Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅन

In this Article

साधारणपणे गर्भारपणाच्या ५ व्या आठवड्यात स्त्रीला ती गर्भवती असल्याचे समजते. जर तुमची मासिक पाळी चुकलेली असेल, तुम्हाला चक्कर येत असेल किंवा थकवा जाणवत असेल, मनस्थितीत बदल होत असेल तर तुम्ही गर्भवती असू शकता. तुम्ही गर्भवती असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड करून घ्यावे लागेल. गरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात पहिल्यांदा अल्ट्रासाऊंड केला जातो. तुम्ही गर्भवती असल्याची तुम्हाला शंका असेल तर खात्री करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. ५ व्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड विषयी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

तुमचे पहिले अल्ट्रासाऊंड स्कॅन कधी करावे?

तुमचे पहिले अल्ट्रासाऊंड स्कॅन कधी करावे?

तुमच्या गरोदरपणाच्या पाचव्या आठवड्यात पहिले अल्ट्रासाऊंड स्कॅन असणे आवश्यक आहे कारण तेव्हाच हृदयाचे ठोके जाणवू लागतात. त्यामुळे गर्भाशयात गर्भाच्या उपस्थितीस पुष्टी मिळण्यास मदत होते. ह्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड स्कॅनमुळे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गर्भाशयातील बाळ बघता येते.

गर्भधारणेच्या तपासणीसाठी पाचवा आठवडा आदर्श असल्याची अनेक कारणे आहेत कारण त्यापूर्वी स्त्री गरोदर असल्याची खात्री करता येत नाही. पाचव्या आठवड्यापूर्वी गर्भधारणा अनेक कारणांमुळे संपुष्टात येते. त्यामुळे, अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

तुम्ही ५ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन का केले पाहिजे?

गरोदरपणाच्या ५व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याची अनेक कारणे आहेत आणि ती खालीलप्रमाणे आहेत:

  • ५ आठवड्यात केलेले अल्ट्रासाऊंड स्कॅन तुमचे पहिले स्कॅन असेल. तुम्हाला एक किंवा एकाधिक बाळे आहेत का ह्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना त्याची मदत होईल
  • तुमचे डॉक्टर अल्ट्रासाऊंड करून बाळामध्ये कोणती विकृती तर नाही ना हे तपासू शकतील. जरी हा स्कॅन गरोदरपणाच्या सुरुवातीस असला तरी, तुमचे डॉक्टर योक सॅक आणि गर्भजल पिशवीची तपासणी करतील जेणेकरून त्यांना विकृती असल्यास तिचा शोध घेता येईल
  • या टप्प्यावर अल्ट्रासाऊंड केल्याने बाळ सामान्यपणे वाढत आहे की नाही हे समजण्यास मदत होईल, विशेषत: जर ही तुमची दुसरी गर्भधारणा असेल आणि आधीच्या गरोदरपणात काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर किंवा जुळ्या मुलांची अपेक्षा असेल तर ह्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केल्याने मदत होऊ शकते
  • तुम्ही अल्ट्रासाऊंडद्वारे बाळाच्या आकाराचा अंदाज लावू शकता

आपल्या पाचव्या आठवड्यातील स्कॅनची तयारी कशी करावी?

तुमच्या ५ व्या आठवड्याच्या गर्भधारणेच्या स्कॅनच्या वेळी तुमचे डॉक्टर तुम्हाला भरपूर पाणी पिण्यास सांगतील जेणेकरून तुमचे मूत्राशय पूर्ण भरलेले असेल. त्यामुळे बाळ वर ढकलले जाईल आणि अशा प्रकारे सोनोग्राफरला गर्भ स्पष्ट दिसेल. या टप्प्यावर, तुमचे बाळ सफरचंदच्या बियाण्याएवढे असेल, म्हणून ते स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

अल्ट्रासाऊंड स्कॅनसाठी, तुम्हाला टेबलवर झोपायला सांगितले जाईल. एक अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञ तुमच्या खालच्या ओटीपोटावर स्नेहन जेल लावेल आणि नंतर एक प्रोब आत सरकवेल. प्रोब सरकवून, तंत्रज्ञ गर्भजल पिशवी शोधू शकतील आणि बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतील. अल्ट्रासाऊंड वेव्ज स्क्रीनवर गर्भाच्या स्पष्ट प्रतिमा तयार करण्यात मदत करतील. प्रक्रियेदरम्यान आपण शांत राहणे महत्वाचे आहे. उदरपोकळी अरुंद असल्यामुळे जर टेक्निशियनला गॅस्टेशनल सॅक शोधता आली नाही तर डॉक्टर ट्रान्सवाजाइनल स्कॅन करण्यास सुचवू शकतात. गर्भारपणाचे सुरुवातीचे टप्पे तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकतात कारण तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तुम्हाला थकवा येऊन आणि चक्कर आल्यासारखे वाटू शकते. शांत राहिल्यास तणाव कमी होऊन लक्षणांशी अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास मदत होऊ शकते.

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास किती वेळ लागतो?

अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यासाठी सुमारे २० ते ३० मिनिटे लागतात. तंत्रज्ञ, जेल लावून आपल्या पोटावर प्रोब फिरवेल त्यामुळे मॉनिटरवर प्रतिमा स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल. संपूर्ण प्रक्रियेला जास्तीत जास्त ३० मिनिटे किंवा एक तास लागू शकतो. तुम्हाला इच्छा असल्यास, तुम्ही अल्ट्रासाऊंडच्या छायाचित्रासाठी देखील विनंती करू शकता.

५ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन कसे केले जाते?

ही प्रक्रिया सोपी आहे. तपासणी पूर्वी डॉक्टर तुम्हाला पाणी पिण्यास सांगतील. मग तुम्हाला टेबलवर तुमच्या पाठीवर झोपावे लागेल. यानंतर, तंत्रज्ञ तुमच्या पोटावर जेल लावेल आणि मॉनिटरवर प्रतिमा मिळवण्यासाठी अल्ट्रासाऊंड यंत्र किंवा प्रोब पोटावर सरकवेल. प्रक्रियेत मदत करण्यासाठी तुम्ही तुमच्या पतीला देखील सोबत घेऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला बघता तो क्षण तुमच्यासाठी खरंच विशेष असतो. या क्षणाचा आनंद घ्या आणि आपल्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा.

तुमच्या गरोदरपणाच्या पाचव्या आठवड्याच्या स्कॅनमध्ये काय पहाल?

ह्या आठवड्यातील अल्ट्रासाऊंड दरम्यान तुम्ही ५ व्या आठवड्यात तयार झालेल्या योक सॅक सह गॅस्टेशनल सॅक सुद्धा बघू शकता. जुळी बाळे असतील तर, भ्रूण असलेल्या योक सॅक सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला एकसारखी जुळी बाळे होणार असतील तर एका गॅस्टेशनल सॅक मध्ये दोन योक सॅक तुम्हाला दिसतील आणि त्यामधील गर्भाची लांबी सुमारे १.२५ मिमी इतकी असेल.

गॅस्टेशनल सॅक हा काळा भाग आहे तर सॅक च्या वरच्या बाजूला डावीकडे दिसत असलेले छोटे पांढरे वर्तुळ म्हणजे योक सॅक आहे. ही पिशवी गर्भासाठी पोषक घटकांचे स्त्रोत देखील आहे. तुम्ही फक्त पाच आठवड्यांनंतर भ्रूण पाहू शकता कारण अन्यथा, ते तांदळाच्या दाण्याच्या आकाराचे असते. तथापि, उच्चअंत: मशीन वापरून ते ५ आठवड्यांपूर्वी सुद्धा दिसू शकते. एखाद्या अनुभवी टेक्निशियनला ट्रान्सव्हाजिनल स्कॅनच्या मदतीने ह्या सॅक दिसू शकतील.

तुमच्या गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यात तुम्हाला जुळी बाळे आहेत कि नाही ह्याची माहिती होऊ शकते का?

होय, व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करून, तुमचे डॉक्टर किंवा तंत्रज्ञ तुम्हाला जुळी बाळे आहेत की नाही हे सांगू शकतील. जुळी बाळे समान किंवा असमान असल्यास त्यानुसार तुम्ही ती पाहू शकता.

जर अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये काहीही दिसत नसेल तर?

जर तुमच्या डॉक्टरांना ५ व्या आठवड्याच्या अल्ट्रासाऊंडमध्ये काहीच दिसत नसेल, तर योक सॅक दिसते आहे किंवा नाही असे तुम्ही त्यांना विचारू शकता. कधीकधी, अल्ट्रासाऊंड मध्ये दिसण्यासाठी बाळ खूप लहान असू शकते. जर तुमच्या गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्याच्या स्कॅन मध्ये काही दिसत नसेल, तर त्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.

  • तुम्हाला चुकीच्या तारखा दिल्या गेल्या असतील त्यामुळे काही दिवसात बाळ स्कॅनमध्ये दिसले पाहिजे
  • ही एक एक्टॉपिक गर्भधारणा आहे
  • गर्भपात झालेला आहे

स्कॅनमध्ये काही विकृती आढळल्यास काय करावे?

योक सॅक, गर्भामध्ये तसेच गेस्टेशनल सॅक मध्ये विकृती असल्यास ती शोधण्यास अल्ट्रासाऊंड मुळे मदत होऊ शकते. विकृतीच्या तीव्रतेवर आधारित आपण डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकता.

हा स्कॅन तुमच्या गरोदरपणाच्या नियमित तपासण्यांचा एक भाग आहे का?

गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यांत केले जाणारे अल्ट्रासाऊंड स्कॅन हे पहिले अल्ट्रासाऊंड स्कॅन आहे आणि म्हणूनच हा गरोदरपणाच्या प्रक्रियेचा नियमित भाग आहे. तुम्ही गर्भवती आहात की नाही हे स्कॅन केल्यावर कळेल.

गरोदरपणात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन अत्यंत महत्वाचे आहेत. गरोदरपणाच्या ५ व्या आठवड्यातील स्कॅन हा पहिला स्कॅन आहे, म्हणून हा किंवा यानंतरचा स्कॅन करणे टाळू नका. तुमची गर्भधारणा आणि गर्भाची स्थिती जाणून घेण्यासाठी हा स्कॅन करून तुमचा मातृत्वाचा प्रवास सुरू करा.

आणखी वाचा:

गर्भधारणा: ५वा आठवडा
गरोदरपणातील अल्ट्रासाऊंड स्कॅन – प्रकार, तयारी कशी करावी आणि बरेच काही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article