Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी?

मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी?

मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी?

मुलांच्या केसात कोंडा होणे ही सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे. त्यामुळे टाळूवर जळजळ होते आणि खाज सुटते. मुले सहसा घराबाहेर खेळतात. यामुळे मुले डोक्यातील कोंड्यासह, धुळीमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्येस अधिक संवेदनाक्षम असतात. अँटीडँड्रफ शाम्पू वापरून डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होऊ शकतो का असा प्रश्न पालकांना पडू शकतो. परंतु, मुलांच्या डोक्यात कोंडा होण्यामागे धूळ हे एकमेव कारण नाही. त्याची विविध कारणे, लक्षणे आणि उपचार आहेत, ह्यावर चर्चा करूयात आणि अधिक जाणून घेऊयात.

डोक्यातील कोंडा म्हणजे काय?

डोक्यातील कोंडा मूळत: मृत त्वचा आहे जी टाळू किंवा एखाद्या व्यक्तीच्या केसांमधे आढळते. त्याचा परिणाम म्हणजे सामान्यतः पांढरे खवले तयार होतात आणि खाज सुटते. परंतु काही क्वचित प्रसंगी, सेबोर्रोइक डर्माटिटिस ह्यासारखे गंभीर त्वचारोग होऊ शकतात आणि त्यामुळे टाळूला सूज येऊ शकते.

खाली आपण मुलांमध्ये डोक्यातील कोंडा होण्याच्या आणखी काही कारणांवर चर्चा करू.

मुलांच्या डोक्यात कोंडा होण्याचे कारणे

मुलांमध्ये डोक्यातील कोंडा होण्याची विविध कारणे खालीलप्रमाणे

. अयोग्य पद्धतीने केस धुणे

कधी कधी जेव्हा आपण मुलांचे केस धुतो तेव्हा त्वचेच्या मृत पेशी नीट स्वच्छ धुतल्या जात नाहीत. त्यामुळे टाळूवर ह्या मृत पेशी तशाच राहतात आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.

. कुपोषण

मुलांमध्ये कुपोषण हे डोक्यातील कोंडा होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. मुले पौष्टिक आहारापेक्षा स्नॅक्स किंवा जंक फूड खाण्यास प्राधान्य देतात त्यामुळे टाळूला खाज सुटून कोंडा होऊ शकतो.

. केसांच्या उत्पादनांविषयी संवेदनशीलता

काहीवेळा, तुम्ही केसांसाठी वापरत असलेली उत्पादने तुमच्या बाळासाठी योग्य नसतात. त्यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या उद्भवू शकते. उत्पादन बदलण्याचा प्रयत्न करा, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तसे करा.

. मालासेझिया

ही यीस्टसारखी बुरशी आहे, जेव्हा ती वेगाने वाढते तेव्हा पेशींची वाढ नीट होत नाही. यामुळे, त्यांच्या डोक्यात कोंडा होऊन खाज सुटते. मुलांमध्ये होणारे विशिष्ट आजार किंवा हार्मोनल बदल सामान्यत: अशा बुरशी उद्भवण्याचे कारण असते.

. सेबोर्रोहिक डरमाटिटिस

हा रोग एक्झिमा म्हणून देखील ओळखला जातो, ज्यामुळे त्वचेचा दाह होतो. या प्रकारची त्वचेची समस्या सहजपणे बरी होत नाही, परंतु मुलांच्या डोक्यातील कोंडा या स्थितीचा सौम्य प्रकार आहे.

मुलांमधील कोंड्याची चिन्हे आणि लक्षणे

मुलांमधील कोंड्याची लक्षणे आणि चिन्हे खालीलप्रमाणे

  • आपल्या मुलाच्या टाळू किंवा पोशाखांवर कोरडे पांढरे फ्लेक्स.
  • टाळूवर तेलकट त्वचेचे फ्लेक्स आढळणे.
  • टाळूवर सतत खाज सुटणे.
  • खाजवण्यामुळे किंवा जास्त कोंडा झाल्यामुळे टाळूवरील त्वचेवर लाल चट्टे आढळणे.

कोंड्यामुळे टाळूला इजा होऊ शकते का?

बहुतेक प्रकरणांमध्ये, डोक्यातील सौम्य कोंड्यामुळे तुमच्या मुलाची चिडचिड होते आणि टाळूच्या क्षेत्रावर जास्त परिणाम करत नाही. परंतु काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, सेबोर्रिक डार्माटायटीस, एक्जिमा, मालासेझिया किंवा सोरायसिस सारख्या समस्यांमध्ये टाळूचा भाग सुजतो आणि लाल होतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचाविकारतज्ज्ञांनाचा सल्ला घेतला पाहिजे.

लहान मुलांच्या डोक्यातील कोंड्यावरील उपचार

मुलांच्या डोक्यातील कोंड्यावरील उपचार

. औषधी शैम्पू वापरणे

औषधी शैम्पूचा वापर केल्याने मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कोंड्यावर उपचार होऊ शकतो. कुठल्याही शाम्पूची निवड करू नका, त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या ते तुमच्या मुलाच्या परिस्थितीवर आधारित प्रभावी औषधी शैम्पूची शिफारस करतील.

. सजलीत रहाणे

तुमच्या मुलांना शक्य तेवढे पाणी पिण्यास सांगा. जर ते स्वतःहून पाणी प्यायले नाहीत तर दररोजची नियमित गरज भागवण्यासाठी त्यांना मोजलेल्या प्रमाणात पाणी किंवा रस द्या. त्यांना हायड्रेट ठेवल्यास नक्कीच कोंडा कमी होऊ शकतो.

. शैम्पू करण्यापूर्वी केस विंचरणे

औषधी शैम्पूने स्वच्छ धुण्याआधी आपल्या मुलांचे केस व्यवस्थित विंचरून घ्या. केस विंचरल्याने काही प्रमाणात फ्लेक्स दूर करण्यास मदत होईल, जेणेकरून शाम्पू केल्यानंतर टाळूची स्वच्छता होण्यास मदत होईल.

शैम्पू करण्यापूर्वी केस विंचरणे

. स्वतंत्र कंगवे आणि टॉवेल्स वापरणे

तुमच्या मुलांसाठी स्वतंत्र कंगवे आणि टॉवेल्स ठेवा नाहीतर कोंडा वाढू शकतो.

. योग्य पोषण

कोंड्याच्या समस्येचा सामना करणार्‍या मुलांना हिरव्या पालेभाज्या देणे आवश्यक आहे. प्रथिने,कर्बोदके आणि इतर आवश्यक पौष्टिक द्रव्यांमुळे त्वचा ओलसर आणि निरोगी राहते त्यामुळे कोंडा कमी होतो किंवा पूर्णपणे नाहीसा होतो.

. टाळूवर तेल लावणे

तुमच्या मुलाच्या टाळूला नियमित किंवा दिवसाआड तेल लावा, कारण यामुळे टाळू ओलसर राहण्यास मदत होईल आणि अशा प्रकारे डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.

. कोणतीही हानिकारक केसांची उत्पादने लावू नका

मुले त्वचेच्या समस्येस सर्वात जास्त संवेदनशील असतात आणि त्याच कारणास्तव केसांना क्रीम किंवा जेल लावू नये कारण यामुळे डोक्यातील कोंडा किंवा केसांशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

. वारंवार शैम्पू करणे

एक दिवसाआड मुलांचे केस धुवा. वारंवार केस धुतल्यास धूळ दूर ठेवण्यास मदत होते , जे मुलांमध्ये कोंडा होण्याचे मुख्य कारण आहे. दररोज शैम्पू करण्याची शिफारस केली जात नाही.

वारंवार शैम्पू करणे

मुलांच्या कोंड्यावर घरगुती उपचार

मुलांच्या डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी घरगुती उपचारांचा समावेश आहे

. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा एक अविश्वसनीय स्क्रब म्हणून कार्य करते जे टाळूला उत्तेजन देण्यास मदत करते. आपल्या नियमित शैम्पूमध्ये आपल्याला थोडासा बेकिंग सोडा घालण्याची आवश्यकता आहे आणि धुण्यापूर्वी त्यास टाळूवर लावा.

. ट्री ऑइल

ट्री ऑइल मध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात, जे कोरड्या टाळूला आराम देण्यास मदत करतात. बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये ट्री ऑईलचे काही थेंब मिसळा आणि कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. अर्ध्या तासासाठी ते तसेच राहूद्या आणि मग टाळू पूर्णपणे स्वच्छ धुवा.

. दही

दह्यामुळे टाळू ओलसर आणि मऊ राहण्यास मदत होते. टाळूवर दही लावा आणि अर्धा तास ते तसेच राहूद्या आणि नंतर धुवून टाका.

. लिंबू

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते जे डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यास मदत करते. कापसाने टाळूवर लिंबाचा रस लावा आणि धुण्यापूर्वी अर्धा तास ठेवा.

. कडुनिंब

कोंड्यावर उपचार करण्यासाठी देखील कडुनिंब प्रभावी आहे. कडुलिंबाच्या रसामध्ये नारळ तेल मिसळा आणि टाळूवर व्यवस्थित मालिश करा.

. मेथी बियाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये अँटीफंगल आणि टाळूला आराम देणारे गुणधर्म असतात. किसलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट तयार करा आणि केस धुण्यापूर्वी टाळूवर लावा.

. कोरफड रस

कोरफड एक थंड घटक आहे. कोरफडीमध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात. रोपामधून थेट कोरफड जेल काढा आणि शैम्पू करण्यापूर्वी टाळूवर लावा.

. अंडी

अंडी देखील टाळू ओलसर ठेवण्यास मदत करतात. फक्त अंडी फेटून केस धुण्यापूर्वी टाळूवर लावा.

. ऍपल सायडर

ऍपल सायडर केसांचे छिद्र साफ करण्यास कार्यक्षम आहे. ऍपल सायडर सम प्रमाणात पाण्यात मिसळा आणि केस धुण्याआधी ते टाळूवर लावा.

१०. नारळ तेल

नारळ तेलामध्ये एंटीफंगल गुणधर्म असतात आणि ते टाळूवर मॉश्चरायझर म्हणून देखील कार्य करते. नारळाचे तेल थेट टाळूवर लावा आणि केस धुण्यापूर्वी थोडावेळ ठेवा.

११. पांढरे व्हिनेगर

पांढरे व्हिनेगर कोंड्याच्या समस्येवर उत्तम उपाय आहे. त्यामुळे बुरशीजन्य वाढ टळते आणि खाज सुटत नाही. आपल्या मुलांचे केस धुण्यासाठी पांढरे व्हिनेगर पाण्यात मिसळा.

१२. लसूण

लसणाच्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी त्याच्या बुरशीविरोधी गुणधर्मांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पाण्यात लसणाच्या पाकळ्या भिजवा आणि शैम्पू करण्यापूर्वी ते तुमच्या मुलांच्या टाळूवर लावा.

१३. लोणी

भरपूर लोणी घ्या आणि केसांवर चोळा. लोणी एक तासासाठी ठेवा. नंतर ते साध्या पाण्याने धुवा. हे डोक्यातील कोंडा विरघळवते आणि कोंडा दूर करते.

१४. आवळा

आवळा वाळवून घ्यावा आणि त्याची पेस्ट करून तुम्ही टाळूला लावू शकता. हे कार्यक्षमतेने केल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

आपल्या मुलांच्या टाळूमध्ये लालसरपणा किंवा रक्ताच्या गुठळ्या दिसू लागल्या, अत्यधिक खाज सुटत असल्यास आणि डोक्यात कोंडा झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे ठरते.

मुलांच्या केसांच्या कोंड्याच्या समस्येविषयी तथ्ये आणि उपचारांविषयी आता तुमच्याकडे बरीच माहिती आहे. त्यामुळे तुमच्या मुलाच्या केसातील कोंड्याशी तुम्हाला सामना करता येईल. थोडीशी काळजी आणि स्वच्छता ठेवल्यास डोक्याची त्वचा आणि केस निरोगी राहतील.

आणखी वाचा:

मुलांमधील उष्माघाताची ६ लक्षणे आणि तो कसा टाळावा?
एचएफएमडी (HFMD: Hand Foot Mouth Disease) साठी परिणामकारक २० घरगुती उपाय

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article