामुळे संतुलन, स्नायू समन्वय आणि स्नायूंच्या एकूण विकासास मदत होते. तथापि, पालकांना संकोच वाटू शकतो आणि ते बरोबर सुद्धा आहे. तुम्हाला बरे वाटावे म्हणून काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. प्रथम, हे सुनिश्चित करा की तुम्ही तापमान जास्त असेल त्या दिवशी बाळाला पोहण्यासाठी घेऊन जात आहात. बाळ तापमानास संवेदनशील असते आणि दोन डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली असलेल्या कोणत्याही तापमानामुळे थरथर जाणवते. दुसरे म्हणजे, बाळाला एकावेळी फक्त १० मिनिटे पाण्यात घाला, नंतर तुम्ही ही वेळ ३० मिनिटांपर्यंत वाढवू शकता. ज्या क्षणी बाळ थरथर कापू लागेल त्या क्षणी बाळाला बाहेर काढा आणि टॉवेलने पुसून घ्या. उबदार दुधाची बाटलीही सोबत ठेवा.

. चेंडू शोधा

हा एक सोपा खेळ आहे जो घरामध्ये खेळला जाऊ शकतो आणि दृश्य ओळख सुधारण्यास मदत करतो. आपल्या बाळाला आवडणारा एक चेंडू घ्या आणि त्यास आसपास लपवा. लपण्याची जागा सोपी असावी आणि जेव्हा ती बॉल शोधेल तेव्हा तिला आनंद होईल!

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील परिस्थितीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • खूप उच्च तापमान आहे जे कमी होण्याची चिन्हे दिसत नाही
  • ओळखीच्या लोकांबद्दल भावना किंवा हावभाव दर्शवित नाही
  • चंचल किंवा सक्रिय राहण्याऐवजी जास्त बोलत नाही आणि एकटाच राहतो

या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या तुम्हाला २९ आठवड्यांच्या बाळाची वाढ आणि विकासाच्या बाबतीत माहित असणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही तुमच्या लहान बाळासोबत आनंद घ्या आणि तिच्याबरोबरचे सर्वोत्कृष्ट क्षण कॅमेरा किंवा वहीमध्ये टिपून ठेवा!

मागील आठवडा: तुमचे २८ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
पुढील आठवडा: तुमचे ३० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article