Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मुलांसाठी आंबे – आरोग्यविषयक फायदे आणि चवदार पाककृती

मुलांसाठी आंबे – आरोग्यविषयक फायदे आणि चवदार पाककृती

मुलांसाठी आंबे – आरोग्यविषयक फायदे आणि चवदार पाककृती

लहान मुले असो किंवा मोठी माणसे , आंबे सर्वांनाच आवडतात. रसाळ आंबा म्हणजे मोठ्या माणसांसाठी आणि लहान मुलांसाठी उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम अशी पर्वणीच आहे. हे फळ केवळ शरीराचे सजलीकरण करत नाही तर त्याच्या समृद्ध चवीमध्ये, टेस्ट बड्स शांत करण्याची शक्ती देखील असते. तसेच, आंब्याशी संबंधित आरोग्यविषयक फायद्यांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. तुम्ही ते तसेच खाल्ले किंवा त्याचा शेक करून प्यायला तरीही तो चवदार लागतो.

मुलांसाठी आंब्याचे फायदे

आंबा मुलांसाठी चांगला आहे का? याचे उत्तर होय आहे. आंबा म्हणजे पोषक अशी खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे उर्जास्थान आहे. शिवाय, त्यात अँटीऑक्सीडेंट्स असतात त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यासाठी निवडण्यासाठी तो उत्तम पर्याय आहे. त्याचे आणखी फायदे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा

. दृष्टी सुधारते

मुले विकासाच्या टप्प्यात असताना, त्यांची वाढ चांगली होण्यासाठी योग्य आहार देणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी रसाळ आंब्यापेक्षा चांगले काय असू शकते? मुलांना विशिष्ट पदार्थांविषयी आवडनिवड निर्माण होते आणि ते भाज्या खाण्यास नकार देतात पण व्हिटॅमिन ए समृद्ध असलेल्या आंबा ते कधीही नाकारणार नाहीत. अ जीवनसत्वाचा हा स्रोत अशा प्रकारे रात्रीचा अंधत्व दूर करण्यास, कॉर्नियाला मऊ करण्यासाठी आणि डोळ्यांमधील खाज कमी करण्यास मदत करू शकतो.

. तीक्ष्ण स्मरणशक्ती

आंब्यात ग्लूटामाइन ऍसिड भरपूर प्रमाणात असते जे मेमरी बूस्टर म्हणून कार्य करते. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या दैनंदिन आहारामध्ये आंबे समाविष्ट करता तेव्हा ते सक्रिय रहातात आणि शैक्षणिक कौशल्ये पटकन आत्मसात करतात.

. त्वचेचे आरोग्य सुधारते

सर्व पालकांची अशी इच्छा असते की त्यांच्या मुलाची त्वचा मऊ आणि गुळगुळीत असावी. पण त्यामागील रहस्य म्हणजे तुमच्या मुलाला हायड्रेटेड ठेवणे. आंबे खाल्ल्याने मुलाची त्वचा निरोगी आणि तेजस्वी राहते. आंब्याचा लगदा लावल्याने बंद झालेली त्वचेची छिद्रे उघडतात.

. अशक्तपणा कमी करते

खरं सांगायचं तर, आंबा लोह समृद्ध आहे. आणि, लोह हे आवश्यक खनिज आहे जे लाल रक्त पेशींच्या उत्पादनास चालना देण्यास मदत करते. म्हणून, आपल्या मुलांना आंबे दिल्यास त्यांची रक्तक्षय होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होते, जेथे रक्तामध्ये लाल रक्तपेशींची योग्य संख्या नसते.

. निरोगी वजनाला प्रोत्साहन देते

निरोगी वजन वाढविण्यासाठी मुलांना योग्य प्रमाणात पोषकमूल्ये आणि जीवनसत्त्वे आवश्यक असतात. जर आपल्या मुलाचे वजन पुरेसे होत नसेल तर आपण त्याच्या आहारात आंब्याचा समावेश करू शकता. त्याला नियमितपणे मॅंगो शेक देऊ शकता, याची चव चांगली आहे आणि मुलांना मजबूत आणि निरोगी राहण्यास देखील त्याची मदत होते.

. पचन वाढवते

आंबे हे पाचक एन्झाईमचे समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखले जाते जे प्रथिनांचे विघटन करण्यास मदत करतात. या प्रक्रियेमुळे मुलांमध्ये पचन चांगले होते. तसेच, आंब्यांचा आणखी एक फायदा म्हणजे आंबे ऍसिडिटी किंवा इतर पाचक विकार कमी करतात जे सामान्यत: मुलांमध्ये आढळतात.

. कर्करोगाचा धोका कमी करते

आंब्यात पेक्टिन समृद्ध प्रमाणात आढळते, आहारातील तंतुमय पदार्थ पचनसंस्थेशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता कमी करते. आपल्या मुलांच्या नियमित आहार योजनेत आंब्यांचा समावेश करणे महत्वाचे आहे कारण यामुळे ते कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून दूर राहतील.

. रोगप्रतिकार शक्ती वाढवते

आंबे जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी चे समृद्ध स्त्रोत आहेत तसेच, आंबे म्हणजे निरोगी रोगप्रतिकार प्रणाली टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या विविध प्रकारच्या कॅरोटीनोइड्सचा चांगला स्रोत आहे. अँटीऑक्सिडंट गुणधर्म सूक्ष्मजंतूंच्या हल्ल्यापासून बचाव करण्यास मदत करतात, यामुळे आपोआप रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास चालना मिळते

लहान मुलांसाठी आंबा घालून करण्याच्या सोप्या पाककृती

आपल्या मुलाच्या आहारात पौष्टिक आंबा कसा घालायचा याविषयी विचार करीत आहात? त्याविषयी जास्त माहिती मिळण्यासाठी खालील पाककृती वाचा

. आंबा शेक

आंबा शेक केल्याने केवळ शरीर हायड्रेट होत नाही तर तो शेक चवदारही असतो

साहित्य

 • ताजा आंबा बारीक कापून घ्या
 • चवीनुसार साखर
 • दुधाने भरलेला ग्लास
 • आवश्यक असल्यास बर्फाचे तुकडे

पद्धत

 • मोठ्या भांड्यात बारीक कापलेला आंबा, साखर आणि दूध मिसळा
 • चांगले मिसळण्यासाठी ब्लेंडर वापरा
 • संपूर्ण पातळ होईपर्यंत ब्लेंडर मध्ये फिरवत रहा
 • गरज भासल्यास बर्फाचे तुकडे घाला आणि ते आपल्या मुलांना थंडगार सर्व्ह करा

. आंबा द्राक्षे स्मूदी

मुलांसाठी ही आंब्याची स्मूदी म्हणजे द्राक्षे आणि आंब्यांचे मिश्रण आहे केवळ त्याची चवच नाही तर उत्तम आरोग्यासाठी देखील त्याचे भरपूर फायदे आहेत

साहित्य

 • १ चिरलेला आंबा
 • २ कप हिरवी द्राक्षे
 • लिंबाचा रस १ चमचा
 • एक कप पाणी
 • चवीनुसार साखर
 • २ पुदिन्याची पाने

पद्धत

 • एका भांड्यात आंबे आणि द्राक्षे मिक्स करावीत आणि मिश्रण चिकट द्रव पदार्थ होईपर्यंत मिसळत रहा.
 • दुसऱ्या भांड्यात लिंबाचा रस, पाणी, साखर आणि पेपरमिंट घालून मिक्स करावे.
 • एका काचेच्यामध्ये ग्लासमध्ये हे मिश्रण घाला आणि त्यावर साखर आणि पुदिन्याची पाने घाला
 • आवश्यक असल्यास बर्फाचे तुकडे घाला आणि आपल्या मुलांना सर्व्ह करा.

. आंबा केक

केकमध्ये आंब्याचा गोडपणा आणि चव ह्यामुळे ही पाककृती सर्वोत्तम सर्वोत्तम होते करून पहा

साहित्य

 • १ कप पीठ
 • चवीनुसार साखर
 • /२ कप फ्रेश मलई
 • बटर १ चमचा
 • १ चमचा बेकिंग पावडर
 • २ पाश्चराइज्ड अंडी
 • २ आंबे

पद्धत

 • आंब्याचा पल्प काढून एका खोल भांड्यात बाजूला ठेवा
 • आंब्याच्या पल्पमध्ये साखर आणि व्हीप्ड क्रीम घाला आणि ब्लेंडरने चांगले ढवळा
 • मिश्रणात अंडी घाला आणि पुन्हा चांगले ढवळा
 • आता त्यात बेकिंग पावडर आणि पीठ घाला आणि सर्व एकत्र होईपर्यंत चांगले मिसळा
 • मिश्रण एका चांगले ग्रीस केलेल्या मायक्रो ओव्हन सेफ वाडग्यात घाला
 • सुमारे १० मिनिटे मिश्रण मायक्रोवेव्ह करा
 • ओव्हन बीप्सनंतर बघा आणि केक सेट नसल्यास, आणखी ४५ मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करा.
 • थंड होऊ द्या आणि आपल्या मुलांना सर्व्ह करा

. आंबा आणि दही मिक्स पेप्सिकल्स

मुलांसाठी आंब्याचा हा पदार्थ करणे आवश्यक आहे कारण त्याच्या मस्त चवीमुळे मुले मनापासून त्याचा आनंद घेतील

साहित्य

 • दही १ कप
 • १ कप बारीक ब्लेंड केलेला आंबा
 • चवीनुसार साखर
 • /२ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स

पद्धत

 • एका भांड्यात सर्वकाही मिक्स करावे आणि त्याची चांगली पेस्ट होईपर्यंत चांगले ढवळावे
 • पोपसिकल मोल्ड मध्ये ही पेस्ट भरा
 • भरलेले साचे फ्रीजरमध्ये ठेवा आणि रात्रभर तसेच ठेवा
 • जेव्हा आपणास लक्षात येईल की पॉप्सिकल घट्ट होऊ लागले आहे तेव्हा त्यात आइस्क्रीम स्टिक्स घाला
 • काही तास गोठवा आणि आपल्या मुलांना शाळेतून परत आल्यावर ते द्या

. अविरत आंबा कोशिंबीर

मुलांसाठी सर्वात सोपा आंबा स्नॅक्स आहे. या रेसिपीसाठी जास्त कष्ट लागत नाही. परंतु ह्या पदार्थाचे खूप फायदे आहेत.

साहित्य

 • ३ ताजे व सोललेले आंबे
 • लिंबू
 • चवीनुसार मीठ
 • मिरपूड चिमूटभर
 • मिरची पावडर (पर्यायी)

पद्धत

 • आंबे सोला व चिरून घ्या आणि एका खोल भांड्यात ठेवा
 • दुसऱ्या भांड्यात मीठ, मिरपूड, तिखट आणि लिंबू मिक्स करावे
 • आता तयार केलेले मिश्रण आंब्यात मिसळा आणि आपल्या मुलास सर्व्ह करा

तुम्हाला आंब्याच्या आरोग्यविषयक फायद्यांची माहिती असल्याने तुम्ही ह्या पाककृती का करून पहात नाही? आजच प्रयत्न करा पण कृत्रिम साखर न घालण्याचे लक्षात ठेवा.

आणखी वाचा : मुलांनी दूध प्यावे म्हणून काही सोपे आणि परिणामकारक मार्ग

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article