Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे

मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे

मुलांचे जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे

वैद्यकीय ज्ञान नसलेल्या पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याच्या समस्या ओळखणे कठीण आहे. ताप आणि खोकल्याची लक्षणे सहजपणे लक्षात येण्यासारखी असतात. परंतु आपले मूल डोळे मिचकावत असल्यास ते लक्षात येत नाही

जास्त डोळे मिचकावणे म्हणजे काय?

ताणापासून संरक्षण करण्यासाठी डोळे मिटले जातात. एक मूल सरासरी ३ १७ वेळा प्रति मिनिट डोळे मिटते. ह्यापेक्षा अधिक वेळा तुमचे मूल डोळ्यांची उघडझाप करीत असेल तर ते अस्वस्थतेचे किंवा डोळ्यांच्या समस्येचे लक्षण असू शकते. डोळ्यांची जास्त वेळा उघडझाप ही अनेक कारणांमुळे होऊ शकते चेहऱ्याचे स्नायू ताणले जाणे ते डोळ्यांचा कोरडेपणा इथपर्यंत अनेक कारणे त्यामागे असू शकतात.

डोळे अति प्रमाणात मिचकवण्याची कारणे

डोळे अति प्रमाणात मिचकवण्याची कारणे

तुमचे मूल खालील कारणांमुळे डोळे जास्त प्रमाणात मिचकावत असेल

  • चेहऱ्याचे स्नायू आखडणे

चेहऱ्याचे स्नायू आखडल्यामुळे मूल जास्त प्रमाणात डोळे मिचकावते. मुलाच्या डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंवर त्यामुळे परिणाम होतो. तापट मुलांच्या बाबतीत असे होण्याची शक्यता जास्त असते. जर असे झाले तर तुमच्या मुलाच्या वर्तणुकीबाबत तुमच्या मुलाच्या मानसशास्त्रज्ञांशी बोला.

  • दूरचे अंधुक दिसणे अंधुक दिसणे

जास्त डोळे मिचकावण्यामागील सामान्य कारण म्हणजे दूरचे अंधुक दिसणे. एखाद्या नेत्रतज्ञास भेट द्या आणि आपल्या मुलाचे डोळे तपासून घ्या.

  • ऍलर्जी

जर तुमचे मूल जास्त प्रमाणात डोळे मिचकावत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल किंवा स्त्राव येत असेल तर ते ऍलर्जीचे लक्षण असू शकते.

  • कोरडेपणा

जेव्हा तुमच्या मुलाचे डोळे कोरडे पडलेले असतील तेव्हा तो जास्त प्रमाणात डोळे मिचकावेल. तसेच तुमचे बाळ डोळे चोळत नाही ना ह्याकडे लक्ष द्या. डोळ्यांचा चिडचिडेपणा कमी होण्यास मदत करण्यासाठी डॉक्टर सहसा डोळ्यात घालण्याचे थेंब लिहून देतात.

  • ताण

डोळ्यावर जास्त ताण आल्यामुळे सुद्धा मुले जास्त प्रमाणात डोळे मिचकावतात. कमी प्रकाशात वाचणे, जास्त प्रमाणात स्क्रीन समोर वेळ घालवणे आणि झोपेचा अभाव यामुळे ताण येऊ शकतो.

  • ओसीडी

ऑब्सिझिव्हकॉम्प्लेसिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) ही एक मानसिक स्थिती आहे जी बर्‍याच मुलांमध्ये आढळते आणि तिचे निदान केले जात नाही. ही मानसिक स्थिती असल्यास डोळे जास्त प्रमाणात मिचकावले जातात किंवा चेहऱ्यावरचे स्नायू ताणले जातात.

  • ब्लेफेरिटिस

ब्लेफेरायटीस म्हणजे पापण्यांना होणारा एक जिवाणू संसर्ग आहे. मुले जास्त प्रमाणात डोळे मिचकावण्याचे हे एक कारण आहे

जास्त डोळे मिचकावण्याचे निदान

जास्त वेळा डोळे मिचकावण्याच्या परिस्थितीचे निदान नियमित शारीरिक तपासणीद्वारे केले जाऊ शकते. जर त्यामागील कारण डोळ्याच्या शक्तीचे असंतुलन असेल तर आपल्या मुलास चष्मा लागण्याची आवश्यकता असू शकते. ही मानसिक समस्या असल्यास, आपल्या मुलास नियमित सत्रासाठी एखाद्या थेरपिस्टकडे जाण्याची आवश्यकता असू शकते.

डोळ्यांचे अतिप्रमाणात मिचकवण्यावर उपचार

डोळ्यांचे अतिप्रमाणात मिचकवण्यावर उपचार

मुलांच्या डोळे मिचकावण्यावर उपचार करण्याचे अनेक मार्ग आहेत. निदानाच्या आधारे,वेगवेगळ्या उपचारांचा त्यामध्ये समावेश होतो

  • डोळ्यांमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी किंवा सूज घालवण्यासाठी डोळ्यात घालायचे थेंब
  • चष्मा
  • मानसशास्त्रीय थेरपी
  • अँटीहिस्टामाइन्स

अधिक उपचारांच्या योजना आणि माहितीसाठी नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधा.

आपल्या मुलाला डोळे मिचकावण्यापासून कसे प्रतिबंधित करावे

आपण विचारात घ्याव्यात अशा काही टिप्स येथे आतः

  • तुमच्या मुलाच्या डोळ्यांचे रक्षण करा

संरक्षक चष्मा वापरुन आपल्या मुलाच्या डोळ्यांना धूळ, सूर्यप्रकाश आणि इतर त्रासदायक घटकांपासून संरक्षण मिळेल.

  • डोळे कोरडे होण्यापासून रोखणे

ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स असलेले अन्नपदार्थ अश्रू ग्रंथींना उत्तेजित करून आणि जळजळ कमी करून डोळ्यांमधील कोरडेपणा प्रतिबंधित करतात.

  • ताण व्यवस्थापित करा

ध्यान, विश्रांती आणि योग यासारख्या क्रियाकलापांसह आपल्या मुलाचा शैक्षणिक ताण व्यवस्थापित करण्यात मदत करा.

  • निरोगी आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करा

आपल्या मुलास पौष्टिक आहार खाण्यास आणि भरपूर पाणी प्यायला लावा. असे केल्यास त्याच्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होईल.

  • मुलाचे डोळे स्वच्छ ठेवा

आपल्या मुलाला स्वच्छ पाण्याने वारंवार आपले डोळे धुण्यास सांगा, विशेषत: बाहेरून आल्यावर हे जरूर करण्यास सांगा.

  • प्रकाशाकडे लक्ष द्या

तुमचे मूल चांगला प्रकाश असलेल्या खोलीमध्ये वाचत आहे, टी. व्ही. बघत आहे किंवा संगणकावर काम करीत आहे हे सुनिश्चित करा.

  • तुमच्या मुलाला पुरेशी विश्रांती द्या

तुमचे मूल दिवसा ८१० तास झोपत असल्याची खात्री करा.

  • तुमचे मूल स्क्रीन समोर किती वेळ घालवते ह्याकडे लक्ष द्या

आपल्या मुलाने टीव्ही किंवा आपला मोबाइल पाहण्यात घालवलेल्या वेळेचे परीक्षण करा.

  • खेळायला परवानगी द्या

तुमचे मूल करीत आहे ह्या कडे लक्ष द्या

धोक्याची चिन्हे काय आहेत?

धोक्याची चिन्हे काय आहेत?

मुलांनी जास्त प्रमाणात डोळे मिचकावणे प्राणघातक नाही. तुम्हाला खालील चिन्हे आढळल्यास तुमच्या मुलास त्वरित डॉक्टरकडे घेऊन जा.

  • तुमचे मूल वारंवार डोळे चोळते
  • सकाळी उठल्यावर डोळे उघडण्यासाठी ते धडपडत असते
  • एका हाताच्या अंतरावरील काही वाचायचे झाल्यास डोळे तिरळे करते
  • त्याचे डोळे बरेचदा लाल असतात
  • तुमचे मूल प्रति मिनिट १७ पेक्षा जास्त वेळा डोळे मिचकावते.
  • तुमच्या मुलाला वारंवार राग येतो
  • ते घाबरून जाते आणि खोलीत सर्व काही व्यवस्थित नसल्यास शांत बसू शकत नाही

मुलांची दर ३४ महिन्यांनी डोळ्यांची तपासणी केली पाहिजे. जर तुमच्या मुलाला चष्मा असेल तर नेत्रतज्ञांना भेट द्या आणि दर ३ महिन्यांनी नवीन चष्मा खरेदी करा.

तुमचे मूल जास्त प्रमाणात डोळे मिचकावत असल्यास घाबरू नका. ते सौम्य किंवा गंभीर असो, आपल्या बालरोगतज्ञांच्या सूचनांचे अनुसरण करा आणि बदलांसाठी आपल्या मुलाचे बारकाईने निरीक्षण करा. आपण स्वत: औषधोपचार करू नये किंवा स्वत: हून त्याचे निदान करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टरांच्या भेटी चुकवू नका आणि त्यांच्या सूचनांचे अनुसरण करा.

आणखी वाचा:

मुलांच्या तोंड येण्याच्या (तोंडातील अल्सर) समस्येवर ११ घरगुती उपचार
मुलांच्या केसात कोंडा होण्याची समस्या कशी हाताळावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article