Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात सोडा (शीतपेये) पिणे सुरक्षित आहे का?

गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात अल्कोहोल घेतल्यास त्यामुळे बाळाला नुकसान पोहचू शकते, परंतु बर्‍याच गरोदर स्त्रिया सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, मॉकटेल इत्यादींसारखी पेये घेतात. गरोदरपणात मध्यम प्रमाणात ही पेये घेतली तर ती सुरक्षित आहेत, या पेयांचे स्वतःचे दुष्परिणाम आहेत. गरोदरपणात जास्त सोडा प्यायल्यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर काही दुष्परिणाम होऊ शकतात

तुम्ही गरोदरपणात सोडा घेऊ शकता का ?

गरोदरपणात मर्यादित प्रमाणात फ्रेश लाईम सोडा घेणे ठीक असते. अधूनमधून सोडा घेतल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवण्याची शक्यता नसते.

गर्भवती असताना आपण किती सोडा पिऊ शकता?

गर्भधारणेदरम्यान, दररोज सोडा किंवा डाएट सोडा एकापेक्षा कमी सर्व्हिंग (१ सर्व्हिंग = ३३० मिली) पिणे सुरक्षित आहे.

साखर असलेला किंवा कृत्रिम गोड पदार्थ असलेल्या सोडायचे सेवन केल्यास ताजेतवाने वाटू शकते परंतु ते गर्भास हानिकारक ठरू शकते. अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनोकॉलॉजिस्टच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की गर्भवती महिलेने दररोज २०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफिन सेवन करू नये. एका सोडा सर्व्हिंगमध्ये ३२४३ मिग्रॅ कॅफिन असते. म्हणूनच, जर तुम्ही दररोज सोडा घेण्याचे प्रमाण एक सर्व्हिन्ग पुरते मर्यादित ठेवल्यास तुम्ही सुरक्षित आहात.

सोड्याचे कोणते घटक आपल्या जन्मलेल्या बाळाला हानी पोहोचवू शकतात?

सोडा अनेक घटकांच्या मिश्रणाने तयार झालेले पेय आहे. तुमच्यावर आणि बाळावर परिणाम करू शकणार्‍या सोड्यामधील काही पदार्थ येथे आहेत:

. कॅफीन

सोड्यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो तसेच यामुळे निद्रानाश देखील होऊ शकतो, आईवडिलांमध्ये बद्धकोष्ठता आणि निर्जलीकरण होऊ शकते. हे बाळाच्या हालचालविषयक आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी हानिकारक आहे. दिवसात ३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफेनचे सेवन केल्यास गर्भपात होऊ शकतो आणि एका दिवसात ५०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त कॅफेनचे सेवन केल्यास बाळाच्या जन्माच्या वेळेस तीव्र श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ शकतो.

. साखर

बाळाच्या योग्य वाढीसाठी स्थिर इन्सुलिनची पातळी आवश्यक आहे. सोड्यामध्ये असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे इन्सुलिन वाढू शकते. मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणा देखील वाढतो तसेच यामुळे गर्भपात होऊ शकतो किंवा बाळामध्ये जन्मजात अपंगत्व यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात

. कार्बोनेटेड वॉटर

सोडा हाय प्रेशर वॉटर आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या कार्बोनेशनपासून बनविला जातो आणि कार्बन डाय ऑक्साईड मुख्य घटक आहे ज्यामुळे पेयांमध्ये बुडबुडे निर्माण होतात. सोड्यामध्ये असलेले हे कार्बोनेटेड पाणी आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे पाठीच्या दुखण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात, कारण तुमची हाडे हळूहळू तुमच्या वाढत्या पोटास आधार देण्यासाठी कमकुवत होऊ शकतात. साध्या कार्बोनेटेड पाण्यात फक्त गॅस असतो, परंतु काही उत्पादक पोटॅशियम आणि सोडियम सारखी खनिजद्रव्ये समाविष्ट करतात. सोडियममुळे रक्तदाब वाढतो, जो तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो.

. कृत्रिम गोड पदार्थ

साध्या सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते, तर डाएट सोड्यामध्ये कृत्रिम स्वीटनर असतात ते त्यांच्या स्वत: च्या दृष्टीने हानिकारक असतात. डाएट सोड्यात वापरले जाणारा एस्पर्टाम, ह्या कृत्रिम गोड पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास बाळांना अपंगत्व येऊ शकते. साध्या सोड्यापेक्षा डाएट सोडा पिणे गर्भारपणात जास्त हानिकारक आहे.

. फ्लेवरिंग एजंट्स

जरी सोड्यामध्ये कॅफेन हे द्रव्य नसले तरीही त्यामध्ये थोडासा फ्लेवर असू शकतो सोड्यामध्ये असलेला फॉस्फरिक ऍसिड हा एक चवदार घटक आहे. हा फॉस्फोरिक ऍसिड आपल्या हाडांमधील कॅल्शियमवर परिणाम करू शकतो आणि त्यास ठिसूळ बनवू शकतो.

गरोदरपणात सोडा पिण्याचे हानिकारक परिणाम

गर्भधारणेदरम्यान सोडा सेवन केल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा सारांश खाली दिलेला आहे.

  • कार्बोनेटेड ऍसिड आणि फॉस्फोरिक ऍसिड (फ्लेव्हिंग एजंट) मुळे हाडांमधून कॅल्शियम कमी होणे
  • कार्बोनेटेड वॉटरमध्ये सोडियम असल्यामुळे रक्तदाब वाढतो
  • जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात
  • साखर आणि कृत्रिम स्वीटनर्सचे जास्त सेवन केल्याने लठ्ठ बाळांना त्रास होऊ शकतो
  • यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो

२०१८ च्या अभ्यासात गर्भधारणेदरम्यान सोड्याचे सेवन आणि बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या दरम्यान नकारात्मक संबंध सांगितलेला आहे. या संशोधनात असे दिसून आले आहे की जेव्हा गरोदरपणात, अधिक प्रमाणात साखर खाल्ली जाते, विशेषत: सोडाच्या रूपात, त्यांच्या मुलांची स्मरणशक्ती कमी असते तसेच शाब्दिक आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्य सुद्धा कमी असते. अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की डाएट सोड्यासोबत त्याचे दुष्परिणामही वाईट आहेत गर्भधारणेदरम्यान त्याचे सेवन लहान मुलांमधील दृष्य मोटर, अवकाशासंबंधी आणि उत्तम मोटर क्षमतांशी जोडले गेले होते.

सोडा कदाचित अल्कोहोलयुक्त पेयांऐवजी एक स्फूर्ति देणारे पेय असू शकते, परंतु त्याचा धोका आपल्याला किंवा आपल्या मुलाला पोहचू नये म्हणून सोड्याचा वापर मर्यादित ठेवल्यास मुलाची निरोगी वाढ सुनिश्चित होते आणि प्रसुतिदरम्यान मुलामध्ये होणाऱ्या कोणत्याही जन्मजात दोषांनाही प्रतिबंधित करते. गर्भधारणेदरम्यान भरपूर पाणी पिणे चांगले आहे. ताज्या फळांचा रस आणि दूध देखील हायड्रेशन आणि पोषण दोन्हीसाठी चांगले पर्याय आहेत.

आणखी वाचा: गरोदरपणात खावीत अशी १६ सर्वोत्तम फळे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article