Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना मासिक पाळी म्हणजे काय आणि तुमच्यावर तिचा कसा परिणाम होतो?

मासिक पाळी म्हणजे काय आणि तुमच्यावर तिचा कसा परिणाम होतो?

मासिक पाळी म्हणजे काय आणि तुमच्यावर तिचा कसा परिणाम होतो?

जेव्हा तुम्ही तारुण्यात पदार्पण करता तेव्हा तुमचे शरीर वेगाने परिपक्व होते आणि शरीरात खूप बदल होत असतात. प्रमुख शारीरिक बदल म्हणजे स्तनांचा विकास, जननांगावर लव येणे आणि सर्वात महत्वाचे मासिक पाळी सुरु होणे इत्यादी होय. प्रत्येक मुलीची मासिक पाळी ह्या कालावधीत सुरु होते, तथापि ती सुरु होण्याचा अचूक कालावधी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो.

मासिक पाळी म्हणजे काय?

प्रत्येक महिन्याला तुमचे शरीर गर्भधारणेकरिता तुमच्या गर्भाशयाला तयार करीत असते. ह्या प्रक्रियेदरम्यान गर्भाशयात स्त्रीबीजाच्या रोपणासाठी पेशी आणि रक्ताचे आवरण तयार होत असते. मासिक पाळीदरम्यान हे आवरण गळून पडते आणि गर्भाशयाच्या मुखातून योनिमार्गाद्वारे हे आवरण शरीरातून बाहेर पडते. ह्या कालावधीत तुमच्या शरीरातून रक्त आणि ऊतक (टिश्यू) बाहेर पडतात आणि ही क्रिया सरासरी ३-५ दिवसांपर्यंत सुरु राहते.

मासिक पाळी चक्र म्हणजे काय?

मासिक पाळी दर महिन्याला येते त्यामुळे स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होते. पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढच्या पाळीच्या एक दिवस आधी असे दिवस मोजल्यास मासिक पाळी चक्र २८-२९ दिवसांचे असते. काही स्त्रियांचे मासिक पाळी चक्र २१ दिवसांचे असते आणि त्यांचे मासिक पाळी चक्र छोटे असण्याची शक्यता असते. तसेच काहींचे मासिक पाळी चक्र ३५ दिवसांचे म्हणजेच सरासरीपेक्षा मोठे असते.

मासिकपाळी चक्रादरम्यान काय होते?

महिन्याभरात मासिक पाळी चक्राचे ४ टप्पे असतात

पहिला टप्पा: मासिक पाळीचा टप्प्पा

गर्भशयाचे आवरण गळून पडते आणि तुम्हाला रक्तस्त्राव सुरु होतो. हा टप्पा ३-५ दिवसांपर्यंत सुरु राहतो. काही स्त्रियांमध्ये ह्या पेक्षा सुद्धा जास्त काळ चालतो. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसतात जसे की ओटीपोटात दुखणे, पाठदुखी, पाय दुखणे. मनःस्थितीत बदल, स्तनाना सूज येऊन दुखणे इत्यादी. ह्या काळात तुम्हाला खूप थकवा जाणवू शकेल. ऊर्जा आणि उत्साह कमी पडेल.

दुसरा टप्पा: फॉलिक्युलर टप्पा

ह्या टप्प्यामध्ये तुमचे शरीर ओव्यूलेशन साठी स्वतःला तयार करते. एफ.एस.एच. नावाचे संप्रेरक अंडाशयाला उत्तेजित करते आणि परिपक्व अंड्याची निर्मिती करते. ह्या प्रक्रियेदरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांची निर्मिती होते तसेच अपेक्षित गर्भधारणेसाठी गर्भाशयाचे आवरण तयार होते. गर्भाला रक्ताचा आणि पोषणमूल्यांचा पुरवठा होण्यासाठी हा जाड थर तयार केला जातो.

ह्या कालावधी दरम्यान, इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ होते, तुम्हाला उत्साही वाटते आणि तुमची मन:स्थिती चांगली राहते. ह्या कालावधी दरम्यान तुम्हाला पांढरा चिकट स्त्राव होऊ शकतो पण ते पूर्णतः सामान्य आहे.

तिसरा टप्पा: ओव्यूलेशन

जेव्हा अंडाशयातून परिपक्व स्त्रीबीजाचे बीजवाहिनीतून गर्भाशयाकडे वहन होते तेव्हा ओव्यूलेशन होते. हे स्त्रीबीज फक्त १२ ते २४ तासांसाठी जिवंत राहते. ह्या कालावधीत जेव्हा स्त्रीबीज शुक्रजंतूच्या सानिध्यात येते तेव्हा त्याचे फलन होते. ह्या दिवसात तुमची प्रजननक्षमता खूप जास्त असते. ह्या कालावधीत जर तुम्ही सुरक्षित शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत.

ह्या कालावधीत तुमच्या शरीरात निर्माण होत असलेल्या जास्त इस्ट्रोजेन पातळीमुळे तुमच्या शरीरात ऊर्जा वाढेल, मनस्थिती सुधारेल तसेच तुम्हाला शारीरिक संबंधाची सुद्धा इचछा वाढेल.

चौथा टप्पा: ल्युटल टप्पा

हा मासिक पाळी चक्राचा शेवटचा टप्पा आहे. जेव्हा स्त्रीबीज बीजवाहिनीतून गर्भाशयाकडे जाते तुमचे शरीर प्रोजेस्टेरॉनची निर्मिती करण्यास सुरुवात करते आणि त्यामुळे गर्भाशयाचे आवरण तयार होऊ लागते. परंतु, जर स्त्रीबीजाचे फलन  झाले नाही तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. तसेच स्त्रीबीजाचे रोपण झाले नाही तर ते गळून पडते आणि तुम्ही मासिक पाळीच्या नवीन चक्रामध्ये जाता.

संप्रेरकांचे कार्य कसे चालते?

मासिक पाळी हे शरीराच्या वेगवेगळ्या भागात निर्मित झालेल्या संप्रेरकांनी नियंत्रित होते

  • गोनॅडोट्रोफिन रिलिझिंग हॉर्मोन, ते जी.एन.आर.एच. ह्या नावाने सर्वज्ञात आहे आणि हायपोथॅलॅमस ह्या मेंदूच्या भागापासून त्याची निर्मिती केली जाते. ह्यामुळे इतर संप्रेरकांची जसे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनची (एफ.एस.एच.) निर्मिती सुद्धा प्रेरित केली जाते, तसेच लुटीनझिंग हॉर्मोनची  निर्मिती सुद्धा प्रेरित केली जाते.
  • एफ.एस.एच.किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनची निर्मितीसुद्धा मेंदूतील पिट्युटरी ग्रंथी मधून केली जाते आणि अंडाशयात स्त्रीबीज परिपकव होण्यासाठी ते जबाबदार असते.
  • पिट्युटरी ग्रंथींद्वारे निर्मित लुटीनझिंग संप्रेरक स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया प्रेरित करते.
  • तुमचे अंडाशय इस्ट्रोजेनची निर्मिती करते. इस्ट्रोजेन  तारुण्यातील तुमच्या शरीरातील बदलांना जबाबदार असते. प्रजनन चक्रादरम्यान  त्याला तुमच्या शरीरात थोडी कामे असतात.
  • प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकाची निर्मिती अंडाशयाद्वारे केली जाते आणि तुमची प्रजनन चक्र नियमित करण्याचे काम त्यावर असते तसेच शरीराला गर्भधारणेसाठी तयार करण्याचे काम सुद्धा ते करते.

ओव्युलेशन  दरम्यान

ओव्युलेशन  दरम्यान तुमच्या शरीरातील इस्ट्रोजेन च्या पातळीत वाढ होते त्यामुळे एफ.एस.एच. ह्या संप्रेरकाच्या पातळीत घट होते. परंतु लुटीनझिंग संप्रेरकात वाढ झाल्यास, एफ.एस.एच.च्या पातळीत सुद्धा वाढ होते. लुटीनझिंग संप्रेरक ओव्यूलेशन प्रेरित करते आणि स्त्रीबीज अंडाशयातून सोडले जाते. हे स्त्रीबीज नंतर बीजवाहिनी मध्ये पकडले जाते.

इतर दिवशी, गर्भाशयाचे मुख घट्ट श्लेष्माची निर्मिती करते जेणेकरून शुक्रजंतू आत जाऊ शकत नाही. ओव्युलेशनच्या आधी इस्ट्रोजेन हॉर्मोन घट्ट चिकट स्त्राव पातळ करते. त्यामुळे शुक्रजंतूंचे गर्भाशयाकडे वहन होते आणि स्त्रीबीजाचे फलन होते.

ओव्यूलेशन नंतर

स्त्रीबीज सोडल्यानंतर अंडाशयातील फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस लुटम मध्ये होते. कॉर्पस ल्यूटम हा पेशींचा पिवळा संच असतो, जो प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकाच्या निर्मितीस जबाबदार असतो. प्रोजेस्टेरॉन चिकट स्त्राव पुन्हा घट्ट करते आणि शुक्रजंतूंचा प्रवेश कठीण करते. ह्या कालावधी दरम्यान तुमच्या असे लक्षात येईल की योनीमार्गातील स्त्राव हा घट्ट आणि चिकट आहे.

प्रोजेस्टेरॉन मुळे गर्भाशयाचे आवरण रोपणासाठी तयार होते त्यासाठी ते रक्तवाहिन्यांचे आणि ऊतींचे आवरण तयार करते. प्रोजेस्टेरॉन च्या वाढत्या पातळीमुळे तुम्हाला तुमचे स्तन ओढल्यासारखे वाटू थोडेसे शकतात आणि तुम्हाला मुंग्या आल्यासारखे जाणवेल.

ओव्यूलेशन नंतर पिट्युटरी ग्रंथी एफ.एस.एच. ची निर्मिती करत नाहीत त्यामुळे स्त्रीबीज परिपक्व होत नाहीत.

जर फलन झाले तर काय होते?

जर अंडाशयातून सोडलेल्या परिपक्व स्त्रीबीजाचे बीजवाहिनी मध्ये फलन झाले तर त्याचे गर्भाशयामध्ये वहन होते आणि गर्भाशयाच्या आवाराणामध्ये  त्याचे रोपण होते. अंडाशयातून गर्भाशयाकडे वहन होण्यासाठी स्त्रीबीजाला लागणारा वेळ हा ६-१२ ह्या दिवसांमध्ये कितीही दिवस असू शकतो. ह्या कालावधीत स्त्रीबीजामध्ये फक्त १५० पेशी असतात. तुम्हाला गर्भारपणाची पूर्वलक्षणे सुद्धा जाणवू लागतील कारण तुमच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन ची पातळी वाढत जाते.

जर फलन झाले नाही तर काय होते?

जर फलन झाले नाही किंवा गर्भाशयाच्या आवाराणमध्ये स्त्रीबीजाचे रोपण यशस्वीरीत्या झाले नाही तर स्त्रीबीज विखरू लागते. कॉर्पस ल्यूटम सुद्धा आक्रसते आणि इस्ट्रोजेन  आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी तुमच्या शरीरात कमी कमी होऊ लागते.

तुमचे गर्भाशय प्रोस्टाग्लान्डिन ह्या रासायनिक द्रव्याची निर्मिती करते, ज्यामुळे गर्भाशयाकडील रक्तप्रवाहात बदल होतो, जे आवरण तयार झालेले असते ते तुटते आणि त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते. हीच ती वेळ आहे जेव्हा अफलित स्त्रीबीजासह गर्भाशयाचे आवरण गळून पडते आणि तुमची मासिक पाळी सुरु होते.

मासिक पाळी कशी असते?

मासिक पाळी दरम्यान योनीमार्गातून ३-५ दिवस रक्तस्त्राव होतो. काही स्त्रियांसाठी हा रक्तस्त्राव कमी किंवा जास्त काळासाठी होऊ शकतो. रक्तस्त्राव किंवा योनीमार्गातून येणाऱ्या रक्ताचे प्रमाण किती आहे त्यावर तो खूप जास्त, माध्यम किंवा कमी असे त्याचे वर्गीकरण करता येऊ शकते. हे प्रत्येक स्त्रीनुसार  बदलते. मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव पहिल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त असू शकतो जो नंतरच्या काही वर्षांमध्ये नियमित होतो.

मासिक पाळीशी निगडित प्रश्न

मासिक पाळीशी निगडित अनेक प्रश्न आहेत जसे की पेटके येणे, पी.एम.एस., अंगदुखी वगैरे.

१. खूप जास्त रक्तस्त्राव होणे (Menorrhagia)

ह्या स्थितीमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होतो जो ५-७ दिवसांपर्यंत सुरु राहतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ह्या संप्रेरकांच्या पातळीतील असंतुलनामुळे ही स्थिती निर्माण होते. योनीमार्गातील संसर्ग, गर्भाशयाच्या मुखाला सूज येणे, हायपोथायरॉईडीसम, गर्भाशयातील फायब्रॉइड्स वगैरेमुळे  ही स्थिती निर्माण होते.

२. पाळी खूप उशिरा येणे (Amenorrhoea)

ह्या स्थिती मध्ये मासिक पाळी येत नाही. ह्या स्थितीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जरी तुम्ही १६ वर्षांच्या झालात तरी मासिक पाळी  येत नाही. तारुण्याला उशीर होणे किंवा प्रजनन प्रणाली मध्ये काही कमतरता असणे किंवा पिट्युटरी ग्रंथीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर असे होऊ शकते. द्वितीय अवस्थेमध्ये हायपोथायरॉईडीसम, अंडाशयात सिस्ट, अनोरेक्सीया, गर्भारपण, गर्भनिरोधकांचा  वापर थांबवणे किंवा अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे ही कारणे  आहेत.

३. पाळीदरम्यान खूप वेदना होणे (Dysmenorrhoea)

ह्या स्थितीमध्ये मासिक पाळी दरम्यान खूप दुखते. पी.एम.एस. च्या दरम्यान गर्भाशय आकुंचन आणि प्रसरण पावत असल्याने पोटात दुखणे हे नॉर्मल असल्याने परंतु ह्या स्थितीच्या रुग्णांना मासिक पाळीदरम्यान भयंकर वेदना होतात. श्रोणीच्या भागात सूज आल्यामुळे किंवा फायब्रॉइड्स किंवा एन्डोमेट्रिओसिस (गर्भाशयात उतींची असामान्य वाढ ) ह्यामुळे हा रक्तस्त्राव होतो.

मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी केव्हा सुरु होते?

वयाच्या १०-१२ वर्षादरम्यान पहिली मासिक पाळी येते. काही मुलींना वयाच्या १० व्या वर्षी पाळी येते किंवा काही मुलींना त्या १५-१६ वर्षांच्या होईपर्यंत मासिक पाळी येत नाही. पाळी येण्याचे वय मुलीच्या आईला पहिली पाळी केव्हा सुरु झाली होती ह्यावर सुद्धा अवलंबून असते. जेव्हा स्तनांची वाढ होते आणि जननेंद्रियांवर केस दिसू लागतात त्यानंतर २ वर्षांनी मुलीला पाळी  येण्याची शक्यता असते.

रजोनिवृत्तीला केव्हा सुरुवात होते?

जर स्त्रीला मासिक पाळी १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी आली नसेल तर तिला रजोनिवृत्ती झाली असे आपण म्हणू शकतो. स्त्रीला तिच्या वयाच्या ४०-५० वर्षादरम्यान रजोनिवृत्तीचा त्रास होण्यास सुरुवात होते. तथापि काही स्त्रियांना रजोनिवृत्ती वयाच्या तिशीतच येते तर काही जणींना वयाच्या ६० वर्षापर्यंत येत नाही.

पॅड/टॅम्पून कितीवेळा बदलले पाहिजे?

संसर्ग टाळण्यासाठी किंवा जिवाणूंची वाढ होऊ नये म्हणून तुम्ही दार ४ तासांनी पॅड बदलणे जरुरीचे आहे. जर तुम्ही टॅम्पून चा वापर करत असाल तर ते ८ तासांपेक्षा जास्त वेळासाठी असू नये. असे केल्याने टी.एस.एस. किंवा टॉक्सिक शॉक सिंड्रोम (ही स्थती टॅम्पून ८ तासापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवल्यास निर्माण होते ह्यामध्ये जिवाणू विषारी द्रव्यांची निर्मिती करतात) स्पॉंज किंवा मेन्स्ट्रुअल कप हे दिवसातून एकदा किंवा दोनदा बदलले पाहिजेत, हे रक्तप्रवाह किती होतो त्यावर अवलंबून आहे.

तुम्हाला किती रक्तप्रवाह होतो आहे त्यानुसार योग्य उत्पादन वापरणे हे महत्वाचे आहे. जसजसे तुमचे पाळीचे दिवस पुढे जातात त्यानुसार तुम्ही वेगवेगळी उत्पादने वेगवेगळ्या दिवसांसाठी वापरू शकता.

तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला केव्हा घेतला पाहिजे?

तुम्हाला खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे:

  • जर तुम्हाला वयाच्या १५ वर्षापर्यंत पाळी आली नाही.
  • तुमच्या स्तनांचा विकास झाला नसेल आणि विकास झाल्यानंतर ३ वर्षे उलटून सुद्धा तुमची मासिक पाळी आली नसेल तर.
  • ९० दिवसांहून जास्त काळासाठी मासिक पाळी थांबली असेल तर.
  • अनियमित पाळी.
  • ७ दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तप्रवाह सुरु राहिल्यास.
  • तुम्हाला खूप जास्त रक्त प्रवाह होत असल्यास आणि तुम्ही दर दोन तासांनी पॅड किंवा टॅम्पून बदलत असाल तर.
  • तुमच्या २ मासिकपाळी चक्रादरम्यान  तुम्हाला रक्त प्रवाह होत असेल तर.
  • जर तुम्हाला खूप पेटके येऊन दुखत असेल तर.
  • टॅम्पून वापरल्यावर ताप आल्यास.

मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे कारण त्यामुळे स्त्रीचे शरीर गर्भधारणेस किंवा बाळाला बाळगण्यास तयार होते. तुमचे मासिक पाळी चक्र कसे कार्य करते हे समजून घेणे हे महत्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला लागणारी सर्व माहिती तुमच्याकडे असते तसेच तुमच्या आईपणाच्या प्रवासादरम्यान तुम्ही सुरक्षित असता.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article