Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) भारतामध्ये मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना

भारतामध्ये मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना

भारतामध्ये मुलींच्या भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना

प्रत्येक पालकांना आपल्या मुलीचे भवितव्य आर्थिक दृष्ट्या स्थिर असावे अशी इच्छा असते आणि ते स्थिर करण्याचा पालकांसाठी एक मार्ग म्हणजे गुंतवणूकीचे पर्याय शोधणे. हे पर्याय मुलीस उत्कृष्ट शिक्षण मिळवून देण्यास आणि उत्तम करियरसाठी मदत करणारे असावेत. पालकांनी आपल्या मुलीच्या आयुष्यात येणारे खर्च आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी ही योजना आखली पाहिजे. आपल्या मुलीला सुरक्षित आर्थिक भविष्य प्रदान करणे ही प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपण तिला देऊ शकणारी ती सर्वोत्कृष्ट भेट आहे.

आपल्या मुलीसाठी गुंतवणूकीची योजना का आवश्यक आहे?

भारतात मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीचे शिक्षण आणि करिअरसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील खर्चाची योजना आखली पाहिजे. या व्यतिरिक्त, त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी बचत करण्याचा विचार देखील करावा लागेल कारण लग्नाचा खर्च मुख्यतः वधूचे पालक करतात. या व्यतिरिक्त, पालकांना वैद्यकीय खर्च किंवा अनियोजित प्रवासासारख्या अनपेक्षित गरजांसाठी देखील योजना आखण्याची इच्छा असू शकते. म्हणूनच, आपल्या मुलीसाठी तिची आर्थिक सुरक्षा आणि यशस्वी भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एक चांगली गुंतवणूक योजना आवश्यक आहे.

आपल्या मुलीसाठी आपण कुठे आणि कसे गुंतवणूक करू शकता?

भारतात मुलीसाठी गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी काहींचा समावेश आम्ही ह्या लेखात करत आहोत.

. सुकन्या समृद्धि योजना

सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय) हा सरकार प्रायोजित गुंतवणूकीचा पर्याय आहे जो विशेषत: मुलीसाठी आहे. मुलींसाठी ही सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे. पालक दोन मुलींसाठी गुंतवणूक करू शकतात आणि त्यासाठी मुलीचे वय १० वर्षे पूर्ण होण्याआधी खाते उघडले पाहिजे. तुमची मुलगी १५ वर्षांची होईपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. ही योजना दर वर्षी ८. % व्याज देते, जे इतर योजनांच्या तुलनेत जास्त आहे. या व्यतिरिक्त, व्याज करमुक्त आहे आणि कलम ८० सी अंतर्गत गुंतविलेली रक्कमदेखील करमुक्त आहे. एका आर्थिक वर्षात एसएसवायसाठी किमान ठेव रुपये. १००० आणि कमाल रू. ,५०,००० इतकी आहे. जेव्हा मुलगी २१ वर्षे पूर्ण करते तेव्हा ही गुंतवणूक योजना परिपक्वतेपर्यंत पोहोचते. किमान ठेव दरवर्षी जमा करावी लागते, अयशस्वी झाल्यास तेथे रु. ५० प्रति वर्ष आकारले जाईल. जेव्हा उच्च शिक्षण किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे आवश्यक असतात तेव्हा पैसे मिळू शकतात. कर लाभ आणि सरासरी परतावा असलेला जोखीममुक्त गुंतवणूकीच्या पर्यायाचा शोध घेणारे पालक एसएसवाय निवड करू शकतात.

. म्युच्युअल फंड एसआयपी

भारतातील मुलींसाठी गुंतवणूक योजनांसाठी हा एक चांगला उत्पादन देणारा पर्याय आहे. जे पालक जास्त परतावा शोधत असतात आणि जोखमीचा घटक स्वीकारण्यास तयार असतात, ते म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय निवडू शकतात. एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यात पालक आपल्या मुलीसाठी कॉर्पस तयार करण्यासाठी विशिष्ट अंतराने पैसे गुंतवू शकतात. हे पैसे म्युच्युअल फंडाच्या कंपनीद्वारे कर्ज आणि इक्विटी बाजारात जोडले जातात.

मुलगी जन्माला येताच एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे जेणेकरून फायदे जास्त असतील. साधारणत: म्युच्युअल फंड हे दीर्घकालीन फंड असतात आणि त्यामध्ये साधारणपणे १० वर्ष गुंतवणूक करावी लागते. म्युच्युअल फंडाकडे विशेषतः मुलांसाठी अनेक पर्याय असतात आणि ते कर्ज आणि इक्विटीच्या सुनियोजित संयोजनात पैसे गुंतवतात. अशाप्रकारे, भांडवल जतन केले जाईल आणि परतावा मध्यम ते उच्च प्रमाणात असतो. हा गुंतवणूकीचा पर्याय १० ते १५% दरम्यान वार्षिक परतावा देऊ शकतो. तथापि, म्युच्युअल फंड आपल्याला कर लाभ मिळविण्यात मदत करत नाहीत. तसेच, ते बाजाराच्या जोखमीस असुरक्षित आहेत, आणि म्हणूनच एखाद्या पात्र गुंतवणूकीच्या सल्लागाराची मदत घेणे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी कसून संशोधन करणे चांगले.

. पीपीएफ

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही मुलीसाठी सर्वोत्तम गुंतवणूक योजना आहे, विशेषत: जर आपण जोखीममुक्त पर्याय शोधत असाल तर येथे तुमची मुद्दल सुरक्षित असेल त्यासाठी हा पर्याय चांगला आहे. जर तुमची मुलगी नवजात असेल तर तुम्ही पीपीएफ योजनेत गुंतवणूक सुरू केली तर हा फंड १५ वर्षात अधिक वाढेल आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल. याचा अर्थ असा की गुंतवणुकीच्या सुरुवातीच्या रकमेवर व्याज मिळते आणि नंतर त्याची पुन्हा गुंतवणूक करून त्यावर व्याज मिळते. पीपीएफ योजना हा सरकारसमर्थित गुंतवणूकीचा पर्याय आहे ज्याचा कार्यकाळ १५ वर्षे आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार करात सूट मिळालेला हा व्याजदर ७. % आहे. किमान ठेव रक्कम रू. एका वर्षासाठी किमान ५०० आणि जास्तीत जास्त रु. ,५०,००० इतकी असते. ७ व्या वर्षापासून अंशतः पैसे काढणे शक्य आहे.

. बाल योजना

पालकांच्या अनेक विमा योजना आहेत जी पालकांचे अचानक निधन झाल्यास मुलाला एकरकमी रक्कम मिळते. अशा वेळी पॉलिसीधारकाची मुदत संपल्यास उर्वरित सर्व प्रीमियम माफ केले जातात. विमा कंपनी मुलींसाठी पैसे गुंतवून ठेवणे सुरु ठेवेल. या पैशात गुंतवणूकीतून मिळालेला परतावा वेळोवेळी मुलीला दिला जातो जेणेकरून मुलीचे पालनपोषण आणि शिक्षण त्रासमुक्त असेल. विमा योजना निवडण्यापूर्वी, संपूर्ण बाजारपेठेचे संशोधन करणे आणि गुंतवणूकीच्या योजनाकारांशी सल्लामसलत करणे चांगले आहे. ह्यामुळे तुम्हाला विमा योजना निवडण्यात मदत होते जेणेकरून जरी तुम्ही नसलात तरी त्याच्या फायदा मुलाला होईल.

. आरडी आणि एफडी

आवर्ती ठेव (आरडी) आणि मुदत ठेवी (एफडी) हा तुमच्या मुलीसाठी आणखी एक सुरक्षित आणि जोखीम मुक्त गुंतवणूक पर्याय आहे. हे दोन्ही गुंतवणुकीचे पर्याय शून्य जोखीम असलेले आहेत आणि निश्चित उत्पन्न देतात. आपण एखादी विशिष्ट रक्कम गुंतवू शकता आणि आपल्याला त्या रकमेवर निश्चित व्याज मिळेल. कार्यकाळ संपल्यानंतर गुंतवणूकदारास भांडवल व व्याज मिळेल. या दोघांमधील फरक हा आहे की एफडी ही एकवेळ ठेव आहे, तर आरडीने नियमित अंतराने आपल्याला विशिष्ट रक्कम जमा करण्याची आवश्यकता असते. एफडीचा व्याज दर आरडीच्या व्याज दरापेक्षा थोडा जास्त आहे. एफडी व्याज दर १ वर्षासाठी ५. २५% ते ७.% पर्यंत बदलतो. आरडीसाठी व्याज दर १ वर्षासाठी ६. % ते ८% दरम्यान आहे.

तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील?

जेव्हा आपण आपल्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे गुंतवाल तेव्हा आपण तिला मिळणाऱ्या रकमेसाठी सुद्धा योजना आखणे आवश्यक आहे. मॅच्युरिटी कालावधीच्या शेवटी महागाई दर सुद्धा तुमच्या लक्षात घ्यावा लागेल. खाली २०१८ साठी एक नमुना योजना आहेः

उच्च शिक्षणाचा सध्याचा खर्च रु. २५ लाख
महागाई %
शिक्षणासाठी २० वर्षानंतर आवश्यक रक्कम रू. ६६,३३,२४४
२० वर्षात उद्दीष्ट रक्कम वार्षिक व्याज १०% दराने मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करण्याची रक्कम रू. ८६६३

विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून आपल्या मुलीला सुरक्षित आर्थिक भविष्य देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. भारतात मुलींसाठी उपलब्ध असलेल्या सर्व गुंतवणूकीच्या पर्यायांचा कसून शोध घेऊन आपण कोणती योजना निवडायची हे ठरवू शकता आणि तुमच्या विशिष्ट गरजेनुसार एखादी योजना निवडू शकता.

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी आधार कार्ड – तुमच्या मुलाच्या आधार कार्डासाठी अर्ज कसा कराल?
भारतात नवजात बाळाचा जन्माचा दाखला कसा मिळवाल?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article