Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home मोठी मुले (५-८ वर्षे) आरोग्य काळजी तुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणाला उशीर करावा का?

तुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणाला उशीर करावा का?

तुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणाला उशीर करावा का?

सर्व पालक आपल्या मुलाचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. लसीपासून बचाव करण्यायोग्य आजारांना दूर ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरणाचे वेळापत्रक पाळणे हा आहे. जगाच्या विविध भागात लसीकरणाचे वेळापत्रक भिन्न असू शकते. लसीकरणाचे वेळापत्रक त्या भागात आढळणारे विविध प्रकारचे संक्रमण, रोग आणि इतर आजारांच्या संवेदनक्षमतेवर अवलंबून असते. जीवघेणा रोग रोखण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तथापि, काहीवेळा पालक काही कारणास्तव काही लसी देण्यास उशीर करू शकतात किंवा वगळू शकतात. असो, जर तुम्हाला, आपल्या मुलाला वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे का?, लसीकरणाच्या वेळापत्रकात उशीर करण्यास काही गुंतागुंत होऊ शकते का ?,पालक लस देण्यासाठी टाळाटाळ का करतात ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर पुढील लेखात त्याविषयी चर्चा केली आहे. ह्या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास हा लेख वाचा!

पालक लसीकरण करण्यास उशीर का करतात?

लहान मुलांमधील जीवघेणे संक्रमण आणि आजार रोखण्यासाठी, लस आयुष्य वाचवण्याचे काम करू शकते आणि  असे असले तरी काही पालक लसीकरणाला उशीर का करतात? पालक काहीवेळा उशीरा लसीकरण का करतात याची काही कारणे येथे आहेतः

१. मागील लसीवर प्रतिक्रिया

कधीकधी बाळांना लसीमुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते. मागच्या वेळेसारखी गुंतागुंत टाळण्यासाठी पालक तशा प्रकारची लस किंवा लसीचा भाग घेण्याचे टाळतात.

२. लसीची सुरक्षितता

बहुतेक पालकांना आपल्या मुलासाठी असलेल्या लसीच्या सुरक्षिततेबद्दल खात्री नसते. ऍलर्जी, सर्दी किंवा अशा प्रकारच्या इतर वैद्यकीय समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुलांच्या बाबतीत ही शंका जास्त वाटू शकते.

३. फुफ्फुसातील संसर्ग किंवा दम्याने ग्रस्त मुले

फुफ्फुसातील संसर्ग किंवा दम्याने ग्रस्त मुलांना फ्लूची लस देणे महत्वाचे आहे कारण फ्लूची लक्षणे अशा परिस्थितीस तीव्र बनवू शकतात. तथापि, पालक फ्लूची नाकातून घ्यायची लस टाळू शकतात कारण ह्या लशीमध्ये कमकुवत जिवंत विषाणू असू शकतात.

४. जर मूल स्टिरॉइड घेत असेल तर

दम्यासारख्या काही विशिष्ट आरोग्यविषयक समस्यांसाठी, सामान्यत: कमी कालावधीसाठी तसेच स्थिती नियंत्रित करण्यासाठी स्टिरॉइड्सचा एक उच्च डोस देणे आवश्यक असते. स्टिरॉइड्सचे दुष्परिणाम कमी होईपर्यंत मुलास काही आठवडे  लस घेण्यासाठी थांबणे आवश्यक असते कारण विषाणूच्या संसर्गाचा  सामना करण्यासाठी स्टिरॉइड्स मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीला बाधा आणू शकतात. तथापि, स्टिरॉइड्सची कमी डोस असलेली औषधे या लसींमध्ये अडथळा आणू शकत नाहीत.

५. जर मूल एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर

एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या मुलांना त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होत नाही तोपर्यंत लस दिली जाऊ  शकते.  तथापि, पालकांनी त्यांच्या एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलाच्या टी-सेल मर्यादेविषयी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, याचा अर्थ असा की जर ते स्वीकार्य मर्यादेपर्यंत असतील तर थेट जिवाणूची औषधे दिली जाऊ शकतात परंतु जर ते मर्यादेपेक्षा कमी असतील तर तसे केले जाऊ शकत नाही.

६. जर मूल केमोथेरपी घेत असेल तर

केमोथेरपी घेणाऱ्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झालेली असते आणि अशा मुलांना थेट लस देणे फायदेशीर ठरणार नाही.

७. जर मुलास ताप आला असेल तर

अनेकदा पालक आपल्या मुलास १०१ अंश किंवा जास्त ताप असल्यास लस देणे टाळतात. कारण ताप नेहमीच्या संसर्गामुळे किंवा लसच्या दुष्परिणामांमुळे आहे हे कळणे कठीण होते..

८. जर मुलास अंड्यांची ऍलर्जी असेल तर

गोवर आणि फ्लूची लस अंड्याच्या कवचामध्ये विकसित केली जाते. ही लस देणे पूर्णपणे सुरक्षित आहे कारण डॉक्टर ऍलर्जीचा घटक विचारात घेऊ शकतात आणि गुंतागुंत टाळण्यासाठी ह्या लसीचा लहान डोस  देतात. परंतु काहीवेळा पालक आपल्या मुलांमध्ये ऍलर्जिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी ही लस देणे टाळू शकतात.

मुलाच्या लसीकरणात विलंब होण्याची संभाव्य जोखीम

मुलाच्या लसीकरणात विलंब होण्याची संभाव्य जोखीम

रोग प्रतिबंधक आणि जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हे आपल्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ठ आहे. जन्मापासून ते किशोरवयापर्यंत, पालकांनी आपल्या मुलाच्या लसीकरण वेळापत्रकावर लक्ष  ठेवताना काळजी घ्यावी. कधीकधी लसीकरणाच्या वेळापत्रकात उशीर झाल्यास आपल्या मुलांनाच नव्हे तर आसपासच्या लोकांना देखील त्याचा धोका उद्भवू शकतो. लस उशिरा दिल्यास उद्भवू शकणारी गुंतागुंत इथे दिलेली आहे.

१. मुलाला धोका वाढू शकतो

अर्भके आणि मुलांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात असुरक्षित अवस्थेत जास्तीत जास्त प्रतिकारशक्ती प्रदान केली जाईल अशा पद्धतीने लसीकरणाचे वेळापत्रक तयार केलेले असते. लस देण्यास कोणताही विलंब झाल्यास त्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका वाढू शकतो.

  • मेनिनजायटीस, यामुळे मेंदूचे कायमस्वरुपी नुकसान किंवा बहिरापणा येऊ शकतो
  • पोलिओ, ज्यामुळे कायम पक्षाघात होऊ शकतो
  • गोवर, ज्यामुळे मेंदूत सूज येते आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यू देखील होतो

२. इतरांना धोका निर्माण होणे

आपल्या मुलाचे लसीकरण न घेतल्याने केवळ आपल्या मुलाच्या आरोग्यास नव्हे तर आजूबाजूच्या खालील प्रकारच्या लोकांना पण धोका निर्माण होऊ शकतो

  • नवजात बाळांना, ज्यांना बर्‍याच लसी मिळाल्या नाहीत
  • वृद्ध, ज्यांना विशिष्ट रोगांमुळे गुंतागुंत होण्याचा धोका असू शकतो
  • ज्या लोकांची औषधे घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते किंवा आरोग्याच्या काही जटिल समस्या असतात

३. इतर जोखीम

येथे आपल्या मुलास धोका होऊ शकतो अशी काही बाबी खालीलप्रमाणे

  • धनुर्वाताची लस ही केवळ प्रतिबंधात्मक लस आहे. कारण धनुर्वाताचा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होत नाही. याचाच अर्थ या प्रकरणात हर्ड इम्युनिटी काम करीत नाही. जर बाळाचे लसीकरण केले गेले नाही तर त्याचा धोका वाढतो. लहानसे कापले गेले किंवा जखम झाली तरी ती प्राणघातक ठरू शकते.
  • इतर देशांमध्ये प्रवास करताना तुमच्या मुलास लसीपासून बचाव होऊ शकतो अशा रोगांचा धोका वाढतो.
  • लसीपासून बचाव करण्यायोग्य रोगांचा संसर्ग पसरल्यास तुम्हाला तुमच्या मुलाचे एक्स्पोजर कमी करावे लागेल आणि त्याचा उद्रेक कमी होईपर्यंत त्याला कित्येक आठवडे शाळेत जाणे थांबवावे लागेल.

सामान्य प्रश्न

पालकांना त्यांच्या मुलांचे लसीकरण वेळापत्रक आणि इतर संबंधित बाबींविषयी बरेच प्रश्न असतात. आम्ही या विभागात वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे

१. लसीकरणास विलंब होण्याचे कोणते फायदे आहेत?

लहान मुलांचे लसीकरण टाळण्यास विलंब करण्याचा संभाव्य फायदा म्हणजे फक्त लस देताना होणाऱ्या वेदनांपासून वाचवणे हा असू शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या लसीकरणास विलंब करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्या मुलाला जीवघेणा रोग आणि संसर्ग होण्याच्या संभाव्य धोक्याला तोंड द्यावे लागेल.

२. मी माझा बाळाला काही लसी देण्यास का विलंब करू शकत नाही?

गंभीर आजार होण्यास अर्भके आणि लहान मुले फारच संवेदनशील असतात, ज्यामुळे त्यांना रूग्णालयात भरती केले जाऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूही होऊ शकतो. जर तुम्ही लस देण्यास विलंब करण्याचा विचार करीत असल्यास तर तुम्ही तुमच्या मुलास असुरक्षित ठेवल्याने प्राणघातक रोग आणि संक्रमण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

३. मी बाळाला स्तनपान करीत असले तरी सुद्धा त्यास वेळेवर लस देणे आवश्यक आहे का?

यात काही शंका नाही की स्तनपान केल्याने आपल्या बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तथापि, आईचे दूध सर्व प्रकारचे संसर्ग आणि रोगांपासून प्रतिकारशक्ती प्रदान करत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या बाळाला जीवघेण्या रोगांपासून संरक्षण देण्यासाठी तसेच रोगांपासून दीर्घकालीन संरक्षण प्रदान करण्यासाठी लस महत्त्वाची आहे.

४. माझा मुलगा अद्याप डे केअरला जात नसल्यामुळे मी माझ्या मुलाचे लसीकरण करून घेण्यास विलंब करू शकते का?

अजिबात नाही, कारण तुमचे मूल घरी आहे किंवा डेकेअर मध्ये आहे ह्याने काही फरक पडत नाही, परंतु त्याला कोणाकडूनही किंवा कोठूनही संसर्ग होऊ शकतो. जीवघेणा रोग रोखण्यासाठी, आपल्या मुलाचे  शिफारस केलेल्या अनुसूचीनुसार प्रतिबंधात्मक-रोगांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करा.

५. वैकल्पिक लसीकरण वेळापत्रक सीडीसीने मंजूर केले आहेत का?

लसीमध्ये अंतर ठेवणे किंवा उशीर करणे ही एक वैयक्तिक निवड आहे. बहुतेक पालक एकदा दवाखान्यात गेल्यावर एकाच वेळी किंवा कमी कालावधीत जास्त लसी देणे टाळतात. तथापि सीडीसी ने मंजूर केलेल्या वेळापत्रकाव्यतिरिक्त कुठलेही वैकल्पिक लसीकरण वेळापत्रक नाही.

६. मी माझ्या बाळाला लस दिली नाही परंतु आता माझा विचार बदलला आहे. काय करावे?

चांगली बातमी अशी आहे की जर मुलास लस देण्याबाबत आपला विचार बदलला तरी हरकत नाही, लस देण्यास उशीर झालेला नाही. शक्य तितक्या लवकर आपल्या मुलास जास्तीत जास्त संरक्षण प्रदान करण्यासाठी आपले आरोग्य सेवा प्रदाता आपल्या मुलाचे लसीकरण वेळापत्रक तयार करण्यास मदत करू शकतील.

७. जर माझ्या बाळाला सर्दी किंवा ताप येत असेल किंवा ते अँटिबायोटिक्स घेत असेल तर माझ्या बाळाला लसीकरण करता येईल का?

होय, नक्कीच! जर आपल्या मुलास कमी ताप येत असेल किंवा तो प्रतिजैविक औषध घेत असेल तर त्याचे लसीकरण करण्यात कोणतीही अडचण नाही. तुम्हाला ह्याबाबतीत काही शंका असल्यास किंवा त्याबद्दल काही चिंता वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता.

८. माझ्या मुलाचे लसीकरण चुकल्यास माझ्या बाळाला पुन्हा लस सुरू कराव्या लागतील का?

नाही, आपल्याला पुन्हा लस शेड्यूल पुन्हा सुरू करण्याची गरज नाही. आपण जी लस चुकवली आहे तिथून प्रारंभ करू शकता. तथापि, चांगले संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही निर्धारित वेळापत्रकांचे पालन करणे महत्वाचे आहे.

ठराविक प्राणघातक संसर्ग आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी लस घेणे हा उत्तम मार्ग आहे. लसीकरण वेळापत्रकात विलंब करण्याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोला.

आणखी वाचा: लसीकरणानंतर बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी काही टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article