Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसुतीपूर्व काळजी गरोदरपणातील अतिउष्णता (हायपरथर्मिया) – कारणे, धोके आणि उपाय

गरोदरपणातील अतिउष्णता (हायपरथर्मिया) – कारणे, धोके आणि उपाय

गरोदरपणातील अतिउष्णता (हायपरथर्मिया) – कारणे, धोके आणि उपाय

होय, तुम्ही बरोबर ऐकले! शरीराची उष्णता वाढण्यास आपण कारणीभूत असतो. आपल्यापैकी बरेच जण तहान लागेपर्यंत नियमित अंतराने पाणी पिणे विसरतात. गरोदरपणात, आणखी एक मौल्यवान जीव त्याच्या सर्व पौष्टिक गरजांसाठी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असतो. त्यामुळे, तंदुरुस्त आणि निरोगी गरोदरपणासाठी तुम्ही योग्य आहारासोबतच पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे.

गरोदरपणात शरीराचे तापमान वाढणे (हायपरथर्मिया) म्हणजे काय?

जर तुमच्या शरीराचे तापमान (जे साधारणपणे ३७ डिग्री सेंटीग्रेड असते) ते गरोदरपणात ३९.डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त वाढले, तर त्याला अतिउष्णता म्हणतात. गरोदरपणात अतिउष्णतेसाठी वापरला जाणारा वैद्यकीय शब्द म्हणजे हायपरथर्मिया हा होय .

अतिउष्णतेची (हायपरथर्मिया) चिन्हे

अतिउष्णतेचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अतिउष्णतेचा सर्वात वाईट भाग म्हणजे तुमच्या शरीराचे तापमान वाढले तरीही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अस्वस्थता जाणवणार नाही. परंतु, तुमचे शरीर जास्त गरम होत आहे की नाही हे समजण्यासाठी खालील लक्षणांकडे लक्ष द्या:

  • चक्कर येणे
  • डोके जड होणे
  • मळमळ किंवा उलट्या झाल्याची भावना
  • निर्जलीकरण
  • मूर्च्छा येणे
  • अचानक सर्दी होणे किंवा थंडी वाजून येणे
  • अचानक तोंडात कोरडेपणा जाणवतो
  • अनियंत्रित आणि जास्त घाम येणे
  • चिकटपणाची अप्रिय भावना

गरोदरपणातील अतिउष्णतेची (हायपरथर्मिया) कारणे

अतिउष्णता खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे होऊ शकते

  • उष्ण हवामानात जास्त शारीरिक श्रम केल्याने पहिल्या तिमाहीत गरोदरपणात शरीर जास्त गरम होते.
  • दीर्घकाळापर्यंत उच्च तीव्रतेचे शारीरिक व्यायाम
  • सौना बाथ घेत असल्यास
  • गरम पाण्याच्या बाथटबमध्ये बराच वेळ घालवल्यास .
  • संसर्ग किंवा इतर वैद्यकीय स्थितीमुळे खूप ताप आल्यास

गरोदरपणात अतिउष्णतेचा धोका

गरोदरपणात अतिउष्णतेचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

  • पहिल्या तिमाहीत गरोदरपणात उष्णता वाढल्यास गर्भपात सुद्धा होऊ शकतो
  • अतिउष्णतेमुळे गर्भाची वाढ मंद होणे, बाळाचा पोटात मृत्यू आणि मज्जारज्जूविषयक विकृती यासारखे काही गंभीर जन्म दोष होऊ शकतात
  • अभ्यासातून असे दिसून आले आहे की आईच्या शरीराची उष्णता वाढल्याने बाळाचे ओठ दुभंगलेले असू शकतात . म्हणजे वरच्या ओठात आणि तोंडाच्या वरच्या भागात छेद असू शकतात.
  • विशेषतः पहिल्या तिमाही मध्ये उष्णता वाढल्यामुळे बाळामध्ये न्यूरल ट्यूब दोष देखील होऊ शकतात.

गरोदरपणात अतिउष्णतेचा धोकाव्यायामामुळे शरीराचे तापमान वाढू शकते का?

आपल्या सर्वांना माहित आहे की व्यायाम करणे नेहमीच आरोग्यासाठी चांगले असते. गरोदरपणात सुद्धा व्यायाम केल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात, तुमचे हृदय निरोगी राहते आणि तुम्हाला सक्रिय वाटते. पण गरोदरपणात जास्त परिश्रम केल्याने शरीर जास्त गरम होऊ शकते. बराच काळ, अत्यंत उष्ण आणि दमट हवामानात उच्चतीव्रतेचे वर्कआउट केल्याने शरीर जास्त गरम होऊ शकते. त्यामुळे तुमच्या गरोदरपणात ट्रेनरने सुचवलेले मध्यम, कमीतीव्रतेचे व्यायाम करणे चांगले असते. सलग ४५ मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करू नका. अति उष्ण दिवसात व्यायाम करणे टाळा.

गरोदरपणात शरीराचे तापमान सामान्य कसे ठेवावे?

गरोदरपणात, तुमच्या शरीराचे तापमान जास्त असते. ह्याचे कारण असे की शरीरात वाढणाऱ्या गर्भाच्या विकासासाठी शरीरात साधारणतः ४०५०% जास्त रक्त पंप होते. शरीर कठोर परिश्रम करत असल्याने, आपोआप उष्णता निर्माण होते आणि उन्हाळ्यात बाह्य उष्णता त्यामध्ये भर घालते. तिसर्‍या तिमाहीत उष्ण आणि दमट हवामान देखील गरोदरपणात अतिउष्णतेला चालना देते. त्यामुळे, आईने शरीर थंड राहण्यासाठी आणि उष्णतेवर मात करण्यासाठी चांगली काळजी घेणे आवश्यक आहे! अतिउष्णतेपासून बचाव करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत.

गरोदरपणात अतिउष्णता टाळण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे:

. पुरेसे पाणी पिणे

तुम्हाला तहान लागत नसली तरीही तुम्ही ठराविक अंतराने पाणी प्यावे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात, शरीराची ऊर्जा पातळी वाढते, मेंदूचे कार्य वाढते आणि शरीरातील निर्जलीकरण टाळले जाते. ह्यासारखे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत.

. सौना बाथ टाळा

संपूर्ण गरोदरपणात स्टीम बाथ, हॉट मसाज आणि सॉना टाळणे चांगले. गरम पाण्याच्या बाथटबमध्ये सुद्धा जास्त वेळ बसणे टाळा, कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढेल. गरोदरपणात फक्त उबदार पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.

. जास्त शारीरिक ताण टाळा

आधी सांगितल्याप्रमाणे, गरोदरपणात उच्चतीव्रतेचे व्यायाम टाळणे चांगले. नुसता व्यायामच नाही तर वजन उचलणे, घरातील कामे करणे इत्यादी कोणत्याही प्रकारची कठोर क्रिया टाळली पाहिजे.

. अतिउष्ण दिवसात बाहेर जाणे टाळा

दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी लवकर फिरणे टाळा, कारण यामुळे सनस्ट्रोक किंवा हायपरथर्मिया होऊ शकतो. जास्त काळ उष्णतेच्या संपर्कात न येता घरातच राहणे किंवा सुरक्षितपणे प्रवास करणे चांगले.

. थंड आणि हलके कपडे घाला

गरोदरपणात घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळा. सैल, हलके आणि श्वास घेण्यासारखे आरामदायक कपडे उन्हाळ्यात योग्य आहेत.

थंड आणि हलके कपडे घाला

. द्रवपदार्थांचे पुरेसे सेवन

आपल्या आहारात शक्य तितक्या द्रवपदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आहारात ताज्या फळांचे रस, सूप इत्यादींचा समावेश करू शकता. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. फिजी ड्रिंक्स आणि कोल्ड्रिंक्स टाळा.

. कॅफिन टाळा

गरोदर असो किंवा नसो, कॅफीनचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो उदा: अस्वस्थता, निद्रानाश, चिडचिड आणि कधीकधी तणाव इत्यादी. म्हणून, आपल्या आहारातून कॅफिनचे सेवन पूर्णपणे काढून टाकणे चांगले. त्याऐवजी, रीफ्रेशिंग स्मूदीज घ्या. त्यामुळे तुमचे शरीर थंड राहील.

. पोहणे

गरोदरपणात पोहणे हा सर्वोत्तम आणि सुखदायक व्यायाम मानला जातो. गरोदरपणाच्या संपूर्ण काळात पोहण्याचा सराव करणे सुरक्षित आहे आणि तुम्हाला थंड राहण्यास मदत होईल.

. ध्यानाचा सराव करा

ध्यान केल्याने तुम्हाला खोल श्वास घेता येईल आणि तुमचे मन आणि शरीर तणावापासून मुक्त होईल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या बाळाशी जोडले जाण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करून पाहू शकता. ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम तुमच्या संवेदना शांत करतात आणि शरीराचे तापमान कमी करतात, त्यामुळे शरीर जास्त गरम होण्याची शक्यता कमी होते.

गरोदरपणातील अतिउष्णता किंवा हायपरथर्मिया सहजपणे टाळता येऊ शकतो. अतिउष्णता टाळण्यासाठी त्यावर काही उपाय करता येतात. काळजी करू नका, कारण शरीराचे तापमान वाढणे हे अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत होऊ शकते. ज्या गरोदर स्त्रिया भरपूर पाणी पितात त्यांना सहसा अतिउष्णतेचा त्रास होत नाही. शांत रहा आणि आपल्या गरोदरपणाच्या सुंदर कालावधीचा आनंद घ्या!

आणखी वाचा:

गरोदरपणात सूज येणे
गरोदरपणात पोटात वायू होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article