Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण १५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, तक्ता आणि पाककृती

१५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, तक्ता आणि पाककृती

१५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – पर्याय, तक्ता आणि पाककृती

जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी नेहमीचे जेवण तयार करत असता तेव्हा १५ महिन्यांच्या बाळासाठी जेवणाच्या आणि नाश्त्याचे पर्याय न सुचणे हे खूप स्वाभाविक आहे. लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या पोषणाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात आणि दोघांच्याही पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी कुठले अन्नपदार्थ योग्य आहेत हे समजणे थोडे अवघड होऊन बसते. आणि म्हणूनच आहाराचे योग्य नियोजन आणि सोपे वेळापत्रक असल्यास त्याची मदत होते.

१५ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाच्या गरजा

१५ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाच्या गरजा सर्वसमावेशक आहेत. आहार कमी होऊन सुद्धा सर्व महत्वाची पोषणमूल्ये योग्य प्रमाणात त्यात समाविष्ट असणे गरजेचे असते.

. पूरक पोषणमूल्ये

आहार कमी झाल्यावर, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स सारखी सूक्ष्ममूलद्रव्ये कमी पडू लागतात. म्हणून, त्यांचा आहारात समावेश होतो आहे की नाही ह्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे.

. पाणी

आहारात पाण्याचा समावेश करणे हे अतिशय गरजेचे आहे कारण बऱ्याच मुलांच्या पाणी पिण्याचे लक्षात राहात नाही. तुमच्या बाळाने दिवसातून साधारणपणे १ लिटर पाणी प्यायले पाहिजे.

. लोह

तुमच्या मुलाची वाढ होत असताना अन्नपदार्थांमधून मिळणाऱ्या लोहाची गरज वाढते, कारण लोहाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजेच स्तनपान कमी होते. बाळाला आहारातून दररोज ७ मिग्रॅ लोह मिळत आहे ना ह्याची खात्री करा.

. सोडियम

अन्नपदार्थातील सर्वात महत्वाचा घटक ज्यापासून आपल्याला सोडियम मिळते तो घटक म्हणजे मीठ. ज्या घरांमध्ये मीठ कमी वापरले जाते त्यांनी ह्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.

. तंतुमय पदार्थ

आतड्यांची हालचाल आणि पचन नीट झाल्यास पोषणमूल्यांचे सगळे फायदे मुलांना मिळतात. तंतुमय पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने शरीर जास्तीत जास्त चांगले कार्यरत राहते.

. कर्बोदके

तुमच्या मुलाच्या जेवणाचा बराचसा भाग कर्बोदके व्यापतात, आणि ते ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतात. शरीरातील बऱ्याचशा प्रक्रिया ह्या कर्बोदकांवर अवलंबून असल्याने कर्बोदकांच्या संख्येत तडजोड केली जात नाही.

. प्रथिने

मुलांना लागणारी प्रथिने त्यांना पुरवण्याबाबत शाकाहारी कुटुंबाना चिंता असते. मांसामधून आवश्यक प्रथिने मिळतात. चांगले पोषण मिळण्यासाठी शाकाहारी पर्याय सुद्धा उपलब्ध असतात.

. ऊर्जा

सुरवातीच्या काही दिवसांसारखा आता वाढीचा वेग नाही. त्यामुळे ऊर्जेची गरज आता दररोज किलोकॅलरी इतकी असते आणि पुढे वाढत जाते.

१५ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाच्या गरजा

१५ व्या महिन्यात बाळाला किती अन्नाची गरज असते?

तुमच्या बाळाच्या शारीरिक हालचाली आणि चयापचयाच्या क्रियेनुसार तुमच्या मुलाच्या अन्नपदार्थांची गरज ही पहिली काही वर्षे १००० ते १४०० कॅलरीज दिवसाला इतकी असते. म्हणून नाश्त्याच्या कल्पना आणि अन्नपदार्थांचे पर्याय ह्यांचे संतुलन राखल्यास बाळाला नीट पोषण मिळू शकते.

१५ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

काही विशिष्ठ अन्नपदार्थ तुमच्या बाळासाठी उत्तम पर्याय आहेत ज्यामुळे बाळाला लागणारे पोषण मिळते.

. मांस

हे महत्वाचे आहे की छोटी मुले मोठ्या माणसांसारखे चिकनचे मोठे तुकडे खाऊ शकत नाही. ह्या वयातील प्रथिनांची गरज ही किसलेले डुकराचे मांस, मऊ मासे, बारीक केलेले चिकन किंवा हॅम हे पर्याय निवडून भागवता येऊ शकते. आहारात समुद्री अन्नपदार्थांचा समावेश करताना काळजी घेतली पाहिजे.

. शेंगा आणि सुकामेवा

जेवणासाठी अंड्याचा पर्याय निवडल्याने तुमच्या बाळाला प्रथिने आणि चरबी मिळू शकते, तसेच शाकाहारी लोक सुद्धा शेंगा आणि सुक्यामेव्याचा पर्याय निवडू शकतात. बाळाला सुकामेवा तसाच देऊ नये कारण तो घशात अडकण्याची शक्यता असते. तथापि, अन्नपदार्थांमध्ये घालून दिल्यास काही प्रश्न नाही.

. भाज्या

बरीच मुले ह्या वयात भाज्या खाऊ लागतात. काही घटक अजूनही चावायला कठीण असतात आणि ते उकडून किंवा वाफवून मऊ करून घ्यावे लागतात. तळलेल्या भाज्या टाळा आणि विविध पर्याय निवडा जेणेकरून तुमच्या बाळाला वेगवेगळ्या चवींचा आनंद घेता येईल.

१५ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

. धान्य

तुमच्या बाळाची पोषणाची गरज भागावी म्हणून पालकांना अन्नपदार्थांची निवड करताना संपूर्णधान्याचा पर्याय निवडण्यास सुचवले जाते. आणि ते पोळी , भाजी, पास्ता ह्या स्वरूपात सुद्धा देऊ शकता. तसेच कृत्रिम पदार्थ नसलेले सीरिअल्स सुद्धा एक उत्तम निवड असू शकते.

. फळे

दुसऱ्या अन्नपदार्थांपेक्षा फळे तुमच्या बाळाला वेगवेगळ्या चवींची ओळख करून देतात तसेच त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्था प्रेरित होते आणि त्यामुळे वेगवेगळी जीवनसत्वे मिळण्यास मदत होते.

. नाश्ता

तुमचे बाळ जरी बिस्किटाचे किंवा टोस्टचे छोटे तुकडे चघळत असेल तरी त्यांच्या आयुष्याच्या ह्या सुरुवातीच्या टप्प्यावर खूप साखर असलेले पदार्थ देणे टाळले पाहिजे. त्यांना मध्येच लागलेली भूक भागवण्यासाठी चीझ असलेले अन्नपदार्थ किंवा उकडलेल्या भाज्यांच्या समावेश करा.

नाश्ता

. तेल

१५ महिन्यांच्या बाळाला चरबीचीसुद्धा गरज असते. चरबी म्हणजे ऊर्जेचा स्रोत असतो आणि त्यामुळे तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत होते. ज्या तेलामध्ये ट्रान्सफॅट नसतात असे तेल किंवा बटर सारखा पर्याय निवडा.

. दुग्धजन्य पदार्थ

ह्या वयाच्या मुलांना प्रथिने आणि कॅल्शिअम ह्यांची आत्यंतिक गरज असते कारण त्यांची हाडे आणि स्नायू मजबूत असणे गरजेचे असते. तुमच्या मुलाच्या आहारात तुम्ही योगर्ट आणि संपूर्ण दुधाचा समावेश करीत आहात ना ह्याची खात्री करा.

. फळांचा रस

मुलांसाठी फळांच्या रसाऐवजी फळे खाणे जरी चांगले असते तरी, फळांच्या रसाचा आहारात समावेश असणे चांगले असते. परंतु हा रस ताजा असणे जरुरीचे असते आणि त्यामध्ये कुठलेही कृत्रिम घटक असता कामा नयेत. तसेच पाण्याऐवजी फळांचा रस घेणे टाळा.

फळांचा रस

१०. जीवनसत्वे

शरीराची संरचना आणि कुटुंबाच्या जीवनशैलीमुळे बाळाच्या शरीरात पोषणमूल्यांची कमतरता होऊ शकते. अशा वेळी आहारातून कमी पडत असलेली पूरक जीवनसत्वे बाळाला दिली पाहिजेत.

१५ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता/ आहार योजना

१५ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता तयार करणे ही सोपी गोष्ट नाही. खाली दिलेल्या तक्त्याचा संदर्भ घेऊन तुम्ही तुमच्या बाळासाठी योग्य असा आहार तक्ता तयार करू शकता.

  • १५ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना: आठवडा १ ला

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला अंजीर घालून केलेला राजगिऱ्याच्या लाह्यांचा मिल्कशेक. चिरलेले पेअर/ सफरचंद संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप शेवयांची लापशी

पराठा पनीर भुर्जी

दिवस २ रा उकडलेले अंडे किंवा घरी केलेले पनीर कलिंगडाचे तुकडे पोळी+ भाजी+ आवडीची भाजी+काकडीचे काही काप चिकू मिल्कशेक भाज्यांचे सूप + फ्राईड राईस + गाजराचे काप
दिवस ३ रा

बेसन,ज्वारीचे कोशिंबीरी घालून केलेले धिरडे दह्यासोबत

संत्र्याचा रस संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर

पालक ढोकळा

भाज्या घालून केलेली खिचडी आणि कढी
दिवस ४ था किसलेले गाजर घालून केलेले बेसन धिरडे चिकू मिल्कशेक

पोळी+ डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही काप

रताळे + पोहे पावडर संपूर्ण गव्हाचा पास्ता घरी केलेल्या टोमॅटो प्युरीसोबत
दिवस ५ वा भाज्या घालून केलेला उपमा ताकासोबत

खजूर आणि मिल्क पावडर लाडू

संपूर्णधान्य रोटी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरूटचे तुकडे

गाजरबीटरूट सूप आणि मुरमुरे

डाळ खिचडी आणि व्हेजिटेबल सूप

दिवस ६ वा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच

पालक + द्राक्षे सफरचंद स्मूदी

पोळी + डाळ + तुमच्या आवडीची भाजी + काकडीचे काही काप

३ पनीर अंजीर लाडू

दही किंवा लस्सीसोबत, पराठा
दिवस ७ वा मनुके घातलेला राजगिरा गहू शिरा

खजुराचा लाडू + दूध

संपूर्णधान्य रोटी +डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप

पपई आणि पेपरचे तुकडे

पोळी +भाजी +डाळ फ्राय
  • १५ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना: आठवडा २ रा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला १ अंड्याचा किंवा पनीर पराठा हिरव्या चटणीसोबत १ ग्लास सफरचंदाचा मिल्कशेक संपूर्णधान्य रोटी+डाळ+आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप शेवयांची लापशी पनीर कटलेट, ब्रोकोली सूप आणि टोस्ट सोबत
दिवस २ रा अंड्याची भुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास ताजा संत्र्याचा ज्यूस १ ग्लास चॉकलेट मिल्कशेक पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप गव्हाची बिस्किटे आणि दही पालक

पनीर (कॉटेज चीझ ) किंवा अंड्याचा पुलाव व व्हेजिटेबल रायता

दिवस ३ रा बदाम आणि अक्रोड पूड घातलेली राजगिरा लापशी पपई संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर

उकडलेले रताळे आणि चाट मसाला

छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप

दिवस ४ था

१ कप पोहे + १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस

१ ग्लास दूध पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप मधासोबत पनीरचे तुकडे किंवा चाट मसाला नाचणीगहू रोटी कुठलीही भाजी आणि डाळी सोबत
दिवस ५ वा

फ्रेंच टोस्ट + १ ग्लास ताजा सफरचंद रस

१ ग्लास चिकू मिल्कशेक संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप राजगिरा लाडू आणि दूध पालक खिचडी दह्यासोबत
दिवस ६ वा ढोकळा आणि हिरवी चटणी

स्ट्रॉबेरी योगर्ट किंवा केळ्याचा रायता

पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप

नाचणी सत्व

वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी आणि कढी
दिवस ७ वा

१ अंडे किंवा बेसन ऑम्लेट

सीताफळ मिल्कशेक

संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप

बटाटा चीझ लॉलीपॉप

शेवग्याचे सूप + पनीर पराठा

  • १५ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना: आठवडा ३ रा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक खजूर आणि मिल्क पावडर लाडू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप

बटाटा आणि दही चाट

व्हेजिटेबल खिचडी, दही किंवा कढी सोबत

दिवस २ रा गहू पॅनकेक, मध किंवा साखर आणि दूध

पालक+ द्राक्षे सफरचंद स्मूदी

पोळी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप गहू आणि सोया बिस्किटे दुधासोबत २ छोटे चांदणीच्या आकाराचे ज्वारीपनीरपालक पराठा
दिवस ३ रा ज्वारीच्या लाह्यांची लापशी, खजूर लाडू + दूध

खजूर लाडू + दूध

संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर

पनीरचे तुकडे मध किंवा चाट मसाला सोबत

मटार आणि बटाटा भाजी आणि पराठा

दिवस ४ था बदाम पूड घातलेली

मुरमुऱ्याची

लापशी

मँगो/स्ट्रॉबेरी योगुर्ट आणि ओट्स रोटी+ डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप सफरचंदाची खीर + गाजर पराठा डाळ खिचडी किसलेल्या गाजरासोबत
दिवस ५ वा १ कप पोहे + १ छोटा ग्लास ताजा संत्र्याचा रस ओट्स सफरचंद स्मूदी संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काही काप दलिया शाही पनीर आणि पराठा, टोमॅटोमशरूम सूप
दिवस ६ वा फ्रेंच टोस्ट + १ ग्लास ताजा रस शेंगदाण्याचा लाडू पोळी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप मेथी ठेपला + दुधी भोपळा हलवा इडली आणि कमी तिखट सांबर
दिवस ७ वा अंडाभुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास चॉकलेट मिल्क उकडलेला चना संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप मँगो मिल्कशेक मटार आणि बटाटा भाजी आणि पराठा
  • १५ महिन्यांच्या बाळासाठी आहार योजना: आठवडा ४ था

जेवण न्याहारी नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता रात्रीचे जेवण
दिवस १ ला फ्रुट कस्टर्ड जव लाडू संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप गाजराचे काही काप, चीझ घातलेले मेथी पराठा आणि दुधी भोपळा कोफ्ता
दिवस २ रा किसलेली काकडी आणि ओट्स पॅनकेक मेथी पुरी रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप शेवयांची लापशी पनीर कटलेट, पालक सूप आणि टोस्ट
दिवस ३ रा व्हेजिटेबल उपमा आणि ताक बिया काढून कुस्करलेले सीताफळ संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + किसलेले गाजर संपूर्णधान्य बिस्किटे आणि दहीपालक कढी भात आणि टोमॅटोचे काप
दिवस ४ था ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच कलिंगड ज्यूस रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप घरी केलेले फ्रेंच फ़्राईस किंवा बटाट्याचे चिप्स १ छोटा काप छोले + २ छोट्या पुऱ्या + १ छोटा ग्लास लस्सी
दिवस ५ वा राजगिरागहू शिरा आणि कुस्करलेले मनुके अंडाभुर्जी किंवा पनीर लाडू संपूर्णधान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + उकडलेल्या बीटरुटचे काप मखाना + चॉकलेट मिल्कशेक मासे किंवा पनीरचा रस्सा आणि भात
दिवस ६ वा छोट्या इडल्या आणि चटणी मुरमुरे शेव रोटी + डाळ + आवडीची भाजी + काकडीचे काही काप सफरचंद कापून किंवा केळं पनीर पराठा आणि भोपळी मिरची भाजी
दिवस ७ वा अंडाभुर्जी + संपूर्णधान्य टोस्ट + १ ग्लास चॉकलेट मिल्क उकडलेला चना संपूर्ण धान्य रोटी + डाळ + आवडीची भाजी + टोमॅटोचे काही काप मँगो मिल्कशेक मटार आणि बटाटा भाजी पराठा

१५ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांच्या पाककृती

१५ महिन्यांच्या बाळाच्या जेवणाच्या किंवा विशेषकरून दुपारच्या जेवणासाठी काय करावे ह्यासाठी पालकांना संघर्ष करावा लागतो. परंतु खाली दिलेल्या पाककृतींमुळे तुमची त्यातून सुटका होणार आहे तसेच आणखी नवीन पदार्थ करण्यासाठी कल्पनाशक्तीला चालना मिळणार आहे.

. दही भात

हा पदार्थ तुम्ही कुठेही आणि कधीही बाळाला भरू शकता.

घटक

  • काळे उडीद
  • आले
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • लाल मिरची
  • तेल
  • मोहरी
  • मीठ
  • क्रीम
  • दही
  • दूध
  • शिजवलेला भात

कृती

  • शिजलेला भात घेऊन चांगला कुस्करा. त्यामध्ये दूध घालून चांगले ढवळा. त्यामध्ये दही आणि क्रीम घालून पुन्हा हलवा
  • एक भांडे घेऊन त्यामध्ये तेल घाला. त्यामध्ये फोडणीसाठी लागणारे सगळे घटक टाका आणि गरम होऊ द्या. थोडे तेल टाका आणि त्यामध्ये भात घाला.

दही भात

. खिचडी

मोठ्या माणसांसाठी आजारपणात योग्य आणि आरामदायक असलेला हा पदार्थ मुलांच्या दुपारच्या जेवणासाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे त्यांना चांगले पोषण मिळते.

घटक

  • मिरची पावडर
  • हळद
  • तूप
  • मीठ
  • भाज्या
  • डाळ
  • तांदूळ

कृती

  • तांदूळ आणि डाळ एकत्र करा आणि चांगली धुवून घ्या आणि ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • तोपर्यंत, भाज्या चांगल्या चिरून घ्या. आणि डाळ, तांदूळ असलेल्या भांड्यात घाला. आता हे भांडे कुकर मध्ये देऊन, कुकर माध्यम आचेवर गॅस वर ठेवा
  • २ शिट्या होईपर्यंत शिजू द्या.
  • वाफ जाऊ द्या आणि भात शिजला आहे का ते पहा.
  • खिचडी एका भांड्यात काढून घेऊन कुस्करा आणि त्यामध्ये तूप घाला. तसेच चवीसाठी मीठ, मिरपूड आणि थोडी हळद सुद्धा घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.

खिचडी

. पास्ता खीर

तुम्हाला आश्चर्य वाटले हो ना? जेव्हा आपले मूल ही खीर खाईल तेव्हा त्याला आनंद होईल.

घटक

  • दूध
  • तांदळाचे पीठ
  • हिरवी वेलची
  • गूळ
  • पास्ता
  • पाणी

कृती

  • एक भांडे घेऊन त्यामध्ये पाणी घाला. ते उकळू द्या. त्यामध्ये पास्ता घालून शिजू द्या. शिजल्यानंतर त्यामधून पाणी काढून टाका.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये तूप आणि बटर घाला आणि ते चांगले परतून भाजून घ्या. त्यामध्ये दूध घालून ते उकळू द्या. त्यामध्ये पास्ता घाला आणि ते एकत्र शिजवा.
  • एका कपात दूध, पाणी आणि तांदळाचे पीठ घाला. ते मऊ होईपर्यंत चांगले मिक्स करा, आता ते सुद्धा वरील मिश्रणात घाला आणि सतत ढवळत रहा.
  • जेव्हा खीर थोडी घट्ट होईल तेव्हा त्यामध्ये वेलची आणि गूळ घालून खायला द्या.

पास्ता खीर

. भाजलेले हिरवे बीन्स

नेहमीच्या कंटाळवाण्या नाश्त्यापेक्षा तुमच्या बाळासाठी हा हिरवा आणि पोषक पर्याय निवडा जेणेकरून तुमच्या बाळाला हिरवे अन्नपदार्थ आवडू लागतील.

घटक

  • शुद्ध ऑलिव्ह ऑइल
  • मीठ
  • हिरवे बीन्स

कृती

  • सुरवातीला ओव्हन ४२५ डिग्रीला गरम करून घ्या. त्यामध्ये ८१० मिनिटांसाठी भांडे ठेवा.
  • एका भांड्यात बीन्स ठेवा आणि त्यामध्ये थोडे तेल टाका आणि थोडेसे मीठ वरून घाला. टॉस करून एकत्र करा.
  • हे बीन्स ट्रे मधील शीट वर ठेवा आणि ठेवताना त्यांच्यामध्ये अंतर असुद्या.
  • कुरकुरीत आणि मऊ होईपर्यंत ओव्हनमध्ये ठेवा.

भाजलेले हिरवे बीन्स

. जांभळ्या रंगाची भाज्यांची प्युरी

त्याच जुन्या प्युरी खाऊन मुलांना कंटाळा येतो, आणि असे जांभळ्या रंगासारखे वेगळे रंग बघून त्यांच्या डोळ्यात लगेच चमक येते.

घटक

  • पाणी
  • लिंबाचा रस
  • फ्रोजन पालक
  • ब्लूबेरी

कृती

  • एक भाडे घेऊन त्यामध्ये पाणी आणि पालक एकत्र करा, ते चांगले उकळू द्या आणि ८ मिनिटे ते शिजू द्या.
  • पाणी काढून टाका आणि पालक, ब्लूबेरी, लिंबाचा रस आणि पाणी घालून एकत्र वाटून घ्या त्यामुळे छान घट्ट प्युरी तयार होईल.

जांभळ्या रंगाची भाज्यांची प्युरी

भरवण्यासाठी काही टिप्स

तुमच्या बाळाला भरवताना ह्या साध्या आणि सोप्या टिप्समुळे बाळाला भरवण्याचा अनुभव तुम्ही तुमच्यासाठी आणि बाळासाठी सोपा करू शकता

  • तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तयार केलेले अन्नपदार्थ सुद्धा तुमचे मुलं खाऊ शकते परंतु ते मसालेदार नसावे.
  • तुमच्या मुलाला काही गोष्टी स्वतःच्या हाताने खाण्यास सांगा
  • तुमच्या बाळाला जबरदस्तीने अन्न संपवण्यास सांगू नका
  • संपूर्ण जेवणाची वाट बघत बसण्याऐवजी तुमच्या बाळाने मध्ये मध्ये थोडे खाल्ले तरी चालेल
  • बाळाच्या खाण्याच्या सवयी अचानक बदलल्यास गोंधळून जाऊ नका
  • जेवणाचा संपूर्ण अनुभव आनंदी आणि मजेदार करा

तुमच्या बाळाच्या रात्रीच्या जेवणासाठीच्या विविध पर्यायांमुळे येत्या काही आठवड्यांमध्ये तुमचे जेवण नवीन रूप घेईल. तुमच्या बाळाचे निरीक्षण करा आणि बाळाला काय आवडते किंवा काय नाही ह्याकडे लक्ष द्या त्यानुसार बाळाचे खाण्याचे संतुलित वेळापत्रक करा.

अस्वीकारण:

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरा. तुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसार/ गरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता.
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका.
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा.
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावे. जसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावा. खूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होते, आणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तथापि, जर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या.
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकते. तुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकता. बाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनी, जिरेपावडर, लिंबाचा रस, कढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवा, ग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा
RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article