Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य मातृदिनासाठी तुमच्या आईला पाठवण्यासाठी कोट्स, मेसेजेस आणि शुभेच्छासंदेश

मातृदिनासाठी तुमच्या आईला पाठवण्यासाठी कोट्स, मेसेजेस आणि शुभेच्छासंदेश

मातृदिनासाठी तुमच्या आईला पाठवण्यासाठी कोट्स, मेसेजेस आणि शुभेच्छासंदेश

आपल्या आयुष्यात आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई‘. आई हे आपल्या आयुष्यातील खूप स्पेशल असं नातं आहे. आपलं सगळं आयुष्य ती मुलांसाठी समर्पित करीत असते. ती आपल्या मुलांसाठी अहोरात्र कष्ट करत असते. तिचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असतात. आपण मात्र तिला बऱ्याच वेळा गृहीत धरत असतो.

मे महिन्याचा दुसरा आठवडा हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षी तो ९ मे रोजी साजरा केला जाणार आहे. तुमच्या मनातील आईविषयीच्या भावना तिला कळू द्या. आम्ही ह्या लेखाद्वारे काही कोट्स, शुभेच्छा संदेश देत आहोत.

मातृदिनासाठी काही कोट्स

  1. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
    कवी यशवंत

2. न ऋण जन्मदेचे फिटे
मोरोपंत

3. प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
माधव ज्युलियन

4. तीच वाढवी, ती सांभाळी
तीच करी सेवा तिन्हि त्रिकाळी
देवानंंतर मस्तक नमवी आईच्या पायी
आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
ग.दि. माडगुळकर

5. आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
फ. मु. शिंदे

मातृ दिन शुभेच्छा संदेश

6. आई म्हणजे माया, आई म्हणजे प्रेम आई म्हणजे लळा, आई म्हणजे जिव्हाळा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

7. सर्व चुका पोटात घेऊन, मुलांसाठी सर्वस्व वेचणारी आई मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8. निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी आई असताना दुसऱ्या कुणाकडून प्रेमाच्या अपेक्षेची काय गरज? – मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

9. जिचा आशीर्वाद जगात सर्वात अमूल्य आहे अशी त्या ईंश्वरस्वरूप आईला मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

10. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

11. स्वतःचे सर्वस्व पणाला लावून जी सतत सावलीसारखी सोबत असते ती म्हणजे आई मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

12. आज मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे कारण माझ्यासोबत तू आहेस मातृदिनाच्या शुभेच्छा

13. रणरणत्या उन्हात गुलमोहरासारखी ऊन सोसत कुटूंबासाठी तू सतत उभी असतेस आई मातृदिनाच्या शुभेच्छा

14. अनंत यातना सोसून जन्म देणाऱ्या आईला परमेश्वर सुखी ठेवो मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!

15. मनात अगदी मनापासून जपून ठेवावा असा शब्द म्हणजे आई मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

16. नातं आईशी म्हणजे नातं परमेश्वराशी मातृदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा

17. जन्मभर आपल्यासोबत असणारी सावली म्हणजे माऊली मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

18. असाच आनंद देत रहा असाच आनंद घेत रहा मातृदिनाच्या तुला उदंड शुभेच्छा

19. आई म्हणजे माया,तुझ्यावर अखंड राहो परमेश्वराची छाया मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

20. आई म्हणजे लळा, आई म्हणजे जिव्हाळा, जिच्यामुळे कमी होतात जीवनातल्या उन्हाच्या झळा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

21. सर्व चुका पोटात घेऊन, मुलांसाठी सर्वस्व वेचणारी आई! तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

22. निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव करणारी आई असताना दुसऱ्या कुणाकडून प्रेमाच्या अपेक्षेची काय गरज? – मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

23. जिचा आशीर्वाद जगात सर्वात अमूल्य आहे अशी त्या ईंश्वरस्वरूप आईला मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

24. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

25. स्वतःचे सर्वस्व पणाला लावून जी सतत सावलीसारखी सोबत असते ती म्हणजे आई मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

26. आज मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे कारण माझ्यासोबत तू आहेस मातृदिनाच्या शुभेच्छा

27. रणरणत्या उन्हात गुलमोहरासारखी ऊन सोसत तू सतत कुटूंबासाठी उभी असतेस आई मातृदिनाच्या शुभेच्छा

28. मायेनं भरलेलं आभाळ म्हणजे आई, प्रेमानं अलगद सावरणारी म्हणजे आई मातृदिनाच्या शुभेच्छा आई

29. पूर्वजन्माची पुण्याई म्हणुनी तुझा पोटी जन्म घेतला, जन्माचे सार्थक जाहले जेव्हा तुझा सहवास लाभला मातृदिनाच्या शुभेच्छा आई!

30. शब्द अपुरे पडले तुझी महती सांगण्यासाठी, उभा जन्म पुरणार नाही तुझे उपकार फेडण्यासाठी आई मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

31. भेटण्या होतो जीव आतुर

दाटून येतो कंठ

पुन्हा तुझ्यापाशी यावेसे वाटते

सोडून सारे घर

32. आठवणी आठवणी किती साठल्या

अश्रूंचा येई पूर

ये ना पुन्हा परतुनी

का ग गेलीस दूर

33. जीवनातल्या प्रथम गुरूस प्रणाम, तुझा प्रेमळ कर्तव्याला सलाम मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

34. माझा सुखात, दुःखात, आनंदात सतत सोबत असणाऱ्या माझा आईस मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा

35. तुझ्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडती

प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, माया ह्याची तू साक्षात मूर्ती

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

36. तू दिलेले संस्कार, तू घेतलेले कष्ट

तू दिलेलं ज्ञान, तू दाखवलेली वाट

सगळंच अमूल्य आहे आई

मातृदिनाच्या खूप शुभेच्छा आई

37. मनातलं सारं न बोलताच ओळखणारी तू आई

थोर तुझे उपकार आई, कशी करू उतराई

38. आई तुझी माया, प्रेम, लळा, जिव्हाळा हे सगळं अमूल्य आहे मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

39. जीवनातल्या प्रथम गुरूस प्रणाम, तुझ्या प्रेमळ कर्तव्याला सलाम मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

40. माझा सुखात, दुःखात, आनंदात सतत सोबत असणाऱ्या आईस मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा

41. तुझ्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडती

प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, माया ह्याची तू साक्षात मूर्ती

मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा

42. आई माझा देव, आई माझी गुरु, आई माझा श्वास आई तुझाच सारखा ध्यास मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई

43. हातावरचे चटके सोसत माझ्या जखमांवर फुंकर घालणारी आई मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

44. आई तूच माझा विठ्ठल आणि तूच माझा राम, तूच माझा कृष्ण आणि सदा मुखी तुझे नाम मातृदिनाच्या अनेक शुभेच्छा आई

45. तुझ्याशी बोलल्याशिवाय एकही दिवस जात नाही, तुझी आठवण आल्याशिवाय एकही क्षण सरत नाही मातृदिनाच्या शुभेच्छा आई

46. घरात तू असली की ते किती सुंदर दिसते, तू नसली की मात्र सारे सुने सुने भासते मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

47. झाल्या असतील किती चुका, माफ केलेस तू आई, अनेक जन्मांची पुण्याई म्हणोनि तू लाभलीस आई मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

48. दीर्घायुष्य तुला लाभो

मिळो आम्हाला सहवास

जन्मो जन्मी तुझाच पोटी

हीच लागली आस

49. सगळ्यांनी साथ सोडली तरी तू सतत सोबत असतेस आई

इतका त्याग, इतके समर्पण आनंदाने कसं सोसलंस ग आई

मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

50. दीर्घायु होऊदे माझी आई हे परमेश्वरापाशी मागणे

तिच्याच पोटी जन्म होऊदे पुन्हा हेच देवाला सांगणे

मातृदिनाच्या खूप शुभेच्छा

आईबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी जास्त महागडे गिफ्ट किंवा पैशांची गरज नाही. तिच्यासाठी एखादे भेट कार्ड पुरेसे आहे. तर ह्या मदर्स डे साठी तुमच्या आईसाठी काहीतरी खास करा आणि तिच्यासोबत हा दिवस साजरा करा.

आणखी वाचा:

मातृदिनाच्या दिवशी आईला भेट देण्यासाठी ३५ एकमेव आणि कल्पक भेटवस्तूंचे पर्याय
तुमच्या आईला समर्पित करण्यासाठी मराठी चित्रपटांमधील ९ सर्वोत्तम गाणी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article